Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, June 12, 2021

इतिहास प्रश्न

इतिहास प्रश्न

इतिहासातील महत्वाच्या घटना

क्र

घटनेचे नाव

वर्ष

विशेष

1.

प्लासीची लढाई

1757

सिराज उधौला व इंग्रज

2.

भारताकडे येण्याचा सागरी मार्ग

1498

वास्को-द-गामा

3.

वसईचा तह

1802

इंगज व पेशवे

4.

बस्कारची लढाई

1764

शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज

5.

सालबाईचा तह

1782

इंग्रज व मराठे

6.

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध

1818

दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट

7.

अलाहाबादचा तह

1765

बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी

8.

तैनाती फौज (सुरवात)

1797

गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी

9.

दुहेरी राज्यव्यवस्था

1765

रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)

10.

रेग्युलेटिंग अॅक्ट

1773

बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.

11.

सतीबंदीचा कायदा

1829

बेटिंग

12.

भारतात इंग्रज सत्तेची सुरवात

1835

लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले

13.

रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे)

1853

लॉर्ड डलहौसी

14.

भारतातील पहिली कापड गिरणी

1853-54

काउसजी

15.

पहिली ताग गिरणी

1855

बंगालमधील रिश्रा

16.

विधवा पुनर्विवाह कायदा

1856

लॉर्ड डलहौसी

17.

विद्यापीठांची स्थापना

1857

मुंबई,मद्रास,कोलकाता

18.

1857 चा कायदा

1857

भारतमंत्री पदाची निर्मिती

19.

राणीचा जाहिरनामा

1 नोव्हेंबर 1858

लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला

20.

वुडचा खलिता

1854

वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात

21.

1861 चा कायदा

1861

भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी

22.

दख्खनचे दंगे

1875

महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन

23.

शेतकर्‍याचा उठाव

1763 ते 1857

बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला</td>

24.

हिंदी शिपायांचा उठाव

1806

वेल्लोर येथे झाला

25.

हिंदी शिपायांचा उठाव

1824

बराकपूर

26.

उमाजी नाईकांना फाशी

1832

27.

संस्थाने खालसा

1848 ते 1856

डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)

28.

मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली

29 मार्च 1857

बराकपूरच्या छावणीत

29.

1857 च्या उठावाची सुरवात

10 मे 1857

'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू

30.

भिल्लाचा उठाव

1857

खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली

31.

गोंड जमातीचा उठाव

-

ओडिशा

32.

संथाळांचा उठाव

-

बिहार

33.

रामोशांचा उठाव

-

उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली

34.

गडकर्‍याचा उठाव

-

कोल्हापूर

35.

कोळी व भिल्लाचा उठाव

-

महाराष्ट्र

36.

1857 च्या उठावाचे नेतृत्व

-

बहादुरशाह

37.

भारतातील पहिली कामगार संघटना

1890

नारायण मेघाजी लोखंडे

38.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा

1882

लॉर्ड रिपन

39.

हंटर कमिशन

1882

भारतीय शिक्षणविषयक आयोग

40.

भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली

1878

लॉर्ड लिटन

41.

भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली

1882

लॉर्ड रिपन

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव

क्र

उठावाचे नाव

वर्ष

प्रांत

नेतृत्व

1.

संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

2.

चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला

3.

हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंगभूम

-

4.

जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधू

5.

खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई

6.

संथाळांचा उठाव

1855

-

कान्हू व सिंधू

7.

खासींचा उठाव

1824

आसाम

निरतसिंग

8.

कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर

-

9.

दक्षिण भारतातील उठाव

-

-

-

10.

पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास

-

11.

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर

-

12.

विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर

-

13.

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर

-

14.

रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड

-

15.

रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

16.

भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824

-

-

17.

केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर

-

18.

फोंडा सावंतचा उठाव

1838

-

-

19.

लखनऊ उठाव

-

-

-

20.

भिल्लाचा उठाव

1825

खानदेश

21.

दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

 

समाजसुधारक व त्यांची ग्रंथसंपदा / पुस्तके

क्र.

समाजसुधारकांची नावे

ग्रंथसंपदा / पुस्तके

1.

महात्मा फुले

1.    1855 तृतीयरत्न

2.    1869 छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा

3.    1869 ब्राह्मनांचे कसब

4.    1873 गुलामगिरी

5.    1883 शेतकर्‍यांचा आसूड

6.    1885 सत्सार

7.    1885 इशारा

8.    1811 सार्वजनिक सत्यधर्म

2.

सावित्रीबाई फुले

1.    बावनकोशी सुबोध रत्नाकर

3.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1.    द अनटचेंबल्स

2.    थॉटस ऑफ पाकिस्तान

3.    हू वेअर शुद्राज

4.    बुद्ध अँड हिज धम्म

5.    रिड्ल्स इन हिंदूइझम

6.    द प्रॉब्लेम ऑफ रूपी

4.

गोपाल गणेश आगरकर

1.    कॉस्ट इन इंडिया

2.    डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस

3.    विकारविलसित

5.

महर्षी धोंडो केशव कर्वे

1.    आत्मवृत

6.

राजा राममोहन रॉय

1.    वेदांतसार

2.    तूहफत-उल-मुवाउद्दीन(एकेश्चवादाना नजराणा)

7.

महात्मा गांधी

1.    माझे सत्याचे प्रयोग

8.

विवेकानंद

1.    आय एम सोशॉलिस्ट

9.

स्वामीदयानंद सरस्वती

1.    सत्यार्थी प्रकाश

2.    वेदभाष्य

3.    संस्कारनिधी

4.    व्यवहार भानू

10.

दादाभाई नौरोजी

1.    पाव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया

11.

नेताजी सुभाषचंद्र बोस

1.    द इंडियन स्ट्रगल

12.

पं. जवाहरलाल नेहरू

1.    डिस्कव्हरी ऑफ इंडिया

13.

लाला लचपतराय

1.    अनटॅपी इंडिया

2.    द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट

14.

अरविंद घोष

1.    मानवी एक्याचे ध्येय

15.

इंदिरा गांधी

1.    इनटरनल इंडिया

16.

न्या. महादेव गोविंद रानडे

1.    मराठी सत्तेचा उदय

17.

तुकडोजी महाराज

1.    ग्रामगीता

18.

आचार्य विनोबा भावे

1.    गिताई

2.    स्वराज्यशस्त्र

19.

दादोबा
पांडुरंग तर्खडकर

1.    धर्मविवेचन परमहांसिक ब्राम्हधर्म (काव्य संग्रह) यशोदा पांडुरंग

20.

महर्षी वि.रा.शिंदे

1.    माझ्या आठवणी व अनुभव

2.    अनटचेबल इंडिया

3.    भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न

21.

आचार्य
बाळशास्त्री जांभेकर

1.    संध्येचे भाषांतर

22.

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

1.    हिंदूस्थानाचा इतिहास

2.    लक्ष्मीज्ञान

3.    ग्रामरचना

23.

पंडिता रमाबाई

1.    द हाय कास्ट हिंदू वुमन

24.

लोकमान्य टिळक

1.    ओरायन

2.    गीतारहस्य

3.    आर्य कोण होते

25.

बाबा पदमजी अरुणोद्य

1.    यमुनापर्यटन

2.    नवा करार

26.

साने गुरुजी

1.    श्यामची आई

2.    सुंदर पत्रे,

3.    पणती, गोड गोष्टी

4.    पक्षी 

5.    श्याम

27.

विष्णुशास्त्री चिपळूणकर

1.    आमच्या देशांची स्थिती

28.

विनायक 
दामोदर सावरकर

1.    कमला

2.    काळेपाणी

3.    सन्यस्त खडग,

4.    भारतीय स्वातंत्र्य समर

5.    गोमंतक

29.

रा.गो भांडारकर

1.    दख्खन प्राचीन इतिहास

30.

बाबा आमटे

1.    माती जागविला त्याला मत

2.    ज्वाला आणि फुले


प्रसिद्ध व्यक्तींची मूळ नावे

व्यक्ति

मूळ नावे

स्वामी विवेकानंद

नरेंद्र दत्त

स्वामी दयानंद सरस्वती

मुळशंकर तिवारी

म. गांधी

मोहनदास करमचंद गांधी

मानवेंद्रनाथ रॉय

नरेंद्र भट्टाचार्य

स्वामी श्रद्धानंद

लाल मुन्शीराम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमराव रामजी सपकाळ

राजर्षी शाहू महाराज

यश वंत

लोकमान्य बाळगंगाधर टिळक

केशव

अण्णा हजारे

किसन बाबुराव हजारे 

 

भारतातील सर्वात पहिली महिला

भारताची पहिली महिला राष्ट्रपती व सुप्रिम कमांडर/तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख 

श्रीमती प्रतिभाताई पाटील

भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका        

आशापूर्णा देवी

भारतातील प्रथम महिला भारतरत्न            

इंदिरा गांधी

भारतातील प्रथम महिला राज्यपाल            

सरोजीनी नायडू

भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर)         

मीरा कुमार

भारताची पहिली महिला स्पीकर (विधानसभा)            

सुशीला नायर

राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा         

सरोजीनी नायडू

भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला        

आरती शहा

भारतातील प्रथम महिला पंतप्रधान            

इंदिरा गांधी

एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिला         

बचेंद्री पाल

भारतातील प्रथम महिला बॅरिस्टर             

कार्नलिया सोराबजी

भारतातील प्रथम महिला कुलपती             

सरोजीनी नायडू

भरतातील पहिली भारतीय डॉक्टर            

डॉ. कादम्बनी गांगुली

भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत        

सी.बी. मुथाम्मा

भारतातील प्रथम महिला महापौर            

अरुणा आसफ अली

भारतातील प्रथम महिला आय.ए.एस.            

अन्ना राजम जॉर्ज

भारतातील प्रथम महिला राजदुत            

विजयालक्ष्मी पंडित

भारतातील प्रथम महिला आय.पी.एस.             

किरण बेदी

भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्री             

सुचेता कृपलानी

भारतातील कॉँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा            

अॅनी बेझंट

भारतातील दादासाहेब फाळके पारितोषिक विजेती पहिली महिला     

देवीकाराणी

जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला         

उज्वला रॉय

सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश         

न्या.फातीमाबिबी

भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्री             

देवीकाराणी

भारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर     

आनंदीबाई जोशी

युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा         

विजयालक्ष्मी पंडित

भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला        

मदर तेरेसा

भारतातील पहिली महिला अंतरराळवीर           

कल्पना चावला

पहिली भारतीय महिला क्रांतिकारक            

मॅडम भिकाजी कामा

पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल             

पद्मावती बंडोपाध्याय

एम.ए.ची पदव्युत्तर पदवी मिळविणारी पहिली महिला         

चंद्रमुखी बोस

योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष             

इंदिरा गांधी

केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला         

राजकुमारी अमृतकौर

युनोमध्ये नागरी पोलिस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिला     

किरण बेदी

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविणारी पहिली भारतीय महिला    

न्या. लैला शेठ

दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती        

रझिया सुलताना

अमेरिकी राज्याच्या प्रतिनिधीगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला     

स्वाति दांडेकर (आयोवा राज्य अमेरिका)

विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला         

सुष्मिता सेन

जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला        

रिटा फॅरिया

भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव             

चोकीला अय्यर

पॅराशूट जंप (उडी) झेप घेणारी पहिली भारतीय महिला        

गीता चंद्र

पहिली महिला वैमानिक                 

प्रेम माथूर

एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला         

गीता चंद्र

पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर             

एस. विजयालक्ष्मी

रॅमन मॅगसेस पारितोषिक मिळवणारी पहिली महिला        

कमलादेवी चट्टोपाध्याय

भारताच्या 13 लाख जवान असलेल्या संरक्षण दलात पहिली महिला जवान     

शांती टिग्गा (सप्टेंबर 2011)

भारतातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य नेहरू पारितोषिक विजेती पहिली महिला     

मदर तेरेसा

भारताच्या अग्निशामक दलातील पहिली महिला अधिकारी         

हर्षींनी कानेकर

पाचही खंड पोहून जाणारी पहिली महिला             

बुला चौधरी

भारतातील एखाधा राज्याची पहिली महिला पोलिस महासंचालक       

कांचन चौधरी (भट्टाचार्य) (उत्तरांचल प्रदेश)

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार्‍या पहिल्या भारतीय महिला     

कॅ. लक्ष्मी सहगल

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा     

कुसुमावती देशपांडे

बूकर पुरस्कार मिळवणारी पहिली महिला             

अरुंधती रॉय

ऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली महिला         

सायना नेहवाल

साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला         

अमृता प्रीतम

 

1857 च्या पूर्वीचे उठाव ईतिहास

1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857):

आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)

·         गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.

·         बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.

·         शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.

·         शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

हटकरांचा उठाव - मराठवाड्यात

·         नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.

·         नेता - नौसोजी नाईक

·         प्रमुख ठाणे - नोव्हा

·         ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  

खानदेशातील भिल्लाचा उठाव

·         भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.

·         नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल

·         भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.


खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

·         1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.

·         भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  

·         बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

काजरसिंग नाईकचा उठाव:

·         1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.

·         पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.

·         ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

·         1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

महाराष्ट्रातील समाजसुधारक - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

जन्म - 14 एप्रिल 1891 महूमध्यप्रदेश.

मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.

 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.

1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.

हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.

सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.

आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.

संस्थात्मक योगदान :

·         1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.

·         1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.

·         20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.

·         25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.

·         2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)

·         24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.

·         1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.

·         ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.

·         1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.

·         1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.

·         मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.

·         20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.

आंबेडकरांचे लेखन :

·         The Problem Of Rupee

·         1916 - Cast In India

·         1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)

·         1946 - The Untouchables

·         1956 - Thoughts on pakisthan.

·         1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.

·         'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.

·         1920 - मुकनायक.

·         1927 - समता.

·         1946 - Who Were Shudras?

वैशिष्ट्ये :

गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.

1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.

1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.

1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.

29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.

1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.

14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

महाराष्ट्रातील समाजसुधारक - आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे

जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).

मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.

आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.

भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.

संस्थात्मक योगदान :

·         1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.

·         संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.

·         18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.

·         कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.

आचार्य यांचे लेखन :

·         1923-महाराष्ट्र धर्म मासिक.

·         गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.

·         मधुकर(निबंधसंग्रह)

·         गीता प्रवचने.

·         'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.

·         विचर पोथी.

·         जीवनसृष्टी.

·         अभंगव्रते.

·         गीताई शब्दार्थ कोश.

·         गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.

वैशिष्टे :

·         वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.

·         गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.

·         चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.

·         मंगरौठ - उत्तरप्रदेश येथे 'सब भूमी गोपाल की' हा नारा दिला.

·         'जय जगत' घोषणा

 

महाराष्ट्रातील समाजसुधारक - महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले :

मूळ आडनाव – गोह्रे

जन्म – 11 मे 1827

मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

जीवन परिचय :

आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

शिक्षण:

फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.

परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.

विवाह:

महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.

त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

पुढील शिक्षण :

इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

संस्थात्मक योगदान :

·         3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

·         4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

·         1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

·         1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.

·         1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

·         1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

·         10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

·         24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

·         व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.

·         1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

1868 - 'ब्राम्हणांचे कसब'

1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.

1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.

1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.

शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

वैशिष्ट्ये :

·         थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.

·         1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

·         1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

·         1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.

·         2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.

·         ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

·         उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

·         सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.

·         सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

महाराष्ट्रातील समाजसुधारक - धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे

जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.

1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :

·         1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

·         1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.

·         1907 - हिंगणे महिला विद्यालय.

·         1910 - निष्काम कर्मकठ.

·         1916 - महिला विद्यापीठ, पुणे.

·         1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

·         1 जानेवारी 1944 - समता संघ.

·         1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.

·         1948 - जातींनीर्मुलन संघ.

·         1918 - पुणे - कन्याशाळा.

·         1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :

·         मानवी समता - मासिक.

·         1893 - विधवेशी पुनर्विवाह.

·         1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.

·         1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

·         1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

·         जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

·         'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

महाराष्ट्रातील समाजसुधारक - राजर्षि शाहू महाराज

राजर्षि शाहू महाराज :

जन्म - 16 जुलै 1874.

मृत्यू - 6 मे 1922.

एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.

महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.

भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

एक कल्याणकारी राजा.

संस्थात्मक योगदान :

1.    ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहेस्थापन केली.

2.    1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

3.    नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

4.    1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

5.    15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

6.    1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

7.    1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.

8.    1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

9.    1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

10.  14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

11.  लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

12.  पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

13.  जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

14.  1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

15.  1917 - विधवा विवाहाचा कायदा.

16.  1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

17.  1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

18.  वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

19.  1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.

20.  1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

21.  1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.

22.  यामुळे पुरोहितगिरी  ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.

23.  1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

24.  1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

25.  1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

26.  1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

27.  1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

28.  1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.

29.  1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

30.  1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

31.  1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.

32.  1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

33.  1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

34.  कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.

35.  ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

वैशिष्टे :

1.    महात्मा फुले  सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.

2.    सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.

3.    जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.

4.    पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.

5.    उदार विचार प्रणालीचा राजा.

6.    राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.

7.    कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.

8.    शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.

9.    टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.

महाराष्ट्रातील समाजसुधारक - विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे :

जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू - 2 जानेवारी 1944.

1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.

'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.

जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :

·         1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

·         18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.

·         1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

·         द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.

·         अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.

·         ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

·         23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.

·         1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

·         1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

·         1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

·         1923 - तरुण ब्रहयो संघ.

·         1937 - बहुजन पक्षाची स्थापना.

·         स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

·         वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :

·         प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

·         1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

·         1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.

·         Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

·         Untouchable India,

·         History Of Partha,

·         भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

·         माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .

वैशिष्ट्ये :

·         शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.

·         अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

·         1904 - मुंबई धर्म परिषद.

·         1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

·         1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

·         1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

·         1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

·         स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

·         शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

महाराष्ट्रातील समाजसुधारक - गोपाल गणेश आगरकर

गोपाल गणेश आगरकर:

जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.

मृत्यू : 17 जून 1895,पुणे

1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.

बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .

संस्थात्मिक योगदान :

·         1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .

·         15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

·         गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.

·         स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

·         अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.

·         शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.

·         'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक.

·         हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

वैशिष्टे :

·         इष्ट असेल ते बोलणार......

·         राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.

·         हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.

·         बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

·         ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.

·         जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

महाराष्ट्रातील समाजसुधारक - भाऊराव पायगोंडा पाटील

भाऊराव पायगोंडा पाटील :

जन्म - 22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जी. कोल्हापूर.

मृत्यू - 9 मे 1959.

महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात.

22 सप्टेंबर 1887 पहिला श्रमप्रतिष्ठादिन.

भाऊराव पाटील यांना 'कर्मवीर' ही पदवी गाडगे महाराजांनी दिली.

22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दी म्हणून साजरा केला जातो.

ग्रामीण शिक्षणप्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक.

रयतेचे बोधचिन्ह : वटवृक्ष.

संस्थात्मक योगदान :

·         1910 - स्थानिक लोकांच्या मदतीने दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना(1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)

·         4 ऑक्टोबर 1919 - काले, ता. कर्‍हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना.(1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)

·         1924 - छत्रपती शाहू बोर्डिंग, सातारा येथे स्थापना (ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी). छत्रपती शाहू बोर्डिंगचे उद्घाटन म. गांधीच्या हस्ते झाले. बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद आली होते.

·         1932 - पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी Union Boarding House स्थापन.

·         1935 - प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी सातारा येथे Silver Jubilee Rural Training College स्थापले.

·         1940 - महाराजा सायाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली (सातारा).

·         1947 - छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापले.

·         स्वावलंबी शिक्षणासाठी 'कमवा व शिका योजना'.

·         गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्यूकेशन फंड स्थापना ही योजना राबवली.

वैशिष्टे :

·         समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक.

·         वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न.

·         म. फुले, राजर्षी शाहू, म. गांधी यांचा प्रभाव. सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव.

·         स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.

·         श्रमाच्या प्रतिष्ठेला शैक्षणिक तत्वज्ञानात महत्वाचे स्थान.

·         तुम्हास जर एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा ! शंभर वर्षाची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा ! हा संदेश.

·         शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन बहुजन समाजाला समर्थ बनविले.

·         महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन-ह. रा.महाजनी.

·         भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तिस्तंभ है - म. गांधी.

·         'जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णाना जगातील सर्व विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल ' डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिक्रिया.

भारतातील वृत्तपत्र

भारतातील (विशेषतः महाराष्ट्रातील) वृत्तपत्रे :

भारतातील पहिले वृत्तपत्र - बेंगॉल गॅझेट, 1780. 1712 ला बेंगॉल गॅझेटचा छापखाना जप्त - सरकारवरील टिकेमुळे.

Censorship Act,1799

लॉर्ड वेलस्लीच्या काळात

फ्रेंचांच्या भारतीय संभाव्य आक्रमणाच्या भीतीमुळे हा कायदा लागू केला.

लॉर्ड हास्टिंगच्या काळात हे निर्बंध उठवले.

Licensing Regulations,1828

जॉन अॅडम्सच्या काळात लागू

या कायद्यात विना परवाना वृत्तपत्र सुरू करणे. फौजदारी गुन्हा.

या कायद्यामुळे राजा राममोहन रॉय यांच्या 'मिरत-उल-अखबार' या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद पडले.

1835 चा वृत्तपत्र कायदा :

वृत्तपत्रांवरील निर्बंध हटविले.

1823 च्या कायद्यानुसार घातलेले निर्बंध या कायद्याने काढून टाकले.

चार्ल्स मेटकाल्फच्या काळात हा कायदा पारित त्यामुळे मेटकाल्फला 'वृत्तपत्रांचा मुक्तिदाता' म्हटले जाते.

या कायद्यामुळे भारतात वृत्तपत्र व्यवसाय वाढीस लागला.

1857 चा युद्धाच्या काळात वृत्तपत्रांवर पुन्हा काही काळासाठी निर्बंध घालण्यात आले.

vernacular press Act(1876)

भारतातील स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांवर निर्बंध लादले.

वृत्तपत्राच्या संपादकाला आणि प्रकाशकला या कायद्यानुसार जिल्हा दंडाधिकारीबरोबर करार करायची सक्ती, या करारात सरकारविरोधात असंतोष पसरविणारे लेखन न करण्याची सक्ती केली जाई.

छापखाना जप्त करण्याची तरतूद.

जिल्हा दंडाधिकार्‍यांचा या बाबतीत निर्णय अंतिम. दंडाधिकार्‍यांच्या विरोधात न्यायालयात अपिल करण्याचा निर्बंध घातले होते.

या कायद्यान्वये भारतीय भाषेतील वृत्तपत्रे व इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये भेदभाव करण्यात आला.

लॉर्ड लिटनच्या काळात 1878 ला कायदा करण्यात आला.

लॉर्ड रिपनच्या काळात हा कायदा रद्द करण्यात आला - 1882

पत्रकाराचे कर्तव्य बजवत असताना शिक्षा भोगणारे पहिले भारतीय. सुरेंद्रनाथ बॅनर्जी (1883)- बेंगाली वृत्तपत्रातील लेखाबद्दल - शाळीग्राम देवतेच्या अपमानाच्या खटल्यात त्यांनी न्यायाधीशांवरच टीका केली होती.

लोकमान्य टिळकांना केशरीतील 'shivaji's Utterances' (शिवाजीचे उच्चार) ल लेखाबद्दल 18 महिन्याची शिक्षा.

यावेळीच जनतेकडून टिळकांना 'लोकमान्य' हा किताब मिळाला.

पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध काळात वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्यात आले होते.

press commission अध्यक्ष-राजाध्यक्ष

1954 मध्ये All India Press Council ची स्थापना करण्याची शिफारस केली.

भारतातील वृत्तपत्रे

वृत्तपत्रे व संपादक

·         बेंगॉल गॅझेट - जेम्स ऑगस्टस हिकी

·         इंडियन गॅझेट - हेन्सी लुईस, विवीयन डिरोझिओ

·         बॉम्बे हेराल्ड - बॉम्बे प्रांतातील पहिले वृत्तपत्र

·         दिग्दर्शन - बंगाली भाषेतील पहिले मासिक

·         कलकत्ता जर्नल - एस.जे.बकिंगहम

·         बेंगाल गॅझेट - हरिश्चंद्रे रे (बंगाली भाषेतील पहिले वृत्तपत्र)

·         संवाद कौमुदी - साप्ताहिक - राजा राममोहन रॉय

·         मिरत-उल अखबार - राजा राममोहन रॉय (पार्थियन भाषेतील पहिले वृत्तपत्र)

·         जान-ए-जहान नूआह - उर्दू भाषेतील पहिले वृत्तपत्र

·         बंगदुत - राजा राममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर

·         बॉम्बे समाचार - गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र

·         ईस्ट इंडियन - हेन्री व्हीलियन डिरोझिओ

·         बॉम्बे टाईम्स - थॉमस बेनेट (वृत्तपत्र 1861 पासून द टाईम्स ऑफ इंडिया म्हणुन परिचित)

·         रास्त गोफ्तार - गुजराती भाषेत - दादाभाई नौरोजी

·         हिंदू पॅट्रीयन - हरिश्चंद्र घोष आणि हरिश्चंद्र मुखर्जी

·         सोमप्रकाश - व्दारकानाथ विद्याभूषण (बंगाली)

·         इंडियन मिरर - देवेन्द्रनाथ टागोर

·         बेंगली - गिरीशचंद्र घोष

·         नॅशनल पेपर - देवेन्द्रनाथ टागोर

·         अमृत बाझार पत्रिका - शिशिरकुमार घोष - मोतीलाल घोष

·         बंगदर्शन - बकिमचंद्र चॅटर्जी

·         द हिंदू - जी.एस.अय्यर, वीरराधवाचरी सुब्बाराव पंडित

·         केसरी - लोकमान्य टिळक (मराठी)

·         मराठा - लोकमान्य टिळक (इंग्रजी)

·         स्वदेशमित्रण - जी.एस.अय्यर (तामिळ)

·         युगांतर - बरीन्द्रकुमार घोष आणि भुपेंद्रनाथ दत्त

·         संध्या - ब्रहयानंदन उपाध्याय (बंगाली)

·         काळ - महाराष्ट्र (मराठी)

·         इंडियन सोशिओलॉजिस्ट - श्यामजी कृष्णा वर्मा (लंडन)

·         वंदे मातरम (पॅरिस) - मादाम भिकाजी कामा

·         तलवार (बर्लिन) - विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय

·         फ्री हिंदुस्थानी - व्दारकानाथ दास (व्हकुव्हर)

·         गदर - लाला हरद्याळ (सॅन फ्रान्सीस्को USA)

·         बॉम्बे क्रोनिकल - फिरोजशहा मेहता

·         हिंदुस्थान टाईम्स - के.एम.पाणीक्कर

·         मिलाप - एम.के.चंद्र

·         लिडर - मदनमोहन मालवीय

·         किर्ती - संतोष सिंग

·         बहिष्कृत भारत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

·         कुडी आरसू - ई.व्ही.रामस्वामी नायकर (पेरीयार)

·         बंदीजीवण - सच्चीद्रनाथ संथल

·         नॅशनल हेराल्ड - जवाहरलाल नेहरू

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली

ब्रिटीशांच्या काळातील भारतातील (महाराष्ट्रातील शिक्षणपद्धती) :

·         1781 मतरशाची स्थापना - वॉरेन हेस्टिंग्ज अरबी आणि पारशी भाषेच्या अध्यायनासाठी

·         1791 बनारसला संस्कृत पाठशाळा - जोनाथम डंकब (बनारसचा इंग्रजी रेसिडेंट)

·         1800 - Fort William College - लॉर्ड वेलस्ली

·         कंपानीच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना शिक्षण देण्यासाठी. 1802 मध्ये हे कॉलेज कंपनीच्या संचालकांच्या आदेशावरून बंद केले.

·         1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार भारतात विद्येच्या प्रसारासाठी वार्षिक एक लक्ष रुपये कंपनीने खर्च करावे अशी तरतूद

·         राजा राममोहन रॉय यांनी शिक्षण पाश्चात्य शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई.

·         वार्षिक एक लक्ष रुपये कसे खर्च करावे यावर ब्रिटीशांच्या लोकशिक्षण समितीत 2 गट-

·         1. H.T प्रिन्सेस - प्राचीन भारतीय भाषेच्या आणि विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावेत.

·         2. इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च करावेत.

·         हा वाद सोडण्यासाठी बेंटिंगने लॉर्ड मेकॉल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

·         मेकॉलने दुसर्‍या गटाचे (इंग्रजी शिक्षणाचे) जोरदार समर्थन केले.

मेकॉल समिती :

·         अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणार्‍या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.

·         पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.

·         शिक्षणाचे माध्यम - इंग्रजी भाषा

·         मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता.

·         "जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल."

·         म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते.

जेम्स थॉमसनची शिक्षण व्यवस्था :

·         वायव्य सरहद्द प्रांतात (1843-53)

·         देशी भाषेच्या ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था

·         ग्रामीण भागात कृषि विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था सूरु केली.

·         वुडचा अहवाल - 1854

·         हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणून ओळखला जातो.

·         1.सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्वज्ञान विज्ञान, कला, साहित्य यांचा प्रसार करावा.

·         2. प्राथमिक शाळा - प्रादेशिक भाषेचा शिक्षणासाठी वापर - खेड्याच्या पातळीवर

·         3. जिल्हा स्तरावर - हायस्कूल (माध्यमिक) आणि महाविद्यालये - इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर

·         4. पदवी - इंग्रजी भाषेचा वापर (उच्च शिक्षणासाठी)

·         5. शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनुदान पद्धती सुरू करावी.

·         6. लंडन विद्यापीठाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुंबई, मद्रास, कोलकाता इथे विद्यापीठे स्थापन करण्यात यावीत.

·         7. कंपांनीच्या प्रत्येक प्रांतात लोकशिक्षण विभाग स्थापन करावा

·         8. वुडच्या अहवालात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणावर (Technical)जोर

·         9. अध्यापक परिक्षण संस्था स्थापन करण्यात याव्यात (इंग्लंडच्या धर्तीवर)

·         10. स्त्री-शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस

हंटर समिती (1882-83) :

·         वुडचा अहवाल लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी हंटर समितीची स्थापना

·         हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होते.विद्यापीठांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश नव्हता.

·         शिफारस. 1. प्राथमिक शिक्षण - स्थानिक भाषेतून घ्यावे

·         2.प्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण जिल्हा व नगर नियोजन मंडळाकडे दिले जावे.

·         3. माध्यमिक शिक्षणाचे दोन प्रकार असावेत.

·         a.साहित्य शिक्षण - पुढील विद्यापीठीय अभ्यासासाठी

·         b.व्यवहारीक शिक्षण - व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी विद्यार्थी तयार करणे

·         शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना पूर्ण चालना द्यावी. सरकारने लवकरात लवकर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावे.

·         स्त्री शिक्षणाला चालना देण्याची शिफारस

शॉमस रॅले समिती :

·         या समितीच्या अहवालानुसार 'भारतीय विद्यापीठ कायदा 1904' करण्यात आला.

·         भारतीय विद्यापीठ कायदा (1904)

·         विद्यापीठावरील सरकारचे नियंत्रण वाढवले.

·         खाजगी महाविद्यालयांवरील सरकारचे नियंत्रण अधिकच दृढ करण्यात आले.

·         विद्यापीठांचे क्षेत्र ठरविण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे (1904)

सॅडलर समिती (1917-18)

·         कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी या आयोगाची निर्मिती

·         अध्यक्ष- M.E.सॅडलर

·         सदस्य - आशुतोष मुखर्जी (भारतीय), झियाउद्दीन अहमद (भारतीय)

हाटोंग समिती :

·         शिक्षणविषयक घसरणार्‍या दर्जावर अभ्यास करण्यासाठी नेमली.

·         तरतुदी . 1. प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्व देण्यात आले.

·         2. शिक्षणात सुधारणा व संघटनांवर भर देण्यात यावा.

·         3. ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर रोखले पाहिजे आणि त्यांना व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडे वळविले पाहिजे.

वर्धा योजना / मौलिक व आधारभूत शिक्षण :

·         तत्व-काम करताना शिक्षण

·         मातृभाषेतून शिक्षण

·         ही योजना झकिर हुसेन समितीने पुढे आणली.

महाराष्ट्रातील क्रांतिकारी नेते

महाराष्ट्रातील महत्वाचे क्रांतिकारी नेते :

विनायक दामोदर सावरकर :

·         जन्म - 1883 - भगूर, नाशिक

·         मृत्यू - मुंबई

·         'प्रयोपवेसा' या पद्धतीव्दारे मृत्यू

·         सावरकरांचे बंधु - गणेश (बाबाराव), नारायण

·         "हिंदू धर्मातील जात व्यवस्थेचे निर्मूलन करण्यात यावे आणि हिंदूधर्मातून परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घ्यावे" - सावरकर

·         मित्रमेळा - 1900 - अभिनव भारत - 1904

·         'फ्रीइंडिया सोसायटीच्या' स्थापनेतही सावरकरांचा सहभाग

·         1910 मध्ये 'इंडिया House'संघटनेशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून सावरकरांना अटक

·         दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा (50 वर्ष)

·         अंदमान कारागृहात 'हिंदुत्व' हे पुस्तक लिहले.

·         'हिंदू राष्ट्रवादाचे' प्रणेते

·         क्रांतिकारी दहशतवादाचे मार्ग सोडून देण्याच्या आधारावर त्यांची 1921 ला तुरुंगातून सुटका

·         'हिंदू महासभा' या संघटनेची स्थापना

·         1942 च्या चलेजाव चळवळीला सावरकरांचा विरोध

·         भारताच्या फाळणीला विरोध केला.

·         1905 परदेशी कपड्यांची होळी

·         'गरम दल' (Army of the Angry)या संघटनेची टिळकांच्या नेतृत्वाखाली स्थापना केली.

·         श्यामजीकृष्ण वर्मा च्या 'शिवाजी शिष्य वृत्ती' मूळे सावरकर इंग्लंडला गेले.

·         ग्रंथसंपदा - 'भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने',' माझी जन्मठेप',' हिंदुत्व',' 1857 चे स्वतंत्र युद्ध '.

·         सावरकरांनी 8 मे 1908 रोजी 'इंडिया हाऊस' येथे 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य लढयास 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला.

·         1911 ते 1924 - अंदमान कारागृहात सावरकर होते.

·         1924 ते 1937 - रत्नागिरी कारागृहात सावरकर रवानगी.

अनंद कान्हेरे :

·         बाबाराव सावरकरांच्या घरात बरीच आशेपार्ह कागतपत्रे सापडल्यामुळे बाबरावांनी सरकारने जन्मठेपची शिक्षा दिली.

·         या शिक्षेच्या विरोधात अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ची हत्या केली.

शिवराम हरी राजगुरू :

·         जन्म - खेड 

सध्याचे - राजगुरूनगर

·         भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉडर्सची हत्या केली, लाहोर 1928

1857 चा उठाव व महाराष्ट्र

1857 चा उठाव व महाराष्ट्र

1. रंगो बापुजी गुप्ते

·         सातार्‍याचा राजा प्रतापसिंह याचा वकील.

·         प्रतापसिंहचे सरकार खालसा होवू नये म्हणून प्रयत्न केला.

·         यासाठी सतत इंग्लंड मध्ये 12 वर्ष वास्तव्य

·         इंग्रजांनी मागणी मान्य न केल्यामुळे भारतात परतल्यावर इंग्रजांविरुद्ध सशस्त्रं उठावाची योजना रंगो बापूजीने बनवली.

·         मांग, रामोशी, कोळी, यांना भरती करून छुपे सैन्य उभारले.

·         सातारा व महाबळेश्वर येथे उठावाची योजना होती.

·         परंतु उठाव फसला, योजना यशस्वी झाली नाही.

·         रंगो बापुजी गुप्ते पळून जाण्यास यसस्वी.

2. नानासाहेब व तात्या टोपे :

·         इंग्रजांविरुद्ध 1857 च्या उठावात भाग

·         18 एप्रिल 1859 - तात्या टोपेला फाशी

·         उत्तरेकडील 1857 च्या उठावाला मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.

कोल्हापुरातील उठाव: :

·         1. जुलै 1857 - 21 व्या आणि 28 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांचा उठाव.

·         2. डिसेंबर 1857 - कोल्हापूर छत्रपतीला लहान भाऊ चिमा साहेबाच्या नेतृत्वाखाली उठाव, बेळगाव, धारवाडा, कोन्हार परिसरातील हिंदी शिपायांनी योजना आखली

·         पण हा उठाव फसला.

·         वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकबने सहाय्य केले.

जमाखिंडी संस्थानातील उठाव :

·         आप्पासाहेब पटवर्धन यांचा सहभाग

·         बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले.

·         1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळेल.

मुधोळमधील बेरडांचा उठाव :

·         1857 ल लागू केलेल्या शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंधी घातली.

·         या शस्त्रबंदी कायद्याच्या विरुद्ध मुधोळमधील बेरडांनी उठाव केला.

·         बेरडांना सार्वजनिक ठिकणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले.

सुरगाणा संस्थान मधील उठाव :

·         सुरगाणा संस्थानचा राजा नीळकंठराव भगवंतराव पवार यांनी भिल्ल व कोळी लोकांना हाताशी धरून उठाव घडवून आणला.

·         इंग्रजांनी उठाव मोडून काढला.

·         पेठच्या राजाला फाशी दिली.

खानदेशातील भिल्लाचा उठाव: :

·         सातपुडा भागात

·         नेतृत्व - काजीसिंग, भागोजी नाईक, शंकरसिंह

·         1500 पेक्षा अधिक भिल्ल सहभागी

·         सरकारी खजिना लुटला

·         इंग्रजांनी उठाव मोडून काढला

औरंगाबादेतील उठाव :

·         औरंगाबादेतील घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम बहसंख्य

·         मुघल बादशाहाविरुद्ध उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुन होते.त्यामुळे उठाव केला.

·         नेतृत्व - फिदाअली

नागपूरमधील उठाव :

·         नागपूरमधील मराठे मंडळींची उठावाला फूस

·         युरोपीयन अधिकार्‍यांची दारूगोळा, तोफा हस्तगत करणे, सीताबर्डीचा किल्ला हस्तगत करणे असे उठावाचे पूर्वनियोजित स्वरूप होते.

·         या उठावाला भोसले कुळातील बाकाबाई हिचा विरोध

·         बाकाबाई सारखी माणसे देशद्रोहि राहिल्यामुळे उठाव फसला.

·         निकष :

·         - 1857 च्या उठावात मराठी जनतेने भाग घेतला असला तरी त्याचे सहभागीत्व अत्यंत मर्यादित होते. ते महाराष्ट्राच्या विशिष्ट भागापुरते मर्यादीत होते. या भागात राष्ट्रीयत्वाच्या - - भावना तेवड्या प्रखरतेने उदयास आल्या नव्हत्या.

·         - परकीय राजवटीविरुद्ध चीड, संताप, हा प्रामुख्याने संस्थानिकांत राज्य गमावलेल्या वर्गात होता.आदिवासी जमातीत होता.

- 1857 च्या उठावात मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.

नारायण मल्हार जोशी :

·         कामगार नेते

·         All India trade union congress च्या स्थापनेत पुढाकार - 1920

·         AITUC चे 1925 ते 1929 या काळात general secretary होते.

·         1931 मध्ये जोशींनी AITUC सोडली & All India Trade union Federation ची स्थापना केली.

·         AITUC मध्ये डाव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणून जोशींनी ALTUC सोडली.

भारतातील कामगार चळवळ :

·         1850 ते 1900 भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड. या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक विकासाचा वेग कमी होता पर्यायाने कामगार वर्गाची संख्या कमी होती.

·         1900 ते 05 नंतर ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेतून भारतीय भांडवलदारांचा औद्योगिक कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर भारतात औद्योगिक कारखाने स्थापन करायला चालना मिळाली पर्यायाने कामगार वर्गाची संख्या वाढली.

·         1920-All India trade union congress ची स्थापना

नारायण मेघाजी लोखंडे

·         जन्म - 1848 ठाणे

·         भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते.

·         महात्मा फुलेचे अनुयायी होते.

·         Bombay mill hands Association ची स्थापना - 1881 ला.

महाराष्ट्रातील शेतकरी उठाव :

·         1857 - पुणे व अहमदनगर, सातारा जिल्ह्यात या प्रदेशात अस्तित्वात असलेली महसुलाची पद्धती-रयतवारी

·         रयतवारी पद्धतीचा दोषाप्रमाणे या भागातील शेतकरी सावकारांच्या तावडीत सापड्लेले

·         या भागातील सावकार बाहेरून आलेले मारवाडी, गुजराती होते.

·         1860 च्या दशकात पूर्वार्धात अमेरिकेतील यादवी युद्धमुळे कापसाची निर्यात वाढल्याने कापसाचे भाव वाढत गेले.

·         1964 मध्ये यादवी युद्ध संपल्यावर कापसाची निर्यात कमी होवून कापसाचे भाव कोसळले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला

·         शेतकर्‍यांच्या अडचणीचा कायदा घेवून सावरकरांनी जमिनी बाळकवायला सुरवात केली

·         सावरकर हेच आपल्या दुर्दशेचे कारण आहे असे शेतकर्‍यांचे ठाम मत बनले.

·         उठावाची सुरवात - डिसेंबर 1874, करडे गाव तालुका शिरूर

·         सावकारांवर सुरवातीला शांततापूर्न सामाजिक बहिष्काराचे तंत्र वापरण्यात आले.

·         सामाजिक बहिष्काराचा फारसा परिणाम होत नाही हे लक्षात आल्यावर शेतकर्‍याच्या बहिष्काराचे रूपांतर दंग्यामध्ये झाले

·         सावकारांकडील गहाणखाते, न्यायालयाचे हुकूमनामे, सर्व कर्जविषयक दस्ताऐवज हस्तगत करून त्याची सार्वजनिक होळी करण्यात येई.

·         चळवळीत हिंसाचार फारसा झाला नाही.

·         उठावाचा रोख ब्रिटिश सरकारविरूद्ध नव्हता तर स्थानिक सावकारांविरुद्ध होता.

·         ब्रिटीशांनी कारवाही करून उठाव दडपून टाकला.

·         शेतकर्‍यांमधील असंतोष शांत करण्यासाठी 1879 डेक्कन "Agriculturist Releif Act" करण्यात आला.

·         व शेतकर्‍यांना सावकारांपासून काही प्रमाणात संरक्षण देण्यात आले.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय

महाराष्ट्रातील राष्ट्रवाद :

उदयाची कारणे :

1. समान महसुली पद्धती - रयतवारी पद्धत - त्यामुळे जनतेच्या समस्या सारख्याच

2. पाश्चिमात्य शिक्षण - स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायप्रियता, कायद्याचे राज्य, लोकशाही, उदारमतवाद इ. कल्पनांचा परिचय आणि त्यातून राष्ट्रवादी भावना वाढीस

3. समाजसुधारकांचे कार्य - फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर - सामाजिक क्षेत्रात जागृती - त्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण झाले - राष्ट्रीय भावना वाढीस आली.

4. वृत्तपत्रे - दर्पण, प्रभाकर, केसरी, मराठा - यामुळे राजकीय, सामाजिक, धार्मिक जागृती निर्माण झाली.

5. दळणवळणाची साधने - रस्ते, रेल्वे, तारायंत्र, पोस्टखाते. यामुळे प्रांतातील दुरावा कमी होऊन लोक एकमेकांच्या अधिक जवळ आले - राष्ट्रवाद वाढीस

6. आर्थिक शोषण - दादाभाई नौरोजी, गोखले, रानडे

7. वंशश्रेष्ठत्वाचा अभिमान आणि Elbert Bill

8. धर्म सुधारणा चळवळीचा प्राभाव - प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज

9. रामोशी, कोळी, भिल्ल, यांचे उठाव यातून प्रेरणा मिळाली.

10. मध्यवर्गाचा उदय - शिक्षक, वकील, कारकून, पत्रकार सरकारी अधिकारी

या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी भावना वाढीस आली.

सार्जत योजना

सार्जत योजना 1944 :

होमरूल लीग आणि महाराष्ट्र :

·         नेतृत्व - टिळक

·         1916 च्या बेळगाव बैठकीत होमरूल लीगच्या स्थापनेची घोषणा.

·         टिळकांच्या होमरूल लीगचे प्रमुख नेते दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, शि.ल.करंदीकर

·         टिळकांनी 'केसरी' 'मराठा' या वृत्तपत्रांतून होमरूल चळवळीचा प्रसार केला.

·         1917 चे होमरूल लीग अधिवेशन - नाशिक

·         1917 पर्यंत टिळकांच्या होमरूल लीगचे 33,000 सदस्य होते.

·         मद्रासचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुब्रंहयणमन अय्यर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना 1917 मध्ये पत्र पाठवून भारताच्या होमरूल चळवळीस सहाय्य करण्याची विनंती केली होती.

·         टिळकांनी होमरूलच्या प्रचारासाठी 1917 मध्ये जोसेफ बॅप्टिस्ता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इंग्लंडला पाठविले.

·         फ्रान्सचे पंतप्रधान कलेमेन्शो यांनाही टिळकांनी पत्र पाठवून हिंदुस्थानला स्वराज्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले आहे.

·         टिळकांच्या होमरूल चळवळीत 44% ब्राह्मण तर 55% ब्राम्ह्णेतर होते.

असहकार आणि महाराष्ट्र :

·         1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकारच्या कार्यक्रमाला मान्यता दिली.

·         या अधिवेशनात कॉँग्रेस संघटनेच्या विस्ताराला बाल देण्यात आले.

·         यावर्षी तत्वावर आधारित या प्रांतिक संघटना स्थापन करण्यात आल्या.

·         असहकार चळवळ

·         महाराष्ट्रात मद्यपनविरोधी चळवळ

·         Ex - बॅरिस्टर जयकर - 1 वर्ष बहिष्कार घातला न्यायालयांवर.

·         1920 - लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय - पुणे स्थापना.

·         साधकाश्रम कडून केशवराव देशपांडे अंधेरी, मुंबई

·         'मी सहकारी नोकरी करणार नाही' ही शपथ साधकाश्रमात प्रवेश करणार्‍यास घ्यावी लागे.

·         शेती करण्याचे, सुतकताईचे, दुग्धशाळा चालवण्याचे विद्यार्थ्याना प्रशिक्षण.

·         मुळशी सत्याग्रह - 1921

·         टाटा कंपनी विरुद्ध

·         नेतृत्व - बापट, पहिले सत्याग्रही - शंकरराव देव

·         सुरवातीला अहिंसक नंतर हिंसक वळण

·         कालावधी 1921-24

·         1923 - बापटांना 7 वर्ष शिक्षा - ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्याबद्दल.

·         टिळक स्वराज्य फंड - 30 जून 1921 पूर्वी 1 कोटी रूपयांचा स्वराज्य फंड गोळा करावा व 1 कोटी लोकांना कॉँग्रेसचे सभासद करून घ्यावे असा संकल्प.

·         याच चळवळीच्या काळात गांधींनी अर्ध कपड्यांचा त्याग केला.

सविनय कायदेभंग आणि महाराष्ट्र :

·         दांडी यात्रेत 13 महाराष्ट्र / 79 पैकी

·         पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकारे, अवंतीकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खेर, द.ना.बांदेकर, स.का.पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणे

·         7 एप्रिल 1930 - सोलापूर सत्याग्रह

·         12 जानेवारी 1931 - जगन्नाथ शिंदे, मल्लाप्पा धनशेट्टी, जयकिसन सारडा, कुर्बान हुसेन यांना फाशी - येरवडा कारागृहात, पुणे.

·         शिरोडा सत्याग्रह - 12 मे 1930 - मीठ

·         वडाळा सत्याग्रह - 17 मे 1930 - मीठ

·         बिळाशी सत्याग्रह - 5 सप्टेंबर 1930 - जंगल- सत्याग्रह

·         उंबरगाव - 5 मे 1930 - मीठ - नानासाहेब देवधर, कमलादेवी चट्टोपाध्याय

·         चिरणेर सत्याग्रह - पनवेल - ठाणे - मीठ

·         बाबू गेनू - 12 दि. 1930 - मुंबई - वळवादेवी नवीन हनुमान रस्ता येथे बलिदान दिले.

·         दहीहंडी सत्याग्रह - अकोला - खार्‍या पाण्याच्या विहिरीतून मीठ तयार करून सत्याग्रह केला. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे.

·         यवतमाळ - बापुजी अणे

·         नागपुर - नरकेसरी अभ्यंकर

·         पुसद - 10 जुलै 1930 - जंगल - सत्याग्रह - बापुजी अणे - 6 महीने शिक्षा

·         शिरोडा सत्याग्रह - आठल्ये, श.द.जावडेकर, विनायकराव मुस्कूटे

·         याच काळात मुंबईचे हंगामी गव्हर्नर हॉटसन यांच्यावर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील वासुदेव बळवंत गोगटे या तरुणाने गोळ्या झाडल्या. गोगटेला 8 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

1942 - भारत छोडो

·         मुंबई - सेंट्रल डायरेक्टरेट - भूमिगतांची मध्यवर्ती संस्था - क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा.

·         भूमिगत चळवळ - अरुण असफअली, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, सानेगुरूजी, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे

·         मुंबई रेडिओ स्टेशन - उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी

·         भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील - रायगड परिसरात - सशक्त क्रांतिकारकांची सेना - टाटा पावर केंद्रातून मुंबईला होणारा वीजपुरवठा खंडीत केला.

·         आझाद दल - नागनाथअण्णा नायकवडी

प्रतिसरकार - क्रांतिसिंह नाना पाटील

·         सत्यशोधक चळवळीचा नानांवर प्रभाव होता.

·         वाय.बी. चव्हाण, जी.डी.देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर

·         1943-46 पर्यंत कार्यरत

·         प्रभात फेर्‍या, मोर्चे, टेलिफोनच्या तारा तोडणे,रेल्वे रूळ उखडणे, सधन लोकांच्या घरावर दरोडा टाकून पैसा उभारणे.

·         पुणे - वेस्टएंड आणि कॅपिटल थिएटरला स्फोट बॉम्ब

खानदेश :

·         साने गुरुजी आणि मधु लिमये मार्गदर्शक

·         नेतृत्व - उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील

·         चिमठाने खनिजा लुटला - लीलाताई आणि जी.डी.लाड आणि नायकवडी नागनाथ अण्णा

·         शिरिषकुमार मेहता - बलिदान - नंदुरबार

·         अब्दुल रंजवा - भुसावळ - रेल्वे उलथवल्या

विदर्भ :

·         हिंदुस्थान लाल सेना - मदनलाल बागडी, विनायक सखाराम दांडेकर, श्याम नारायण काश्मिरी

·         HSRA च प्रभाव श्याम नारायण काश्मिरी यांच्यावर होता.

·         तुकडोजी महाराजांचे अभंगातून प्रबोधन

·         सावली संग्राम (अमरावती) - जिल्हाधिकारी मेल्ड्रमवर हल्ला - सैन्यदलाचा वापर ब्रिटीशांनी केला.

·         बेनोडा सत्याग्रह - नेतृत्व - वामनराव पाटील आणि चिमुर - चंद्रपुर

प्रतिसरकार (सातारा) :

·         विजयाताई लाडा, रजुताई कदम, लक्ष्मीबाई नायकवडी, लीलाताई पाटील इ. स्त्रियाही सहभागी होत्या

·         सामाजिक सुधारणा - दारूबंदी, गांधीविवाह

·         न्यायदान व्यवस्था - स्वस्तात न्याय मिळवून देणे हा उद्देश

मुंबई-नौसैनिकांचा उठाव - तलवार

·         अन्न, राहण्याची व्यवस्था इ. बाबतीत दुर्व्यवस्था

·         खालच्या दर्जाची वागणूक - शिवीगाळ

·         वेतन कमी

1857 चा राष्ट्रीय उठाव व त्याची कारणे

·         सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता.

·         सन 1856 पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.

·         सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.

·         इसवी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते.

·         लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला. पण हा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता.

·         ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला.

·         ब्रिटिशांनी भारत जिंकली व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले.

·         या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले.

·         शेती भाती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते.

·         1760-70 च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी संघर्ष होत आलेला आहे.

·         देशाच्या कोठल्या ना कोठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नाही.

·         शेकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवली तरी 1773 ते 1786 च्या दरम्यान किमान 40 मोठे लष्करी संघर्ष झाले होते.

·         1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला.

·         1857 पूर्वीचे उठाव :

·         भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इग्रंज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले.

·         शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केले.

·         कंपनी सरकारच्या काळात शेतकर्‍यांचे शोषण झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला.

·         सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी उठाव केले. असेच उठाव गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतातही झाले.

·         भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले.

·         छोटा नागपुर परिसरातील कोलाम, ओरिसातील गोंड, महाराष्ट्र्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुध्द उठाव केले.

·         बिहारमध्ये संथाळांनी तर फार मोठया प्रमाणावर उठाव केला. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या.

·         महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी केलेल्या उठावही असाच तीव्र होता.

·         उमाजींनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुध्द बंड केले. उमाजी नाईक यांनी एक जाहिरनामा काढून इंग्रजांविरुध्द लढा देण्याचे व इंग्रज सत्ता झुगारून देण्याचे लोकांना आवाहन केले.

·         1832 साली उमाजींना पकडून फाशी देण्यात आली.

·         कोल्हापुर लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकार्‍यांविरुध्द वेळोवेळी उठाव केले होते.

·         त्यांपैकी 1806 सालच्या वेल्लोर येथील तसेच 1824 सालचा बराकपुर येथील उठाव हे विशेष उग्र स्वरूपाचे होते.

·         इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व उठाव स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे परंतु त्यामुळे लोकांतील असंतोष फक्त दडपला गेला, तो नाहीसा झाला नाही, दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे 1857 साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गांत साचत गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र उठावाने झाला.

1857 च्या उठावाची पाश्र्र्वभूमी -

·         ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणामुळे जमीनदारांची व सरंजामदारांची वतने खालसा केल्यामूळे व अनेक सत्ताधीशांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्यामुळे असंतुष्ट झालेल्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे कंपनी सरकारच्या विरोधात शस्त्र उचलले मध्य व पूर्व हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केला.  

·         हिंदुस्थानातील छोटा नागपूर भागातील कोलरी आदिवासींनी 1827 मध्ये तर मुंडा आदिवासींनी 1831 मध्ये उठाव केला.

·         पूर्व हिंदुस्थानात उत्तर पूर्व भागातील खासी टेकडयांवरील आदिवासंनी 1829 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला.

·         नागा  कुफी बंडखोरांचे उठावही महत्वपूर्ण मानले जातात.

·         ओरिसातील खोंडा आदिवासी तसेच बिहारमधील संथाळांचा उठाव ही ब्रिटिशांना हादरा देणारा ठरला.

·         महाराष्ट्र्रातील खानदेशातील आदिवासींनी त्रिंबकजी डेंगळे यांच्या प्रोत्साहनाने दुसर्‍या बाजीरावास पेशवे पदावर पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिशांपूढे त्यांचा निभाव लागला नाही.

·         महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी रामोशंच्या मदतीने ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. नाईकांनी ब्रिटिश धार्जीण्या व्यापारी सावकार संस्थानिक व जमीनदार यांची लूट केली.

·         शेवटी फंदफितुरीने 1831 मध्ये ते ब्रिटिशांच्या हाती लागले.

·         ठाणे जिल्यातील कोळी व आदिवासी लोकांनी मराठी सत्तेच्या पुनरुजिवनासाठी 1839 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले.

·         1840 मध्ये सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांनी तर 1841 मध्ये कोल्हापुर भागातील गडकर्‍यांनी ब्रिटिश सत्तेला विरोध केला.

·         ब्रिटिशांच्या विरोधात घडून आलेले वरील सर्व उठाव ब्रिटिश सरकारने मोडून काढले.

·         वरील सर्व उठाव दडपून टाकण्यात कंपनी सरकारला यश आले असले तरी भारतीयांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत गेला.

·         1757-1857 या शंभर वर्षाच्या कालखंडात कंपनी सरकारने आपला प्रचंड साम्राज्यविस्तार केला. कंपनीच्या धोरणामुळे प्रजा संस्थानिक जहांगीरदार जमीनदार असंतुष्ट झाले.

·         राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक व लष्करी क्षेत्रातील असंतोषामधून 1857 चा उठाव घडून आला.

·         इसवी सन 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे या दिवशी झाली.

·         इस्ट इंडिया कंपनीच्या मेरठ येथील सैनिकांनी बंड पुकारले व युरोपियन अधिकार्‍याना ठार मारले. नंतर ते दिल्लीवर चाल करुन गेले.

·         त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला व मोगलांचे प्रतिष्ठेचे नाव लावणार्‍या दुसर्‍या बहादूरशहाच्या नावे भारताचा सम्राट म्हणून द्वाही फिरविली.

·         सेवेच्या अधिकाधिक जाचक होत चाललेल्या अटी, धार्मिक बाबींत हस्तक्षेप आणि अधिकार्‍यांचा वर्णीय अहंकार असे त्यांचे स्वरुप होते.

·         पण मुळात त्या सर्वामागे ब्रिटिश सत्तेविरुध्दचा असंतोष होता. कारण हे शिपाई झाले तरी भारतीय समाजातलेच होते. ते एकप्रकारे गणवेशातील शेतकरीच होते.

·         भारतीय समाजाच्या अन्य घटकांमध्ये ज्या आशा आकांक्षा, निराशा आणि असंतोष होता त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या अंत:करणात पडलेले होते.

·         शिपायांचे हे बंड म्हणजे भारतीय अर्धव्यवस्था नष्ट झाली, तिला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविण्यात आले आणि देशाची मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात आली हे होय.

·         सर्वात वरकडी म्हणजे जमीनमहसूल वाढविण्याच्या वसाहतवादी धोरणामुळे बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्या जमिनीलाच मुकावे लागले व ती वसुली शेतकरी, व्यापारी आणि सावकारांच्या घशात गेली.

·         परंपरागत हस्तव्यवसायही नष्ट झाल्याने लक्षावधी कारागिरांवर बेकारी आणि दारिद्रय ओढवले. शेतकरी व कारागीरांच्या या आर्थिक दुरवस्थेमुळे 1770 पर्यंत 12 वेळा मोठा व कित्येकदा छोटे दुष्काळ पडले.

·         हजारो जमीनदार व पाळेगारांचे शेतीच्या वसुलीवर आणि स्वत:च्या शेतजमिनीवरच नियंत्रण राहिले नाही.

·         शेकडो वतनदारांची वतने नष्ट झाली. आपल्या अंतर्गत कारभारात ईस्ट इंडिया कंपनीने हस्तक्षेप केलेला अनेक संस्थानिकांना आवडला नव्हता.

·         विद्वान आणि उपासकवर्गाना संस्थानिक, छोटे वतनदार, सरदार आणि जमीनदारांचा जो आश्रय होता, तोच नाहीसा झाल्याने त्यांच्यावर दारिद्रय कोसळले.

·         ब्रिटिश सज्ञ्ल्त्;ाा परकीय होती हेच उठावाचे एक मुख्य कारण होते. या देशात ब्रिटिश सदैव परकेच राहिले.

·         या परकीय घुसखोरांच्या हुकुमांपुढे हांजी हांजी करण्याची आपणावर वेळ आली याचा भारतीय जनतेला मोठा अपमान वाटे.

1857 च्या उठावाची कारणे :-

राजकीय कारणे :-

कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :-

·          सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता.

·         परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.

·         कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.

 र्लॉड वेलस्लीची तैनाती फौज :-

·         इ.स. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

·         त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला.

·         तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे.

·         त्याचबरोबर या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे. कंपनीच्या परवानगीशिवाय इतरांशी युध्द किंवा करार करता येणार नाहीत. तसेच इंग्रजांचा वकिल दरबारी राहिल.

·         त्याच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करावा, इ. तैनाती फौजेच्या अटी होत्या.

·         वेलस्लीने निजाम मराठयांचे शिंदे, होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आवळला व अनेक संस्थाने बरखास्त केली.

·         ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही.

·         परिणाम त्यांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या.

संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती :-

·         इ.स. 1848 मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता.

·         डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला. याबाबत त्याचे दोन मार्ग होते.

·         एक तर ते राज्य जिंकून घेणे किंवा विविध कारणे दाखवून ते ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे डलहौसीने आपल्या अंकित असणार्‍या संस्थानिकांवर त्यांनी आपल्या उत्तरधिकार्‍यास कंपनी सरकारची मान्यता घेणे आवश्यक केले व जी संस्थाने तत्वानुसारच नि:संतान संस्थानिकाला डलहौसीने दत्ताक घेण्यास परवानगी दिली नाही.

·         दत्ताक वारस नामंजूर या धोरणानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा करुन कंपनीच्या राज्यात सामाविष्ट केली.

·         तर गैरकारभार व अव्यवस्था या त्वाखाली अयोध्येचे संस्थान खालसा केले.

·         डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.

पदव्या आणि पेन्शन रद्द :-

·         र्लॉड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला.

·         मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला.

·         पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्ताक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली वर्‍हाड (विदर्भ) प्रांत आपल्या ताब्यात घेतला.

·         इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.

वेतने, इनाम व जहागिरीची जप्ती :-

·         ईस्ट इंडिया कंपनीच्या भरभराटीसाठी र्लॉड विल्यम बेंटिकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थानिकांनी लोकंाना इनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या बेंटिकने अशा जमिनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरावे नव्हते.

·         त्यांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहागिरींची जप्ती केली.

·         र्लॉड डलहौसीने पुरावे न्व्हते.

·         जमिनींच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमले.या कमिशनने पंचवीस हजार इनामी जमिनींची चौकशी करुन एकवीस हजार जप्त केले यामूळे लक्षावधी लोक नाराज झाले.

आर्थिक कारणे :-

देशी उद्योगधंद्याचा र्‍हास -

·         ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.

·         18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.

·         सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली.

·         येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता.

·         परिणामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाव राहिला नाही. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षावधी कारागीरांवर बेकारीची वेळ आली.

शेतीसंबंधी उदासीन धोरण -

·         शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतर्‍यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

·         दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसार्‍यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.

·         ब्रिटिशांनी सर्व देशभर एकच अशी शेतसार्‍याची पध्दत ठेवलेली नव्हती प्रत्येक प्रांतामध्ये यात वेगळेपणा होता.

·         र्लॉड कॉर्नवालिसने पंजाब प्रांतात कायमधारा पध्दती सुरु केली. तर र्लॉड हेस्ंिटग्जने यात सुधाराण करुन पंजाब व आग्रा प्रांतात थॉमस मन्रो याने रयतवारी पध्दती सुरु केंली.

·         ब्रिटिशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर वसुलीकडे अधिक लक्ष दिले. कराच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला व असा शेतकरी ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहिला .

हिंदी जनतेची आर्थिक पिळवणूक -

·         भारत हा एक सधन व संपन्न देश होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताची आर्थिक लूट केली.

·         या देशातील प्रत्यके प्रांत कोणत्या ना कोणत्या उत्पनासाठी प्रसिध्द होता. आसाम चहासाठी, महाराष्ट्र्र, गुजरात, कापसासाठी तर पंजाब, व बंगाल धनधान्यासाठी प्रसिध्द होता.

·         ब्रिटिशांनी भारतीयांचे ज्या मार्गाने शोषण केले. ते मार्ग याप्रमाणे

(1) भारतात अत्यंत कमी किमतीत कच्चा माल खरेदी करणे व तयार झालेला पक्का माल हुकमी बाजारपेठ म्हणून भारतात विकणे,

(2) भारतातील चहा, कॉफी, मसल्याचे, पदार्थ, खनिजे, लाकूड, इत्यादी माध्यमातून ब्रिटीशांनी आपले साम्राज्य निर्माण केले होते.

·         या साम्राज्याच्या रक्षणासाठी ब्रिटिशांना आपले लष्कर सतत सज्ज ठेवावे लागे हा खर्च भारतीय तिजोरीतून दिला जाई.

·         ब्रिटिशांनी भारतीयांची यंत्रवत लुट केली. त्यांच्या लुटीचे मार्ग अनेक होते.

·         यामुळे ब्रिटनची भरभराट झाली. तर भारत दारिद्रयाकडे वाटचाल करु लागला याबाबत डॉ ईश्र्वरीप्रसाद म्हणतात, भारतमातेच्या दुधावर इंग्रज लठ्ठ झाले. परंतु भारतीयांवर यात उपासमारीची वेळ आली.

शेतसार्‍यासाठी शेतकर्‍यांवर अन्याय, अत्याचार -

·         सरकारी अधिकार्‍यांनी जमीन महसूल कृषी उत्पनाच्या स्वरूपात घेण्याऐवजी रोखा रकमेच्या स्वरुपात घेण्याचा आग्रह धरला शेतकर्‍यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकर्‍यांवर अन्याय अत्याचार करण्यात आले.

·         मद्रासमधील सरंकारी निवेदनात म्हटले आहे, त्यानुसार ठरावीक शेतसरा प्राप्त करण्यासाठी उन्हात उभे करणे, जेवण न देणे फटके मारणे अशा शिक्षा दिला जात होत्या.

सामाजिक - सांस्कृतिक कारणे :-

हिंदूविषयी तुच्छतेची भावना -

·         काळया लोकांपेक्षा गौरवणीर्य लोक जन्मत श्रेष्ठ आहेत. अशी भावना 19 व्या शतकात युरोपभर पसरली होती.

·         इंग्लंडही त्यास अपवाद कसा असेल हिंदी लोक मागास आहेत. त्यांची संस्कृती रानटी आहे हे भारतीयांच्या मनावर ब्ंिाबविण्याचा ब्रिटिश प्रयत्न करु लागले.

·         एखादया साधा इंग्रज रस्त्याने जात असेल तर घोडागाडीमधून जाणार्‍या भारतीयालाही खाली उतरून त्या इंग्रजास सलाम ठोकावा लागे.

·         रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून भारतीयांना प्रवेश करण्यास मज्जाव होता.

·         युरोपियनांच्या हॉटेलमध्ये व क्लबमध्ये भारतीयांना प्रवेश नसे, हिदी माणसाप्रती असणारी ब्रिटिशांची तुच्छतेची भावना भारतीयांचा असंतोष वाढविण्यास कारणीभूत ठरली.

हिंदू संस्कृती व समाज जीवनावर आघात -

·         भारतीयांच्या सामाजिक जीवनात बदल करण्यासाठी र्लॉड विल्यम बेंटिकने अनेक कायदे पास केले.

·         सन 1829 मध्ये सती बंदीचा कायदा केला.

·         त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाह संमती कायदा, वाबविवाह प्रतिबंधक कायदा असे कायदे पास केले.

·         भारतीय समाज प्रबोधनापासून अ्द्याप दूर होता.

·         ब्रिटिशांनी हे सर्व कायदे आपला धर्म व संस्कृती बुडविण्यासाठी केले आहेत. असे काही रुढीप्रिय भारतीयांना वाटू लागले.

जातिभेद रद्द करण्याचा कायदा -

·         इ.स. 1850 मध्ये ब्रिटिशांनी जातिभेद रद्द करण्याचा कायदा केला व या कायद्यानुसार वारसाहक्क व मालमत्ता हक्कामध्ये काही बदल केले.

·         तत्कालीन हिंदु मुस्लिमांना या कायद्याचा धोका वाटू लागला हिंदू वा मुस्लीम धर्मातर करुन ख्रिश्चन धर्मात गेला, तरी त्याचा वाससाहक्क व मालमत्ता प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहणार होता.

नवीन शिक्षणव्यवस्था अप्रिय -

·         भारतात ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षणव्यवस्था सुरु केली.

·         देशभर ख्रिश्चन धर्माचे शिक्षण देणार्‍या मिशनरी शाळा सुरु झाल्या ब्रिटिशांच्या या धोरणामुळे 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजरचना कोलमडते की काय, असे लोकांना वाटू लागले आणि यामधून भारतीयांच्यात असंतोष निर्माण झाला.

धार्मिक कारणे :-

धार्मिक संकट-

·         ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक साम्राज्यावादाबरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला.

·         इ.स. 1813 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.

·         अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.

·         कंपनीने धर्म प्रसारासाठी खालील मार्गाचा अवलंब केला.

(अ) ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्‍यांना वडिलोपार्जित संपत्ती त त्यांचा हक्क मिळे.

(ब) अनाथ बालकांना सेवा सुविधा देऊन ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जाई.

(क) ख्रिश्चन धर्म स्वीकाराणार्‍यांना नोकरीत सामावून घेतले जाई व जे नोकरीत असतील त्यांना बढती दिली जाई.

(ड) ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या शाळांतून ख्रिश्चन धर्माची शिकवण व तत्वज्ञान दिले जाई.

(ई) तुरुंगवास भोगणार्‍या भारतीयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलयास त्याची मुक्तता होई

कंपनीच्या या धर्मप्रसारामुळे भारतीयांना असे वाटू लागले की इंग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडविला आता इंग्रज आपला धर्मही बुडविणार.

धर्म व सामाजिक सुधारणाविरुध्द प्रतिक्रिया -

·         कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये धर्म व समाज सुधारणेबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

·         विशेषता बेंटिकने इ.स. 1929 मध्ये सती बंदीचा कायदा केला बेंटिकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या खर्‍या परंतु तत्कालीन रुढीप्रिय समाजाला या सुधारणा आवडल्या नाहीत.

देवालयांची व मशिदींची वतने जप्त -

·         कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.

·         यामुळे धर्मगुरु व मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली.

·         यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.

लष्करी कारणे :-

·         राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला. तरी जोपर्यत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यत उठाव घडून येणे शक्य नव्हते.

·         शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.

·         त्यामुळे शिपायांनी हाती शस्त्र घेण्यासाठी मागची कारणे महत्वाची आहेत.

हिंदी शिपायावरील निर्बंध -

·         ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बध लादले. इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.

·         भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती.

·         र्लॉड कॅन्ंिागने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते.

·         त्यांनी परदेशात जाण्यास विरोध केला, त्यांना नोकरीस मुकावे लागले, तर अनेकांना शिक्षा झाल्या.

·         हिंदी शिपायांना मिळणारी अयोग्य वागणुक

·         हिंदी शिपायांत असंतोष वाढीस लागण्यास कारणीभूत ठरलेली कारणे खालीलप्रमाणे:

(अ) लष्करातील उच्च अधिकार पदे भारतीय सैनिकांनी दिली जात नसत.

(ब) एकाच पदावर काम करणार्‍या हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्यांत फार मोठी तफावत केली जात होती.

(क) हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाई. परेड ग्राऊंडवर त्यांचा अवमान कला जाई. वेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात.

(ड) लष्करी मोहिमेवर ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर पाठवत. धुमश्चक्री होऊन अनेक हिंदी शिपाई मारले जात मग गोरी फौज पुढे पाठविली जाई. म्हणजे मृत्यूला सामोरे जाताना भारतीय शिपाई व विजयाची माळ यात गोर्‍या सैन्याकडे, या प्रकारामुळे हिंदी शिपायांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

तात्कालिक कारण :-

·         इनफिल्ड बंदुका व चरबीयूक्त काडतूसे

·         काडतूस प्रकरणामुळे हिंदी सैन्यामधील असंतोष पराकोटीस पोहोचला. इ. स. 1857 मध्ये इनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका वापरात आणल्या.

·         या बंदुकांना लागणार्‍या काडतुसांचे सील गाई व डुकराच्याचरबीने बंद केले.

·         या काडतुसांचा वापर करते वेळी त्यावरील सील सैनिकांना दाताने तोडावे लागे गाय ही हिंदूना पवित्र तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिध्द काडतूस प्रकरणामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

·         या प्रकरणाची माहिती वार्‍यासारखी सर्व भारतीय सैनिकांना मिळाली .

·         त्यांनी काडतूसे वापरण्यास नकार दिला. नकार देणार्‍या शिपायांवर खटले भरण्यात आले.

·         10 वर्षापर्यत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या या सैनिकंाना नोकरीतून काढून टाकणयत आले.

·         त्यामुळे लष्करी छावण्यांमध्यील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनत गेली आणि यामधून 1857 च्या उठावाचा भडका उडाला.

उठावाचा कालखंड व नेत्यांची व्यक्तिगत भूमिका :-

मंगल पांडेचे हौतात्म्य -

·         इ.स. 1857 च्या उठावाचे नियोजन करण्यात आले होते.

·         31 में 1857 ची उठावाची तारीखही निश्चित केली होती. परंतु काडतुसाच्या बातमीने सैन्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला.

·         अशातच बराकपूरच्या छावणीमध्ये एक महत्वपूर्ण घटना घडली एका ब्राम्हण सैनिकास एका अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पाण्याची मागणी केली.

·         त्यावेळी त्याने उत्तर दिले की तुझ्या स्पर्शाने माझा लोटा अपवित्र होईल.

·         यावर तो अस्पृश्य सैनिक म्हणाला, महाराज आता तो जातीचा अभिमान ठेवा गुंडाळून यापूढे तुम्हाला गाईची नि डुकराची चरबी आपल्या दातानी तोडावी लागणार आहे. ही नवीन आलेली काडतुसे याच अपवित्र पदार्थानी हेतुत माखलेली आहेत समजलात.

·         29 मार्च 1857 रोजी बराकपूरच्या छावणीत उठावाची पहिली ठिणगी पडली.

·         नव्याने वापरात आलेल्या इनफिल्ड बंदुका व त्यासाठी वापरण्यास येणारी चरबीयुक्त आपरणाने सील केलेली काडतुसे यामुळे सैनिकात पराकोटीची अस्वस्थता होती.

·         लष्कारी कवायतीच्या प्रसंगी मंगल पांडे याने ही नवीन काडतुसे वापरण्यास नकार दिला.

·         एवढयावरच न थांबता काडतूस वापरण्याची सक्ती करण्यासाठी पुढे आलेले ब्रिटिश अधिकारी मेजर हडसन बाॅं कमांडर जनरल व्हिलर आणि लेफटनंट वाघ यांना गोळया झाडून ठार केले.

·         शेवटी ग्रेनेडिअर शेखपट्टने मंगल पांडेस पकडले ही चकमक पाहणार्‍या एकाही हिंदी सैनिकास मंगल पांडे यांस मदत करावी असे वाटले नाही शेवटी कोर्ट मार्शल होऊन 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले.

·         अशा प्रकारे 1857 च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो.

क्रां क्रांतीचे आयोजन -

·         सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील रंगो बापूजी तसेच नानासाहेब पेशवे यांची वार्षिक आठ लाखाची बंद केलेली पेन्शन चालू व्हावी यासाठी अजीमुल्लाखान दोघेही इंग्लंडला गेले होते.

·         परंतु ब्रिटिशांनी घेतलेल्या निर्णयांत बदल केला नाही परिणामत रंगो बापूजी व अजीमुल्लाखान यांनी ब्रिटिशांच्या विरोधात हालचाली सुरु केल्या इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याची त्यांनी एक योजना आखली रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील संस्थानांचा तर अजीमुल्लाखान यांनी परकीयांनी मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला.

·         हे सर्वजण इंग्रजांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखावलेले होते.

·         इंग्रज हा सर्वाचा सामूहिक शत्रू होता.

·         कमळाचे फुल व चपाती ही क्रांतीची प्रतिके होती.

·         तर दिल्ली लखनौ कोलकज्ञ्ल्त्;ाा व सातारा ही क्रांतीची प्रमुख केंद्र होती संस्थानिक व हिंदी लष्कर यांच्यामध्ये समन्वय साधला गेला व 31 मे 1857 हा उठावाचा दिवस निश्चित करण्यात आला.

मीरत -

·         बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.

·         मंगल पांडेच्या फाशीची बातमी देशभरातील लष्करी छावण्यात वणव्यासारखी पसरली.

·         काडतूस प्रकरणामुळे हिंदी शिपायांत संतापाची एकच लाट उसळली आणि यामधून 3 मे रोजी लखनौ व 5 मे रोजी अयोध्या येथील लष्करी तुकाडयांनी काडतूसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला.

·         ब्रिटिशांनी अशा शिपायांवर कठोर कारवाई केली. अनेकांना सक्त मजुरीची शिक्षा झाली माीरतच्या छावणीमध्ये इ.स. 9 में 1857रोजी 85 शिपायांनी काडतुसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला.

·         लष्करी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या सर्व शिपायांना सक्त मजुरीची शिक्षा झाली.  

·         त्यांनी 10 में 1857 रोजी सायंकाळी उठावास सुरुवात केली.

·         इंग्रज अधिकार्‍यांना ठार केले लगेचच तुरुंग फ़ोंडून भारतीय वैद्यांची मुक्तता केली.

·         मीरत उठाववाल्यांच्या ताब्यात येताच कंपनी सरकारचे राज्य खालसा झाल्याची घोषणा करण्यात आली.

·         हिंदी सैनिकांनी दुसर्‍याच दिवशी चौसष्ठ कि.मी. अंतर कापून दिल्ली गाठली. मार्गामध्ये हजारो नागरिक उठाववाल्यांना येऊन मिळाले.

दिल्ली -

·         मीरतहून आलेली फौज दिल्लीत प्रवेश करताच येथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई उठाववाल्यांना येऊन मिळाले.

·         मोगल बादशहाचे साम्राज्य इंग्रजांनी घश्यात घातले होते. परंतु भारतीयांच्या मनात त्या वैभवशाली साम्राज्यांच्या आठवणी अजून जाग्या होत्या.

·         त्यामुळे उठाववाल्यांनी उठावाच्या नेतृत्वाची धुरा बादशहा बहादूरशहाला धोका वाटत असतानाही बंडवाल्यापुढे त्यांचा नाईलाज झाला.

·         11 में रोजी बंडवाल्यांनी आपल्या दिल्लीतील आगमनाबरोबर दिल्लीतील इंग्रजांच्या कत्तलीस सुरुवात केली.

·         उठाववाल्यांनी दिल्लीतील दारुगोळयाच्या कोठाराकडे धाव घेतली पुढील धोका ओळखून ब्रिटिश शिपायांनी कोठारास आग लावली.

·         प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. अवघ्या 24 तासात दिल्ली उठाववाल्यांचा ताब्यात आली.

·         बादशहा बहादूरशहा यांस भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले.

·         उठावाचे गांभीर्य लक्षात घेऊन गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिंग याने ब्रिटिश साम्राज्यामधून 1 लक्ष 20 हजार सैनिक बोलावून घेतले.

·         तसेच भारतातही पंजाबी, गुरखा, शीख, रजपूत, यांची नव्याने भरती करून 3 लक्ष 10 हजार फौज तयार केली इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सूरू केल्या तर बहादूरशहा व बंडवाले दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी दक्ष होत.

·         इंग्रजांनी जून 1857 मध्ये 65 हजारांची फौज दिल्लीभोवती गोळा केली मानसशास्त्रीय दबाव ठेवण्यासाठी ज्ंिाकणे इंग्रजांना आवश्यक वाटू लागले.

·         15 सप्टेंबर 1857 रोजी बंडवाले व इंग्रज यांच्यामध्ये युध्दास तोंड फुटले बंडवाल्यांनी 10 दिवस निकराने झुंज दिली. परंतु ब्रिटिशांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही.

·         25 सप्टेंबर 1857 मध्ये दिल्ली इंग्रजांच्या हाती आली.

·         दिल्ली ताब्यात येताच दहशत बसविण्यासाठी इंग्रजांनी अमानुषपणे कत्तल सुरु केली ब्रिटिशांनी लाल किल्ल्याचा ताबा घेतला.

·         बादशहा बाहदूरशहा यास कैद करुन एका हुजर्‍याच्या कोठीत डांबले.

कानपूर -

·         मीरत व दिल्ली येथील उठावाच्या यशस्वी वाटचालीमुळे सर्वच लष्करी छावण्यात अस्वस्थता निर्माण झाली.

·         अशाच अस्वस्थ झालेल्या कानपूरमधील एका गोर्‍या शिपायाने 5 जून 1857 रोजी हिंदी शिपायांवर गोळया झाडल्या यामूळे कानपूरमधील हिंदी शिपायांनी बंड पुकारले नानासाहेब येथील उठाववाल्यांचे नेते बनले कानपूरमधील इंग्रजांनी एका खंदक असणार्‍या इमारतीचा आश्रय घेतला.

·         नानासाहेबांनी या इमारतीस वेढा दिला इंग्रजांनी मोठया धैर्याने 21 दिवस उठाववाल्यांचा प्रतिकार केला शेवठी नानासाहेबाांशी करार करून इंग्रजांनी आपली सुटका करुन घेतली.

·         1 जूलै 1857 रोजी कंपनी राजवट संपुष्टात येऊन नानासाहेब पेशवा बनल्याचे घोषित करण्यात आले.

·         इंग्रजांना कानपूरमधील उठावाची बातमी समजताच कानपुरच्या दिशेने इंग्रज फौज धावू लागली.

·         12 जुलै 1857 रोजी तुंबड युध्द झाले इंग्रजांच्या तोफखान्यापुढे नानाचा निभाव लागला नाही.

·         17 जुलै रोजी इंग्रजांनी कानपुरवर ताबा मिळविला.

·         अवध संस्थानच्या माध्यामातून पुन्हा कानपुरवर ताबा मिळविण्यात नानासाहेब व तात्या टोपे यशस्वी झाले मात्र फार काळ त्यांना कानपूर टिकविता आले नाही.

·         ब्रिटिश अधिकारी जनरल कॅम्पबेलने पुन्हा नानासाहेब व तात्या टोपे यांचा पराभव करुन कानपूर मिळविले.

·         यानंतर नानासाहेब नेपाळमध्ये आश्रयासाठी निघून गेले तर मागे सेनापती तात्या टोपे मात्र जवळ जवळ दहा महिने इंग्रजांविरुध लढत होते.

·         पंरतु फिरतिमुळे त्यांचाही घात झाला. इंग्रजांनी त्यांना पकडले व 18 एप्रिल 1859 रोजी फासावर लटकविले.

   लखनौ -

·         र्लॉड डलहौसीने अयोध्या (औंध/अवध) संस्थान खलसा केले.

·         30 मे 1857 रोजी अयोध्या संस्थानात उठावास सुरुवात झाली अयोध्या संस्थानच्या नवाबाच्या हजरत महल या बेगमने बंडवाल्याचे नेतृत्व केले आपल्या अल्पवयीन मुलास गादीवर बसवून इंग्रज राज्य समाप्त झाल्याचे जाहीर केले.

·         ब्रिटिश सेनापती हॅव लॅक मोठी फौज घेऊन सप्टेंबर 1857 मध्ये लखनैास आला.

·         बंडवाल्यांशी लढा देऊन 17 नोव्हेंबर 1857 रोजी बंडवालयांचा ब्रिटिश रेसिडेन्साी भेावतीचा वेढा उठविला.

·         इंग्रजांनी ताकद वाढत असतानाच ब्रिटिश सेनानी जनरल कॅम्बेल 20 हजारांची फौज घेऊन लखनौस पोहोचला. त्यांनी बंडवाल्याशी मुकाबला दिला.

·         बेगम हजरत महल च्या नेतृत्वाखाली बंडवाल्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे.

·         शेवटी 22 मार्च 1857 रोजी ब्रिटिशांनी लखनौ मिळविण्यात यश मिळविले.

बिहार -

·         पाटणजवळ दानापूर येथे ब्रिटिशांनी फौज होती येथील ब्रिटिश अधिकारी र्लॉड याने आपल्या छावणीतील हिंदी शिपायांत उठावाची लागण होऊ नये म्हणून त्याने शिपायांना निशस्त्र करण्याचा निर्णय घेतला हिंदी सैनिक शस्त्रे खाली ठेवण्यास आणि गोर्‍यांची फौज तेथे येण्यास एकच गाठ पडली.

·         आपणास नि:शस्त्र करुन लॉईड आपली कत्तल करणार अशी भीती हिंदी शिपायांना वाटल्याने त्यांनी हाती शस्त्रें घेतले व गोर्‍या फौजेवर गोळीबार सुरु केला.

·         र्लॉडड हतबल झाला. त्यांची जमीनदार राणा कुंवरसिंग ब्रिटिशांच्या विरोधात बंड करुन उठला.

·         इंग्रजांकडून झालेल्या अन्यायाची संधीच उठावाच्या रुपाने राणा कुवरस्ंिाहाला चालून आली.

·         उठाववाल्यांनाही कुंवरसिंहाच्या रुपाने नेता मिळाला इंग्रजांशी त्यांनी दिलेला लढा तरुणांनाही लाजवेल असा होता.

·         ब्रिटिशांशी लढता लढता इ.स. 1857 मध्ये कुंवरसिंह मरण पावला.

झाशी -

·         र्लॉड डलहौसीने दत्ताक वारस नामंजूर या तत्वाखाली झाशीचे राज्य खालसा केले राणीच्या दत्ताक पुत्रास राज्याधिकार नाकारणसत आला आपल्या मुलाच्या मुंजीसाठी आपल्याचा खजिन्यातील 1 लाख रुपयांची मागणी राणीने इंग्रजाकडे केली.

·         इंग्रजांनी यासाठी जामीन मागितला यामुळे राणी अपमानित झाली व तिने हाती शस्त्र घेंतले उठावाची वार्ता जसजशी समजेल तस-तसे उठावाचे लोण पसरत होते.

·         6 जून 1857 रोजी झाशी येथील हिंदी शिपायांनी बंड पुकारून इंग्रज अधिकार्‍यांची कत्तल केली. यापाठी मागे राणीचा हात आहे. असे वाटून इंग्रजांनी राणीच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.

·         इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. राणी मोठया निर्धाराने किल्ला लढवू लागली राणीच्या मदतीस तात्या टोपे धावून आले.

·         पण त्यांना पराभवास सामोरे जोवे लागले ब्रिटिश सेनापती सर हयूरोज याने किल्ल्याच्या तटबंदीस खिंडार पाडलें इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेश करताच भयंकर कतल सुरु केली.

·         मोठया युक्तीने आपल्या मुलाला पाठीशी बांधून घोडयावर स्वार होऊन राणी किल्ल्याबाहेर पडली.

·         काल्पीच्या दिशेने राणीची दौड सुरु झाली.

·         100 मैलाचे अंतर राणीने वार्‍याच्या वेगाने पार केले.

·         झाशीची राणी लक्ष्मीबाई काल्पीला येताच नानासाहेब पेशवे तात्या टोपे, बांद्याचा नवाब इ. नेते एकत्र आले.

·         ब्रिटिश सेनापती सर हयू रोज काल्पीवर आक्रमण केले.

·         बंडवाले आणि इंग्रज यांच्यात दोन लढाया झाल्या पण त्यात बंडवाल्यांचा पराभव झाला. राणी आणि तात्या टोपे यांनी ग्वाल्हेरकडे कूच केले.

·         राणी व तात्या टोपे ग्वाल्हेरला येताच तेथील सैनिकात उत्साह संचारला व त्यांनी बंडाचे निशान उभारले यावेळी ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव मात्र आगर्‍यास पळून गेला.

·         ग्वाल्हेरचा किल्ला जून 1858 मध्ये बंडवाल्यांच्या ताब्यात आला.

·         ग्वाल्हेरच्या बंडाची बातमी समजाताच सर हयेरोज काल्पीहून ग्वाल्हेरला आला राणी, तात्या टोपे व इंग्रज यांचा जणू पाठशिवणीचा खेळ सुरु होता.

·         ग्वाल्हेर जिंकणे इंग्रजाना आवश्यक वाटू लागले.

·         त्यांनी बंडवाल्यांवर आक्रमण केले यावेळी राणी लक्ष्मीबाई उठावाचे स्वत: नेतृत्व करत होती सर ह्यूरोज व जनरल स्मिथ यांच्या भेदक मार्‍यापुढे उठाववाल्यांचा निभाव लागेनासा झाला राणीला शत्रूने वेढा दिला.

·         राणीने मोठया चपळतेने घोडा उडवून वेढयाचा छेद केला.

·         ब्रिटिश फौज पाठीवर होतीच अशा आणीबाणीच्या प्रसंगी एका ओढयाजवळ राणीचा घोडा अडला पाठलाग करणार्‍या इंग्रज सैनिकांनी राणीच्या डोक्यावर छातीवर जबर वार केले.

·         राणीने पराक्रमाची शर्थ केली.

·         मृत्यूला कवटाळण्यापूर्वी राणीने वार करणार्‍या दोन शत्रू सैनिकांना ठार केले.

·         राणीच्या मृत्यूने 17 जून 1858 उठावाच्या एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला.

1857 च्या उठावाच्या अपयशाची कारणे :-

उठावाचे क्षेत्र मर्यादित -

·         1857 चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला.

·         नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही.

·         त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकाला.

योग्य नेतृत्वाचा अभाव -

·         उठावाला सर्वसामान्य नेता मिळू शकला असता तर उठाव यशस्वी होऊ शकला असता.

·         इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. उठाववाल्यांचे नेते त्यांची बरोबरी करु शकले नाहीत.

·         नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंह यांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही.

·         क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.

एकाच ध्येयाचा अभाव -

·         1857 चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता उठाववाल्यांच्यात समान ध्येयाचा अभाव होता.

·         हिन्दी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता.

·         बादशहा बहादूरशहहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. तर नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती.

·         झाशीची राणी मेरी झांशी मै नही दूंगी अशी गर्जना करुन रणमैदानात उतरली होती.

·         सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.

नियोजनाचा अभाव -

·         ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत कोणत्या ठिकाणी कोणी उठाव कराव तसेच उठाव यशस्वी झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी असावी, याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार 31 मे 1857 ही उठावाची नियोजित तारीख होती.

·         परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले.

·         एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला.

जनतेच्या पाठिंब्याचा अभाव -

·         1857 च्या उठावात सामान्य जनता सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा उठावास मिळावयास हवा होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही.

·         दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.

स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत -

·         फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती.

·         या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली त्यांचे डावपेच सैन्य याबबतची माहिती पुरविणार्‍यांना बक्षिसे जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले.

·         दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले.

·         फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानी ब्रिटिशांच्या हाती लागले.

लष्करी साहित्यातील तफावत -

·         लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे बंदुका, तोफा व इतर आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती.

·         शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयु रोज केवळ 2 हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या 20 हजार फौजेचा त्याने पराभव केला लखनौममधील ब्रिटिश रेसिडेन्सीमधील अडकलेल्या 2 हजार इंग्रजांनी 1 लक्ष बंडवाल्यांच्या अपयशास कारणीभूत ठरली.

·         1857 च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो.

·         मला गोर्‍या इंग्रजांनी भीती वाटत नाही पण, त्यांच्या हाती असणार्‍या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.

दळणवळणाच्या साधनातील प्रगती -

·         र्लॉड डलहौसीने दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली.

·         रेल्वे तारायंत्र पोस्ट, रस्ते, यांच्या सोयी उपलब्ध केल्या 1857 चा उठाव दडपून टाकण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला तारायंत्राच्या द्वारे ठिकठिकाणच्या बंडाची बातमी त्यांना मिळू शकली तर रेल्वेच्याद्वारे उठावाच्या ठिकाणी लष्कारी कुमक पाठविणे ब्रिटिशांना शक्य झाले.

अनुभवी ब्रिटिश सेनापती -

·         उठावाचे नेतृत्व करणारे नानासाहेब तात्या साहेब टोपे बहादूर शहा, झाशीची राणी, हे पराक्रमी साहसी होते. परंतु रणनीतीत ते मागे पडले.

·         याउलट इंग्रजांकडे असणारे सेनानी हॅव, लॉक, कॅम्बेल, नील, लॅरेन्स, हयू, रोज, हे अत्यंत पराक्रमी अनुभवी व मुत्सदी होते.

·         त्यांच्या लष्करी हालचाली अत्यंत जलद व नियोजनबध्द होत्या त्यामुळे त्यांचा विजय झाला.

इंग्लडची मदत -

·         1857 चा उठाव दडपून टाकण्यासाठी गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिनंने इंग्लंडमधून 1 लक्ष 12 हजाराची फौज आणली आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकुल होती. ब्रिटिश साम्राज्यात यावेळी शांतता होती त्यामुळे 1857 च्या उठावाकडे बारकाईने लक्ष देऊन हा उठाव दडपून टाकता आला.

महत्वाची आंदोलने व चळवळी

असहकार आंदोलन :-

·         भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांनडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही.

·         इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ नच केले गेले. या घटनांमुळे भारतीय जनतेने ब्रिटिश सरकारविरूध्दचा आपला लढा अधिक तीव्र केला.

खिलाफत चळवळ :-

·         पहिल्या महायुध्दानंतर तर्कस्तानवर कठोर तह लादला गेल्याने प्रक्षुब्ध झालेल्या भारतीय मुस्लीम समाजाने खिलाफत आंदोलन उभारले.

·         राष्ट्रीय सभेने खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि मुस्लिमांनी राष्ट्रीय सभेच्या आंदोलनास दिलेला पाठिंबा यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यात गांधीजीना यश मिळाले.

असहकार चळवळ :-

·         1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

·         त्यात पुढील बाबींचा समावेश होता.

(1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

(2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

(3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

(4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

(5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

(6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

(7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

·         असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

·         शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

·         चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.

विधायक कार्यक्रम :-

·         गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

·         त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

स्वरात्य पक्ष :-

·         पंडित मोतीलाल नेहरू, बॅ. चित्ता रंजन दास इ. ज्येष्ठ नेत्यांनी कायदेमंडळात जाऊन ब्रिटिश शासनाशी लढा देण्याच्या उददेशाने 1922 साली स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

·         1923 च्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत या पक्षाला बर्‍यापैकी यश मिळाले. यात शासनाने आडमुठेपणाने धोरण स्वीकारल्याने अल्पावधीत त्यांचा भाषांतरांवरूनरमनिरास झाला.

यशापयश :-

·         असहकार आंदोलनाने भारतीय जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली.

·         लाखोंच्या संख्येत सामान्य लोक निर्भयपणे असहकार आंदोलनात सहभागी झाले.

·         या आंदोलनाद्वारे हिंदू-मुस्लीम ऐक्य दृढ झाले.

·         सत्याग्रहाच्या अभिनव मार्गाने ब्रिटिश साम्राज्यवादी राजवटीचा पाया कमकुवत करण्यात गांधीजी यशस्वी झाले.

चलेजाव आंदोलन (1942) :-

·         क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम 6 जुलै 1942 रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.

·         मुंबईत 7 ऑगस्ट 1942 रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) 8 ऑगस्ट 1942 रोजी चलेजाव ठराव मंजूर.

·         9 ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.

·         गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.

·         कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ. -

* प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ. बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.

* या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.

* सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.

*या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.

* काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.

* व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.

* मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.

* भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.

* निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.

* स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.

* भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.

छोडो भारत चळवळ -

·         क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे 8 ऑगस्ट, 1942 रोजी घेतला.

·         ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले.

·         समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून 1942 च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले.

·         महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले.

·         देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.

·         अशा प्रकारे 1942 चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.

नेताजी सुभाष चंद्र बोस -

·         भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत.

·         1938 1939 साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

·         दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले.

·         त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

आझाद हिंद सेना -

·         ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.

·         नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

·         नेताजींनी 1943 आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.

·         आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

·         18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.

·         आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले.

·         लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.

भारतीय नौदलाचा उठाव -

·         आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी 1946 मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला.

·         अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली.

·         या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

हिंदी राष्ट्रवाद व त्याच्या उदयाची कारणे

·         पाश्चात्य शिक्षणातून हिंदुस्थानात एका सुरक्षित वर्गाचा उदय झाला. या वर्गानेच पुढे आपल्या समाजाचे नेतृत्व केले.

·         विविध प्रांतात राहणारे हिंदू मुसलमान, जैन, पारसी, इ. विविध धर्माचे लोक हे हिंदुस्थान देशाचे नागरिक आहेत.

·         ही राष्ट्रवादी भावना हळूळळू तयार त्यातून पूढे 1885 साली राष्ट्रभाषा (कॉग्रेस) ही राजकीय संघटना स्थापन झाली.

·         त्या राजकीय संघटनेची महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

धर्मसुधारणेचा परिणाम -

·         एकोणिसाव्या शतकात ब्राम्हो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, रामकृष्ण मिशन, थिऑसॉफिकल सोसायटी, इ. अनेक धर्मसंघटना हिंदुस्थानात तयार झाल्या त्याद्वारे राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अ‍ॅनी बेझंट यांसारख्या महान सुधारकांनी जी धार्मिक जागृती घडवून आणली त्यातून पुढे राजकीय जागृती घडून आली.

·         ज्या देशात स्वामी विवेकानंदांसारखे थोर विद्वान जन्मास येतात, त्या देशात धर्मप्रसारासाठी ख्रिस्ती मिशनरी पाठविणे म्हणजे शुध्द मूर्खपणा आहे असे पाश्चात्य विचारवंत म्हणू लागले.

समाजसुधारकांनी केलेली जागृती -

·         राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद स्वामी विवेकांनद यांनी समाजात धर्म जागृतीबरोबरच समाज जागृतीही घडवून आणली, समाजात समाजसुधारकांची जी एक पिढी निर्माण झाली.

·         त्यांनी सतीची चाल, अस्पृश्यता, जातिभेद, विधवांचा छळ, बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, अंधश्रध्दा, धार्मिक, कर्मकांड या अनिष्ट रुढींवर हल्ले चढवले, त्याचबरोबर त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार केला त्यामुळे हळूहळू हिंदी समाजात जागृतीघडून आली.

पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव -

·         पाश्चात्य शिक्षण हि इंग्रजांकडून हिंदी समाजाला मिळालेली फार मोठी देणगी होती.

·         त्यांची संस्कृती कला, विज्ञान, याचे हिंदी लोकांना ज्ञान होऊ लागले. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, इटलीेचे व जर्मनीचे एकिकरण, या निमित्ताने तेथील जनतेत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना त्यातून त्यांना मिळालेले स्वातंत्र्य या गोष्टीमुंळे आपल्या देशातसुध्दा अशी राष्ट्रनिर्मिती का होऊ नये. अशी भावना हिंदी जनतेत निर्माण झाली. त्यामुळे पुढे राष्ट्रसभा स्थापन झाली.

वृत्तपत्रांचे योगदान -

·         हिदुस्थानात प्रथम इंग्रजांनी वृत्तपत्रे सुरु केली. त्यात सरकारच्या धोरणाची फक्त स्तुती केलेली असे.

·         पण या इंग्रजांचे धोरण अन्यायकारक कसे आहे हे दाखवून देण्यासाठी पूढे हिंदी वृत्तपत्रे निघाली. सरकारविरुध्द असंतोष निर्माण करुन राष्ट्रवादाचा प्रसार करण्याचे महान कार्य हिंदी वृत्तपत्रानी केले.

साहित्यातून राष्ट्रीयत्व -

·         बंगालमध्ये बकिमचंद्र चटर्जी रवींद्रथान टागोर आणि महाराष्ट्रात लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा अनेक लेखकांनी मातृभाषा समृध्द केली.

·         मातृभाषेविषयीचा त्यांचा अभिमान समाजात राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत झाला.

·         याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बकिमचंद्राचे वंदे मातरम हे गीत होय.

·         हे गीत काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यत पसरलेल्या अफाट हिंदी समाजाचे राष्ट्रगीत बनले.

·         पुढे पुढे नुसते वंदे मातरम हा शब्द उच्चारणेही गुन्हा ठरू लागला.

हिंदुस्थानच्या प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व -

·         इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्य स्थापन केल्यांनतर पाश्चात्य संशोधकांनी येथील प्राचीन साहित्य व इतिहास यावर संशोधन केले.

·         या संशोधकांमध्ये कोलब्रुक विल्सन, म्यूलर, मोनिअर, विल्यम्स, यांसारख्या लोकांचा समावेश होता.

·         हिंदुस्थानातील राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद, सरस्वती, डॉ, भांडारकर यांसारख्या हिंदी लोकांनी हिंदी संस्कृतीचे श्रेष्ठत्व जनतेसमोर मांडले.

·         त्यामूळे सुशिक्षित हिंदी जनतेला आपल्या प्राचीन ठेव्यांचा अभिमान वाटू लागला.

इंग्रजी भाषेद्वारे राष्ट्रीय एकात्मता -

·         इग्रजांनर जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानांत इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यास सुरुवात केली.

·         काश्मिरी, पंजाबी, गुजराती, बंगाली, मराठी, कानडी, मद्रासी, या सर्वानी भाषा भिन्न भिन्न होती ती एकमेकांस समजत नव्हती, पण इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे हे लोक एकत्र येत तेव्हा ते इंग्रजीतून विचारविनिमय करीत.

·         त्यामुळे राष्ट्रवादाची झपाटयाने वाढ होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढतच गेली, त्यातून राष्ट्रसभेची स्थापना होऊ शकली.

रेल्वे, तारायंत्रे व पोस्ट या सुधारणांचा परिणाम -

·         रेल्वे, मोठे रस्ते, तारायंत्रे, पोस्ट, या भौतिक सुधारणांमुळे हिंदुस्थानातील प्रमुख शहरे एकत्र जोडली गेली.

·         महाराष्ट्रातील व्यक्तीला मद्रासमध्ये व मद्रासमधील व्यक्तीला महाराष्ट्रात जाणे रेल्वेमुळे सहज शक्य झाले.

·         एका प्रांतातील लोक दुसर्‍या प्रांतात सहज जाऊ लागल्यामुळे त्यांच्यातील विचारविनिमय वाढला.

·         त्यामुळे राष्ट्रवादाचा उदय होण्यास हातभार लागला.

·         रेल्वेने समाजातील सर्व जातिपंथाचे लोक एकत्र बसून प्रवास करु लागले त्यामुळे जातिपंथाची बंधने शिथिल होण्यास मदत झाली.

·         त्यातून राष्ट्रीय जागृती घडून आली.

इंग्रजांचा केंदि्य राज्यकारभार -

·         1857 पर्यत इंग्रजांनी जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थान जिंकून घेतला.

·         1857 च्या उठावानंतर हिंदुस्थानातिल संस्थानांना जिवदान दिले, परंतु ती संस्थाने अप्रत्यक्ष इंग्रजांच्याच वर्चस्वाखाली होती.

·         हिंदुस्थानत ही जी एकछत्री राजवट इंग्रजांनी स्थापन केली.

·         त्याविषयी पं. नेहरू म्हणतात इंग्रजांनी स्थापन केलेल्या राजकीय ऐक्याने हिंदुस्थानात राजकीय जागृती व राष्ट्रीय ऐक्य यांचा उदय घडवून आणला.

·         केंद्राचे प्रांतावर पूर्ण नियंत्रण होते. सरकार एक, त्याचे लष्कर एक त्याची राज्यकारभार पध्दती सर्वत्र सारखी या गोष्टीमुळे हिंदुस्थान झपाटयाने एक होऊ लागला.

·         त्यातून अप्रत्यक्षणपणे राष्ट्रीय एकात्मता वाढू लागली.

इंग्रजांनी केलेल्या आर्थिक शोषणाचे परिणाम -

·         इंग्रजाचे साम्राज्य हे व्यापारी साम्राज्य होते. रेल्वेमार्ग बांधणे, बंदरे तयार करणे, रस्ते बांधणे यांदवारे हिंदुस्थानात मोठया प्रमाणावर इंग्रजी माल खपवून त्यांना हिंदी लोकांची अप्रत्यक्ष पिळवणूकच करावयाची होती.

·         त्यामूळेच त्यांनी इंग्लडंमधून हिंदुस्थानात येणार्‍या मालावरील जकात माफ केली.

·         इंग्लंडमध्ये औद्योगिकीकरण झाल्यामुळे यंत्रावर तयार होणारे कापड स्वस्तात विकूनही त्यांना विक्रमी नफा होत असे. त्यामुळे हिंदुस्थानातील उद्योगधंदे हळूहळू बंद पडून कारागीर बेकार झाले.

·         खेडे पूर्वी स्वयंपूर्ण होते, पण उद्योगधंदे बुडाल्यामुळे ही स्वयंपूर्णता नष्ट झाली या अर्थिक शोषणाची जाणीव सुशिक्षित वर्गास होऊ लागली.

·         सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरुघ्द दादाभाई नौरोजींसारख्या नेत्यांनी आवाज उठवला.

·         इंग्रज अधिकार्‍यांचे पगार, इंग्रज भांडवलावरील व्याज, नफा, या रुपाने देशातून संपत्ती चा ओघ इंग्लंकडे वाहू लागला थोडक्यात सर्वच बाजुंनी हिंदी लोकांचे आर्थिक शोषण चालले होते हिंदी जनतेची ही दु:खे सरकारच्या कानावर घालण्यासाठी एखाद्या राष्ट्रीय व्यासपीठासी आवश्यकता होती.

र्लॉड लिटनची दडपशाही -

·         इ.स. 1876 ते 1880 या काळात हिंदुस्थानात आलेला व्हाईसरॉय र्लॉड लिटन याने दडपशाहीच्या धोरणाचा अवलंब केल्यामूळे हिंदी सुशिक्षित वर्गात असंतोष निर्माण झाला.

·         ब्रिटिश पार्लमेंटने खास कायदा करुन इंग्लंडच्या राणीस हिंदुस्थानची साम्रागिनी म्हणून जाहीर केले तेव्हा लिटनने दिल्लीस खास दरबार भरवला त्या निमिज्ञ्ल्त्;ााने त्यांने हिंदी राजे, महाराजे व नबाब यांना दरबारात पाचारण करण्यात आले होते.

·         दक्षिण हिंदुस्थानात या वेळी प्रचंड दुष्काळ पडून लाखो लोक अन्नाअभावी मेले होते.

·         तरी लिटनने दिल्लीला वैभवशाली दरबार भरवून लाखो रुपयांची उधळपट्टी केली होती.

·         वृत्तपत्रातून त्यांच्या या धोरणावर प्रखर टीका करण्यात आली, त्यामूळे लिटनने इ.स. 1878 मध्ये व्हार्नाक्युलर अ‍ॅक्ट पास करून देशी भाषेतील वृत्तपत्रंाची गळचेपी केली.

·         तसेच याच सुमारास त्याने आम्र्स अ‍ॅक्ट पास करून हिंदी लोकांनी हत्यारे बाळगू नयेत असा निर्बंध घातला.

आपला वंश श्रेष्ठ असा इंग्रजांना गर्व -

·         बरेच इंग्रज अधिकारी हिंदी जनतेशी फटकून वागत असत.

·         हिंदी लोक म्हणजे दगड धोंडयाची व जनावरांची पूजा करणारे रानटी लोक आहेत.

·         अर्धे निग्रो व अर्धे गोरिला असे प्राणी आहेत. अशी हेटाळणी करीत हिंदी लोकांना शिव्या इंग्रज मळेवाले अधिकारी देत.

·         आपला वंश श्रेष्ठ व हिंदी लोकांचा वंश कनिष्ठ असे इंग्रज मानीत असत.

·         त्यांचे खरे स्थान दाखवणे आवश्य होते.

हिंदी लोकांवर होणारे अत्याचार -

·         इंग्रज हिंदी जनतेवर काही ना काही निमिताने जूलुम जबरदस्ती करीत असत. पण हे अत्याचार बर्‍याच वेळा सहन केले जात असत.

·         त्यांना हिंदी जनतेच्या जीवित्वाची किंमतच नव्हती. पण ते स्वत:चे जीवन यात मौल्यवान समजत असत.

·         त्यामूळे या युरोपियनांनी केलेले जूलूम व खून अनेक वेळा पचवले जात असत आणि एखाद्या गोष्टीचा किंवा गुन्हाचा फारच बोलबाला झाला तर थोडीफार शिक्षा देऊन नंतर त्या युरोपियन गुन्हेगारास सोडून दिले जात असे.

·         रेल्वेच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणे ही युरोपियनांची मक्तेदारी समजली जात असे त्या वर्गातून हिंदी माणासांना प्रवास करता येत नसे इंग्रजांच्या या वागण्यामुळे सुशिक्षित हिंदी लोकांच्या ह्रदयात आपल्या गुलामगिरीच्या वेदना असहय होत असत.

·         त्यामुळे राष्ट्रीय संघटनेची आवश्यकता भासू लागली.

इलर्बट बिलाद्वारे मार्गदर्शन -

·         र्लॉड रिपनच्या काळात सर सी. पी. इल्र्बट हा कायदामंत्री होता त्याच्या काळापर्यत हिंदी न्यायाधिशांना युरोपियन लोकांचे खटले चालविण्याची परवानगी नव्हती. हा अन्याय आहे असे इल्र्बटला वाटत होते.

·         कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असाव्यात असे त्याचे मत होते.

·         त्यामूळे त्याने या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी एक विधेयक मांडले इंग्रजांनी या बिलास फार मोठा विरोध केला.

·         खूद्द त्यांनी व्हाइसरॉयविरुध्द आंदोलन केले, त्यामुळे त्या बिलात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली.

·         या निमित्ताने हिंदी जनतेत जागृती निर्माण झाली. आपणही आपले हक्क संघटित होऊन सरकापासून हिसकावून घेतले पाहिजेत.

·         हा धडा हिंदी विचारवंतांनी या प्रकरणापासून घेतला. आपल्यावर होणारा अत्याचार सहन न करता आपणही राष्ट्रीय स्वरुपाची संघटना अन्यायास वाचा फोडली पाहिजे अशी हिंदी जनतेत मानसिकता निर्माण झाली.

हिंदी सुशिक्षितांना पात्रतेनुसार नोकर्‍या देत नसत -

·         हिंदी जनतेस धर्म वंश किंवा रंग यावरून कारभारतील अधिकाराच्या जागा नाकारल्या जाणार नाहीत असे आश्र्वासन राणीच्या जाहिरनाम्यात दिले होते, पण ते आश्र्वासन सरकारे पाळले नाही.

·         झालेल्या हिंदी तरुणांना बढती दिली जात नव्हती प्रसंगी उच्च जागा देण्यात आली तर अल्पकाळातच काही तरी क्षुल्लक कारण दाखवून संबंधित हिंदी अधिकार्‍यास नोकरीवरुन कमी केले जात असे.

·         नोकरीस लागलेल्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना क्षुल्लक कारणावरून नोकरीवरून काढून टाकले होते.

·         हा अन्याय सहन न करता सर्व हिंदी नेत्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे अनेक नेत्यांना वाटत होते.

इंग्रज सरकारचे प्रशासन

कंपनी सरकारची प्रशासन रचना :-

बंगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -

·         बंगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.

·         16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.

·         त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.

·         भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.

·         या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.

·         या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्ंिटग्जने बंद केली.

नियामक कायदा (1773) :-

·         कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने कंपनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतुने नियामक कायदा 1773 मध्ये मंजूर केला.

·         कायदा मंजूर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे

बंगालमध्ये अत्याचार -

·         कंपनीच्या नोकरांनी बंगालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार केला.

·         कारागिराकडून जबरदस्तीने स्वस्त दरात माल घेणे, दंड करणे कारागृहात पाठविणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून जबरदस्तीने कर्जाचे रोखे लिहून घेणे यामुळे इंग्लडची जनता कंपनी शासनावर टीका करुन कंपनी सरकार बरखास्त केले.

कंपनीचे शासन म्हणजे व्यापारी धोरण -

·         प्लासीच्या युध्दाने राजकारणात प्रवेश तर बक्सारच्या युध्दाने सत्ता स्थिर झाली. संरक्षण परराष्ट्रीय धोरण, करार, तह इ. महत्वाचे अधिकार कंपनीला मिळाले शासनविषयक सज्ञ्ल्त्;ाा व्यापारी संघटनेकडे असणे योग्य नाही असे मत राजनीतिज्ञम्प्;म्पनी व्यक्त केले.

·         व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हटले जाते.

ब्रिटिश पार्लमेंटला संधी -

·         कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अनेक मार्गाने मोठया प्रमाणात पैसा स्वत:साठी गोळा केला.

·         कंपनीने सतत युध्दाचे धोरण स्वीकारले त्यामूळे आर्थिक स्थिती कोलमडली होती. यासाठी कंपनीने पार्लमेंटकडे आर्थिक मदत मागितली.

·         1772 मध्ये संसदेने कंनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सदस्य असलेल्या प्रवर समिती व त्याचबरोबर 13 सदस्यअसलेल्या गुप्त समितीची नेमणूक केली. समितीच्या अहवालाच्या आधारे 14 लाख पौंड रक्कम कर्जाऊ दिली.

·         त्याचवेळी 1 ऑक्टोबर 1773 रोजी नियंत्रणाचा कायदा मंजूर केला.

नियामक कायद्याचे स्वरुप /तरतुदी :-

कंपनीच्या संघटनेतील व प्रशासनातील दोष दूर करुन भारतीय जनतेला चांगले शासन प्रदान करणे हा उद्देश होता. त्यातील तरतुदी पुढीलप्रमाणे:

(1) मुंबई, मद्रास, कोलकत्ता , या तीन प्रांताचे एकीकरण करुन कोलकत्ता येथे मुख्य ठिकाण केले.

(2) कोलकत्याच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे उच्च पद देऊन कंपनीच्या प्रदेशाचा सर्वोच्च शासक म्हणून घोषित केले. तसेच मुंबई, मद्रास, गव्हर्नरच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले.

(3) प्रांतीय गव्हर्नरने जनरलला कारभारात मदत करण्यासाठी 4 लोकांचे कार्यकारी मंडळ नियुक्त केले. हे मंडळ बहुमतानुसार कार्य करीत असे.

(4) कोलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. एक मुख्य व इतर तीन असे चार न्यायाधीश असत. दिवाणी फौजदारी, धार्मिक, तसेच कंपनीच्या अधिकार्‍याच्या विरूध्द (गव्हर्नर जनरल गव्हर्नर आणि कौन्सिल सोडून ) निर्णय देणे. या निर्णयाविरुध्द इंग्लंडमधील प्रिव्ही कौन्सिलकडे अपील करता येत असे

(5) दर 20 वर्षाने विशेषाधिकाराचे नूतनीकरण करावे.

नियामक कायद्यातील दोष :-

(1) प्रशासनाचे अधिकार कौन्सिलकडे सोपविल्याने गव्हर्नर जनरलची स्थिती अतिशय दुबळी होती.

(2) गव्हर्नर जनरल, कौन्सिल, आणि न्यायालय यांच्यातील अधिकारात अस्पष्टता होती.

(3) प्रांतीय गव्हर्नरने परिस्थितीनुसार गव्हर्नर जनरलचे आदेश आज्ञम्प्;म्प्;ाा नाकारल्याने सर्वोच्च सत्तेला अर्थ उरला नाही.

1781 चा दुरुस्ती कायदा :-

·         1773 च्या कायद्यातील दोष दुर करण्याच्या हेतुने ब्रिटिश संसदेने 1781 मध्ये दुरुस्ती कायदा मंजूर केला.

·         त्यानूसार कंपनी कर्मचार्‍यांवर सर्वोच्च न्यायलयात कोणतीही कार्यवाही होणार नाही.

1784 चा पिट्स कायदा :-

·         1773 च्या नियंत्रण कायद्यातील काही दोष नष्ट करण्याचा प्रयत्न 1781 च्या दुरुस्त कायद्याने केला.

·         1783 मध्ये श्री दंडास यांनी कंपनी प्रशासन व भारतातील सुधारण या संदर्भात विधेयक मांडलें. पंरतु विरोधी सदस्य असल्याने विधेयक नामुंजूर झाले.

·         त्यानंतर नोव्हेबर 1783 मध्ये फॅक्स नॉर्थ याच्या सरकारने विधेयक मांडले त्याचेही विधेयक नामंजूर झाले कारण पिट यांनी त्याला विरोध केला. कंपनी शासनावर नियंत्रण असावे असेही वाटत होते.

·         पंतप्रधान पिट यांनी जानेवारी 1784 मध्ये कंपनी शासनासंबंधी विधेयक सादर केले, विरोधी केला.

·         निवडणूकीनंतर ऑगस्ट 1784 मध्ये पुन्हा विधेयक मांडले व मंजूर झाले.

·         या कायद्यास पिट्स कायदा म्हणतात.

·         या कायद्यातील तरतुदी पुढीलप्रमाणे :-

(1) इंग्लंडचा अर्थमंत्री भारत सचिव प्रिव्ही कौन्सिलच्या सभासदातून सम्राट चार सदस्यांची निवड करुन 6 सदस्यांचे र्बोड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. भारतासंबंधची सर्व कागदपत्रे र्बोड ऑफ डायरेक्टर्सला र्बोड ऑफ कंट्रोलसमोर ठेवावी लागत असत. भारतातील राज्यकारभरावर नियंत्रण व मार्गदर्शन करण्याचे अधिकार दिले होते.

(2) र्बोड ऑफ कंट्रोलच्या संमतीने गव्हर्नर जनरलची नियुक्ती र्बोड ऑफ डायरेक्टर करत असे. त्याच्या कार्यकारिणीची सदस्य संख्या तीन करण्यात आली.

(3) मुंबई, मद्रास, गव्हर्नरवर गव्हर्नर जनरलचे पूर्ण अधिकार असतील.

(4) कंपनीच्या संचालक मंडळाकडून तीन सदस्याची एक गुप्त समिती स्थापन केली. या समितीने र्बोड ऑफ कंट्रोलचे गुप्त स्वरुपाचे निणर्य आदेश भारत सरकारला पाठविणे. (५) गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचा एक सदस्य सेनापती असावा.

·         भारतीय शासनासंबंधीचे नियंत्रण आणि पर्यवेक्षणाचा अधिकार र्बोड ऑफ कंट्रोलला देण्यात आला प्रशासनाची जबाबदारी आणि त्याला लागणारे अधिकार्‍यांच्या नेमणूकीचे अधिकार र्बोड ऑफ डायरेक्टर्सना देण्यात आले.

·         त्यामुळे भारतातील प्रशासनाची पध्दत ही द्विसरकार पदधत म्हणून प्रसिध्द आहे.

·         थोडया फार बदलाने ही पध्दत 1858 पर्यत सुरु होती.

1786 चा कायदा :-

·         र्लॉड कॉर्नवॉलिसच्या मागणीनुसार ब्रिटिश संसदेने 1786 चा कायदा मंजूर केला या कायद्यानूसार गव्हर्नर जनरलला कमांडर इन चिफ म्हणून घोषित केले.

·         तसेच गरज असल्यास कार्यकारीणीच्या निर्णयाविरुध्द कार्य करण्याची परवानगी देण्यात आली.

·         भारतीय प्रशासनात कार्य करण्यार्‍या अधिकर्‍यांना इंग्लडमध्ये परत गेल्यावर मालमत्ता घोषित करावी लागत असे ही अट रद्द करण्यात आली.

चार्टर अ‍ॅक्ट किंवा सनदी कायदा (1793-1857) :-

·         कंपनी शासनाचा काळ 1793-1857 असा होता.

·         त्यामध्ये 1773 ते 92 पर्यतचा काळ संसदीय कायद्यांचा व नियंत्रणाचा काळ म्हणून ओळखला जातो.

·         1793-1857 चा काळ हा चार्टर अ‍ॅक्ट किंवा सनदी कायदा म्हणून ओळखला जातो.

·         चार्टर अ‍ॅक्टनुसार कंपनीला व्यापारविषयक क्षेत्रात सवलती देण्यात आल्या. त्यामध्ये संसदेने परिवर्तन केले.

1793 चा सनदी कायदा :-

·         नियंत्रणाच्या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की दर20 वर्षानी कंपनीच्या कारभाराची फेरतपासणी करुन भारतामधील व्यापारी मक्तेदारीची व राज्यकारभाराची नवी सनद दिली जावी त्यानुसार 1793 साली आज्ञापेताचे नूतनीकरण करण्यात आले.

·         त्यातील तरतूदी पुढीलप्रमाणे :

(1)भारताबरोबर पुर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा विशेषाधिकार आणखी 20 वर्षासाठी प्राप्त झाला.

(2) र्बोड ऑफ कंट्रोलची सदस्य संख्या पाच करण्यात आली. त्यांचे वेतन भारतीय कोषातून तिजोरीतून देण्यात यावे

(3) गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर यांना त्यांच्या कौन्सिलच्या निर्णयाविरूध्द कार्य करण्याचे स्वांतत्र्य देण्यात आले.

(4) भारतामधील कंपनीच्या कोणत्याही अधिकार्‍याला परत बोलावण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला.

1793-1893या काळातील संसदीय कायदे :-

·         1793 च्या आज्ञापेतानूसार जी प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. त्यास संसदेने आवश्यकतेनुसार बदल केले.

·         1793 च्या कायद्यानुसार कॉर्नवालिसने केलेल्या नियमंाना मान्यता दिली.

·         भारतीयांना ब्रिटिश नागरिकांनी जो कर्जपुरवठा केला त्यास कायद्याने मान्यता दिली 1795 च्या कायद्यानुसार कंपनीला ब्रिटिश सैन्यात वाढ करण्याची परवानगी संसदेने दिली.

·         1800 च्या कायद्यानुसार कोलकत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करण्यात आली.

1813 चा चार्टर अ‍ॅक्ट /सनदी कायदा :-

·         कंपनीचा व्यापारविषयक एकाधिकार रद्द करुन मुक्त व्यापारी धोरण आणि ख्रिश्चन मिशनर्‍यांना भारतात प्रवेश हि ब्रिटिश नागरिकांची मागणी होती तर याला कंपनी समर्थकानी विरोध केला. यातून 1813 आज्ञापत्र मंजूर करण्यात आले.

·         त्यातील तरतुदी पुढीलप्रमाणे :-

(1) कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी नष्ट करुन केवळ 20 वर्षासाठी चहाचा विशेषाधिकार देण्यात आला

(2) कंपनी नियंत्रणाखालील प्रदेश हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग समजून त्यांच्या संरक्षणासाठी 2 हजार सैनिक भारतात ठेवावेत

(3) गव्हर्नर जनरल, गव्हर्नर, कंमाडर, इन चिफ यांच्या नेंमणूकिस ब्रिटिश सम्राटाची मान्यता घ्यावी

(4) भारतीयांचा धार्मिक व नैतिक विकास करण्यासाठी ब्रिटिश सरकारने दरवर्षी 1 लाख रु खर्च करावेत.

1833 चा चार्टर अ‍ॅक्ट:-

·         कंपनीच्या व्यापारविषयक अधिकारची मुदत संपून तिचे नूतनीकरण 1833 साली करण्यात आले.

·         नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष चार्ल्स गंट यांनी कंपनीचे व्यापारविषयक अधिकार सज्ञ्ल्त्;ाा नष्ट करावी अशी मागणी केली.

·         तरतुदी पुढीलप्रमाणे

(1) कंपनीला भारतात राजकीय व प्रशासकीय सत्तेची प्रयोग करण्याची परवानगी 30 एप्रिल 1853 पर्यत दिली

(2) भारत-चीनमधील चहाच्या सवलती रद्द करुन 9 कोटी नुकसानभरपाई देण्यात आली.

(3) संचालक मंडळाचे विशेषाधिकार नष्ट केले

(4) भारतात असलेल्या ब्रिटिश नागरिकांना संरक्षण देण्याची जबाबदारी गव्हर्नर जनरलवर सोपविली

(5) लॉ.मेंबर कौन्सिलला भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. कौन्सिलमध्ये एका लॉ मेंबर समावेश करण्यात आला.

(6) बंगाल प्रांताचे आग्रा व बंगाल असे दोन प्रांतांत विभाजन केले.

(7) कोणताही भेदभाव धर्म, वेश, लिंग, वर्ण न करता भारतीयांना कंपनी प्रशासनात नोकर्‍या द्याव्यात

·         या आज्ञापत्राद्वारे एका केंदि्रय कौन्सिलची स्थापना करुन संपूर्ण भारतासाठी विधिनियम करण्याचा अधिकार दिला. त्यानुसार केंदि्रत विधिमंडळ व केंदि्रय विधिनिर्मितीच्या पध्दतीचा प्रारंभ भारतात झाला.

1853 चा चार्टर अ‍ॅक्ट :-

·         कंपनीला दिलेल्या सनदेची मुदत 1853 मध्ये संपली, कंपनीकडे राजकीय सज्ञ्ल्त्;ाा ठेवण्यास अनेक संसद सदस्यांचा विरोध होता. त्यातून आज्ञापत्र मंजूर करण्यात आले.

·         त्यातील तरतुदी -

(1) आज्ञापत्रांची 20 वर्षाची मुदत रद्द केली. संसद कंपनीचे अधिकार रद्द करत नाही. तोपर्यत सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून कंपनीने भारतात कारभार करावा

(2) कंपनीच्या संचालकांची संख्या 18 करण्यात आली. त्यामध्ये 10 वर्षासाठी सम्राटाकडून 6 तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून 12अशी निवड करावी

(3) नियंत्रण मंडळाच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याची परवानगी दिली. प्रत्यक्षात 1912 मध्ये गव्हर्नरची नेमणूक झाली.

(4) भारतीय कायद्यांचे संहितीकरण करण्यासाठी इंडियन लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली.

(5) विधीनिर्मितीसाठी कार्यकारणी परिषदेची सदस्य संख्या 12 निश्चित करण्यात आली.

·         यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश इतर एक न्यायाधीश आणि चांर प्रांताचे मुंबई, मद्रास, आग्रा, बंगाल चा सदस्य असे 6 सदस्य व इतर 6 सरकारी सदस्य असे.

कंपनी सरकारची नागरी सेवा :-

·         ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेबरोबर नागरी सेवेला प्रारंभ झाला.

·         प्रारंभी व्यापारी व प्रशासकीय कामे कंपनीचे सेवक करत असल्याने त्यांना व्यापारी सेवक किंवा रायटर्स म्हणत असत.

·         त्यांची निवड कंपनी संचालक मंडळ करत असे कंपनीने हिंदुस्थानात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

·         कंपनीमध्ये उच्च जागांवर ब्रिटिश तर कनिष्ठ जागेवर भारतीयांची नेमणूक होत असे कंपनी नोकरांना पगार कमी असल्याने ते खाजगी कामे करत असत व बक्षिसे घेत असत.

·         त्यामूळे कंपनी प्रशासनात गोंधळ व भष्ट्रचार निर्माण झाला.

र्लॉड क्लाईव्हचे धोरण :-

·         कंपनीमधील भाषांतरांवरूनरष्ट्राचार नष्ट करण्यासाठी क्लाईव्हने कंपनीच्या नोकराकडून शपथपत्र लिहून घेतले की इतर कोणाकडूनही कोणत्याही स्वरुपात नजराणे, भेट किंवा बक्षिसे घेणार नाहीत.

·         तसेच कंपनी नोकरांनी खाजगी व्यापार करु नये.

·         त्यांचे पगार वाढविण्याचे प्रयत्न केले. परंतु ही क्लाईव्हची योजना कंपनी संचालकांना मान्य नव्हती.

र्लॉड कॉर्नवॉलिसचे धोरण :-

कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून र्लॉड कॉर्नवॉलिस 1786 मध्ये भारतात आला.

·         कंपनीच्या स्वच्छ व कार्यक्षम कारभारासाठी अनेक सुधारणा घडवून आणल्या त्याचा सुधारणा करण्याचा उद्देंश

(1) वशिलेबाजी बंद करुन व्यक्तीची योग्यता, कर्तृत्व प्रामणिकपणा इ. गुणांवर निवड करणे इंग्रजी नोकरांना प्रचंड पगार देऊन नोकर्‍यांचे युरोपियनीकरण करणे

(2) नोकरांचा पगार वाढ करणे इ.

·         त्याने कंपनीच्या कारभारातील लाचतुचपत व गोंधळ दूर केला कंपनीच्या नोकरांनी खाजगी व्यापर करु नये लाच, नजराणे, बक्षीस, पारितोषिक घेऊ नये. असे निर्बंध लादले.

·         कंपनी नोकरवर्गाचे पगार वाढवले. उदा कलेक्टरचा पगार 1200 रु ऐवजी 1500 रु केला तसेच महसूल वसुलीतील 1% कलेक्टरला द्यावा ज्येष्ठतेनुसार बढतीचे तत्व लागू केले.

·         शासनात कार्यक्षमता आणण्यासाठी कंपनीचे व्यापार व शासनविषयक असे दोन स्वतंत्र विभाग केले.

·         उच्च मुलकी सेवेत भारतींयाना प्रवेश नाकरण्यात आला.

·         कॉर्नवालिसने पोलीस खात्यातही सुधारणा केली.

·         1788 मध्ये पोलीस विभाग कंपनी नोकरांकडे दिला.

·         बंगाल ओरिसा, बिहार, या प्रांताचे 36 ऐवजी 23 जिल्हे केले.

·         प्रत्येक जिल्हयाचे लहान विभाग करुन दर वीस मैलांवर पोलीस चौक्या बनवल्या.

·         प्रत्येक विभागावर दरोगा याची नियूक्ती केली.

·         जिल्हयातील सर्व दरोगांवर जिल्हाधिकार्‍याने नेमलेल्या अधिकाराचे नियंत्रण असे.

र्लॉड वेलस्लीचे धोरण :-

·         कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून र्लॉड वेलस्ली भारतात इ. स. 1798 मध्ये आला.

·         नोकरांची कार्यक्षमता ही वेतनाप्रमाणेच प्रशिक्षणावरही अवलंबून असते भारतात आलेल्या अनेक प्रशिक्षित युवकांची भरती कंपनीच्या प्रशासनात होत असे.

·         अशा नोकरवर्गाच्या प्रशिक्षणासाठी र्लॉड वेलस्लीने इ.स. 1804 मध्ये कॉलेज ऑॅफ फ़ोर्ट विल्यम नावाची संस्था कोलकत्ता येथे स्थापन केली.

·         कंपनीच्या वरिष्ठ जागेवर नियुक्ती होण्यापूर्वी इंग्रज तरुणांना या कॉलेजमध्ये तीन वर्षाचा अभ्यासक्रम पुरा करावा लागत असे. कारण ब्रिटिश लोकांना भारतातील हिंदीभाषा, कायदे व इतिहास या विषयाची माहिती व्हावी र्लॉड वेलस्लीची ही योंजना संचालकांना पसंत पडली नाही त्यामुळे ही संस्था बंद पडली.

·         कंपनी संचालकांना र्लॉड वेलस्लीच्या प्रशिक्षणाच्या योजनेचे महत्व समजल्याने कोलकत्या एवजी इंग्लडमधील हेलिबरी येथे 1806मध्ये ईस्ट इंडियन कॉलेज स्थापन केले.

·         या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी र्बोड ऑफ डायरेक्ट्रर्स किंवा र्बोड ऑफ कंट्रोल या मंडळाची शिफारस लागत असे. कंपनीच्या प्रशासनातील भरतीसाठी या कॉलेजमधील अभ्यासक्रम पूर्ण करणे सक्तीचे बनवले.

·         कंपनीच्या नोकरभरतीचा अधिकार कंपनी संचालकांकडे होता.

1813 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार :-

·         नियम तयार करण्यात आला की, भारतातील कंपनीच्या सेवेतील नोकर्‍यांसाठी इंग्रजी व्यक्तीने हेलिबरी कॉलेंजमध्ये अभ्यासक्रम चार सत्रांमध्ये पूर्ण करावा कंपनीच्या डायरेक्टरांनी नाव सुचविलेल्या व्यक्तींनाच या संस्थेने प्रवेश द्यावा.

र्लॉड विल्यम बेंटिंगचे धोरण :-

·         1833 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार भारतीयांना कोणताही भेदभाव न करता कंपनी प्रशासनात नोकर्‍या द्याव्यात त्याचा फायदा घेऊन र्लॉड विल्यम बेंटिंकने सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

·         इंग्रज अधिकार्‍यांना अधिक पगार द्यावा लागत असल्याने र्लॉड बेटिंगने कनिष्ठ व मध्यमवर्गाच्या पदावर भारतीयाची नेमणूक करण्यास सुरुवात केली. डेप्युटी कलेक्टर, डेप्यूटी,मॅजिस्ट्रेट यांसारख्या पदावरही भारतीयांची नेमणूक होऊ लागली.

1853 चा चार्टर अ‍ॅक्ट :-

·         भारतामधील मुलकी खात्यातील उच्च अधिकार्‍यांची निवड करण्याचा संचालक मंडळ आणि र्बोड ऑफ कंट्रोल याचा अधिकार या कायद्याने रद्द करण्यात आला.

·         त्याची निवड स्पर्धा परीक्षेतून करण्यात यावी. या परीक्षेसाठी हिंदुस्थानातील किंवा युरोपातील कोणत्याही ब्रिटिश नागरिकास बसता येईल.

·         ही परीक्षा इंग्लडमध्ये होत असून वयाच्या अटीमूळे भारतीय तरूणांना स्पर्धा परीक्षेची फारशी संधी मिळत नसे.

कंपनी सरकारची न्याय व्यवस्था :-

·         ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार करण्यात आली.

·         या अ‍ॅक्टनुसार कंपनीला कायदे व नियम तयार करणे, अध्यादेश काढणे इ. अधिकार देण्यात आले होते.

·         हे अधिकार कंपनीच्या ताब्यातील प्रदेश व तिचे प्रशासन या संदर्भात दिले होते. कंपनीच्या कायद्यानुसार दिवाणी व फौजदारी खटल्यांचा निकाल दिला जात नसे.

·         1669 च्या कायद्यानुसार कंपनीच्या ताब्यात मुंबई देण्यात आली. तसेच या प्रदेशा संदर्भात कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला.

·         1783-1786 च्या कायद्यानुसार व्यापारी व नाविक दलासंबंधी न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला.

·         1726 मध्ये मुंबई, मद्रास, फ़ोर्ट विल्यम (कोलकत्ता) येथे मेयर कोर्ट स्थापण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली.

·         प्रत्येक कर्ोटमध्ये 1 मेयर  9 मदतनीस असत.

·         9 पैकी 7 जण ब्रिटनमध्ये जन्मलेले व ब्रिटिश नागरिक असावेत असे बंधन होते.

·         या कर्ोटनी आपल्या क्षेत्रातील दिवाणी खटल्यांचा निकाल देणे. त्याच्या विरोधात सरकारच्या कोर्टात अपील करणे.

·         सरकारी कर्ोटचेसदस्य त्या प्रांताचे गव्हर्नर व कौन्सिलचे तीन सदस्य असतात.

·         800 शिल्ंिागच्या वरचे खटले इंग्लडमधील राजा आपल्या कौन्सिलला ऐकत असे खटल्याचा अंतिम निकाल ब्रिटिश कायद्यानुसार दिला जात असे ही न्यायालय व्यवस्था 1772 पर्यत सूरू होती. त्यानंतर त्यात बदल होत गेले.

·         कंपनीच्या न्यायव्यवस्थेबरोबरच स्थानिक न्यायालये होती. नबाबाला दिवाणी व फौजदारी अधिकार होते.

·         त्याच्या कोर्टातील फौजदारी ,खटल्यासाठी मुसलमानी कायदा तर दिवाणी खटल्यासाठी हिंदू मुसलमान अशा दोन्ही कायद्यांचा आधार घेतला जात असे नबाब हा त्याच्या प्रांताचा प्रमुख न्यायाधीश असे.

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट (1773):-

·         या कायद्यानुसार कोलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.

·         दिवाणी फौजदारी आणि धार्मिक खटल्यांचा निकाल या न्यायालयातून दिला जात असे.

·         गव्हर्नर जनरल आणि त्याचे कौन्सिलचे सदस्य सोडून इतर सर्वाच्या संदर्भात हे न्यायालय निर्णय देत असे.

·         या न्यायालयाच्या निर्णयाविरुध्द इंग्लंडमधील प्रिव्ही कौन्सिलकडे अपील करता येत असे निर्णयासाठी ज्युरी पध्दतीचा उपयोग केला जात असे.

वॉरन हेस्टिंग्ज :-

·         न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वॉरन हेस्टिंग्ज याने दहा विद्वान पंडितांची एक समिती स्थापन करून हिंदू कायद्याचे संहितीकरण केले.

·         न्यायदानाच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हयात दिवाणी व फौजदारी अशी न्यायालये स्थापन केली.

·         दिवाणी न्यायालय कलेक्टरच्या अधिकार क्षेत्रामध्ये असे फौजदारी न्यायालय भारतीयांकडे सोपविण्ययात आले.

·         तेथे काझी हा न्यायाधीशांचे कार्य करी तो मुफती व दोन मौलवी यांच्या मदतीने कार्य करत असे त्यांच्या कार्यावर कलेक्टरचे नियंत्रण असे, दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कार्यक्षेत्र ठरवून दिले होते.

·         दिवणी न्यायालयात चोरी, दरोडे, फसवाफसवी, खून, इ खटले असत.

·         न्यायालय यंत्रणेत सुव्यवस्था आणण्यासाठी जिल्हयातील सर्व कोर्टानी व वरिष्ठ कोर्टानी खटल्याची सर्व माहिती ठेवावी जिल्हा कोर्टाची कागदपत्रे सदर दिवाणी अदालतकडे पाठविण्याची पध्दत सुरु केली.

·         न्यायाधीशांना नियमितपणे पगाराची व्यवस्था केली.

·         शांतता व व्यवस्था राखण्यासाठी प्रत्यके जिल्हयात एक फौजदार नियुक्त केला.

·         त्याच्याकडे गुन्हयाचा शोध व गुन्हेगाराला पकडणे हे कार्य त्याच्याकडे सोपविले.

र्लॉड कॉर्नवॉलिस :-

·         न्याय विभागतील गोंधळ दूर करून तेथे इंग्लिश न्यायप्रणाली प्रस्थापित करण्याचा प्रयत्न र्लॉड कॉर्नवॉलिसने केला.

·         1780, 1787, 1794 या काळात सुधारण केल्या त्या पुढीलप्रमाणे -

·         प्रशासन खर्चात कपात करण्यासाठी 1787 मध्ये जिल्हयाची संख्या 36 ऐवजी 23 केली प्रत्येक जिल्हयाचा प्रमुख म्हणून कलेक्टरची नियूक्ती केली.

·         दिवाणी खटल्याची रक्कम 5 हजारांपेक्षा जास्त असेल तर कलेक्टरने दिलेल्या निर्णयावर कोलकत्ता सदर दिवाणी अदालतकडे अपील करण्याची व गरज वाटल्यास इंग्लंडच्या राजाकडे अपील करण्याची व्यवस्था केली होती.

·         जमीन महसुलीचे दावे महसूल मंडळाकडे सोपविले त्यांनी दिलेल्या निर्णयावर ग.ज. आणि त्याचे कौन्सिलेकडे अपील करता येत असे.

·         200 रु पर्यतच्या दाव्यांचा निर्णय करण्याचा अधिकार रजिस्ट्रार्सना देण्यात आला.

·         त्यासाठी प्रत्येक जिल्हयात स्थानिक महसूल न्यायालये स्थापन केली.

·         यावर कलेक्टरचे नियंत्रण ठेवले तसेच फौजदारी न्यायव्यवस्थेत बदल केले.

·         जिल्हा फौजदारी न्यायालये बंद केली बंगाल, बिहार, ओरिसा या तीन प्रांताचे चार विभाग करुन कोलकत्ता डाक्का, मुर्शिदाबाद पाटणा येथे फिरते न्यायालय स्थापन केले.

·         प्रत्येक न्यायालयात दोन इंग्रज अधिकारी आणि सल्ला देण्यासाठी भारतीय अधिकारी असे.

·         या न्यायालयाने जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली तर सदर निजामत अदालतने ती शिक्षा मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी सदर निजामत अदालतेने ती कोलकज्ञ्ल्त्;ाा येथे स्थालांतरित करुन नबाबचे अधिकार रद्द केले.

·         1793 मध्ये स्थानीय महसूल न्यायालये आणि महसूल मंडळ रद्द करुन दिवाणी न्यायालयाला महसुलाचे दावे चालवण्याचे अधिकार दिले.

·         त्यासाठी प्रत्येक जिल्हयात दिवाणी अदालत स्थापन करण्यात आले. इंग्रज व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.

·         या न्यायालयातील न्यायदान हिंदु मुसलमान यांच्या पारंपारिक कायद्याच्या आधारावर चालत आले.

·         भारतीयांना सराकारी अधिकारी विरोधात 500 रु पर्यत दावे चालविण्याचा अधिकार देण्यात आला जिल्हा दिवाणी न्यायालयात तिन न्यायाधीश असत.

·         त्यांच्या निर्णयाविरुध्द अपील कोलकत्याच्या सदर दिवाणी न्यायालयात करता येत असे.

·         जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द प्रांतीय दिवाणी न्यायालयात करता येत असे.

·         जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द प्रांतीय दिवाणी न्यायालयात अपील करता येत असे.

·         50 रु पर्यतच्या दाव्याची कामे निकालात काढण्याचा अधिकार मुन्सिफांना देण्यात आला. 1777 मध्ये कलेक्टरला दिवाणी व फौजदारी अधिकार कमी करुन केवळ मालगुजारीचेच कार्य करावे लागत होते.

र्लॉड विल्यम बेंटिकच्या सुधारणा :-

·         र्लॉड कॉर्नवालिसने ज्या सुधारणा केल्या त्यामध्ये कालापहरण, पैशाचा अपव्यय, अनिश्चितता इ. दोष होते.

·         सर चार्लस मेटकाफ बेली, आणि होल्ट मेकेंझी यांच्या मदतीने ते दोष दुर करण्याचा प्रयत्न र्लॉड बेटिंकने केला. त्याच्या सुधारणा पुढीलप्रमाणे -

·         र्लॉड बेटिंगने प्रांतीय अपील न्यायालये व मंडळ न्यायालय 1829 मध्ये बंद केले बंगाल प्रांताचे 20 विभाग करुन प्रत्येक विभागावर कमिशनरची नियूक्ती केली.

·         त्याच्याकडे पूर्वीच्या अपील कोर्टाची व मंडळ न्यायालयाची कामे सोपविला.

·         कलेक्टर व पोलीस विभागाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली.

·         कमिशनरच्या न्यायदान व महसूल कारभारावरा अनुक्रमे सदर निजामत अदालत आणि रेव्हिन्यू र्बोड यांचे नियंत्रण ठेवण्यात आले.

·         1829 मध्ये मॅजिस्ट्रेटचे अधिकार कलेक्टरकडे देण्यात आले.

·         तसेच 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा अधिकारही दिला.

·         1831 मध्ये शेतीच्या खंडासंबंधित दाव्याची सुनावणी संक्षिप्तपणे करावी अशी ही सूचना दिली.

·         जिल्हयातील दिवाणी न्यायाधिशाकडे फौजदारी न्यायदानाचे अधिकार दिले.

·         वायव्य प्रांतासाठी आग्रा येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली.

·         अलाहाबाद येथे एक सदर निजामी व सदर दिवाणी न्यायालय स्थापन केले.

·         तसेच तेथेच एक रेव्हन्यू बोर्डाची स्थापना केली. सेशन कोर्टाचे अधिकार काढून ते सिव्हिल कोर्टाकडे दिले सेशन जज्जला डिस्टि्रक्ट जज्ज म्हटले जाऊ लागले त्यांच्या मदतीसाठी सब जज्जांची नियुक्ती केली.

·         1831 मध्ये डेप्युटी कलेक्टर व डेप्यूटी मॅजिस्ट्रेटच्या पदावर भारतीयांच्या नियुक्तीला सुरुवात केली.

·         त्यांनी जास्तीत जास्त 300 रु पर्यतचे खटले चालविण्याचा अधिकार दिला. या भारतीय न्यायाधीशांना मुन्सिफ आणि अमीन म्हटले जाई.

·         इंग्रज लोकांचा खटला चालविण्याचा अधिकार त्यांना नव्हता 1832 पासून ज्युरीची पध्दत सुरु केली न्यायालयाचे व अन्य सरकारी कार्यालयाचे कामकाज त्या त्या ठिकाणच्या प्रांतीय भाषेत सुरु करावे असे आदेश बेंटिगने दिले.

·         गुन्हेगारांना फटके मारण्याची शिक्षा त्याने बंद केली.

कायद्याचे संहितीकरण :-

·         हिंदुस्थानात विविध प्रांतांमध्ये वेगवेगळया स्वरूपात कायदे असल्याने न्यायदानात गोंधळ होत असे तो नष्ट करण्याचा प्रयत्न 1833 1853 च्या चार्टर अ‍ॅक्टने केला.

·         देशातील दिवाणी व फौजदारी कायद्यांचे एकत्रीकरण केले.

·         त्याचा अध्यक्ष लॉ मेंबर र्लॉड मेकॉले यांची नियूक्ती केली.

·         या कमीशनच्या अहवालांची व कामकाजाची तपासणी करण्यासाठी इंग्लडमध्ये लॉ कमिशन नियुक्तीची शिफारस 1853 च्या कायद्याने केली.

·         र्लॉड मेकॉलेने भारतीय दंडविधान संहिता तयार केली.

·         1853 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार दुसरे लॉ कमिशन स्थापन केले.

·         या कमिशनने दिवाणी आचार संहिता 1855 आणि फौजदारी आचारसंहिता 1861 निर्मिती केली त्याचे कायद्यात रुपांतर झाले.

कायद्याचे राज्य :-

·         मध्ययुगामध्ये अनेक राजकीय सत्ता होत्या. त्या प्रत्येकाचे कायदे वेगवेगळे होते.

·         त्याची अंमलबजावणी राज्यकर्त्याच्या इच्छेंनुसार होत असे. त्याच्यावर कोणाचेही बंधन नसे त्यामूळे ते एक प्रकारे व्यक्तीचे राज्य असे.

·         ब्रिटिशांची राजकीय व प्रशासकीय सत्ता स्थापन झाली.

·         कायद्यानुसार निर्णय घेऊन प्रशासन चालवावे असे बंधन होते.

·         आपल्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला कोणते हक्क व अधिकार आहेत हे ठरविण्यासाठी कायदे तयार केल.

·         र्लॉड कॉर्नवॉलिसने न्यायदान पध्दतीत अनेक सुधारणा केल्या.

·         या कायद्याच्या राज्यात उच्च किंवा कनिष्ठ व्याक्तीने उल्लंघन केल्यास त्याला न्यायालयात खेचण्याची तरतूद होती म्हणजे प्रत्येक व्याक्तीने कायद्याचे पालन सक्तीने केले. पाहिजे असा दंडक होता.

·         व्यक्तीच्या हक्कांचे व अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी होती यासाठी इंग्रजांनी कायदेसंहिता तयार केली.

·         यामध्ये कायदे त्यातील तरतूदी ठरवून घेतल्या त्यानुसार सरकारी न्यायालयाने निर्णय द्यावे. ते निर्णय जनतेने मान्य केले पाहिजेत असे ब्रिटिश काळात कायद्याचे राज्य होते.

·         कायद्याच्या राज्यातील कायदे हे लोकशाही प्रक्रियेतून तयार केलेले नसून ते परकीय लोकांनी भारतीयांवर लादलेले होते.

·         त्याची अंमलबजावणीही त्यांच्याकडेच होती त्यामुळे लोकशाही व उदारमतवाद या विचारांना स्थान नव्हते.

कायद्यासमोर सर्व समानता :-

·         ब्रिटिशांपूर्वी भारतात धर्म, पंथ, जात, लिंग, वर्ण, याआधारे न्यायदान केले जात असे. परंपरागत न्यायदान, कायद्यातील जातिव्यवस्था व धर्मशास्त्र तत्व यामुळे उच्चवर्णियांसाठी वेगळा कायदा व शूद्र समजल्या जाणार्‍या लोकांसाठी वेगळा कायदा होता.

·         जमीनदार, जाहागीरदार, उमराव, इ. लोकांना कमी शिक्षा असे, प्रंसगी शिक्षाही नसे. यामुळे कायद्यासमोर सर्व समानता नव्हती.

·         इंग्रजांनी भारतामध्ये कायद्यांच्या राज्यात कायद्यासमोर सर्व समान हे लोकशाही तत्व अमंलात आणले त्यांनी धर्म पंथ, जात, वर्ण, लिंग, यांचा विचार न करता सर्वासाठी एकच कायदा अमलात आणला. एकाच गुन्हयाबदल वेगवेगळया शिक्षा होत्या.

·         त्या एकत्र करून एकच शिक्षा ठरविण्यात आली.

·         व्यक्ती किती मोठी किंवा छोटी असली तरीही ती कायद्यासमोर समानच आहे हे तत्व रुजवले त्यामूळे सामाजिक समता निर्माण होण्यास मदत झाली.

·         1833 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार प्रांतीय कायदे करण्याचे अधिकार रद्द करून सर्व भारतीयासाठी कायदे करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलला देण्यात आला.

·         सर्व भारतासाठी एकच कायदा करणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन झाली.

·         या यंत्रणेने भारतातील विविध कायद्याचे एकत्रीकरण करुन कायदेसंहिता तयार केली.

·         कायदेसंहितेमध्ये सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत. ती सर्व भारतासाठी लागू केली.

न्यायव्यवस्थेतील दोष :-

·         कायद्यासमोर सर्व समान या संदभर्रात इंग्रजांची दुप्पटी भूमिका होती.

·         भारतीय लोक आणि युरोपियन यांच्यासाठी समान न्याय नव्हता युरोपियन व्यक्तीचा खटला युरोपियन न्यायाधीशासमोर चालविला जात असे.

·         युरोपियन व्यक्तीने भारतीयांवर कितीही अन्याय, अत्याचार केली तरीही त्यांना संरक्षण दिले जात असे.

·         ब्रिटिश न्यायदान व्यवस्था अधिक गुंणागुंतीची व खर्चिक होती.

·         कोर्ट फी-वकिल साक्षीदार इ. खूप खर्च असे जिल्हयाच्या ठिकाणी न्यायालय असल्याने आणि खटला दिर्घकाळ लांबला तर खर्च अधिक वाढत असे, साक्षी पुरावे यावर आधिरीत न्यायव्यवस्था होती.

·         इंग्रजांच्या राज्यात न्याय मिळणे ही गोष्ट सोपी, स्वस्त आणि जलद नव्हती.

कंपनीची लष्कर व्यवस्था 1757-1857 :-

·         कंपनी शासनाचा शक्ितशाली आधार म्हणजे लष्कर होय.

·         लष्करी शक्तीवर त्यांनी अंतर्गत व बाहय शत्रंूचा बिमोड करुन हिंदुस्थावर राज्य स्थापन केले.

·         राजकीय सत्तेला उदभवणार्‍या धोक्याचा शेवट करण्याच्या हेतुने अनेक ठिकाणी लष्करी ठाणी उभारुन सरकारला मदत केली.

भारतातील ब्रिटिश लष्काराचे उद्देश :-

(अ) ब्रिटिश प्रदेशातील व भारतीय संस्थानातील जनतेने उठाव केल्यास ते दडपण्यासाठी संस्थानिकांना मदत करणे

(ब) चोर, लुटारु, दरोडेखोर, इ. रस्ते सुरक्षित ठेवणे

(क) व्यापार्‍यांना रक्षण देणे

(ड) भारतीय राज्यकर्त्यानी कमी केलेल्या सैनिकांनी ब्रिटिश सैन्यात सामावून घेणे.

कंपनी लष्करातील विभाग :-

  राजाचे लष्कर -

·         इंग्लंडमधील ब्रिटिश लष्करातील एक हिस्सा कंपनीच्या मदतीसाठी भारतात पाठविण्यात आला.

·         त्या युरोपीय सैनिकांचा सर्व खर्च कंपनीने म्हणजे भारतीय महसूलातून केला जात असे.

   हिंदी लष्कर -

·         कंपनीचे स्वत:भारतीय लोकांची भरती करुन निर्माण केंलेले लष्कर म्हणजे हिंदी लष्कर होय.

·         लष्करामध्ये भारतीयांना प्रवेश देण्याचे कारण -

(1) कंपनीच्या सेवेसाठी मोठे लष्कर इंग्लंडमधून आणणे शक्य नव्हते.

(2) युरोपियन फौजांचा खर्चही फार मोठा होता.

(3) नेपोलियनमुळे युरोपमध्ये युध्द सुरु असल्याने इंग्लंडच्या सुरक्षिततेसाठी मोठया लष्कराची गरज होती.

(4) भारतात चांगल्या दर्जाचे सैनिक मोठया संख्येने उपलब्ध होते. अनेक जातींच्या व टोळयांचा मुख्य व्यवसाय सैनिकांचा होता.

(5) शिस्त, प्रशिक्षण, शूर असे भारतीय राज्यकर्त्याच्या विसर्जित करण्यात आलेल्या लष्करातील लोक मोठया प्रमाणात होते.

दोन्ही लष्कर विभागातील तफावत :-

·         राजाचे लष्कर यामधील अधिकारी स्वत:ला श्रेष्ठ समजत असत. त्यांना पगारही जादा असे यामध्ये युरोपीय सैनिक असे हिंदी लष्करातील सैनिकांना दुय्यम स्थान असून पगारही कमी होती 1856 मध्ये कंपनीकडेही 2,75,000 हिंदी लष्कारात 300 रु पगाराचे फक्त 3 अधिकारी होते.

·         1857 च्या उठावाच्यावेळी कंपनीकडे 3,11,374 लष्करामध्ये फक्त 45,522 वढेच युरोपिय होते.

लष्कराची पुर्नरचना आणि नियंत्रण :-

·         सरकारी क्षेत्रात उच्च पदावर व साधारण जबाबदारीच्या पदावर भारतीयांची नियूक्ती केली जाई.

·         भारतीय सैन्याच्या तुकडयांच्या निम्म स्तरावरील नेतृत्व पदही अतिसमान्य युरोपियांची नियूक्ती केली जात असे.

·         1790-96 या काळात लष्काराची पुर्नरचना केली.

·         त्यानुसार हिंदी शिपायांच्या एका तुकडीवर 9 युरोपीय युरोपीय अधिकारी होते.

·         घोडदलाच्या एका तुकडीवर 20 युरोपीय अधिकारी होते.

लष्करातील जबाबदार्‍या :-

(अ) पोलिस अंतर्गत क्षेत्रात गोंधळ , उठाव,झाल्यास लष्कराला जावे लागे.

(ब) सरकारी खजिना किंवा अन्य मौल्यवान माल वाहतूक प्रसंगी संरक्षण देणे.

(क) सर्वेक्षण करणे, लोहमार्ग, रस्ते, यांच्या बांधकामासाठी मदत करणे.

(ड) सार्वजनिक आरोग्य जंगल जलसिंचन जमीन महसूल इ. विभागंाना गरजेनुसार उपयोग करणे.

भारतातील सामाजिक सुधारणांविषयक कायदे

सतीबंदी -

·         (1829) सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे.

·         ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते.

·         नंतर पुराण ग्रंथात सती प्रिथेला महत्व प्राप्त झाले.

·         पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.

·         काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई.

·         ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत.

·         ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.

·         काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडमिंटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अ‍ॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले. काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा र्लॉड वेलस्लीने सुरु केले.

·         सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या.

ठगांचा बंदोबस्त -

·         ठग हे कालीमातेचे उपासक होते.

·         लुटीचा व्यवसाय व गंगा नदीत नावाडी म्हणून काम करत असे.

·         विजयादशमीच्या मूहुर्तावर ठग व्यवसायासाठी घरातून बाहेर पडत होते.

·         नवीन व्यक्तीला टोळीत समाविष्ट करताना एक विधी केला जाई. देवीची प्रार्थना केली जाई.

·         उजव्या हातावर रुमाल आणि धंद्याची खूण म्हणून कुर्‍हाड ठेवण्यास येई. प्रवासाला ज्या ठिकाणी ठार मारत त्या ठिकाणास भीळ म्हणत भीळ जवळ आले कह भरोरी रुमाल टाकून खून करणारे प्रवाशंच्या मागे उभे राहात. जयकाली तमाकू लाव असे म्हणत त्यास ठार मारत. त्याचे प्रेत फुगुन वर येऊ नये म्हणून त्याच्या पोटात खुेटी मारत व पुरत असत.

·         या ठगांनी माळवा, मध्य प्रदेश, गंगा नदी, हैद्राबाद येथे धुमाकुळ घातला होता.

·         र्लॉड बेटिंकने हैद्राबादचा निजाम अयोध्येचा वजीर यांची मदत घेऊन कर्नल स्लीमन यांची ठगाच्य बंदोबस्तासाठी नियुक्ती केली.

·         त्याने 3200 ठग पकडले. 1500 ना फाशी दिली. काहींना पुनर्वसन करण्यासाठी जबलपुर येथे औद्योगिक वसाहत स्थापन केली.

बालहत्या प्रतिबंधक कायदा -

·         ज्या कुटुंबाला संतती होत नसे, ते गंगेला नवस करत असत की आपणाला संतती झाल्यास त्यापैकी काही गंगेत सोडू मूल झाल्यावर गंगेला फेकून दिले जाई.

·         ही प्रथा र्लॉड वेलस्लीने 1802 मध्ये कायदा करुन बंद केली. तसेच ओरिसामध्ये मागासलेल्या खेडयात हतू नावाच्या देवतेसमोर लहान मुलांचा बळी दिला जाई.

·         मध्ये प्रदेश राज्स्थान, पंजाब,काठेवाड, या प्रदेशात जन्मत:च मुलींना ठार मारले जाई.

·         तिचा श्वास कोंडून तिला अफु देऊन तिचे दुध बंद करुन तिचा शेवट केला जाई. कारण मुलीला योग्य वर मिळत नसे किंवा तिच्या लग्नाला खर्चही परवडत नसे हा प्रकार थांबविण्यासाठी 1795 मध्ये कंपनीने कायदा करुन बालहत्या करणे म्हणजे खून करण्यासारखे आहे असे जाहीर केले.

·         1804 मध्ये कायद्याची प्रादेशिक व्याप्ती वाढविली र्लॉड बेंटिंकने विल्किन्स याची नियुक्ती करुन ही प्रथा बंद केली.

·         1870 मध्ये मुलाच्या जन्माची नोंद करणे जिवंत आहे किंवा नाही याची खात्री करुन घेण्याची पध्दत सुरु केली.

धार्मिक आत्महत्या प्रतिबंधक कायदा -

·         कंपनी काळात हिंदुस्थानात धर्माच्या नावावर आत्महत्या करण्याचे प्रकार होते.

·         त्यामध्ये मध्ये प्रांतीतील लोकाचा असा समज होती, की देवस्थाननजिकच्या कडयावरुन कडेलोट केल्यास मोक्ष मिळतो अनेक यात्रेकरू कडेलोट करत असत ते कायद्याने बंद केले.

·         गंगेकाठी मरण आल्यास मोक्ष प्राप्त होतो. असा समज असल्याने अनेक मरणोन्मुख लोक गंगेकाठी येऊन पडत असत. ते कायद्याने बंद केले.

·         बिहार, ओरिसा, प्रांतामध्ये खोंड नावाची जमात होती, ते दैवतास संतुष्ट करण्यासाठी मनुष्याचा बळी देत असत. ते लोक जमिनीत भरपूर उत्पादन मिळावे म्हणूनही नरबळी देत असे. ते कायद्याने बंद केले ही प्रथा चालू असल्याने 1845 मध्ये नरबळीऐवजी रेडे मारण्याची परवानगी दिली.

·         हिंदू कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर वडिलांच्या संपत्तीचा हक्क रद्द होत असे र्लॉड बेटिंकने या सुधारणा करुन ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्याक्तीला त्याच्या वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार देऊ केला.

गुलामाच्या व्यापारास विरोध -

·         भारतात गुलामगिरीची पध्दत प्रचलित होती. उत्तर भारतामध्ये घरकामासाठी, वेश्या व्यवसायासाठी गूलाम ठेवण्याची प्रथा होती.

·         दक्षिण भारतात शेतकामासाठी गुलाम बाळगत असत. वॉरन हेस्ंिटग्जच्या काळात दरोडेखोरांच्या मुलांना स्त्रियांना गूलाम करावे असा आदेश काढला होता.

·         ब्रिटिश अधिकारी व्यापारी, श्रीमंत लोक आपली विषयवासना तृप्त करण्यासाठी स्त्रियांना गुलाम म्हणून विकत घेत असत.

·         19 व्या शतकाच्या प्रारंभी 16 रु. पर्यत मुलगा व 150 रु पुरुष आणि 100 ते 1000 रु. पर्यत मुली व स्त्रियांची गुलाम म्हणुन विक्रि होत असत.

र्लॉड कॉर्नवॉलिसने :

·         1789 मध्ये देशाबाहेर गुलामांना पाठविण्यास बंदी घातली.

·         1807 मध्ये गुलामगिरी बंद करण्याचा कायदा केला.

·         1811 मध्ये कायदा करुन भारताबाहेरुन गुलाम आणण्यास बंदी घातली.

·         1832 मध्ये कायदा करुन जिल्हयाबाहेर गुलाम पाठवण्यिास बंदी घातली.

·         1843 मध्ये कायद्याने गुलामगिरी नष्ट केली तर 1860 मध्ये गुलामगिरीविरुध्द कायद्याचा इंडियन पिनलकोडमध्ये समावेश केला.

·         खानदेश वर्‍हाड स्त्रियांना पळवून नेऊन त्यांचा व्यापार करणार्‍या टोळया होत्या. त्यांचा बेटिंकने बंदोबस्त केला.

पुनर्विवाहाचा कायदा :-

   हिंदु

·         धर्माने स्त्रीयांना पुरुषांबरोबर स्थान दिले होते. परंतु नंतरच्या काळात पत्नीस दुय्यम दर्जा देण्यात आला.

·         पुरुषांना अनेक विवाह करण्यास धर्मशास्त्राचा विरोध नव्हता बालविवाह झाल्यानंतर प्रौढत्व प्राप्त होण्यापूर्वी एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर तिला विधवा म्हणून खडतर जीवन जगावे लागत असे.

·         सुरुवातीस पुनर्विवाहास धर्माची मान्यता होती. परंतु नंतरच्या काळात बंद झाली. पुनर्विवाहापासून प्राप्त झालेली संतती बेकायदेशीर ठरविण्यात येई.

·         राजा राममोहन रॉय यांनी पुनर्विवाहास मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले.

·         ब्राहो समाजाच्या स्थापनेनंतर ही चळवळ सुरु केली.

·         पंडित ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी शास्त्राच्या आधारे सिध्द केले की, हिंदुधर्मशास्त्रांनी पुनर्विवाहास मान्यता दिली. आहे. त्यांनी पुनर्विवाहास मान्यतेसाठी 1 हजार लोकांच्या सहयांचे निवेदन पाठविले.

·         धर्ममार्तडांनी 37,000 लोकांच्या सहयाने निवेदन पाठवून पुनर्विवाहास मान्यता देऊ नये असे कळवले र्लॉड डलहौसीच्या काळात इ.स. मध्ये पुनर्विवाहाचा कायदा मुजूर करण्यात आला.

·         या कायद्यानुसार पुनर्विवाहास व त्यांच्यापासून झालेलया संततीला मान्यता देण्यात आली.

·         बंगालमध्ये पंडित ईश्र्वरचंद्र विद्यासागर महाराष्ट्र्र महर्षी कर्वे, तसेच वीरेसलिंगम पुतलु यांनी पुनर्विवाह कायद्यासंदर्भात मौलिक कार्य 

सविनय कायदेभंग आंदोलन

असहकार आंदोलन मागे घेतल्यावर राष्ट्रीय चळवळ काही काळ मंदावली 1927 नंतर मात्र सायमन आयोगावरील बहिष्कारातून राष्ट्रीय चळवळीत नवा जोम व उत्साह संचारला आणि त्याचा आविष्कार सविनय कायदेभंगाच्या चळवळीतून झाला.

सायमन आयोग -

1919 च्या सुधारणा कायदयात सुधारणा सुचवण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक केली.

या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने भारतातील प्रमुख राजकीय पक्षांनी सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

नेहरू अहवाल -

सर्व भारतीयांना एकत्र येऊन राज्यघटना तयार करण्याचे भारतमंत्री र्लॉड र्बकनहेड याने केलेले आवाहन स्वीकारून सर्व राजकीय पक्षांच्या समितीने नेहरू अहवालात (1928) भारताला वसाहती स्वराज्य देण्यात यावे, धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्यात यावे, संघटनास्वातंत्र्य व प्रौढ मताधिकार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ स्थापन करण्यात यावेत, अशा सुधारणा सुचवल्या.

लाहोर अधिवेशन -

कलकत्ता अधिवेशनात ब्रिटिश सरकारला देण्यात आलेली 31 डिसेंबर,1929 ही मुदत संपताच, राष्ट्रीय सभेने लाहोर अधिवेशात अध्यक्ष पं. जवाहरलाल म्हणून साजरा करण्याचे व स्वातंत्र्याची शपथ घेण्याचे आवाहन भारतीय जनतेस करण्यात आले.

पूर्ण स्वराज्याच्या प्राप्तीसाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सविनय कायदेभंगाचे आदोलन -

6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे मिठाचा कायदामोडून गांधीजींनी आंदोलनाची सुरवात केली. मिठाचा सत्याग्रह, जंगलसत्याग्रह, साराबंदी, विदेशी कापडावर बहिष्कार इ. कार्यक्रमांत देशाच्या सर्व. स्तरांतील स्त्री-पुरुष मोठया संख्येने सहभागी झाले. शासनाने आंदोलन दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

गोलमेज परिषद -

भारतासाठी संकल्पित घटनात्मक सुधारणांसंबधीची चर्चा करण्यासाठी भारतातील सर्व राजकीय पक्षांची गोलमेज परिषद 1930 साली लंडन येथे आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रीय सभेच्या बहिष्कारामुळे ती अयशस्वी ठरली.

राष्ट्रीय सभेने दुसर्‍या गोलमेज परिषदेत भाग घ्यावा, यासाठी भारताचे व्हाइसरॉय र्लॉड आयर्विन यांनी गांधीजींशी मार्च 1931 मध्ये समझोता केला.

गांधीनी दुसर्‍या गोलमेज परिषेत सहभागी झाले.अल्पसंख्य प्रतिनिधित्वाच्या प्रश्नाबाबत एकमत घडवून आणण्याचा गांधीजींचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी -

दुसर्‍या गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर1932 साली गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू केली एप्रिल 1934मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला.

भारतीय क्रांतिकारी चळवळी आणि राष्ट्रीय आर्मी

आझाद हिंद सेनेची कामगिरी :-

·         भारतीय स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रूशी मैत्री केली.

·         जानेवारी1941 मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला.

·         हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.

·         मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे 21 ऑक्टोबर 1943 रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले.

·         जय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनूसार वाटचाल सुरु केली.

·         1944 मध्ये अंदमान निकोबार ही बेटे मुक्त करून शहीद व स्वराज्य असे नामकरण केले.

·         जर्मनी, जपान यांचा पराभव झाला 18 ऑगस्ट 1945 राजी बॅकॉककडून टोकियोकडे जात असताना विमान अपघात झाला त्यात ते मरण पावले.

(अ) क्रांतिकारी चळवळ -

·         1857 ला स्वातंत्र्य युध्दाच्या पराभवात भावी चळवळीची बीजे पेरली.

·         राष्ट्रवादाच्या त्यागातून, बलिदानातून नव्या पिढीने स्फुर्ती घेऊन इंग्रजांविरुध्द आक्रमक लढा सुरु केला.

·         देशप्रेमासाठी हजारो तरुणांनी आपल्या जीवनाचा होमकुंड पेटवून सर्व जीवन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी खर्ची घातले.

क्रांतिकारी चळवळीची ध्येय व मार्ग -

(1) ब्रिटिश नोकरांवर दहशत बसविणे

(2) प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण करणे

(3) हिंदी लोकांच्या अन्यायाचा बदला घेणे

(4) मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे.

क्रांतिकारी चळवळ यशस्वी करण्याचे मार्ग -

(1) सरकारच्या अन्याय अत्याचार धोरण.

(2) लो. टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सावातून ऐक्य व प्रेरण मिळाली

(3) नैसर्गिक संकट प्रसंग सरकारचे दुर्लक्ष

(4) राजकीय व आर्थिक स्वातंत्र्य व समानता प्राप्त करण्यासाठी चळवळ सुरु.

क्रांतिकारी चळवळीचे स्वरुप आणि कार्यक्रम -

  महाराष्ट्र्रातील क्रांतिकारी चळवळ -

(1) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे शिरढोण (रायगड) गावचे असून सरकारी नोकरीत होते. 1876 दुष्काळाच्या वेळी जनतेला इंग्रज सरकार विरोधी चिथवले आणि बंड पुकारले त्यांना पकडून एडनच्या तुरुंगात ठेवले. तेथेच 1883 मध्ये मरण पावले.

(2) 1896-97 मध्ये पुण्यात प्लेग नियंत्रणाच्या निमित्ताने रॅन्ड कमिशनरने अत्याचार केला. म्हणून चाफेकर बंधूंनी व्हिक्टोरिया राणीच्या हिरक महोत्सव प्रसंगी रॅन्ड व आयर्स्ट यांना ठार मारले पंडित द्रविडच्या फितुरीमुळे ते पकडले गेले. सरकारने त्यांना फाशिची शिक्षा दिली.

(3) सेनापती बापट अभिनव भारत संघटनेतर्फे बॉम्ब विद्या शिकण्यासाठी पॅरिसला गेले. तेथे त्यांनी हेमचंद्र दास व मिर्झा अब्बास यांच्याकडून शिक्षण घेतले त्यानुसार नाशिक, पुणे, मुंबई, पनवेल इ. ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे कारखाने सुरु केले.

(4) अमेरिकेतील गदर पक्षाचे कार्यकर्ते पुणे जिल्हयात गणेश पिंगळे होते. एकाच वेळी सर्व देशात इंग्रजांच्या विरुध्द उठावाची योजना तयार केली. मीरत सैनिक छावणी उठाव केल्याने फाशी झाली.

(5) वि. दा. सावरकर यांनी लोकमान्य टिळक व चाफेकर बंधू यांच्यापासून प्रेरणा घेऊन 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह 1900 मध्ये मित्रमेळा आणि 1904 मध्ये अभिनव भारत सोसायटी या संघटना स्थापन केल्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पेण, खानदेश, वाई, इ.ठिकाणी शाखा स्थापन केल्या शामजी वर्माच्या मदतीने 1906 ला इंग्लंडला गेले. तेथून पिस्तुले व काडतुसे पाठवली. या संघटनेच्या सभासदांनी म्हणजे अनंत कन्हेरे याने जॅक्सनला 1901 मध्ये मदनलाल धिंग्रा याने 1902 मध्ये कर्झन वायलीला ठार मारले. सावरकरांना नाशिक खटल्यासंदर्भात शिक्षा झाली. सावरकर 1937पर्यत कैदेत होते.

  बंगालमधील क्रांतिकारी चळवळ युगांतर समिती -

अरविंद घोष, वीरेंद्रकूमार घोष, भुपेंद्रनाथ दत्त इ.1906 मध्ये युगांतर समितीची स्थापना केली. युगांतर व संध्या वृत्तपत्रे सुरु करुन राष्ट्रवाद निर्माण केला.

·         हेमचंद्र दास याला बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला पाठविले.

·         त्याच्या नेतृत्वाखाली कोलकज्ञ्ल्त्;ाा येथिल कारखाना सुरु केला 6 डिसेंबर 1907 रोजी मिदनापूर स्टेशनवर बॉम्ब टाकून ले. गव्हर्नर फुल्लला ठार मारण्याचा अपयशी प्रयत्न केला.

·         23 डिसेंबर 1907 रोजी न्यायाधीश एलनला ठार मारले.

·         30 एप्रिल 1908 रोजी किंग्जफोर्डला ठार मारण्याचा अपयशी प्रयत्न प्रयत्न खुदीराम बोसने केला.

·         नरेंद्र भट्टायार्च, सतीश बसू प्रथम मित्र यांनी कोलकत्ता येथे अनुशीलन समितीची 1901 मध्ये स्थापन केली.

·         या संघटनेने 64 इंग्रज अधिकारी ठार केले हेमचंद्र दास याला बॅाम्ब विद्या शिकण्यासाठी रशियाला पाठवले.

·         बंगालमध्ये क्रांतिकारकांमुळे अलीपूर खटला.

·         चितगावकर खटला गाजलारास बिहारी बोस यांनी र्लॉड हार्डिग्जला ठार मारण्याचा प्रयत्न केला. नंतर जपानला गेले तेथे ची स्थापना केली.

·         लाहोर, बनारस, मीरत इ. उठावाची योजना केली पण त्यात त्यांना अपयश आले.

  पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ -

·         सरदार व सैय्यद हैदर यांनी भारतीय देशभक्तीची सभा संघटना स्थापन केली.

·         रामप्रसाद बिस्मिल याने काकोरी स्टेशनजवळ सरकारी तिजोरी लुटली, भगतसिंग राजगुरु यांनी 17 फेब्रुवारी 1928 रोजी सॅंडर्सला ठार मारले.

·         भगतसिंग व बटुकेश्र्वर यांनी 8 एप्रिल 1929 रोजी सभागृहावर बॉम्ब टाकला.

·         चंद्रशेखर आझाद व यशपाल सिंग यांनी 23 डिसेंबर 1929 रोजी र्लॉड आयर्विनला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

   मद्रासमध्यील चळवळ -

·         बिपिनचंद्र पाल याने बंगालमध्ये क्रांतिकारी संघटना स्थापन केली. व्ही. व्ही. एस आय्यरने कलेक्टर. मि. अ‍ॅशला ठार मारले.

परदेशातील चळवळीचे कार्य -

(1) श्यामजी कृष्णा वर्माने इंग्लंडमध्ये इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना 1905 मध्ये केली. अनेक क्रांतिकारकांना सर्व प्रकारची मदत केली.

(2) लाला हरदयाळ अमेरिकेत 1913 मध्ये गदर पक्षाची स्थापना केली. गदर म्हणजे विद्रोह/उठाव असा अर्थ होय. फ्रान्सिस्को येथून गदर ह 17 नावाचे वृतपत्र सुरु केले.

(ब) इंडियन नॅशनल आर्मी :-

·         रासबिहारी बोस यांनी जपानमधील पौर्वत्य देशातील निवडक लोकांची नागासाकी येथे बैठक घेतली.

·         ज्ञानेश्र्वर देशपांडे देवनाथ दास यांनी प्रमुख कार्य केले.

·         रसबिहारी बोस यांनी हिंदी लोकांची एक परिषद 28 ते 30 मार्च 1942 मध्ये टोकियो येथे भरवली जपान, मलाया, चीन, थायलंड, या देशातून अनेक हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापना केली.

·         कोणत्याही प्रकारे परकियांचे अधिकार नसणारे स्वातंत्र्य हिंदुस्थानला प्राप्त करु देणे हा संस्थेचा उद्देश होता.

·         लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून रासबिहारी बोस यांची निवड करण्याल आली रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अनेक शाखा स्थापन केल्या.

·         स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करण्यासाठी रास बिहारी बोस यांनी टोकियो येथे आझाद हिंद फौजेची इंडियन नॅशनल आर्मी स्थापना केली.

·         कॅप्टन मोहन सिंग हे सरसेनापती झाले.

·         15 फेब्रुवारी 1942 रोजी जपानचे पंतप्रधान जनरल टोजो व रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्याची घोषणा केली.

·         आझाद हिंद फौज आणि इंडियन इंडिपेन्डन्स लीगने ऑगस्ट 1942 पर्यत सिंगापूर बॅकॉक, रंगून जिंकलीे आझाद हिंद फौजेचे आणि हिंदी स्वातंत्र्य संघाचे मुख्य ठाणे बॅकॉकहून सिंगापूरला आणले.

·         आझाद हिंद फौजेच्या अधिकारावरुन मोहन सिंगला कमी करून जगन्नाथाराव भोसले यांना मेजर जनरल आणि सुप्रीम कमांडर म्हणून नियूक्त केले.

·         सुभाषचंद्र बोस 20 जून 1943 ला टोकियोला आले. रास बिहारी यांनी त्यांचे स्वागत केले.

·         त्यांनतर सिंगापूरला गेले. आझाद हिंद फौजेच्या निरनिराळया घटकांच्या भेटी घेतल्या.

·         5 जूलै 1943 रोजी सिंगापूर येथे नव्याने फौजेची स्थापना केली.

·         आठ दिवसातच राणी ऑफ झाशी रेजिमेंट ही स्त्री शाखा स्थापन केली.

·         25 ऑगस्ट 1943 रोजी आझाद हिंद सेनेचे अधिकृत नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारले.

·         स्वातंत्र्य लढयामध्ये आझाद हिंद सेनेने सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी केली. परंतु अखेरीस अपयश आले.

गांधीजींचे पदार्पण

·         स्वातंत्र्यचळवळीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा 1919 मध्ये सुरु झाला. त्यावेळी प्रथमच जनआंदोलनांनी सुरवात झाली.

·         पहिल्या महायुध्दकाळात ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका हया दोस्त राष्ट्रांनी जाहीर केले होते की, जागतिक महायुध्द हे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठीच लढले जात आहे.

·         पण युध्दात विजी झाल्यानंतर वसाहतवादी साम्राज्यसत्ता नाहीशी करण्यास ते फारसे उत्सुक दिसेनात. भारतीयांनी युध्दप्रयत्नात सर्व सहकार्य दिले होते एवढेच नव्हे तर युध्दाची झळ मोठया प्रमाणात सोसली होती. त्याचे योग्य चीज होईल, अशी त्यांना आशा होती.

·         पण त्याचा लवकरच भाषांतरांवरूनरमनिरास झाला.

·         ब्रिटिशांनी घटनात्मक सुधारणांचे थातुरमातुर प्रयत्न केले असले तरी खरी राजकीय सत्ता सोडण्याची त्यांची बिलकूल तयारी नव्हती आणि आता एक नवे नेते श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी लढयाची सूत्रे आपल्या हाती घेतली.

·         पूर्वीच्या नेतृत्वातील मूलभूत उणिवा हेरुन त्या दूर करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यांनी लढयाची एक नवीनच पध्दत रुढ केली, ती म्हणजे असहकार.

·         तसेच लढयाचे एक नवे तंत्र सत्याग्रह त्यांनी अंमलात आणले. त्यामुळे लढा हा केवळ एक कार्या न राहता तो प्रत्यक्ष अंमलात आणता येऊ लागला.

·         या नव्या तंत्रांची गांधीजींनी दक्षिण आफ़्रिकेत यशस्वीरित्या चाचणी केली होती.

·         गांधीजींनी चंपारण चे शेतकीर व अहमदाबाद चे कामगार हयांचे प्रश्नही हाती घेतले होते.

·         या काळात देशाच्या वेगवेगळया भागांत महागाई एकदम वाढली आणि साथीचे रोग पसरले.

·         जागतिक युध्द संपताच गांधीजींनी भारतीय जनतेच्या मनातील वाढत्या प्रक्षोभाला व लढाऊ प्रवृत्तीला प्रतिसाद देताना एका नव्या संघटनेची व तंत्राची निर्मिती केली. त्यामुळे त्या आंदोलनास जनतेच्या पाठिंब्याचा भक्कम आधार निर्माण झाला.

·         मार्च 1919 मध्ये रौलट कायदा संमत करण्यात आला त्याद्वारा खटला न भरता कोणालाही तुंरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळाले, त्यामुळे भारतीय जनतेचा मोठा अपमान झाला.

·         फेब्रुवारी 1919 मध्ये गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरु केली.

·         हा कायदा मोडावयाचा व स्वत:ला अटक करवून घ्यायची अशी या सभेच्या सदस्यांची प्रतिज्ञा होती.

·         अशा रीतीने राष्ट्रीय चळवळ म्हणजे केवळ एक आंदोलन न ठेवता जनतेच्या शक्तीचे प्रत्यक्ष राजकीय कृतींत रुपांतर करण्याच्या दृष्टीने गांधीजींनी पहिले पाऊल उचलले.

·         त्याचबरोबर आता शेतकरी व कारागीरांवर अधिक विसंबून राहावयास हवे असा काँग्रेसने आग्रह धरला .

·         खादी म्हणजेच हाताने कातलेल्या सुताचे हातमागावर विणलेले कापड वापरण्यावर भर हे त्याचेच एक प्रतिक होते.

·         त्याच वेळी अमृतसरला कुप्रसिध्द जलियाॅंवाला बाग हत्याकांड घडले.

·         13 एप्रिल 1919 रोजी चहूबाजूंनी बंदिस्त असलेल्या या बागेत शांततापूर्ण जमावाला ब्रिटिश लष्कराच्या एका तुकडीने घेतले व बंदुका आणि मशिनगन्सच्या सहाय्याने अमानुष गोळीबार केला.

·         त्याच वेळी युध्दानंतर तुर्कस्तानला औदार्याचे वागणूक देण्याचे आश्र्वासन ब्रिटिशांनी मोडले तुर्कस्तानच्या सुलतानाला खलिफा म्हणजे मुसलमानांचा धार्मिक प्रमुख मानण्यात येत असे.

·         पण तेच धोक्यात आल्याने भारतीय मुसलमानांत तीव्र तिरस्कार निर्माण झाला.

असहकार आणि खिलाफत आंदोलन :-

·         गांधीजींनी व काँग्रेसने असहकाराचे अहिंसक आंदोलन सप्टेंबर 1920 मध्ये सुरु केले.

·         पंजाबात व खिलाफतीबद्दल जो अन्याय झाला होता तो दूर होऊन स्वराज्य मिळेपर्यंत ते चालू राहावयाचे होते.

·         गांधीजींनी एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली. सरकारमान्य शाळा महाविद्यालये, कोर्टकचेर्‍या, विधिमंडळे व परदेशी कापडहयांवर बहिष्कार घालण्याचा व सरकारने दिलेल्या पदव्या किताबांचा त्याग करण्याचा जनतेला आदेश देण्यात आला.

·         नंतर सरकारी नोकर्‍याचे राजिनामे आणि करबंदी सुरु करुन या आंदोलनाला जनतेच्या सत्याग्रहाचे स्वरुप देण्याचा कार्या होता. राष्ट्रीय शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आली. स्वहस्ते सूत कातून खादी तयार करण्याचे, अस्पृश्यता न पाळण्याचे व हिंदू मुस्लिम ऐक्याचे संवर्धन करुन ते टिकविण्याचे जनतेला आदेश देण्यात आले. भाषिक आधारावर प्रांतिक काँग्रेस समित्या संचलित करण्यात आल्या.

·         काँग्रेस संघटना अगदी खेडयांपर्यंत पोहोचली व तिच्या सभासदत्वाचे वार्षिक शुल्क केवळ चार आणे ठेवण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांतील गरीब जनतेलाही सभासद होता यावे हा त्यामागचा उद्देश होता.

·         या पहिल्या जनआंदोलनास 1920 ते 1922 दरम्यान अभूतपर्व स्वरुप प्राप्त झाले. लाखो विद्याथ्र्यांनी शाळा महाविद्यालये सोडली. शेकडो वकिलांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली.

·         परदेशी कापडावरील बहिष्कार हे एक जनआंदोलन बनले व परदेशी कापडाच्या हजारो होळयांनी भारतीय नभोमंडळ उजळून गेले.

·         परदेशी कापड विकणार्‍या व दारुच्या दुकानांवरील निरोधनाचा कार्याही विशेष यशस्वी ठरला.

·         या आंदोलनात अनेक विभागांत कामगार आणि शेतकरी आघाडीवर होते. तरीही गांधीजी संतुष्ट नव्हते.

·         ता. 5 फेब्रुवारीस चौरीचौराची घटना घडली.

·         तीन हजार शेतकर्‍यांच्या एका काँग्रेस मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यचा सूड म्हणून प्रक्षुब्ध जमावाने पालिसचौकीच पेटवून दिली. त्यांत 22 पोलिस ठार झाले.

·         गांधीजींनी हया प्रकाराची विशेष गांभीर्याने दखल घेतली व अहिंसात्मक चळवळीची जनतेला अद्याप योग्य शिकवण मिळाली नाही, असे वाटून त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी हे आंदोलन मागे घेतले. मात्र या चळवळीचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहणारे होते.

(1) त्यामुळे प्रथमच लक्षावधी शेतकरी व नागरी विभागांतील गरीब जनता राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आली. किंबहुना सार्‍या भारतीय जनतेलाच आता अस्मितेची जाणीव झाली. त्यात शेतकरी, कामगार, कारागीर, ददुकानदार, व्यापारी, डॉक्टर, इतर व्यावसायिक व कचेर्‍यांत काम करणार्‍या नोकरवर्गाचाही समावेश होता. स्त्रियांही या आंदोलनाकडे आकर्षित झाल्या. देशाच्या अगदी दूरवरच्या कोपर्‍यापर्यंत ही चळवळ फैलावली. किंबहुना जनतेची लढयाची प्रवृज्ञ्ल्त्;ाी आणि स्वार्थत्यागाची भावना यावरच गांधीजींनी आपले सर्व राजकारण आधारले होते. त्यांनी जनतेला राष्ट्रीय संग्रामाच्या आघाडीवर आणले व त्यांचे जनआंदोलनात रुपांतर केले.

(2) भारतीय जनता आता निर्भय बनली. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीची तिला भीती वाटेनाशी झाली. नेहरुनी नंतर म्हटल्याप्रमाणे गांधीजींनी त्यांच्यातील पौरुषत्व जागृत केले. सार्‍या देशाच्या बाबतीत असेच घडले.

(3) या संदर्भात असे ध्यानात घ्यावयास हवे की अहिंसा हे दुबळया व भेकडांचे शस्त्र आहे. असे गांधीजी मुळीच मानीत नसत. अगदी खंबीरवृज्ञ्ल्त्;ाीची माणसेच त्याचा उपयोग करु शकत. भेकडपणापेक्षा मला हिंसाचार परवडेल, असे गांधीजींनी पुन: पुन्हा सांगितले आहे. १९२० मध्येच त्यांनी म्हटले होते की, ज्ञ्थ्ुेत्;भिरुता की हिंसा एवढाच पर्याय असेल तर खुशाल हिंसाचाराचा अवलंब करा असाच मी सल्ला देईन, भेकड वृत्तीवरने असहाय्यपणे आपला अवमान निमूटपणे पाहात राहण्यापेक्षा आपल्या मानाच्या रक्षणासाठी हिंदी जनतेने हिंसेचा अवलंब केला तरी मला चालेल.

·         असहकार चळवळीचा अत्यंत महत्वाचा परिणाम म्हणजे हिंदी जनतेचा आत्मविश्र्वास आणि स्वाभिमान फार मोठया प्रमाणात वाढला.

·         आता भारतीय जनतेचे साम्राज्यशाहीशी युध्दच सुरु झाले होते.

·         एखाद्या लढाईत तात्पुरता पराभव पत्करावा लागला तरी आपल्या ध्येयाकडील वाटचालीपासून आता कोणीही तिला विचलित करु शकणार नव्हते.

·         ता. 23 फेब्रुवारी 1922 ला चळवळ मागे घेताना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, ब्रिटिश जनतेला जाणीव करुन देण्यास हीच योग्य वेळ आहे.

·         1920 मध्ये जो संग्राम सुरु झाला तो आता शेवटाला जाईपर्यंत चालू राहणार आहे.

·         मग तो एक महिना वा एक वर्ष किंवा कित्येक महिने वा कित्येक वर्षे चालो अथवा स्वातंत्र्ययुध्दाच्या दिवसांत ब्रिटिशांच्या प्रतिनिधींनी जो वर्णनातील धुमाकूळ घातला तसा ते नव्या जोमाने घालोत वा न घालोत, संग्राम चालूच राहील.

·         आपण विधिमंडळातून ब्रिटिशांशी लढा देऊ शकू, अशी स्वराज्य पक्षीयांची श्रध्दा होती. त्यांनी निवडणूका लढविल्या, अनेक विजय मिळविले व अनेक प्रांतिक विधिमंडळातील कामकाज स्थगित करण्यातही यश मिळविले.

·         नोव्हेंबर 1927 मध्ये ब्रिटिशांनी घटनात्मक बाबींच्या पाहणीसाठी सायमन आयोग नेमल्याची घोषणा केली. या आयोगात सर्व सभासद इंग्रजच होते.

·         भारतीयांना हा मोठाच अपमान वाटला. या आयोगाचे सभासद जेव्हा भारतात आले तेव्हा त्यावर बहिष्कार टाकण्यात आला.

·         "सायमन परत जा" अशा घोषणा देत सार्‍या देशभर निदर्शने झाली.

·         लाहोरमध्ये पोलिसांच्या अशाच एका लाठीहल्ल्यात लाला लजपतराय जखमी झाले व त्यातच त्यांचे देहावसान झाले.

सविनय कायदेभंगाची चळवळ :-

·         राजकीय उत्साहाची एक नवी लाटच 1928 1929 मध्ये उसळली.

·         डिसेंबर 1929 मध्ये काॅंग्रेसच्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून युवा नेता जवाहरलाल नेहरु यांनी सुत्रे स्वीकारली.

·         याच अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य हे आपले ध्येय म्हणून जाहीर करणारा ठराव संमत केला.

·         26 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात आला.

·         त्या दिवशी तिरंगी ध्वज उभारण्यात आला आणि हयापुढे परकीय अंमलाखाली राहणे म्हणजे मानवाविरुध्द आणि ईश्र्वराविरुध्द गुन्हा आहे, अशी प्रतिज्ञा लोकांनी घेतली. गांधीजींच्या प्रसिध्द दांडी यात्रेने 12 मार्च 1930 रोजी काँग्रेसने दुपारी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली.

·         त्याचाच परिणाम म्हणून लक्षावधी भारतीयांनी बेकायदा मीठ तयार करुन व ते विकून मिठाचा कायदा मोडला.

·         लाखो लोकांनी सत्याग्रह किंवा नि:शस्त्र प्रतिकार केला. हरताळ, निदर्शने आणि परेदशी माल व दारुवरील बहिष्काराच्या मोहिमेतही लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले.

·         देशाच्या अनेक भागांत शेतकर्‍यांनी जमीन महसून व खंड देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे त्यांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या.

·         महिलांचा सहभाग हे लक्षणीय वैशिष्टय होते.

·         ही चळवळ वायव्येला पठाणांच्या वायव्य सरहद्द प्रांतात व ईशान्येला मणिपूर व नागालॅंडपर्यंत पसरली.

·         पेशावरमध्ये तर 24 एप्रिलपासून 4 मे पर्यंत ब्रिटिशांचे राज्यच अस्तित्वात नव्हते.

·         गांधी आयर्विन कराराद्वारा मार्च 1931 मध्ये तात्पुरती लढाबंदी झाली होती.

·         1932 च्या प्रारंभी मात्र पुनश्च सत्याग्रहास सुरुवात झाली. पण कोणतेही जनआंदोलन कायमचे टिकत नसते, तशीच याही लढयाची तीव्रता हळूहळू कमी होत गेली व 1934 च्या मध्यास चळवळ मागे घेण्यात आली.

·         दरम्यान ब्रिटिशांनी लंडनला गोलमेज परिषद आमंत्रित केल्या होत्या. पण भारताच्या राजकीय स्थितीबाबत कोणतेही नवे सूत्र ठरविण्यात त्यांना अपयश आले.

क्रांतिकारकांची चळवळ :-

·         राजकीय कार्याचा एक भाग म्हणून विसाव्या शतकात क्रांतिकारी दहशतवादाचा दोनदा उद्रेक झाला.

·         प्रथम स्वदेशीची चळवळ अस्तंगत झाली तेव्हा व नंतर असहकार आंदोलन मागे घेण्यात आले तेव्हा. ही चळवळ राष्ट्रवादाने प्रेरित झालेल्या ध्येयवादी युवकांनी चालवली होती.

·         प्रभावी राजकीय गटांच्या कार्या ने त्यांचा भाषांतरांवरूनरमनिरास झाला होता. हया युवकांच्या नसानसांत उत्साह सळसळत होता.

·         सरकारी अधिकारी, मालमत्ता व पदाधिकारी हयांच्याविरुध्द त्यांनी हिंसाचारी मोहीमच सुरु केली.

·         क्रांतिकारी दहशतवादाच्या उगमाचे एक प्रमुख कारण म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या प्रमुख राजकीय चळवळीतील उत्साह ओसरे किंवा ती मागे घेण्यात येई तेव्हा राजकीयदृष्टया पोकळीच निर्माण होई.

·         हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची 1924 मध्ये स्थापना होताच क्रांतिकारकांच्या चळवळीला संघटित स्वरुप प्राप्त झाले.

·         सरकारची प्रतिकि्रया ताबडतोब दडपशाहीची होती. त्यांचाच परिणाम म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या अनेक क्रियाशील कार्यकत्र्यांना अटक करण्यात येऊन 1925 मध्ये काकोरी कट खटला या नावाने प्रसिध्द असलेला खटला भरण्यात आला.

·         समाजवादी विचारांच्या प्रभावामुळे 1928 मध्ये या संघटनेची नाव हिंदुस्थानात सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले.

·         तुम्हाला चंद्रशेखर आझादांचे नाव माहिती असेलच. ते हया संघटनेचे नेते होते.

·         1920 नंतरच्या काळात भगतसिंग, राजगुरु, रामप्रसाद बिस्मील, सुखदेव व बटुकेश्र्वर दत्त हे नेते क्रांतिकारी कार्यात सर्वपरिचित होते.

·         दूरदर्शित्वाचा अभाव ही क्रांतिकारी दहशतवादाची एक प्रमुख त्रुटी होती. वादातील अशा देशभक्तीचे वरदान त्यांना लाभले होते.

·         शासनाच्या यंत्रणेलाच गदगदा हलविण्याची त्यांची क्षमता होती. पण ही चळवळ फारच थोडे दिवस टिकली.

·         सरकारने ती दडपून टाकली. क्रांतिकारकांना अपयश आले असले तरी राष्ट्रीय चळवळीतील त्यांचे योगदान लहानसहान नाही.

·         युवकांना त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा मिळे आणि त्यांच्या असीम त्यागाच्या कथांनी राष्ट्रवादाची ज्योत जागती आणि पेटती ठेवणे शक्य झाले.

गांधीवादाचा विकासात महात्मा गांधीजींची भूमिका

भारतीय राजकारणात गांधीजींचा उदय :-

·         मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला.

·         इंग्लंडमधील बार अ‍ॅट लॉची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये राजकोट व मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरु केला रामचंद्र रवजीकडून अहिंसेचे धडे घेतले.

·         1893 मध्ये हिंदी कंपनीचे वकिल म्हणून दक्षिण आफ़्रिकेत गेले. इंग्रज सरकारचा अन्याय मोडून काढण्यासाठी सत्याग्रहाचा प्रयोग केला व न्याय मिळवला ना. गोखल्यांच्या विचारानुसार गांधीजी भारतात 1915 मध्ये आले.

·         सर्व भारतात दौरा काढला. इंग्रजाविरुध्द आंदोलनाची तयारी केली.

·         गांधीजींच्या सत्याग्रहाचे मार्ग म्हणजे असहकार, कायदेभंग, हरताळ, उपोषण, स्वदेशी, बहिष्कार इ. होते. याच मार्गाने ब्रिटिशांना भारतातून हाकलुन लावले.

·         भारतात गांधीजींनी इंग्रजाच्या अन्यायी धोरणाविरुध्द चंपारण्या सत्याग्रह 1917 खेडा सत्याग्रह 1918 सुरु करुन शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला.

असहकार चळवळ (1920-22) :-

·         गांधीजींनी इंग्रजाच्या अन्यायी धोरणाविरोधी सत्याग्रह करून आफ़्रिकेमध्ये न्याय मिळविला.

·         याच पार्श्वभूमीवर 1920 मध्ये असहकार चळवळ सूरु केली कारणे

(1) पहिल्या महायूध्दामध्ये भारतीय सैन्य व जनता यांच्यात प्रखर राष्ट्रवाद व राष्ट्रजागृती निर्माण झाली.

(2) महायूध्दाचा खर्च वसूल करण्यासाठी इंग्रजांनी प्रचंड आर्थिक पिळवणूक केली

(3) नैसर्गिक संकटसमयी आपल्या आर्थिक नीतीचा त्याग केला नाही व मदत ही केली नाही.

(4) इंग्रजांचा जुलमी राज्यकारभार असून लोकांवर दहशत बसविण्यासठी अनेक कायदे मंजूर केले.

(5) रौलेट अ‍ॅक्टचा निषेध करण्यासाठी जमा झालेल्या जालियनवाला बागेतील लोकांवर जनरल डायरने गोळीबार करुन अनेकांना ठार मारले.

असहकार चळवळीचा कार्यक्रम :-

·         1920 च्या कोलकत्ता अधिवेशात असहकाराचा ठराव मंजूर केला.

·         नागपूरच्या अधिवेशनात सर्वानी ठराव पास केला. या ठरावातील तरतुदी

(1) हिंदी लोकांनी सरकारी पदव्या, नोकर्‍या, पदे, मानसन्मान, इ. चा त्याग करावा,

(2) सरकारी माल, शाळा, कॉलेज, सभा समारंभ न्यायालय इ. वर बहिष्कार टाकावा.

(3) स्वदेशी माल, राष्ट्रीय शिक्षण, पंचायत न्यायदान इ. चा उपयोग करावा.

(4) दारूबंदी, अस्पृश्यता निवारण टिळक स्मारक निधी निर्माण करुन देशी उद्योगंधदे सुरु करावे.

असहकार चळवळीचे स्वरूप :-

(1) जमनालाल बजाज, म. गांधी रवींद्रनाथ टागोर सुंभाषचंद्र बोस यांनी पदव्या व पदवीचा त्याग केला.

(2) 1919 च्या कायद्याने होणार्‍या कायदेमंडळाच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकला.

(3) डयुक ऑफ कॅनोटच्या आगमनप्रसंगी हरताळ, प्रिन्स ऑफ वेल्सच्या होणार्‍या समारंभावर बहिष्कार टाकला.

(4) विद्याथ्र्यानी सरकारी शाळेवर बहिष्कार टाकला. विदेशी मालाच्या दुकानासमोर पिकेंटिंग करण्यात आले.

सरकारचे धोरण व चळवळीची शेवट :-

·         सरकारने आदेश काढून सांगितले की कायदेभंग करू नये.

·         भाषणबंदी सभाबंदी, मिरवणूकबंदी, परंतू जनतेने त्याकडे लक्ष दिले नाही.

·         त्यामुळे सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले, त्यातूनच उतर प्रदेश, मालेगाव, मलबार येथे हिंसक घटना घडल्या 5 फेब्रुवारीपोलीस चौकी जाळली.

·         त्यात 21 पोलीस 1 अधिकारी ठार झाला. या घटनेने 24 फेब्रुवारी 1922 पासून चळवळ बंद केली.

·         त्यामूळे गांधीजींवर अनेकांनी टीका केल्या.

·         चौरीचौरा घटनेमूळे इंग्रजांनी गांधीजींना कैद केले.

स्वराज्य पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम :-

·         गांधीजींच्या अटकेमुळे राजकीय पोकळी निर्माण झाली.

·         ती भरून काढण्यासाठी चित्ता रंजन दास, बिपिनंचद्र पाल, मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय यांनी काॅंग्रेसचा राजीनामा देऊन 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

·         1920 च्या कोलकत्ता अधिवेशात कॉग्रेसमध्ये दोन गट पडले.

·         फेरवादी गट म्हणजे कायदे मंडळात जाऊन ब्रिटिशाना मदत करणे चित्ता रंजन दास, यातीलाल नेहरु, विठ्ठलभाई पटेल या गटाचे प्रमुख होते. नाफेरवादी गट म्हणजे कायदेमंडळावर बहिष्कार टाकणे.डॉ अन्सारी राजगोपालाचारी एस कस्तुरी रंगा, अयंग्गार इ. या गटाचे प्रमुख होते.

स्वराज्य पक्षाचा कार्यक्रम :-

(1) 1923 च्या कायदेमंडळाच्या निवडणूकीत भाग घेऊन 145 पैकी 45 जागा प्राप्त केल्या व 24 स्वतंत्र सभासद मिळवले

(2) भारतीय राज्यघटनेचा ठराव मंजूर केला.

(3) हिंदुस्थानला जबाबदार राज्यपध्दत स्थापन करण्यासाठी गोलमेज परिषद भरवावी ही मागणी इंग्लंड सरकारने फेटाळली

(4) 1919 व्या कायद्यातील दोषांचे निरीक्षण करण्यासाठी मुडिसन समिती नेमण्यास भाग पडले.

(5) 1924-27 या काळात वार्षिक अंदाजपत्रक मंजूर होऊ दिले नाही. 1925 मध्ये चित्ता रंजन दास यांचा मृत्यू झाल्याने पक्षाला हादरा बसला त्यामुळे हळूहळू पक्षाचा अस्त झाला.

सायमन कमिशन (1927) :-

·         च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहिर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.

 कमिशन नेमण्याची कारण -

(1) हिंदी लोकांनी 1919 च्या कायद्यावर बहिष्कार टाकून असहाकर चळवळ सुरु केली होती. म्हणून भारतीयांचे सहाकार्य मिळविण्यासाठी नियूक्ती.

(2) स्वराज्य पक्षाचे नेते मोतीलाल नेहरू यांनी 1919 च्या कायद्यात सुधारणा करुन जबाबदार राज्यपध्दती घ्यावी अशी मागणी केली.

(3) मुझिमन समितीने 1919 चा कायदा अपयशी ठरण्याची शिफारस केली.

(4) दर 10 वर्षानी कायद्याने मुल्यामापन करावे अशी तरतुद 1919 च्या कायद्यात असल्याने मूल्यमापनासाठी नियुक्ती.

सायमन कमिशनवर बहिष्काराची कारणे -

(1) या कमिशनमध्ये भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता

(2) साम्राज्यावादी विचाराचे लोक असल्याने सुधारणा मिळण्याची शक्यता नव्हती

(3) 1927 ला कोलकत्ता येथे यूथ कॉग्रेस स्थापन करुन सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली, तर कमिशन वसाहतीचे स्वराज्य देण्यासाठी नेमले सायमन कमिशन फेब्रुवारी 1928 ला मुंबईत आले. त्या वेळी शहरात हरताळ, काही निशाणे लावून सायमन परत जा अशा घोषणाही दिल्या पोलिस लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले. मुंबई, पंजाब, मद्रास, बंगाल या प्रांतांत जाऊन 27 में 1930 रोजी अहवाल सादर केला.

त्यातील तरतुदी -

(1) प्रांतामधील द्विदल राज्यापध्दत नष्ट करुन लोक प्रतिनिधींच्या ताब्यात कारभार द्यावा

(2) राज्यकारभारतील कार्यक्षमता वाढविण्यासाठी व अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी गव्हर्नरचे अधिकार वाढवावेत

(3) लोकसंख्येच्या 10 ते 25 लोकांना मताधिकार द्यावा व जातीय व राखीव मतदार संघ मतदार संघ चालू ठेवावेत.

नेहरू रिर्पोट (1928) व लाहोर अधिवेशन (1929) :-

·         सायमन कमिशनच्या बहिष्कारामुळे भारतमंत्री र्लॉड र्बकन हेड याने आव्हान केलेली आमची योजन मान्य नसेल तर सर्वाना मान्य होईल. अशी योजना द्यावी त्यानुसार कॉग्रेस लीग हिंदू महासभा यांची बैठक झाली.

·         1928 मध्ये पंडित मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली कमिशन स्थापन केले.

·         त्यांनी जो अहवाल तयार केला. त्याला 1928 च्या कोलकत्ता अधिवेशनात मान्यता दिली.

·         त्यास नेहरू रिपार्ट म्हणतात त्यातील तरतुदी

(1) साम्राज्यांतर्गत स्वराज्यच त्वरीत द्यावे नंतर पूर्ण स्वराज्य मिळावे

(2) संघराज्य स्थापन करुन प्रांतांना गरजेपुरती स्वायत्तता द्यावी.

(3) निधर्मी राज्याची स्थापना करावी.

(4) केंद्रात जबाबदार राज्यपध्दत सुरु करावी,

(5) वसाहतीच्या स्वराज्याची योजना एक वर्षात पूर्ण झाली नाहीतर कायदेभंग सुरु करु या योजनेला मुस्लीम लीगने विरोध करुन डॉ. जिनांनी डिसेंबर 1928 च्या लीगच्या अधिवेशात राज्यघटनेसंदर्भात आपली 14 तत्वे मांडली.

·         1929 च्या लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरुची निवड झाली.

·         त्यांनी ठराव मंजूर केला ठरावानुसार

(1) एक वर्षात सरकारने वसाहतीच्या स्वराज्याची मागणी मान्य करावी

(2) संपूर्ण स्वराज्य मिळविणे हे कॉग्रसचे ध्येय असेल

(3) हे ध्येय साध्य करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्यात येईल.

31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या तीरावर 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला30 जानेवारी 1030राजी अनेक लोकांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली.

सविनय कायदेभंग चळवळ :-

·         लाहोर ठरावानुसार गांधीजींच्या नेतृत्वाखाली 14 फेब्रुवारी 1930 रोजी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्यात आली.

·         हिंसा न करता ब्रिटिशांचे जुलमी कायदे मोडणे आणि त्या संदर्भात शिक्षा भोगणे म्हणजे सविनय कायदेभंग होय.

चळवळीच्या कार्यक्रमाचे स्वरूप :-

·         मिठाचा सत्याग्रह बहिष्कार राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार दारू व करबंदी जंगल कायद्यांचा भंग आणि सरकारी नोकर्‍या न्यायालयावर परकीय मालावर, बहिष्कार, मीठाचा सत्याग्रह, गांधीजीनी कायदेभंग चळवळीची सुरुवात मीठाच्या सत्याग्रहाने म्हणजे दांडी योतेने केली.

·         12 मार्च ते 5 एप्रिल 1930 या काळात आपल्या 75 सहाकार्‍यांहाने साबरमती आश्रमापासून ते दांडीपर्यत सुमारे 385 किमी चालत जाऊन दांडी येथे मीठाचा सत्याग्रह केला.

·         डॉ. सरोजिनी नायडूंच्या नेतृत्वाखाली धारासना सत्याग्रह करुन मीठाचा कायदा मोडला.

साराबंदी :-

·         उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात येथील शेतकर्‍यांनी करबंदी चळवळ सुरु केली सरहद गांधी यांनी करबंदीची चळवळ सुरु केली जंगल सत्याग्रह जेथे समुद्रकिनारा नाही.

·         तेथे साराबंदी किंवा जंगल सत्याग्रह सुरु केला महाराष्ट्र्रात बिळाशी (सातारा) अकोला व संगमनेर (नगर) चिरनेर (रायगड ) लोहार (चंद्रपूर) इ. ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला.

इतर कार्यक्रम :-

·         1930 च्या अलाहाबादच्या अधिवेशनाने चळवळीची व्याप्ती वाढवली परदेशी माल, संस्था बॅका, शिक्षण न्यायालय इ. बहिष्कार टाकला.

·         परदेशी वस्तुंची दुकाने दारू दुकाने यांच्या समोर पिकेटिंग करण्याल आले. येथे येणार्‍या लोकांना हात जोडून दारू न पिण्याची विनंती करणे म्हणजे पिकेटिंग होय.

·         स्वदेशीसाठी सुतकताई खादी उद्योग केंद्र सुरु केले. लोकजागृतीसाठी सभा प्रभात फेर्‍या काढण्यात आल्या.

सरकारचे धोरण :-

·         या चळवळीत स्त्रिया मुले, शेतकरी, कामगार, आदिवासी सहभागी झाले. सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, कमला नेहरू, अरूणा असफअली इ, स्त्रियांनी कामगिरी केली.

·         सरकारने चळवळ मोडण्यासाठी लाठीमार कैद, दंड इ. शिक्षा केल्या महाराष्ट्र्रात सोलापूर येथे मार्शल लॉ पुकारला.

·         सरकारच्या जातीयवादी धोरणामूळेच 1934 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ बंद करुन वैयक्तिक सत्याग्रह करण्यात आला.

गांधी-आयर्विन करार :-

·         सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी अनेक नेत्यांना कैद केली. याचवेळी लंडमध्ये पहिली गोलमेज परिषद भरली होती. कॉग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला.

·         सरकारने कॉग्रसेशी तडजोड करण्याचे धोरण स्वीकारले त्यातून गांधी आयार्विन करार 5 मार्च 1931 रोजी झाला.

·         त्याच्या तरतुदी ब्रिटिश सरकारची स्थापना

(1) राजकैद्यांची सुटका करावी. त्यांच्यावरील खटले मागे घ्यावेत

(2) कायदेभंग चळवळीच्या वेळी जप्त केलेली मालमज्ञ्ल्त्;ाा परत करावी व लोकांना मीठ बनविण्याचा अधिकार द्यावा

(3) लोकांनी शांतपणे धरणे, पिकेटिंग करावे

गोलमेज परिषद -जातीय निवाडा कायदा :-

·         भारतीय राज्यघटनेचा विचार करण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी अशी मागणी स्वराज्य पक्षाने केली होती.

·         सामन कमिशनच्या रिर्पोटला विरोध होता.

·         देशात कायदेभंग चळवळ सुरू झाली होती.

·         या सर्व घटनांच्य आधारे गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.

पहिली गोलमेज परिषद (13 नोव्हेबर 1930- 19 जानेवारी 1931) :-

·         पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली लंडन येथे परिषद भरली सर सप्रु अलीबंधू जयकर जिना डॉ. मुंजे 13 संस्थानिक16इंग्लंडचे राजकीय सभासद 57 जातीय व पक्षीय संघटनेचे प्रतिनिधी होते संभाव्य संघराज्यास मान्यता, त्याची राज्यघटना आणि संस्थानिकांचा खास दर्जा स्वाययज्ञ्ल्त्;ाा असावी इ. ठराव परिषदेत मंजूर केले.

दुसरी गोलमेज परिषद (7 में 1 डिसें 1931) :-

·         गांधी आयर्विन करारानुसार गांधीजींनी या परिषदेत भाग घेतला 107 प्रतिनिधी हजर होते. गांधी व जिना यांच्यात मतभेद झाले. तसेच सुधारणा देण्यास ब्रिटिशांनी नकार दिल्याने परिषदेचे कामकाज बंद झाले. या परिषदेतील ठराव.

·         भारतास संघराज्य पध्दत उपयोगी आहे. प्रांताना जबाबदार व केंद्रात द्विदल शासन पध्दत, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना इ. ठराव मंजूर करण्यात आले.

·         रॅम्से मॅक्डोनाल्डचा जातीय निवाडा निर्णय 16 ऑगस्ट 1931 रोजी जाहीर केला.

·         त्यामध्ये स्वतंत्र जातीय मतदारसंघ मराठा, हरिजन, स्त्रिया, व्यापारी मळेवाले इ. राखीव जागा देण्यात आल्या.

·         या विरोधात गांधीजींनी इ.स. 1931 रोजी प्राणंतिक उपोषण केले.

·         त्यातूनच डॉ. आंबेडकर व म. गांधी यांच्यात 25 सप्टेंबर 1932 रोजी पूणे करार झाला.

·         तिसरी गोलमेज 17 नोव्हेंबर 24 डिसेंबर 1932 या काळात झाली एकूण 46 प्रतिनिधी हजर होते.

1935 चा कायदा :-

·         तीन गोलमेज परिषदेच्या अहवालाच्या आधारे मार्च 1933 मध्ये श्र्वेतपत्रिका प्रसिध्द केली.

·         याचा विचार करण्यासाठी र्लॉड लिनलिथगोच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली.

·         त्याने 11 नोव्हें 1934 मध्ये अहवाल प्रसिध्द केला. त्याच्या आधारे भारतासाठी कायदा केला.

·         पार्लमेंटने 2 ऑगस्ट 1935 ला मान्यता दिली.

·         तोच 1935 चा सूधारणा कायदा होय.

शेतकरी व गांधीजींची चळवळ :-

·         सन 1857 ते 1921 हया 64 वर्षाच्या काळात शेतकरी चळवळीने मूळ धरले.

·         शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले.

·         हया असंतोषाची मुख्य तीन कारणे आहेत.

1) वाढता जमीन सारा,

2) आर्थिक मंदी

3) दुष्काळाचे संकट.

·         शेतकर्‍यांवर खरा अन्यास सुरु झाला तो जमीनदारांच्या जुलूमाने आणि ब्रिटिशांच्या अवाजवी जमीनसारा वसुलीने. हयामुळे शेतकर्‍यास जिणे कठीण होत गेले व शेवटी शेतकर्‍यांनी विरोध दर्शविण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे असे ठरविले.

·         त्यांना संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडली नाही.

·         हया संघटित शेतकर्‍यांचे लढे पुर्ण भारतातून घडू लागले.

·         त्यांतील सर्वात प्रसिध्द लढे म्हणजे

अ) संथालांनी सावकारांविरोधी केलेला लढा

आ) दक्षिणेतील सावकारीविरोधी दंगल

इ) बंगालमध्ये जमीनदारांविरोधी कुळांनी केलेला विरोध

ई) पंजाबमध्ये सावकारांविरुध्द शेतकर्‍यांनी केलेला उठाव

·         अशा रितीने 20 व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत शेतकरी जागृत झालेला आढळतो. त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुध्द लढण्यास तो सिध्द झालेला होता.

·         हया परिस्थितीत 1020 साली महात्मा गांधींनी राष्ट्रीय चळवळ सुरु केलेली होती. त्यातही शेतकरी सामील झाले.

·         विशेषत: गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन शेतकरी चळवळी फारच यशस्वी झाल्या.

·         ती ठिकाणे म्हणजे बिहारमधील चंपारण्य, गुजरातमधील खेडा आणि बार्डोली जिल्हे हया तीनही सत्याग्रहाच्या चळवळीविषयी थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे देता येईल.

चंपारण्य चळवळ :-

·         चंपारण्यास जनक राजाची भूमी म्हणतात. हया भागात आंबा आणि नीळ हयांचे उत्पादन होत असे.

·         सन 1917 साली ब्रिटिशांच्या नियमाप्रमाणे तीन कठीया शेतीत निळीची लागवड करावी असा प्रत्येक शेतकर्‍यावर दंडक होता.

·         तीन कठीया शेती म्हणजे शेतीचा तीन विसांश भाग, अशा रितीने निळीची शेती शेतकरी बळजबरीने करीत होते.

·         त्यांच्यातून राजकुमार शुक्ल हया शेतकर्‍यास स्वत:चे तसेच इतर शेतकर्‍यांचे दु:ख सहन झाले नाही. त्यांची तळमळ इतकी होती की त्याने गांधीजींपुढे हे दु:ख मांडण्यासाठी त्यांचा पिच्छाच केला.

·         प्रथम त्यांनी लखनौच्या काॅंग्रेसमध्ये त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, नंतर कानपूरला, त्यानंतर कलकत्याला असा पुरेपूर प्रयत्न केला.

·         त्यामुळे गांधीजींना ज्या विषयाची काहीही कल्पना नव्हती ती गोष्ट माहीत झाली व त्यांनी चंपारण्य बघण्याचे ठरविले व हया निळीच्या शेतकर्‍यांच्या चळवळीने मूळ धरले.

·         पाटण्यामध्ये आल्यावर गांधीजींना सर्व परिस्थिती जाणून घेण्यासाठी राजेंद्र बाबू, मौलाना मझरुल हक, आयार्च कृपलानी तसेच तेथील वकील मंडळाचे सभासद राम नवमी प्रसाद, बाबू ब्रज किशोर प्रसाद, इत्यांदींचे साहाय्य लाभले.

·         हयात महत्वाचे निरीक्षण म्हणजे राजेंद्र प्रसाद व ब्रज किशोर बाबू हे गरीब शेतकर्‍यांच्या वतीने खटले चालवीत. त्यात शेतकर्‍यांना थोडेफार यश मिळे.

·         परंतु हे दोघेही वकील त्या भोळया खेडवळांकडून फी घेत असत व त्यासाठी एक युक्तिवाद वापरत असत तो म्हणजे फी घेतली नाही तर घर खर्चासाठी पैसा कोठून येणार पण चौकशी अंती गांधीजींना कळले की, वकिलांनी केव्हाही हजाराखाली फी घेतली नाही, तेव्हा गांधीजींनी हे असे खटले ताबडतोब थांबवा असा निर्णय देऊन ती कठीया पध्दत घालविण्यासाठी शेतकर्‍यांचा सरकारविषयीचा भित्रेपणा घालविणे हाच एकमेव मार्ग आहे असे ठामपणे सांगितले.

·         गांधीजींनी तळागाळातल्या शेतकर्‍यांना जास्त महत्व देऊन येणार्‍या भविष्यकाळातील संकटांची किंवा योग्य वेळेतच काळजी घेतली.

·         आमच्यापैकी ज्यावेळी जेवढयांची मागणी कराल तेवढे तुमच्या बरोबर राहतील तुरुंगात जाण्याची गोष्ट नवीन आहे. त्याबाबत शक्ती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करु अशा रितीने सर्वजन एकसंघ झाले व शेतकरी चळवळीचा प्रारंभ झाला व राष्ट्रीय सभेची मुळे रोवली गेली.

·         राष्ट्रीय सभा हा शब्द अप्रिय होता. कारण बिहारमध्ये राष्ट्रीय सभा म्हणजे बॉम्बगोळे, मारामार्‍या, दंगे, इत्यादी असा घेतला जाई.  

·         त्यांना राष्ट्रीय सभेच्या भौतिक देहाच्या परिचयापेक्षा तिचा आत्मा ओळखणे आणि त्याला अनुसरणे पुरेसे वाटत होते.

·         एवढी समज देण्यासाठी गांधीजींनी कोठल्याही धमकीला भीक घातली नाही. जेव्हा त्यांना कमिशनरने तिरहूत सोडून जायला सांगितले आणि नंतर चंपारण्य सोडून जायला सांगितले तेव्हा त्यांनी ही दोन्ही ठिकाणे सोडून जायची नाहीत असे ठरविले.

·         त्यांनी जेव्हा हा नकार कळविला त्यावेळेस त्यांच्यावर समन्स काढून कोर्टात हजर राहण्याचे हुकूम सोडण्यात आले.

·         कलेक्टर, मॅजिस्ट्रेट तसेच सुपरिटेडेंट हयांच्याकडच्या सर्व सरकारी नोटिशी त्यांनी स्वीकारल्या. त्यास विरोध केला नाही. कारण त्यांना हुकमाचा सविनय भंगच करावयाचा होता.

·         हया घटनेने सरकारी अधिकार्‍यांमध्ये ऐक्य निर्माण झाले व इंग्रजांना त्यांची सज्ञ्ल्त्;ाा लुप्त झाल्यासारखे झाले. हयावेळेस गांधीजींना भेटण्यासाठी खूप गर्दी झाली तेव्हा हयाच सरकारी अधिकार्‍यांनी गर्दी रोखण्यास मदत केली.

·         अशा रितीने गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे हाच खरा त्यांच्या अहिंसेचा व सत्याचा साक्षात्कार होता.

·         गांधीजींनी एका निवेदनातून सविनय कायदेभंगाचा वस्तुपाठ मांडला. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, जाहीररित्या हुकूम मोडण्याची जोखीम मला पत्करावी लागली, कारण प्रश्न अनादर करण्याचा नसून स्थानिक सरकार व माझ्यातील मतभेदाचा आहे.

·         येथे मी जनसेवा व देशसेवा करण्याच्या इराद्याने आलो म्हणून मला हया निळीवाल्या शेतकर्‍यांचा प्रश्न जाणून घेणे आवश्यक आहे.

·         निळीचे मळेवाले त्यांना न्यायाने वागवीत नाही व हया शेतकर्‍यांनी माझी मदत मागितली तेव्हा मला त्यांचा प्रश्न अभ्यासणे आवश्यक आहे.

·         तेव्हा हुकमाचा भंग हा कायद्याने स्थापित झालेल्या सत्तेचा अपमान करण्यासाठी नसून एक प्रकारे कायद्याचे पालन करण्याचाच माझा हेतू आहे, त्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांची तक्रारी नोंदवताना सुरुवातीची भीती होती ती नष्ट व्हायची.

·         अशा रितीने गांधीजींनी विनयपूर्वक सर्व चळवळ पुढे नेली व त्यात पूर्णपणे यश मिळविले.

·         निळीच्या लागवडीची सक्ती रद्द होऊन शेतकर्‍यांना त्यांच्या मागणीचा न्याय मिळाला, हयातच चंपारण चळवळीचे यश स्पष्ट होते.

खेडा सत्याग्रह :-

·         चंपारण्यमधील चळवळीपेक्षा खेडा येथिल सत्याग्रह चळवळीस वर्तमानपत्रांद्वारे जास्त प्रसिध्दी मिळाली.

·         मुंबईतून हया सत्याग्रहासाठी एवढी रक्कम जमा झाली की शेवटी ती शिल्लक राहिली. पाटीदार शेतकर्‍यांना हा लढा नवीनच होता. ब्रिटिशांचा अंमल बजावणार्‍यांची भीती त्यांच्या मनातून घालवायची होती म्हणून त्यांना गांधीजी सांगत अंमलदार हे प्रजेचे शेठ नाहीत तर नोकर आहेत, प्रजेच्या पैशातून ते पगार खाणारे आहेत, हे समजावून देऊन त्यांच्याबद्दलचा दरारा दूर करणे हे मुख्य काम होते.

·         सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये खूप हिंमत आली कारण सरकारचे शिक्षा करण्याचे धोरणही नरम होते.

·         हे सरकारी लोकांच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा गुरे विकणे, घरावर जप्ती आणणे, शेतातील उभी पीके जप्त करणे, इत्यादी गोष्टी ते करु लागले.

·         हयाचा परिणाम होऊन शंकरलाल परिख हयांच्या जमिनीचा सारा भीतीपोटी त्यांच्या जमिनीत राहणार्‍या कुळाने भरला परंतु हयामुळे लोकांमध्ये जास्त भीती निर्माण होऊ नये म्हणून घडलेल्या दोषाचे प्रायश्चित म्हणून शंकरलाल परिखाने ती जमीन सार्वजनिक कार्यासाठी देऊन टाकली.

·         दुसरी घटना कांदेचोर म्हणून प्रसिध्द आहे.

·         हयांत एका शेतातील उभे पीक थोडयाशा सार्‍यांसाठी जप्त करण्यात आले हे पाहून गांधीनी मोहनलाल पंडयाच्या नेतृत्वाखाली पीक काढून घेण्याचा सल्ला दिला. कारण उभे पीक जप्त करणे हे कायद्याच्या न्यायनीतीला धरुन नव्हते.

·         तसेच त्यांनी लोकांना तुंरुंगात जाण्याची अथवा दंड होण्याची पूर्वकल्पना दिली होती.

·         पंडयास अशा कामामुळे जर तुरुंगवास झाला तर खेडा सत्याग्रह पूर्ण होईल असे वाटत होते.

·         त्यामुळे त्याने सात आठ लोकांना घेऊन उभे पीक चोरुन नेले. त्यांचा खटला झाला तेव्हा कुठलेही अपील न करता त्याने तुरुंगात जाण्याचे ठरविले व लोकांमध्ये सत्याग्रहाची जाणीव जागृती केली. त्यास तुरुंगात पोहचविण्यास मोठी मिरवणूक निघाली होती.

·         हया सत्याग्रहात जे खंबीर होते त्यांचा विनाश होऊ नये व सत्याग्रहींना कमीपणा येऊ नये हयासाठी गांधींनी एक मार्ग दाखविला.

·         त्याप्रमाणे नाडियाद तालुक्यातील मामलेदाराने श्रीमंत पाटीदारांनी जर आपापला महसूल भरला असेल तर गरिबांची वसुली तहकूब ठेवली.

·         खेडा सत्याग्रहात अशा रितीने गांधीजींच्या नेतृत्वाखाली दुष्काळाच्या काळात अन्याय्य महसूल आकारणीला विरोध दर्शवून पाटीदार शेतकर्‍यांना सत्याग्रह करण्यास प्रवृज्ञ्ल्त्;ा केले.

·         हया चळवळीचे वैशिष्टय म्हणजे शेतकरी तुरुंगवासाला घाबरले नाहीत, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय जागृती निर्माण झाली.

बार्डोली सत्याग्रह :-

·         गांधींनी सन 1922 साली गुजरातमध्ये बार्डोली येथे लोकांच्या मदतीने शांततेने कायदेभंग करुन सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. हयासाठी सर्व तयारी झाली असतानाच उत्तर प्रदेशातील चौरीचौरा हया गावी हिंसात्मक दंगल झाली.

·         हयात तीन हजार शेतकर्‍यांच्या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यामुळे सुडबुध्दीने प्रक्षुब्ध जमावाने पोलीस चौकीला पेटविले व हया दंगलीत 22 पोलीस ठार झाले.

·         हया प्रकाराची गांधीजींनी गांभीर्याने दखल घेतली आणि बार्डोलीचा सत्याग्रह मागे घेतला.

·         गांधींना हयातून जाणवले की लोकांना अजूनही अहिंसात्मक चळवळीची जाण आलेली नाही.

·         अशा हया चळवळीतून शेतकर्‍यांना लढयाची प्रवृत्ती, स्वार्थत्यागाची भावना, निर्भयता आणि खंबीरता हयाची शिकवण मिळाली.

·         सहा वर्षानंतर सन 1928 साली पुन्हा बार्डोलीचा सत्याग्रह झाला. बार्डोलीत सरकारने जमीन महसूलीत 30 टक्के वाढ केली.

·         त्यावेळेस गांधीजींनी वकिलांना ब्रिटिशांच्या कोर्टावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्यावेळेस तेथील नामांकित वकील म्हणून वल्लभभाई पटेल प्रॅक्टीस करीत होते. त्यांनीही गांधीजींच्या आवाहनास दाद दिली व तात्काळ वकिली सोडून ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. वल्लभभाई पटेल हयांनी करबंदी लढा सुरु केला व सरकारला त्यांनी एक स्वतंत्र लवाद मंडळ नेमण्यास सांगितले.

·         मुंबईच्या गव्हर्नरने हया लढयास सर्व शक्तीनिशी प्रतिरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु वल्लभभाई पटेल हयांच्या मोहिमेत ऐंशी हजार शेतकरी सहभागी होते त्यांनी हया दडपशाहीचा प्रतिकार केला आणि ब्रिटिशांनी माघार घेतली.

·         हया बार्डोली लढयातून यश संपादन केल्यावर लोक वल्लभभाई पटेल हयांना सरदार पटेल म्हणून ओळखू लागले.

·         थोडक्यात, गांधीजींच्या चळवळींद्वारे शेतकरी, शेतमजूर, शेतमालक, खंडकरी, किंवा वेठबिगार इत्यांदींचे अनेक प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न झाले.

·         त्यांतील महत्वाचे प्रयत्न हे चंपारण, खेडा व बार्डोली सत्याग्रहातून स्पष्ट झाले.

जहालवादाचा विकासात लोकमान्य टिळकांची भूमिका

·         1892 पासून इंग्रजांच्या न्यायी व उदारमतवादी धोरणाबाबत साशंकता निर्माण झाली.

·         र्लॉड कर्झनची राजवट, बंगालची फाळणी आणि स्वदेशी बहिष्कार चळवळ यातून जहालवादाचा उदय झाला.

·         जहालवादी विचार म्हणजे सरकारशी सहकार्याऐवजी संघर्ष प्रार्थऐवजी प्रतिकार, या मार्गाने सरकारवर पडपण आणणे.

·         लाल, बाल, पाल यांनी नेतृत्व करून सभा चर्चा वृतपत्रे व्याख्याने इ. साधनांद्वारे जहाल विचाराचा प्रसार केला.

जहालजवादाच्या उदयाची कारणे आणि कार्यक्रम :-

(1) सरकारचे अन्यायकारक धोरण -

·         इंग्रजांचा आर्थिक साम्राज्यवादातून राजकीय साम्राज्याचा उदय झाला भारतातून व्यापार, कर, पगार, माध्यामातून प्रचंड संपत्ती मायदेशी पाठवली.

(2) शेतकर्‍यांची पिळवणूक -

·         भारतातील जनता शेतीवर अवलंबून होती. नैसर्गिक संकटे, टोळधाडी यामूळे उत्पन्न मिळत नसे तरीपण सरकारला कर द्यावा लागत असे सावकार व सरकारकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याने उपाशीपोटी जीवन जगावे लागे.

(3) नैसर्गिक संकटसंदर्भात जुलमी धोरण -

·         1896-97 1900 या काळात दुष्काळ पडून दोन कोटी लोकांना तडाख बसला तरीही सरकारने उपाययोजना केली नाही.

·         महाराष्ट्र्रात प्लेगच्या वेळी उपायोजना न करता लोकांचा धार्मिक भावना दुखावल्या.

(4)1892 च्या कायद्याने असमाधान -

·         या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळातील बिन सरकारी सभासदांची संख्या वाढवली परंतू राजकीय हक्क मर्यादित ठेवले.

(5) इंग्रजाचे दडपशाहीचे धोरण -

·         1885-1905 या काळात र्लॉड लेन्सडाऊन, र्लॉडएलिगन, र्लॉड कर्झन यांनी अन्यायाी व जूलमी कायदे केले.

·         सरकारी नोकरीवर बंधने आणली.

·         लष्करी व प्रशासकीय खर्चात वाढ केल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

(6) बंगालची फळणी -

·         इंग्रजांनी भेदनीतीचे राजकारण करण्यासाठी बंगालची फाळणी केली. त्यातून बंगालमध्ये सोनेर बंगला या संघटनेने वंगभंग चळवळ सुरु केली त्याचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी केले त्यामुळे चळवळीला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले.

(7) परदेशातील भारतीयांवर अन्याय -

·         ब्रिटिशांच्या वसाहतीमध्ये भारतीय लोक नोकरी, व्यवसात व्यापारासाठी गेले होते. अनेक ठिकाणी अपमानस्पद वागणूक मिळत होती.

(8) लाल -बाल-पाल यांचे कार्य -

·         इंग्रजांशी जशात तसे हा मार्ग स्वीकारून राजकीय हक्क मिळविण्यासाठी आक्रमक मार्ग स्वीकारला त्यामुळे जहालवादाचा उदय झाला.

मवाळ -जहाल- संघर्षाची कारणे :-

(1) इंग्रजी सत्ता देणगी आहे. मवाळवाद्यांचा विचार तर जहालवाद्यांचा विचार, तो कलंक आहे.

(2) इंग्रजामुळे प्रगती होईल असे मवाळवाद्यांचा विचार होता.

(3) प्रथम स्वराज्य नंतर सुधारणा अशी जहालवाद्यांची मागणी होती.

जहालवाद्यांचा कार्यक्रम :-

·         1905 च्या बनारस अधिवेशात चतुसुत्री तत्वांचा स्वीकार केला. या वेळी मवाळ जहाल, गट पडले.

·         1906 च्या कोलकत्ता अधिवेशनात दादाभाईनी चतु:सुत्रीचा ठराव मंजूर केला.

·         स्वराज्य म्हणजे स्वंशासन असा होता. इतर वसाहतींप्रमाणेच प्रशासन भारतात असावे.

·         स्वदेशी देशी उद्योगधंदे वाढवावे व स्वदेशी माल वापरावा बिहिष्कार सरकार मागण्यांचा विचार करत नाही तोपर्यत त्यांचा माल वापरु नये राष्ट्रीय शिक्षण भारतीय संस्कृती व सद्यस्थिती माहिती देणारे शिक्षणाचा भारतीयांनी स्विकार करावा.

लोकमान्य टिळकांचे कार्य :-

·         बाळ गंगाधर टिळक याचा जन्म 2 जूलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्हयातील चिखली गावी झाला.

·         1876 मध्ये ळ.ळ.भाषांतरांवरून. ची परीक्षा पास झाले.

·         त्यांच्यावर मिल स्पेन्सर यांच्या विचारांचा प्रभाव होता.

·         लो टिळकांचे कार्य पुढीप्रमाणे

     लो. टिळक व कॉग्रेस -

·         कॉग्रेसच्या स्थापना प्रसंगी टिळक हजर होते.

·         तेव्हापासून टिळकांचा कॉंग्रेसशी सबंध होता.

·         इंग्रज भारतीयांवर अन्याय अत्याचार करत हाते, त्याला वाचा फोडण्याचे व लोकजागृतीचे कार्य केले.

लो. टिळक सार्वजनिक सभा -

·         1895 मध्ये मध्ये सार्वजनिक सभेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

·         1896 च्या दुष्काळप्रसंगी लोकांना मदत केली व सरकारच्या धोरणावर टीका केली.

·         याचवेळी संघर्ष करुन हक्क प्राप्त केले पाहिजेत असे लोकांना शिकवले लो. टिळक जहालवाद इंग्रज अन्याय करत असताना मवाळवाद्यांचे धोरण त्यांना पसंत नव्हते जशास तसे उत्तर देऊन इंग्रजांशी संघर्षाची भूमिका टिळकांनी घेतली होती.

·         त्यातून चतु:सुत्रीचा कार्यक्रम अंमलात आणला टिळक शैक्षणिक कार्य व वृत्तपत्रे टिळकांनी आगरकर, चिपळूणकर, यांच्या मदतीने 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

·         1884 मध्ये डेक्कन एज्यूकेशन सोसायटीची स्थापना करून 1885 मध्ये फ़र्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.

·         1881 मध्ये केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरु करुन सरकारी धोरणावर टिका आणि लोकजागृतीचे कार्य केले.

·         सांस्कृतिक कार्यक्रमांमधून राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी 1893 मध्ये गणेशोत्सव आणि 1896 मध्ये शिवजयंती उत्सव सुरु केले.

·         होमरुल लीगची चळवळ :-

·         बंगाल फाळणीचे जहालवाद व क्रांतीवाद उदयास आला त्यांनी सरकारच्या अन्यायाविरूध्द आवाज उठवला पहिल्या माहायुध्दाचा भारतीय राजकारणावर परिणाम होऊन ब्रिटिश विरोधी स्वांतत्र्यासाठी होमरूल चळवळ सुरु झाली.

·         टिळकांनी स्वराज्याच्या मागणीसाठी होमरुल चळवळ सुरु केली.

·         आयर्लडच्या धर्तीवर भारतात आंदोलन करावे यासाठी डॉ अ‍ॅनी बेझंट यांनी टिळकांची भेट घेतली आणि चळवळीला प्रारंभ केला.

होमरूल लीगची स्थापना व उद्देश :-

·         डॉ. अ‍ॅनी बेझंट मूळच्या आयरिश असून भारतात थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य करत होत्या भारताच्या विकासाठी स्वराज्य गरजेचे आहे म्हणून त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला.

·         लो टिळकांशी चर्चा करून 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.

·         मद्रास, मुंबई, कानपूर इ. ठिकाणी शाखा स्थापन केल्या आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कॉमन विल व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे सुरु केली .

·         या संघटनेचा उद्देश म्हणजे स्वशासनासाठी लोकमत तयार करणे राजकीय जागृती करणे इंग्रज सरकारने त्यांच्या वर्तमानपत्रावर बंदी घातली त्यांना व त्यांच्या सहाकार्यांना अटक केली.

·         अनेक प्रांतात प्रवेशबंदी घातली अमेरिकेत लोकांचा पाठिंबा मिळविला.

·         लो. टिळकांना प्रारंभी युध्दाच्या संदर्भात इंग्रजांनी पाठिंबा दिला, तरीपण स्वराज्याची मागणी तीव्र केलीच स्वराज्य म्हणजे इंग्रजांची हकालपट्टी अशी इंग्रजांची भावना झाल्याने लो. टिळकांनी होमरूल हा शब्द वापरायला सुरुवात केली महाराष्ट्र्रात एप्रिल 1916 मध्ये होमरूल लीग म्हणजे स्वराज्य संघाची स्थापना केली.

·         डॉ. बेझंट व लो. टिळक यांनी स्वतंत्र दोन संघटना स्थापन केल्या परंतु कार्य एकत्र केले.

होमरूल लीेगचे कार्य :-

·         सर्व देशभर दौरे काढून व वृत्तपत्रातून सामान्य लोकांना स्वराज्याच्या हक्काची जाणीव करुन दिली.

·         इंग्रजांच्या दडपशाही धोरणामुळे सर्व स्तरातील, जातीधर्माच्या स्त्री पुरुषांनी चळवळीत सहभाग घेतला.

·         इंग्रजांनी वाढत्या चळवळीला पायबंद घालण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारुन वृत्तपत्रावर बंदी, नेत्याना इतर प्रांतात प्रवेश बंदी घातली, मॉटेग्यूच्या मते होमरुल चळवळी ही कॉग्रसची चळवळ आहे.

1919 चा मॉटफ़ोर्ड सूधारणा कायदा :-

·         पहिल्या महायूध्दाच्या काळात भारतीयांनी इंग्रजांना पाठिबां दिला आणि स्वराज्याची मागणी केली.

·         सरकारने दुर्लक्ष केल्याने भारतात असंतोष निर्माण झाला.

·         या पार्श्वभूमीवर 1919 चा कायदा मंजूर केला. त्याचंी कारणे पुढीलप्रमाणे.

(1) 1909 कायद्याने असमाधान -

·         भारतीयांची वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी नाकारली. जातीय मतदार संघ निर्माण करून दुहिचे बीजारोपण केले.

(2) क्रांतिकारकांचे प्रयत्न -

·         इंग्रजांनी दिलेल्या सुधारणा अपुर्‍या असल्याने क्रांतिकारी चिडले होते त्यांनी अनेक इंग्रज अधिकार्‍यांना ठार मारले. हा दहशतवाद नष्ट करण्यासाठी

(3) आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम -

·         बेल्जियमच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लढत आहोत असे इंग्लडचे पंतप्रधान ग्रे यांनी जाहीर करुन पहिल्या महायूध्दात प्रवेश केला. तेच इंग्रज भारतीयांना स्वातंत्र्य देण्यास तयार नाहीत. विड्रो विल्सनने 14 कलमी योजना जाहिर केली. त्यानुसार स्वातंत्र्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण ती अपूर्ण राहिली.

(4) लखनौ कराराने जहाल मवाळ व कॅाग्रेस लीग यांचे ऐक्य झालेले होते.

(5) साम्राज्यांगर्तत स्वराज्य देण्याची घोषण मॉटेग्यूने 20 ऑगस्ट 1917 रोजी केलेली होती.

1919 च्या कायद्यातील तरतुदी :-

(1) भारत मंत्र्याच्या कौन्सिलची संख्या 8-12 करून त्यात 3 भारतीयांचा समावेश केला. भारतमंत्री व कौन्सिलचा खर्च इंग्लंडच्या तिजोरितून केला

(2) भारत मंत्री व ग. ज. चे काही अधिकार कमी करून भारतीय हायकमिशनर पद लंडनमध्ये निर्माण केले. त्याचा खर्च भारतीय तिजोरीतून द्यावा

(3) कनिष्ठ सभागृहाची सभासद संख्या 145-41 सरकारी 104 बिन सरकारी (विविध प्रांतांतील) असे त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असे.

(4) केंद्रीय वरिष्ठ सभासद संख्या 60 असून बिनसरकारी 26, सरकारी 34 सभासद असून कार्यकाळ 5 वर्षाचा असे

(5) विधान सभा व विधान परिषद अशी दोन सभागृहे निर्माण करण्यात आले.

भारतात प्रांतीय शासन व्यवस्था (द्विदल शासन पध्दत) :-

·         1919 च्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरु केली यामध्ये केंद्र व प्रांत यांच्यात विषय विभागणी केंली.

·         विधिमंडळ आणि त्यांचे अधिकार कार्य इत्यादीचा समावेश होतो.

·         1 एप्रिल 1921 पासून द्विदल राज्यपध्दतीला सूरवात झाली परंतू 1920-21 असहकार चळवळ प्रारंभीच सुरु झाली.

·         1921-1937 म्हणजे 16 वर्षाच्या काळात द्विदल शासन पध्दत सुरु होती.

जहाल राष्ट्रवादी नेत्यांची उद्दिष्टे आणि कार्यपध्दती :-

·         विसाव्या शतकाच्या प्रारंभी एका नव्या जहाल राष्ट्रवादी नेतृत्वामुळे भारतीय राष्ट्रवादी चळवळीने आणखी एक वरची पायरी गाठली.

·         एक प्रकारे या आधी झालेल्या राष्ट्रवादी चळवळीच्या फलस्वरुप आणि दुसर्‍या प्रकारे साम्राज्यवादाने 19 व्या शतकाच्या शेवटी आपल्याच हेकट धोरणांचा पुनरुच्चार केल्यामुळे हे घडून आले.

·         1897 मध्ये व्हाईसरॉय म्हणून आलेल्या र्लॉड कर्झनच्या रुपाने हा साम्राज्यवादी हेकटपणा, एकतंत्री वृत्ती आणि कार्यक्षमता प्रकट झाली. राजकीय युक्तिवाद आणि मवाळ चळवळ यांद्वारा आता राजकीय हक्क मिळणे अशक्य आहे.

·         याची राजकीयदृष्टया जागृत असलेल्या भारतीयांना जाणीव झाली.

·         ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्म होऊन स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आता आत्मनिर्भर राहून जनतेचा लढाच सुरु करायला हवा, हे त्यांना कळून चुकले.

·         देशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीही हेच दर्शवीत होती. वसाहतवादी अविकसिततेच्या फलस्वरुप अर्थव्यवस्थेचा गाडा रुतून पडला होता.

·         ही परिस्थिती 19 व्या शतकाच्या शेवटी आपले परिणाम दाखवू लागली.

·         याचेच एक प्रतीक म्हणजे 1897 1900 मधील दुष्काळ या दुष्काळात लक्षावधी लोक दगावले.

·         आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील अनेक घटनामुळेही जहाल राष्ट्रवादाची प्रगती होण्यास मदत झाली.

·         इसवी सन 1896 मध्ये इथिओपियाने इटलीचा व इसवीसन 1905 मध्ये जपानने रशियाचा पराभव केल्याने युरोपीय वर्चस्वाचा फुगा फुटलाआयर्लंड, रशिया, इजिप्त, तर्कस्तान आणि चीनमधील क्रांतिकारी चहचळींनीही हेच दाखवून दिले की, जनतेत ऐक्य असेल व स्वार्थत्यागाची तयारी असली तर वरवर अत्यंत बलशाही वाटणार्‍या कोणत्याही एकतंत्री परकीय सत्तेला उखडून टाकता येते.

·         राजकीय पटलावर आता नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला.

·         त्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल व लाला लजपतराय हे प्रमुख होते.

·         भारतीय जनतेने स्वत:च्याप्रयत्नांवर, राजकीय क्रियाशीलतेवर आणि स्वार्थत्यागावरच आता विसंबून राहिले पाहिजे, असे या नेतृत्वाचे स्पष्ट मत होते.

·         भारतीय जनतेच्या सामर्थ्यावर आणि जनआंदोलनावर त्यांचा दृढ विश्र्वास होता. ते ठामपणे सांगत की, एकदा जनता लढयात उतरली म्हणजे ही राष्ट्रीय चळवळ दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला अशक्य होईल. म्हणूनच राजकीय कार्यात जनतेला सहभागी करुन घेण्यावर त्यांचा भर होता.

·         ब्रिटिश साम्राज्यात राहून या सत्तेत सुधारणा करता येतील हे त्यांना मुळीच मान्य नव्हते

दुसर्‍या महायुध्दातील स्वातंत्र्य चळवळ

ऑगस्ट घोषणा (1940) :-

·         दुसर्‍या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने 8 ऑगस्ट 1940 रोजी घोषण केली. त्यानुसार

(1) भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे,

(2) कार्यकारी मंडळात हिंदी सभासदांची वाढ करणे

(3) राज्यघटनेसाठी घटना परिषद स्थापन करणे

(4) अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे.

वैयक्तिक सत्साग्रह (1940) :-

·         कॉग्रसने 1940 च्या मुंबई अधिवेशानात ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला. कारण, त्यामध्ये भेदनीतीचा उपयोग आणि स्वातंत्र्याची मागणी नाकारली होती.

·         गांधीजींनी ऑक्टो 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरु करुन युध्दविरोधी प्रचार केला पाहिजे सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.

·         दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. डिसेंबर 1941 पर्यत 22 हजार सत्याग्रहींनी कारावास स्वीकारला.

क्रिप्स् योजना (2 मार्च 1942) :-

·         1939 ला दुसरे महायूध्द सुरु झाले. प्रारंभीच्या काळात जर्मनी जपान सैन्याने विजय प्राप्त केले होते.

·         चीनचे चॅग काई शेक यांनी भारतीयांना इंग्रज लवकरच स्वातंत्र्य देतील, त्यासाठी आपण प्रयत्न करू असा सल्ला दिला होता.

·         युध्दात भारताचे सहकार्य मिळविण्यासाठी रुझवेल्टचे प्रयत्न आणि राष्ट्रीय सभेची आक्रमक भूमिका यामुळे भारतीयांशी चर्चा करण्यासाठी चर्चिलने क्रिप्स मिशन पाठविले.

·         सर स्टॅफर्ड, क्रिप्स र्लॉड ऑफ ब्रिव्हर्व, र्लॉड ऑफ प्रिव्हीपर्स इ. 1942 रोजी भारतात आले. त्यांनी जी योजना तयार केली तिला क्रिप्स योजना म्हणतात.

·         तरतुदी-

(1) वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा असलेले संघराज्य.

(2) युध्दसमाप्तींनतर राज्यघटना बनविण्यासाठी घटना समिती स्थापन केली जाईल.

(3) कॉग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा या सर्वानी ही योजना फेटाळली, बुडत्या बॅकेवरील पुढच्या तारखेचा धनादेश असे गांधीजींनी वर्णन केले.

1942 ची चळवळ :-

·         क्रिप्स मिशन परत गेल्यानंतर भारतात इंग्रजांच्या विरोधी नाराजी पसरली. 8 ऑगस्ट 1942 च्या चळवळीला प्रारंभ झाला.

·         चलेजाव चळवळ कारणे पुढीलप्रमाणे

(1) क्रिप्स योजनेने कोणाचेही समाधान झाले नाही.

(2) भारतीय व मंत्रिमंडळाशी चर्चा न करता भारत युध्दात सहभागी असल्याची घोषणा ग.ज. ने केली.

(3) भारतीय स्वातंत्र्य व राज्यघटना या संदर्भात युध्द समाप्तीनंतर निर्णय घेण्यात येईल.

(4) इंग्रजांविरूध्द सुभाषचंद्र बोस यांनी चळवळ सुरु केली. जपानच्या आक्रमणाची भीती वाटत असल्याने चलेजाव चळवळ सुरु केली.

 8 ऑगस्ट 1942 चा ठराव :-

·         वर्धा येथे कॉग्रेस वर्किगं कमिटिने चलेजाव ठराव 14 जूलै 1942 ला मंजूर केला.

·         त्याच आधारे मुंबईच्या गवालिया टंक मैदानावर कॉग्रेस अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर केला.

·         त्यातील तरतुद-

(1) ब्रिटिश राजवट असणे भारताला अपमानास्पद आहे.

(2) भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश व संयुक्त राष्ट्राची परिषद होणार आहे.

(3) स्वतंत्र भारत आपली सर्व शक्ती खर्च करुन हुकूमशाहीविरुध्द लढा देईल.

1942 च्या चळवळीचे स्वरूप :-

·         चळवळीची घोषणा करताच प्रमुख नेत्यांना कैद झाली. त्यामुळे समाजवादी गटांनी भूमिगत राहून आंदोलन सुरु केले.

·         संप मोर्चे हरताळ, निदर्शन, सरकारी, मालमतेचे नुकसार तसेच प्रतिसरकार स्थापन करणे इ. मार्गाने चळवळ सूरू होती.

·         अनेक शहरांमधील कामगारांनी कारखाने बंद केले. सरकारने आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार, केला.

·         त्यामध्ये नंदुबारचा विद्यार्थी शिरीषकुमार आणि त्याचे चार मित्र ठार झाले.

·         10 हजारांहून अधिक लोक ठार झाले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्यूत;राव पटवर्धन, अरूणा असफअली इ. नेत्यांनी महत्वाची कामगिरी केली.

सी. आर. फॉम्र्युला (30 जून 1944) :-

·         हिंदु मुसलमान यांच्यातील मतभेद मिटल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असे व्हॉइसरॉय र्लॉड वेव्हेल यांनी सांगितले, तेव्हा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी गांधीजींच्या संमतीने बॅ. जिनासमोर योजना मांडली.

·         तिलाच सी. आर. फॉम्र्युला किंवा राजगोपालाचारी योजना म्हणतात. त्यातील तरतुदी-

(1) हिंदुस्थानची घटना निर्माण होईपर्यंत हिंदु मुसलमान यांनी हंगामी सरकार स्थापन करावे.

(2) युध्द संपल्यानंतर मुस्लीम बहुसंख्य असलेल्या प्रांताच्या सीमा ठरविण्यासाठी कमिशन नेमावे

(3) भारतातून फुटून निघण्याच्या प्रश्नावर सार्वमत घ्यावे.

ही योजना गांधीजींना मान्य होती. परंतु बॅ. जिनांनी नाकारली.

वेव्हेल योजना (9 जून 1945) :-

·         युरोपमध्ये युध्दाची समाप्ती झाली. तरीपण जपानच्या आक्रमणाची भीती होती.

·         भारताच्या स्वातंत्र्यसंदर्भात मित्र राष्ट्रांचा चर्चिल यांच्यावर दबाब येत होता.

·         आगामी निवडणुकीत मजूर पक्ष सत्तेवर आला. तर आपली राजवट बदनाम करतील. यामुळे भारतीयांसाठी योजना जाहिर केली.

·         त्यातील तरतुद-

(1) हिंदी लोकांनी नवी राज्यघटना करावी.

(2) जपान बरोबरच्या युध्दात भारतीयांनी सहकार्य करावे.

(3) हिंदी गृहलोकांकडे परराष्ट्रीय खाते असेल सिमला संमेलन 25 जून ते 14 जूलै 1945 वेव्हेल योजना व जागा वाटप याची चर्चा करण्यासाठी सिमला येथे संमेलन आयोजित केले.

·         वेगवेगळया पक्षांचे 22 प्रतिनिधी हजर होते. कार्यकारी मंडळाच्या रचनेबाबत मतभेद झाल्याने संमेलन बरखास्त केले.

वेव्हेलची सप्टेंबर घोषणा इ.स. 1945 :-

·         इंग्लंडमध्ये जुलै 1945 ला मजूर पक्ष सत्तेवर आला.

·         पंतप्रधान अ‍ॅटलीने घोषणा केली की, भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्यात येईल.

·         त्यानुसार वेव्हेल यांनी घोषणा केली की,

(1) सर्व पक्षांची घटना समिती स्थापन करण्यात येईल.

(2) 1945 च्या हिवाळयात केंदि्रय व प्रांतिय कायदेमंडळाच्या निवडणूका घेण्यात येतील

(3) घटना समितीच्या कामकाजासाठी संस्थानिकांशी चर्चा करण्यात येईल.

सैनिकांचे बंड :-

·         भारतीय लष्कराच्या तिन्ही दलात इंग्रजांबदल विरोध होता.

·         जानेवारी 1946 मध्ये कराचीच्या विमानदलाने संप पुकारला त्याचा प्रसार लाहोर, मुंबई, दिल्ली येथे झाला. फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबईच्या नाविक दलाने उठाव केला.

·         अंबालाच्या विमानदलाने संप केला जबलपूरच्या लष्करात संप झाला. सर्व लष्करी दलात उठाव झाला.

कॅबिनेट मिशन त्रमंत्री योजना (6 में 1946) :-

·         पंतप्रधान अ‍ॅटलीने जाहिर केले की, भारताला स्वातंत्र्य दिले जाईल.

·         यासाठी सर पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर अलेक्झांडर या तीन कॅबिनेट मंत्र्यांचे मिशन नियूक्त केले, ते 20 मार्च 1946कराची येथे आले.

·         देशातील 472 नेत्यांशी चर्चा करुन 16 मे 1946 योजना जाहीर केली.

·         त्यातील तरतुदी-

(अ) भारताला लवकर स्वातंत्र्य दिले जाईल.

(ब) काँग्रेस लीग यांच्यात एकमत होत नाही,

·         तोपर्यत पुढील योजना सादर करण्यात येत आहे.

(1) ब्रिटिश प्रांत व संस्थाचे यांचे संघराज्य तयार करावे,

(2) लोकायुक्त संसद त्याचा कारभार करेल.

(3) संघराज्याची व गटराज्याची घटना बनवून दर 10 वर्षाने गरजेनुसार बदल करावे

(4) प्रशासनाच्या कामासाठी तीन विभाग

(अ) मद्रास, मुंबई, संयुक्त प्रांत बिहार, मध्ये प्रांत, ओरिसा यांचे एकूण प्रतिनिधी 187

(आ) पंजाब, सरहद्द,प्रांत, सिंधचे प्रतिनिधी 35,

(इ) बंगाल, आसामचे 70 प्रतिनिधी असावेत .

·         या योजनेत पाकिस्तानचे चित्र दिसत असल्याने लीगने मान्य केली तर कॉंग्रेसने नाकारली.

हंगामी सरकार :-

·         घटना समितीसाठी निवडणूक घेण्यात आली.

·         292 पैकी 212 जागा कॉंग्रेसला मिळाल्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीत भरले घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसार याची निवड करण्यात आली.

·         हंगामी सरकारची स्थापना 2 सप्टेंबर 1946 रोजी केली.

·         तो दिवस लीगने शोकदिन म्हणून पाळला 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून लीेगने पाळला.

र्लॉड माऊंटबॅटन योजना जून 1947 :-

·         प्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी जाहीर केले की जून 1948 पूर्वी इंग्रज आपली सज्ञ्ल्त्;ाा सोडेल.

·         र्लॉड माऊंटबॅटन याने काँग्रेस लीगच्या नेत्यांशी चर्चा करून आपली योजना जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे.

(1) हिंदुस्थानची फाळणी करुन मुसलमानांसाठी स्वतंत्र घटना समिती स्थापन करावी.

(2) बंगाल, आसाम, पंजाबाचे, विभाजन केले.

(3) आसामच्या सिल्हेट जिल्हयात सर्वमत घ्यावे,

(4) इंग्रज सरकार 15 ऑगस्ट 1947 राजी हिंदुस्थान सोडून जातील या योजनेला काँग्रेस व लीगनेही मान्यता दिली.

स्वातंत्र्याचा कायदा आणि हिंदुस्थानची फाळणी :-

·         र्लॉड बॅटन योजनेच्या आधारे ब्रिटिश पार्लमेंटने 16 जूलैला कायदा मंजूर केली. तो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता. त्यातील तरतुदी :

(1) 15 ऑगस्ट 1947 रोजी हिदुस्थानची फाळणी करुन भारत पाकिस्तान दोन देश निर्माण करणे

(2) स्वत:च्या देशाचे कायदे करण्याचा अधिकार त्यांच्या कायदेमंडळाला असेल.

(3) 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज सरकारचे सर्व अधिकार रद्द होतील.

(4) नवीन राज्यघटना तयार होईपर्यत सध्या असलेली घटना समिती दोन्ही देशांसाठी कायदे करील.

(5) संस्थानांनी कोठे सामील व्हायचे त्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.

(6) पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, संधि, वायव्य, सरहद्द प्रांत, बलुचिस्थान आसामचा सिल्हेट जिल्हा यांचा समावेश पाकिस्तानमध्ये करण्यात येईल. उरलेला प्रदेश भारतात असेल.भारतीय स्वातंत्र्याचा कायद्यानुसार 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान वेगळा झाला. त्याच रात्री 12 वाजता भारतीय पारतंत्र्य नष्ट झाले. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. हिंदुस्थानची फाळणी होऊन दोन राष्ट्र निर्माण झाली.

ब्रिटिश सत्ता व तिचे एकत्रीकरण

·         पेशवाईचा 1818 मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला.

·         आता पंजाबमधील शीख साम्राज्य संधि व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच जिंकावयाची राहिली होती.

·         बाकीच्या संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा ताबा प्रस्थापित झाला होता अ‍ॅक्हर्स्टच्या कारकिर्दीतचपासून कंपनीचे लक्ष सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले राज्य वाढविण्याकडे केंदि्रत झाले होते.

·         जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या अ‍ॅम्हर्स्ट ते डलहौसी पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे लागले.

·         र्लॉड हेस्टिंग्जनंतर र्लॉड अ‍ॅक्हर्स्ट भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्या कारकिर्दीतचत पहिले ब्रम्ही युध्द झाले.

·         या युध्दात इंग्रजांनी ब्रम्ही फौजांचा पराभव केला.

·         यांदेबूच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना आराकान व तेनासरीम हे प्रांत दिले व आपल्या फौजा असामच्या प्रदेशातुन मागे घेतल्या (1826)

सिंधवर विजय :-

·         संधि प्रांत पूर्वी मोगल साम्राज्याचा एक विभाग होता.

·         या साम्राज्याच्या पतनानंतर अफगाणांनी संधि काबीज केला.

·         अफगाणिस्तानात जेव्हा यादवी सुरु झाली त्या वेळी 1768 मध्ये बलुचिस्थानातील तालपूर जातीने तेथे आपली सत्ता स्थापन केली.

·         सिंधमध्ये तीन निरनिराळे सरदार मीरपूर व हैद्राबाद येथे राज्य करीत होते.

·         व्यापारी व लष्करीदृष्टया इंग्रजांना संधि महत्वाचा वाटत होता. त्यामुळे बेंटिकने तेथील अमीरांशी घनिष्ठ संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला .

·         त्यासाठी र्बोड ऑफ कंट्रोलचा अध्यक्षा र्लॉड एलेनबरो याने सुचविलेल्या योजनेनूसार कार्य करण्याचे त्याने ठरविले.

·         इ.स. 1830 मध्ये लेफटनंट रॉर्बट बर्न याला काही घोडे व अन्य वस्तू रणजितसिंगला भेट देण्यासाठी स्ंिाधमार्गे पंजाबला पाठविण्यात आले.

·         बर्नला असा गुप्त आदेश देण्यात आला होता, की त्याने प्रवासात सिंधच्या राजकीय व लष्करी स्थितीची पाहाणी करावी. जमल्यास अमीराशी व्यापारी करार करावा आणि आपला अहवाल गव्हर्नर जनरलकडे पाठवावा.

·         बर्नच्या योजनेमूळे रणजितसिंगच्या मनातही इंग्रजांच्या हेतुबदल अमीराप्रमाणेच शंका निर्माण झाली, कारण संधि जिंकून घेण्याची त्याचीही इच्छा होती. पंरतु रणजितस्ंिागने सिंधवर आपले वर्चस्व प्रस्थापित करावे ही गोष्ट इंग्रजांना मान्य नव्हती संधिी अमीरसुध्दा रणजितस्ंिागच्या संभाव्य आक्रमणाबदल भयभीत होते.

·         बेंटिंकने त्यांच्या भीतीचा फायदा घेऊन कच्छचा इंग्रज रेसिडेंट कर्नल पॉटीजर याला अमीराशी बोलणे करण्यासाठी पाठविले.

·         त्याने इ.स. 1832 मध्ये अमीराला कंपनीशी व्यापारी तह करण्यास भाग पाडले. या तहानुसार इंग्रज संधि मध्ये व्यापार करू शकत होते.

संधि जिंकण्यात यश (1842-1844) :-

·         वरीलप्रमाणे 1832 मध्ये र्लॉड बेंटिंकने स्ंधी च्या अमीरांशी एक व्यापारी करार केला होता आणि अमीराला कंपनीने असे आश्र्वासन दिले होते, की कंपनी आपल्या फौजा सिंधमधुन कधीही नेणार नाही.

·         इ.स. 1838 मध्ये ऑकलंडने पुन्हा संधी च्या अमीरांशी एक करार केला.

·         या करारानुसार अमीरांनी हैद्राबाद येथे इंग्रज रेसिडेंट ठेवून घेण्याचे मान्य केले.

·         पहिल्या इंग्रज अफगाण युध्दाला सुरुवात झाल्यावर इंग्रज सेनेला रणजितसिंगने आपल्या प्रदेशातून जाऊ दिले नाही.

·         त्यामूळे ऑकलंडने 1832 चा अमीरांशी झालेला करार मोडून इंग्रज सैन्य सिंधमधुन अफगाणिस्तानाकडे पाठविले.

·         एवढेच नव्हे तर युध्दाच्या खर्चासाठी त्याने संधिी अमीरांकडून 21 लक्ष रु वसूल केले.

·         त्यांनंतर 1839 मध्ये ऑकलंडने अमीरांशी पुन्हा एक नवीन तह केला त्यानुसार अमीरांनी इंग्रजांना 3 लक्ष रु वार्षिक खंडणी द्यावी संधि हैद्राबादेस इंग्रज रेसिडेंट होता.

·         त्याने 2 अमीरांबदल तार केल्यामूळे त्यांची चौकशी करण्याकरीता र्लॉड एलेनबरोने सर चार्ल्स नेपियरला सैन्यासह संधिमध्ये पाठवले.

·         9 सप्टेंबर 1842 रोजी तो कराचीत येऊन दाखल झाला.

·         त्याने अमीराविरुध्द पुरावे गोळा केले व त्याच आधारावर अमीरांनी कंपनीशी केलेला करार पाळला नाही ही सबब पुढे करुन नोव्हेंबर 1842 मध्ये त्यांच्यापूढे नेपियरने एक नवीन करार ठेवला त्यातील प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे

(1) अमीरांनी आपली स्वतंत्र नाणी पाडू नयेत.

(2) सिंधमधील शिकारपूर, सख्खर, भक्कर, ही महत्वाची ठिकाणे. कंपनीच्या ताब्यात द्यावीत.

(3) सख्खरच्या उत्तरेकडील प्रदेश बहावलपूरच्या नबाबाला द्यावा.

(4) संधिू नदीतून मुक्त संचार करण्याची इंग्रजांना परवानगी द्यावी.

(5) अमीरांनी कंपनीशी एकनिष्ठ राहावे इ. कलमे त्यात होती या कराराच्या मोबदल्यात अमीरांना तैनाती फौजेच्या खर्चासाठी जे 3 लक्ष रु द्यावे लागत होते ते माफ करण्यात आले.

·         हैद्राबादच्या परिषदेत अमीरांनी इच्छा नव्हती तरी या करारावर सहया केल्या.

·         इंग्रजांपूढे अशी शरणागती पत्करण्यास काही अमीर तयार नव्हते.

·         15 फेब्रुवारी 1843 राजी सायंकाळी पुष्कळशा बलूची लोकांनी रेसिडेंट आऊटरमच्या बंगल्यावर हल्ला चढवला, पण हल्ला होताच आऊटरम पळून गेल्यामुळे वाचला.

·         हैद्राबादच्या उत्तरेस सुमारे 10 मैलांवर मियानी येथे 20,000 बलूची सैन्य गोळा झाले होते.

·         17 फेब्रूवारी 1843 रोजी नेपियर हैद्रबादहून सैन्यासह निघाला आणि त्याने बलूची सैन्यावर हल्ला चढवला मियानी येथे घनघोर युध्द होऊन त्यात अमीरांचा पराभव झाला.

·         हैद्राबाद शहर इंग्रजांच्या ताब्यात आले. काही दिवसांनंतर पुन्हा अमीरांनी गडबड केल्याचे नेपियरला कळले अमीर हैद्राबादवर चालून आले.

·         हे वर्तमान कळताच 24 मार्च 1843 रोजी नेपियरने एकदम हल्ला करुन त्यांना पराभूत केले.

·         27 मार्च 1843 रोजी इंग्रज सेनेने मीरपूर जिंकून घेतले.

·         14 जून 1843 रोजी अमीरांचा नेता शेर मोहम्मद याचाही पाडाव करुन नेपियरने सर्व संधि इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला ऑगस्ट 1843 मध्ये एलेनबरोने संधिचे विलीनीकरण ब्रिटिश साम्राज्यात झाल्याची घोषणा केली सिंधवर विजय मिळवून देणार्‍या नेपियरलाच तेथे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.

पंजाबवर विजय :-

·         रणजितसिंगचया वाढत्या सत्तेमूळे इंग्रज जेवढे भयभीत होत, तेवढेच ते रशियाच्या संभाव्य आक्रमणला घाबरत होते.

·         या चिंतेतून मुक्त होण्यासाठी त्यांनी रणजितस्ंिागशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले.

·         या उद्देशाने प्रेरित होऊनच इंग्रजांनी रॉर्बट बर्न याला रणतिजसिगला काही वस्तू भेट देण्यासाठी लाहोरला पाठविण्यात आले.

·         एवढयाने संतुष्ट न होता गव्हर्नर जनरल र्लॉड बेंटिक याने स्वत:रणजितस्ंिागची सतलज नदीच्या काठावर रोपड येथे 27 ऑक्टोबर 1831 रोजी भेट घेतली स्नेह संबंध कायम स्वरुपाचे राहवेत हे दोघांनी मान्य केले.

·         याचवेळी रणजितसिंगने रशियन आमणाचे संकट उत्पन्न झाले तर परस्परात मैत्री कायम ठेवण्याचे आश्र्वासन दिले.

·         या भेटीती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणजितस्ंिागने कंपनीला आपल्या राज्यात व्यापार करण्याची परवानगी दिली.

·         1839 मध्ये अचानक रणजितसिह मरण पावला. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा वर्षातच इंग्रजांनी त्याचे राज्य खालसा केले.

पहिले इंग्रज शीख युध्द (1845-1846) :-

(1) युध्दाची कारणे रणजितसिंगच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याची सत्ता खालसा सैन्यातील अधिकार्‍यांच्या हाती गेली.

या खालसा सैन्याने रणजितसिंगचा अल्पवयीन मुलगा दिलीपसिंग यास गादीवर बसविले.

दिलीपसिंगची आई राणी जिंदनकौर व वजीर लालसिंह यास सैन्याचे वाढते वर्चस्व सहन होत नव्हते.

(2) सतलज नदीच्या पुर्वेकडे फिरोजपूर लुधियाना, अंबाला व मिरत येथे इंग्रज सैन्याच्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या पंजाबात जी यादवी निर्माण झाली होती.

ते लक्षात घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने आपले सैन्यात वाढ केली येथे त्यांचे 3200 सैनिक व 68 तोफा होत्या.

(3) सिंधमध्येही कंपनीने आपले सैन्य वाढवले होते, त्यामुळे मुलतान मार्गाने केव्हाही आमण करता येणार होते.

पंजाबमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे आणि शिखांकडून केव्हाही आमण होऊ शकते, म्हणून आम्हीही तयारी करीत आहोत. हा कंपनीचा दावा म्हणजे शुध्द खोटेपणा व बनवाबनवी होती.

(4) संपूर्ण भारत जिंकण्यास इंग्रज उतावीळ झाले होते. संधि त्यांनी जिंकलाचा होता.

·         आता फक्त त्यांना केवळ पंजाबच ज्ंिाकावयाचा होता. पंजाबचा समृध्द व मोक्याचा प्रदेश आपल्या ताब्यात यावा अशी त्यांची दृढ इच्छा होती.

·         इंग्रजांनी जी लष्करी तयारी केली होती ती पाहून शिखांनी असा निष्कर्ष काढला की, इंग्रज आपल्यावर निश्चित आमण करणार, त्यामुळे ते पंजाबच्या भूमीवर न होता. त्यांच्याच प्रदेशात लढले जाईल.

·         या विचाराने 11 डिसेंबर 1845 रोजी शीख सैन्याने हरिकी आणि कसूर यांच्यामधून सतलज नदी पार केली आणि हयू गफ यांच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याशी संघर्ष सुरु केला.

·         13 डिसेंबर 1845 रोजी र्लॉड हार्डिग या गव्हर्नर जनरलेने युध्द घोषण करून असे जाहीर केले की, दिलीपस्ंिागच्या राज्याचा सतलजच्या पूर्वेकडील प्रदेश इंग्रज साम्राज्यात विलीन करण्यात येत आहे.

·         या युध्दातील मुदकी, फिरोजशाह, भैरोवाल आणि अलीवाल या लढाया अनिर्णायक ठरल्या पण सुबारावची पाचवी लढाई 10 फेब्रुवारी 1846 निर्णायक ठरली व ती इंग्रजानी सैन्याचा विश्र्वासघात केला.

·         या युध्दात शीख सैन्य मोठया प्रमाणावर मारले गेले.

·         इंग्रजांनी लाहोरवर वर्चस्व प्रस्थापित केले. या वेळी शिखांना लाहोरचा तह 9 मार्च 1846 स्वीकारण्यास इंग्रजांनी भाग पाडले.

·         या तहाची कलमे

(1) सतलजच्या पूर्वेकडील प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.

(2) सतलज व बियास या नद्यांमधील प्रदेशातील सर्व किल्ले इंग्रजांना देण्यात आले.

(3) युध्ददंड म्हणून कंपनीने दीड कोटी रुपयांची मागणी केली. पण ती देणे शक्य नसल्यामूळे 50 लक्ष रु रोख देण्यात आले. व संधिू व बियासमधील पहाडी प्रदेश किल्ले, व काश्मीर व हजारा, प्रांत इंग्रजांना देण्यात आला.

(4) यापुढे दिलीपसिंग यास 20,000 पायदळ  12,000 घोडदळ एवढेच सैन्य ठेवता येतील.

(5) कंपनीच्या परवानगीशिवाय कोणत्याही युरोपियन किंवा अमेरिकनाला आपल्या सेवेत न ठेवण्याचे दिलीपसिंगने मान्य केले

(6) अल्पवयीन दिलीपस्ंिागला पंजाबचा राजा म्हणून कंपनीने मान्यता दिली. त्याची संरक्षिका म्हणुन राणी जिंदनकौर व राज्याचा वजीर म्हणून लालसिंह यांच्या नावालीही संमती दर्शविण्यात आली.

(7) हेन्री लॅरेन्सला लाहोर येथे इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले. पंजाबच्या अंतर्गत कारभारात कंपनीने हस्तक्षेप न करण्यांचे मान्य केले.

दुसरे इंग्रज शीख युध्द (1848-1849) :-

·         लाहोरच्या तहानंतर इंग्रजांनी आपल्या धोरणात बदल केल्यामुळे राणी जिंदन व लालसिंह निराश झाले.

·         त्यांना इंग्रज रेसिडेंट नियंत्रण नकोसे झाले. रेसिडेंटने लाहोर दरबारास असा आदेश दिला कि, काश्मीर गूलाबसिंहास देऊन टाकावा या आदेशाने पालन करु नये अशी सुचना लालसिंहिाने काश्मीरचा गव्हर्नर इमामउद्दीन यास दिली.

·         त्यामुळे इंग्रज सैन्याने सरळ सरळ काश्मीरचा ताबा मिळवला.

·         या घटनेची चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती तिने लालसिंहास दोषी ठरवून त्यास पंजाबमधून हद्दपार करण्यात आले.

·         लाहोरची सत्ता एका प्रतिनिधी मंडळाकडे सोपविण्यात आली.

·         11 मार्च 1846 च्या तहात ठरल्याप्रमाणे लाहोर येथे कंपनीचे सैन्य 1846 हे वर्ष संपेपर्यत थांबणार होते.

·         ती मुदत संपण्याच्या आधी 22 डिसेंबर 1846 रोजी नवीन असा भैरोवालचा तह करण्यात आला.

·         त्यानुसार राजा सज्ञान होईपर्यत त्याच्या संरक्षणासाठी व शांतता टिकवुन ठेवण्यासाठी इंग्रज सैन्य लाहोर येथे राहू देण्याचे मान्य करण्यात आले.

·         या सैन्याचा खर्च म्हणून दरवर्षी 22 लक्ष रु लाहोर दरबार देणार होते.

·         इंग्रज रेसीडेंटच्या हातात पंजाबच्या सर्व सत्तेचे केंदि्रकरण झाले. त्यास राणी ज्ंदीनकौरने आक्षेप घेतला.

·         त्यामूळे गव्हर्नर जनरलने 2 ऑगस्ट 1847 रोजी घोंषणा केली की अल्पवयीन राजाचे शिक्षण व पालनपोषण पित्याप्रमाणे करण्याची गव्हर्नर जनरलची इच्छा आहे आणि त्या दृष्टीेने राजा आणि त्याची आई यांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्याची नितांत गरज आहे.

·         या घोषणेनंतर ताबडतोब जदीनला शेखूपुरा येथे पाठविण्यात आले व तिचा वार्षिक भत्ता फक्त 48,000 रु ठेवण्यात आला.

र्लॉड डलहौसीकडून पंजाबचे विलिनीकरण :-

·         र्लॉड हार्डिगच्या जागेवर जानेवारी 1848 मध्ये डलहौसीची नियुक्ती झाली.

·         मुलतानचा गव्हर्नर मुलराज याच्या बंडामुळे इंग्रजांना पंजाबवर आक्रमण करण्याची संधी मिळाली.

·         1846 मध्ये इंग्रज रेसिडेंटच्या सूचनेवरुन

अ) मुलराजला भेटीदाखल 20 लक्ष रु चा नजराणा देण्यास सांगण्यात आले.

(ब) रावी नदीच्या उत्तरेकडील प्रदेश लाहोर दरबारला सोपविण्यास सांगण्यात आले.

(क) मुलतान प्रांताचा कर तीन वर्षासाठी 33 लाखने वाढविण्याचे ठरविण्यात आले.

·         या गोष्टी मुलराजाला मान्य नव्हत्या, म्हणून त्याने डिसेंबर 1847 मध्ये आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला.

·         त्यामूळे त्याच्या जागेवर 30,000 रु वार्षिक वेतनावर नियूक्त करण्यात आले. त्याला मदत करण्यासाठी जे दोन इंग्रज अधिकारी आले होते.

·         त्यांच्या उद्दाम वर्तनामुळे त्यांना ठार मारण्यात आले. प्रजेने जे बंड केले त्याचे नेतृत्व मुलराजला देण्यात आले. या बंडाचे लोण इतरत्रही पसरले.

·         ऑक्टोबर 1848 मध्ये डलहौसीने घोषणा केली की कोणतीही पूर्वसूचना न देता शिखांनी अकारण युध्द सुरु केले आहे. मी शपथपूर्वक सांगतो की शिखांपासून या युध्दाचा बदला घेतला जाईल.

·         16 नोव्हेंबर 1848 रोजी हयु गफ याचा शीख सैन्याशी संघर्ष् झाला.

·         त्यांच्यात झालेल्या या रामनगरच्या लढाईत कोणताही निर्णय लागला नाही, तसेच त्यांच्यात जानेवारी 1849 मध्ये झालेल्या चिलियनवाला येथील युध्दातही कोणताच निर्णय लागला नाही. त्यामूळे हयू गफच्या जागेवर चार्ल्स नेपियरची नियुक्ती करण्यात आली.

·         त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुजरात युध्दांत इंग्रजांनी शिखांचा पराभव केला हे युध्द तोफांची लढाई म्हणून प्रसिध्द आहे.

·         संपूर्ण पंजाब इंग्रजांच्या हाती आला डलहौसीने ब्रिटिश साम्राज्यात पंजाबचे विलीनीकरण करुन टाकले.

·         दिलीपसिंगला वार्षिक 50,000 रु पेन्शन देऊन उच्च शिक्षणासाठी इंग्लडला पाठविण्यात आले.

·         आयुक्तांच्या एका समितीकडे पंजाबचे प्रशासन सोपविण्यात आले.

र्लॉड डलहौसीची कारकिर्द (1848-1856) :-

·         वेलस्लीनंतर इंग्रज सत्तेची मोठी वाढ र्लॉड डलहौसीने केली. खर्‍या अर्थाने तो इंग्रजांचे साम्राज्याचा निर्माता होता.

·         तो अत्यंत कार्यक्षम व महत्वाकांक्षी गव्हर्नर जनरल होता.

·         इंग्रजांचे राज्य वाढवीत असता त्याने निती अनीतीचा फारसा विचार केला नाही. इंग्रजी साम्राज्यावादाचा तो खराखुरा प्रतिनिधी होता.

विलीनीकरणाचे तत्व :-

·         र्लॉड डलहौसी कर साम्राज्यवादी होता.

·         पंजाब व ब्रहयू युध्दांनतर त्याने आपले लक्ष अंतर भारतीय संस्थानांकडे वळविले. कारण अजूनही देशात अनेक लहान मोठी.

·         विखूरलेली होती ज्यामूळे कंपनीचे राज्य एकसंघ न राहता तुटक दिसत होते.

·         या संस्थानांना या ना त्या कारणांनी नष्ट करून भारतात कंपनीचे सामर्थ्यसंपन्न असे साम्राज्य निर्माण करण्याची डलहौसीची इच्छा होती.

·         भारतातील विविध राज्ये खालसा करण्यासाठी त्याने पुढील युक्त्या शोधून काढल्या.

(1) राजाला प्रत्यक्ष युध्दात ज्ंिाकणे

(2) दत्ताक वारस नामंजूर करणे

(3) कंपनीने पूर्वी दिलेल्या पदव्या व पेन्शन बंद करणे

(4) एखाद्या राजयकत्र्यांचा राज्यकारभार अव्यावस्थित असेल तर ते राज्य खालसा करणे

(5) तैनाती फौजेची ठरविलेली खंडणी न दिल्यास त्या राज्याचा काही मुलुख ताब्यात घेणे अशा विविध कारणांनी त्याने अनेक राज्ये ब्रिटिश साम्राज्यास जोडली.

दत्ताक वारस नामंजूर करणे :-

·         या तत्वानुसार कंपनीची सत्ता भारतात स्थापन होण्यापूर्वी जी अनेक राज्ये अस्तित्वात होती त्यांना दत्ताक वारस नामुंजुरीचे तत्व लावावयाचे नाही परंतु जी राज्ये इंग्रजांनी निर्माण केली त्यांना यात हा नियम लागू करण्याचे ठरविले.

·         पण प्रत्यक्षात र्लॉड डलहौसीने सरसकट जी संस्थाने दत्ताक नामंजुरीच्या तत्वावर खालसा केली त्यावरून असे दिसते की त्याने स्वत: केलेला नियम पाळला नाही हिंदू धर्मशास्त्रानूसार एखाद्या राजास औरस संतती नसल्यास त्याला आपला वंश चालविण्यासाठी व आई वडिलांच्या मृत्यूनंतरचे संस्कार पार पाडण्यासाठी दत्ताक पुत्र घेण्याचा विधी ज्यांना मुलबाळ नसेल असे राजे महाराजे पार पाडीत असत.

·         त्यानंतर या दत्ताक पुत्रास औरस पुत्राचे सर्व अधिकार मिळत असत.

·         पण हे तत्व डालहौसीने मान्य केले नाही तो म्हणतो की वंश चालविण्यासाठी दत्तक घेण्याची गरज असल्यास संस्थानिकांनी खुशाल दत्ताक घ्यावा आणि त्यास आपली वैयक्तीक संपत्ती द्यावी, राज्य नाही जर दत्ताक पुत्रास राज्याचा वारस करण्याचा हेतु असेल तर कंपनी सार्वभौम असल्याकारणाने दत्ताक घेण्यापूर्वी तिची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

·         तशी परवानगी न घेतल्यास सार्वभौम सत्ता या नात्याने कंपनी त्या दत्ताकाला राज्याचा वारस म्हणून मान्यता देणार नाही. या धोरणानुसार त्याने अनेक भारतीय संस्थाने खालसा केली.

·         दत्ताक नामंजुरीच्या या सिध्दान्तानुसार राज्ये खालसा -

(अ) सातारा :

·         इ.स. 1848 साली येथील राजा शहाजी भोसले याचा मृत्यू झाला.

·         त्यापूर्वी त्याचा भाऊ प्रतापसिंह याचाही मृत्यू झाला होता.

·         औरस संतती नसल्यामुळे दोघांनीही इंग्रज रेसिडेंटसमोर विधियुक्त दत्ताक विधान केलेले होते.

·         पण डलहौसीने या दत्ताक विधानास परवानगी न देता राज्य खालसा केले.

    (ब) नागपूर :

·         इ.स. 1853 मध्ये येथील राजा तिसरा राघोजी भोसले याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्व त्याने कंपनीकडे राज्यासाठी दत्ताक घेण्याची परवानगी मागितली होती ती न आल्याने राजाने मृत्यूपूर्वी यशवंतराव नावाच्या मुलास दत्ताक घेण्याची माहिती आपल्या पत्नीस कळवली होती.

·         त्यानुसार दत्ताक विधान झाले परंतू डलहौसीने या दत्ताकास परवानगी न देता राज्य लाखसा केले.

    (क) झाशी :

·         इ.स. 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर झाशीचा प्रदेश ओघाने इंग्रजाकडे आला.

·         तो प्रदेश इंग्रजांनी वंशपरंपरेने राम चंद्रराव नेवाळकर यास इ.स. 1832 मध्ये बेटिंगने राम चंद्ररावास महाराज ही पदवी दिली.

·         त्यांचा इ.स. 1835 साली मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर चुलता रघुनाथराव यास इंग्रजांनी गव्हर्नर, पण तोही निपुत्रिक मरण पावल्यामुळे गंगाधरराव हा राजा झाला.

·         इ.स. 1853 साली त्याचा मृत्यू झाला त्याने राजाने मृत्यूपूर्वी दामोदरराव नावाच्या मुलास दत्ताक घेतले होते, परंतू उलहौसीने या दतकास नकार देऊन झाशीचे राज्य खालसा केले.

·         ज्या राज्यांना औरस संतती नव्हती आणि ज्यांनी मृत्यूपूर्वी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणालाही दत्ताक घेतले नव्हते अशी अनेक लहान संस्थाने डलहौसीने खालसा केली. उदा. ओर्छा, जेतपूर, संबळपूर, उदयपूर इ.

पदव्या व पेन्शन समाप्ती:-

(अ) पेशवा :

·         इ.स. 1851 साली दुसर्‍या बाजीरावाचा मृत्यू झाला त्याने धोडोपंत र्ऊफ नानासाहेबास दत्ताक घेतले होते.

·         पित्याच्या मृत्यूनंतर आपणास त्यांची जहागीर व पेन्शन मिळावी अशी नानासाहेबांनी कंपनीकडे मागणी केली.

·         पण डलहौसीने ती मागणी अमान्य करुन जहागीर व बाजीरावास दिले जाणारे वार्षिक पेन्शन देणे बंध केले.

आ) कर्नाटक :

·         इ.स. 1853 साली नबाब गाउझखानाचा मृत्यू झाला.

·         त्याला मुलगा नसल्यामुळे मद्रास सरकारने केलेल्या शिफारशीवरून डलहौसीने नबाब पद खालसा केले.

   (इ) तंजावर :

·         तंजावरच्या शिवाजी राजांना फक्त मुली होत्या मुलगा नव्हता, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतीर तंजावर खालसा केले.

   (ई) मोगल सम्राट :

·         मोगल सम्राटाचे नामधारी पद समाप्त करण्याचे डलहौसीने ठरविले.

·         पण कंपनीच्या संचालकांनी या गोष्टीस मान्यता दिली नाही. असे असूनही डलहौसीने सम्राट बहादूरशहाच्या एका मुलास आपल्या बाजूला वळवून घेतले युवराज पद मिळविण्याच्या मोहाने या राजपुत्राने दिल्लीचा लाल किल्ला कंपनीस देण्याचे व कंपनी सांगेल तेथे जाऊन राहण्याचे आश्र्वासन डलहौसीला दिले.

अव्यवस्था व अराजकतेमुळे राज्य खालसा :-

   (अ) वर्‍हाड :

·         निजामाकडे तैनाती फौजेच्या खर्चाची बरीच बाकी थकली होती ती त्यास देणे शक्य नसल्यामुळे इंग्रजांनी 1851 मध्ये पैशांच्या मोबदल्यात वर्‍हाड व त्याच्याजवळचा काही प्रदेश निजामाकडून घेतला अशा धोरणामुळे हळूहळू कंपनीच्या राज्यातील तुटकपणा कमी होत जाऊन ते अधिक एकसंघ व एकरुप होऊ लागले.

   (आ) औंध (अवध) :

·         ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्य स्थापनेपासून हे राज्य कंपनीचे मित्र राज्य होते.

·         डलहौसी भारतात येण्याआधीच येथील नवाब उधळे व व्यसनी असल्यामूळे तेथे अराजकता निर्माण झाली होती.

·         डलहौसी आला तेव्हा ती अधिकच वाढली होती.

·         तेथील राज्यकारभारातील अराजकता थांबविण्यासाठी डलहौसीने स्लीमन व आऊटराम या रेसिडेंटांना पाठवले.

·         पण तेथील परिस्थिती नियंत्रबाहेर असल्याचे त्यांनी कळवले स्वत: डलहौसीने औध संस्थान खालसा केले.

·         तेथील नवाब वाजीद अलीशहा यास 12 लक्ष रु पेन्शन दिली.

·         औधचे संस्थान खालसा करणे म्हणजे फार मोठा अन्याय होता.

   (इ) सिक्कीम :

·         हिमालयाच्या उतारावरील व नेपाळच्या सीमेलगत असलेले हे एक स्वतंत्र राज्य होते सिक्कीमच्या राजाने तेथील इंग्रज वकिलास बंदिवान करुन दोन इंग्रज माणसांचा अपमान केला होता.

·         त्यामूळे डलहौसी चिडला व त्याने या राज्यावर स्वारी करून दार्जिलिंगचा भाग जिंकून घेतला.

भारत स्वातंत्र्याचा इतिहास

·         1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली.

·         तशातच सर्वसामान्य भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकत्र्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.

·         दुसरे महायुध्द संपता संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन क्लेमंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वा खालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले.

·         भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केला.

·         तसेच तीन ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचेही त्यांनी घोषित केले.

त्रिमंत्री योजना :-

·         मार्च 1946 मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले.

·         र्लॉड पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते.

·         भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली.

·         तिला 'त्रिमंत्री योजना' असे म्हणतात.

·         ब्रिटिशांच्या शासना खालील प्रांत व संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे, या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे, हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाइसरॉयच्या सल्ल्याने भारतीयांच्या हंगामी सरकारने करावा असे या योजनेचे स्वरूप होते.

·         या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या.

·         तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून लीगही असंतुष्ट होती.

·         यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णत: मान्य झाली नाही.

 वाढते अराजक :-

·         त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै 1946 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळाले.

·         संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरूवात केली. इतकेच नव्हे तर सनसदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस लीगने जाहिर केला.

·         या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून 16 ऑगस्ट, 1946 हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून घोषित केला.

·         लीगच्या या निर्णयानुसार 16 ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. कोलकता शहरात तर रस्तोरस्ती चकमकी झाल्या.

·         त्यात केवळ तीन दिवसांत चार हजार लोक मृत्युमुखी पडले.

·         बंगाल प्रांतातील नोआखालीच्या भागात भीषण हत्या झाल्या.

·         हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौर्‍यावर गेले.

·         जातीय दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत लोकांची मने त्यांनी शांत केली.

·         परंतु देशातील परिस्थिती चिघळतच गेली.

·         देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले.

·         देशात असुरक्षिततेचे, तणावाचे व दहशतीचे वातावरण वाढत गेले.

हंगामी सरकारची स्थापना :-

·         अशा अराजकाच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल र्लॉड वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधींचे हंगामी सरकार स्थापन केले.

·         पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वा खालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

·         सुरूवतीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास लीगने नकार दिला होता. परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये लीगचे सदस्य हंगामी सरकारमध्ये सामील झाले.

·         मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे. असा लीगचा निर्धार होता.

·         यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले. सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले.

·         देशातील वाढत्या अराजकाला व हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला.

·         'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून 1948 पूर्वी सोडून देईल', असे ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केले.

·         त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी र्लॉड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.

  माऊंटबॅटन योजना :-

·         मार्च 1947 मध्ये र्लॉड लुई माउंटबॅटन भारतात आले.

·         त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.

·         भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती. देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता.

·         परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले.

·         यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली.

·         अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :-

·         माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै, 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला.

·         15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.

स्वातंत्र्याची घोषणा :-

·         नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती.

·         मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला.

·         त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.

·         ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.

·         या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले.

·         ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत.

·         मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल.

·         या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.

·         स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता.

·         देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दु:खी होती. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते.

·         शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते.

·         भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली.

·         ही हत्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी, 1948 रोजी केली.

·         हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले.

भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले :-

·         भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 साली सुरू केले.

·         या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या.

·         संविधान समितीने तयार केलेले संविधान 26 जानेवारी, 1950 रोजी अमलात आले.

·         ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या.

·         या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली.

संस्थानांचे भारतात विलीनीकरण :-

·         भारतावरील ब्रिटिश सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात केली होती.

·         संस्थानांनी स्वतंत्र राहायचे की भारत किंवा पाकिस्तान यांपैकी एका राज्यात विलीन व्हायचे हा निर्णय त्यांनी घ्यायला होता.

·         संस्थाने स्वतंत्र राहिली तर भारत शेकडो तुकडयांत विभागला जाणार होता. देशाची एकात्मता व सुरक्षितताही धोक्यात येणार होती.

·         संस्थानी प्रजा मात्र भारतात सामील होण्यास उत्सुक होती.

·         या पेचातून त्या वेळचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला.

·         भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांनी संस्थानिकांना पटवून दिले.

·         तसेच संस्थानिकांच्या प्रतिष्ठेला व मानमरातबाला धक्का लावला जाणार नाही असे आश्वासनाही त्यांनी दिले.

·         भारत सरकारशी करार करून संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण या बाबी भारत सरकारच्या हाती सोपवाव्यात असे त्यांनी सुचवले.

·         याला संस्थानिकांनी मान्यता दिली. जूनागड, हैदराबाद व काश्मीर सोडून बहुतेक सर्व संस्थाने 15 ऑगस्ट, 1947 पूर्वी भारतात विलीन झाली.

·         जूनागडचे विलीनीकरण :-

·         जूनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते.

·         तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, तर जूनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता.

·         त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला.

·         त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये जूनागड भारतात विलीन झाले.

काश्मीरची समस्या :-

·         काश्मीर संस्थानचा राजा हरीसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते.

·         काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होतो.

·         यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले.

·         ऑक्टोबर 1947 मध्ये तर पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला.

·         तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरीसिंगाने स्वाक्षरी केली.

·         अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले.

·         या लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला.

हैदराबाद मुक्तिग्राम :-

·         हैदराबाद संस्थानातील प्रजेमध्ये लोकजागृती करण्याचे आणि तेथील नागरिकांना मूलभूत अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ यांसारख्या नेत्यांनी केले.

·         राष्ट्रीय सभेच्या चळवळीचा प्रभाव हैदराबादमधील स्वातंत्र्यप्रिय जनतेवर पडला. स्वामी रामानंड तीर्थ, गोविंदराव नानल यांसारख्यांनी पुढाकार घेऊन 1938 साली 'हैदराबाद स्टेट काँग्रेस' या संघटनेची स्थापना केली होती.

·         निजामाने सदस्यांनी सत्याग्रहाची चळवळ केली. त्यात शेकडो विद्यार्थी सामील झाले.

·         1942 च्या 'छोडो भारत' चळवळीच्या काळात तशीच चळवळ हैदराबाद संस्थानातही झाली.

·         या चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर गोविंदभाई श्रॉफ़, रामलिंग स्वामी, अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू इत्यादींनी केले.

·         भारताचे स्वातंत्र्य जसजसे जवळ येऊ लागले तसतशी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची चळवळ प्रखर होऊ लागली.

·         हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले जावे असा ठराव जुलै 1947 मध्ये या संघटनेने केला. निजामाला मात्र स्वतंत्र राहायचे होते. त्याला पाकिस्तानची फुस होती.

·         संस्थानी प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी चिरडून टाकण्यासाठी कासीम रझवी याने निजामाच्या पाठिंब्याने रझाकार संघटना उभी केली.

·         कासीम रझवी हा धर्मांत व उद्दाम होता. त्याच्या साथीदारांनी हिंदूंवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणार्‍या मुस्लिमांवरही अनन्वित अत्याचार केले.

·         रझाकारांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. प्रतिकारासाठी प्रजेनेही शस्त्र हाती घेतले.

·         रझाकारांच्या वाढत्या अत्याचारांच्या बातम्या कानी येऊ लागल्या. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले.

·         निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते; परंतु निजाम दाद देत नव्हता.

·         अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाविरुध्द पोलिस कारवाई सुरू केली. तीन दिवसांत निजाम शरण आला.

·         हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला.

भारतातून फ्रेंच व पोर्तुगीज सत्ताचे उच्चाटन :-

·         भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारताचे काही भाग फ्रान्स व पोर्तुगाल यांच्या ताब्यात होते.

·         चंदनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, याणम यांवर फ्रान्सचे, तर गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली यांवर पोर्तुगालचे आधिपत्य होते.

·         तेथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते.

·         हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत अशी मागणी भारत सरकारने केली.

·         फ्रान्सने 1949 साली चंदनगरमध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला.

·         चंदनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले.

·         त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपवले.

·          गोवा मुक्ती लढा :

·         पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.

·         पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.

·         आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.

·         पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.

·         1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.

·         2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.

·         या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.

·         1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.

·         या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.

·         मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक अग्रगण्य नेते होते. सत्याग्रहींवर पोर्तुगिजांनी अनन्वित अत्याचार केले. यामुळे भारतातील लोकमत अधिकच प्रक्षुब्ध झाले आणि लढा अधिक प्रखर झाला.

·         भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.

·         काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.

·         गोवा मुक्त झाला.

·         भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

राष्ट्रसभेची स्थापना

·         इ.स. 1885 ब्रिटिश राज्यकर्त्याकडून आपल्यावर होणार्‍या अन्यायाची दाद मिळवून घेण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगाल, इ. प्रांतांत सुशिक्षित देशप्रेमी लोकांनी अनेक संघटना स्थापन केल्या होत्या.

·         परंतु सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती.

·         ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकार्‍याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकार्‍यांचेही सहाकार्य घेतले.

·         हे इंग्रज साम्राज्याशी एकनिष्ठ होते. परंतू त्यांनी हिंदी लोकांची दु:खे त्यांची होणारी पिळवणूक व त्यातून निर्माण होणारे लोकांचे हाल या गोष्टी बारकाईने पाहिल्या होत्या .

·         हिंदी जनतेत निर्माण होणारी राष्ट्रीय भावना याची त्यांना जाणीव झाली होती.

·         या असंतोषाला दडपून न टाकता त्यास विधायक वळण देण्याची व त्यांसाठी अखिल भारतीय व्यासपीठ स्थापन करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती.

·         राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाल्याने ते 28 डिसेंबर 1885 राजी मुंबईस भरविण्यात आले. मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले.

·         उमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते.

·         सर्व हिंदुस्थानातून एकूण 72 प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

·         त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या तेलंग, दिनशा, वीर राघवाचार्य, आनंद चार्लू गंगाप्रसाद वर्मा इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

राष्ट्रसभेचे ध्येयधोरण :-

·         आपल्या अध्यक्षीय भाषणत उमेशचंद्र बॅनर्जी यांनी कॉग्रसचे ध्येय धोरण पुढीलप्रमाणे सांगितले.

(1) देशाच्या विभिन्न विभागातून आलेल्या व देशसेवा करु इच्छिणार्‍या कार्यकत्यांनी परस्पर परिचय करुन घेणे व मैत्री निर्माण करणे

(2) सर्व देशप्रेमी लोकांमधील वंशभेद, पंथभेद, प्रांतीय संकुचित भावना दुर करून त्यांच्यात राष्ट्रीय एकतेची निर्मिती करणे

(3) हिंदी जनतेच्या प्रश्नांवर विचार करुन त्याला प्रसिध्दी देणे

(4) पुढील वर्षी घ्यावयाच्या कार्यक्रर्माचा आराखडा तयार करणे.

·         वरील उदिष्ट पहिल्या अधिवेशनाची होती.

·         या अधिवेशात काही ठराव पास करण्यात आले. त्यातील प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे होते.

(1) भारताच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमावे आणि त्यात भारत व इंग्लंड या दोन्ही देशांच्या प्रतिनिध्ंिाचा समावेश असावा तसेच भारतीय प्रश्नांबाबत दोन्ही देशातील प्रतिनिधींनी त्याविषयी विचारविनिमय करावा हिंदू चे संपादक सुब्रम्हण्य अय्यर यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि फिरोजशहा मेहता व नरेंद्रनाथ सेन यांनी आपल्या भाषणात त्याचे समर्थन केले.

(2) भारतमंत्र्याचे इंडिया कौन्सिल रद्द करण्यात यावे असा ठराव चिपळूणकरांनी मांडला. वास्तविक पाहता इंडिया कौन्सिलची निर्मिती भारताच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याकरिता झाली होती. पण प्रत्यक्षात यात ते ब्रिटिश साम्राज्याचे हित मोठया प्रमाणावर पाहत असते. त्यामुळे हे ब्रिटिश धार्जिणे इंडिया कौन्सिल बंद करावे अशी भारतीय नेत्यांनी मागणी केली होती.

(3) मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात मोठया प्रमाणावर लोकनियूक्त सदस्य घ्यावेत, या विचारण्याचा अधिकार असावा. कायदेमंडळास आपले म्हणणे ब्रिटिश पार्लमेंटपूढे मांडंण्यासाठी पार्लमेंटचे एक कायमस्वरूपी मंडळ असावे.

(4) सनदी सर्वंटची परिक्षा इंग्लंडप्रमाणेच भारतातही घेण्यात यावी परीक्षेसाठी वयोमर्यादा 19 वरुन 23 वर न्यावी.

(5) लष्करी खर्च वाढवू नये वाढल्यास संरक्षक जकाती बसवून तो खर्च वसूल करावा.

(6) भारत सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी.

(7) युध्दाच्या खर्चाचा बोजा जनतेवर लादू नये.

(8) र्लॉड डफरिनने याच सुमारास उत्तर ब्रहादेशावर स्वारी केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी धोरणावर टिका करणारा ठराव संमत करण्यात आला. ब्रम्हदेशावर ताबा मिळवला तर तो देश भारतात सामील न करता एक स्वतंत्र वसाहत म्हणून ठेवावा असे फिरोजशहा मेहतांनी सुचविले.

(9) एका ठरावात असेही म्हटले होती की या पहिल्या अधिवेशात जे प्रस्ताव मंजूर झाले. असतील ते देशातील भिन्नभिन्न संस्थांतून पाठवून त्यावर कार्यवाही व्हावी.

·         कॉग्रसचे पुढील अधिवेशन 28 डिसेंबर 1886 राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले.

·         यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली.

·         वास्तविक पाहता वरील मागण्या जुन्याच होत्या पण तेव्हा त्या मागण्यांमागे संघटनेची प्रबळ शक्ती नव्हती.

·         आता ती शक्ती राष्ट्रसभेत निश्चितच होती. अर्थात राष्ट्रसभा या संघटनेमुळे मागण्या मान्य झाल्या असे नव्हे.

·         राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

भारतीय राष्ट्रीय सभेचे स्वरुप कार्यप्रणाली :-

·         भारतीय राष्ट्रीय सभेचे स्वरुप हे प्रारंभापासून लोकशाही पध्दतीचे होते.

·         या सभेची रचना संसदेप्रमाणे होती.

·         तिचे कामकाज हे चर्चा व मतदान अशा लोकशाही मार्गाने चालत असे केवळ अर्ज व विनंत्या करून म्हणजे सनदशीर मार्गाचा अवलंब करुन सरकार दाद देणार नाही अनेकांनी सुरुवातीस टीका केली.

·         परंतु भारतीय नेत्यांची लोकशाहीवरील निष्ठा, त्यावेळची परिस्थिची व सरकारी दृष्टीकोन लक्षात घेता, या पध्दतीला पर्याय नव्हता असे दिसते.

·         जनतेची गार्‍हाणी सरकारपर्यत पोहोचवण्याबरोबरच जनतेत जागृती घडवून आणणे हा प्रमुख उद्देश डोळयासमोर ठेवून राष्ट्रीय सभेचे कार्य चालू होते.

·         भारतीय जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे हे राष्ट्रीय सभेचे दुसरे वैशिष्टय होते.

·         या सभेचे ध्येय ज्याप्रमाणे राष्ट्रवादी होते, तसेच स्वरूपही राष्ट्रवादी होते.

·         राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास जे सभासद एकत्र आले होते. ते संपूर्ण भारतातून आलेले होते.

·         अधिवेशनाचे ठिकाणही दरवर्षी बदलेले जात असे. तसेच अधिवेशनाचा ज्या ठिकाणी भरत असे त्या ठिकाणचे प्रादेशिक ऐक्याबरोबरच धार्मिक ऐक्यही राष्ट्रीय सभेत होत.

·         या सभेत हिंदू मुसलमान, पारशी ख्रिस्ती या सर्वाचा समावेश होता हिंदू किंवा मुसलमान सदस्यांनी नकार दिलेला ठराव संमत होउ नये अशी तरतूद 1888 च्या अधिवेशनात करण्यात आली. वरवर पाहता ही गोष्ट लोकशाहीविरोधी वाटत असली तरी लोकशाहीचे भारतीयीकरण करताना परिस्थितीनूसार त्यात बदल करणे आवश्यक होते.

·         ए.ओ. हयूम हे राष्ट्रीय सभेचे प्रमुख संस्थापक असल्यामुळे राष्ट्रीय सभा ब्रिटिश धार्जिणी आहे.

·         असा आरोप नंतरच्या काळात करण्यात आला हयूम यांचे नेतृत्व स्वीकारणत आले होते कारण ते उदारमतवादी असून संभाव्य सहकारी टाळणे हा हेतुपण होताच.

·         जर भारतीयांनी अशी संस्था सुरु केली असती तर यांना त्या कारणाने सरकारने अडथळा आणला असता. त्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने हयूम यांचा उपयोग वीजनिरोधकासारखा झाला.

·         सुरुवातीला राष्ट्रीय सभा मूठभर सुशिक्षितांपुरती होती. असे दिसते.

·         पहिल्या अधिवेशनाप्रसंगी हयूम यांनी इंग्रजी भाषा येणार्‍यांनाच आमंत्रणे दिली त्यामूळे राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या नेत्यावंर टिका झाली.

·         परंतु राष्ट्रीय एकात्मता साधताना राजकीय नेत्यांचे संघटन ही पहिली पायरी होती.

·         लोकशाहीशी जनतेचा परिचय व्हावा व त्यांच्यात स्वदेशाभिमान जागृत व्हावा हे महत्वाचे काम सुरक्षित हिंदी नेत्यांनी राष्ट्रसभेच्या माध्यामूतन केले.

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात

·         वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमित्ताने पोर्तृगीज आले.

·         त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले.

·         या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली.

·         त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.

·         ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले याचा उहापोह या प्रकरणात केला आहे.

·         प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला.

·         र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.

युरोपियनांचे भारतात आगमन :-

·         पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे.

·         परंतु 1453 मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्‍यांचा मार्गच अडवून धरला.

·         आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्‍या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्‍या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते.

·         या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्‍या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो 1492 मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.

·         वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला.

·         या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्‍यावरील पहिले पाऊल होते.

·         1615 मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्‍यांना 100 टक्के फायदा मिळत होता. पुढे 1717साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्‍यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.

युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :-

·         ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्‍यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता.

·         पण भारतातही होणार्‍या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्‍यांशी स्पर्धा करावी लागली.

·         त्या वेळी भारतात कार्यरत असणार्‍या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली.

·         त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय.

·         भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही.

·         याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला.

·         सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला.

·         दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता, या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते.

·         इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले.

·         त्याचा परिणाम असा झाली की इ.स. 1759 मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला.

·         डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली.

·         यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.

भारतातील इंग्रज -फ्रेंच संघर्ष :-

·         व्यापार करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या, या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता.

·         भारतातील व्यापारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सज्ञ्ल्त्;ाा मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.

·         17 व्या आणि 18 व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते, त्यामुळें त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे.

·         ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचचे भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व चंद्रनगर ही उपकेंद्रे होती.

·         इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व कलकत्ता या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले होते.

पहिले कर्नाटक युध्द (1746-1748) :-

·         युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय.

·         आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी 1746 मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली.

·         डुप्लेच्या मदतीला 3000 सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला.

·         फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा 21 सष्टेंबर 1746 रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले.

·         या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता.

·         मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते.

·         शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त 18 मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही.

·         अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला.

·         कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली.

·         मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञा नवाबाने दिली.

·         त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले.

·         या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील 10,000 भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले.

·         या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले.

·         परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच 1748 पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले.

·         या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.

दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754) :-

·         कर्नाटकच्या पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली.

·         भारतीय राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला.

·         या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो, महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती.

·         ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद वारसांमूळे प्राप्त झाली.

·         हैद्राबादचा निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे 1748 मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले.

·         याच वेळी कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला.

·         या संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला.

·         एकुण डुप्लेला खूप यश मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट 1949 मध्ये अंबूर येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर 1750 मध्ये झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली.

·         कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती करण्यात आली.  

·         चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. 1751 डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.

·         परंतु लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले, अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता.

·         त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त 210 सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले.

·         राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी चंदासाहेबाने 4000 सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.

·         जून 1752 मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी झाले.

·         1754 मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द समाप्त केले.

·         जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती चांगली होती.

·         मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला.

·         30 लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्‍या कर्नाटक फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.

   तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763) :-

·         1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.

·         फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.

·         त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.

·         काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.

·         कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.

·         दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.

·         खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.

·         युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.

·         कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले. 1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

फ्रेंचांच्या भारतीय राजकारणातून झालेला अस्त :-

·         इ.स. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती.

·         पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापेटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते.

·         इ.स. 1798 मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता.

·         इ.स. 1798 मध्येच र्लॉड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.

·         भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात आणण्यास उतावीळ झाला होता.

·         टिपू सुलतान दौलतराव श्ंिादे व हैद्राबादचा निजाम यांनी कवायती सैन्य ,तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे हा उद्देश र्लॉड वेलस्लीने जाहीर केला.

·         निजामाकडे चौदा हजार  शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली.

·         टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला.

·         र्लॉड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला.

·         एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. 1803 मध्ये तेहरान येथे पाठविले.

·         डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती बेर्यडला एक फौज देऊन पाठविले परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.

·         वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला तो म्हणजे फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

भारतातील क्रांतीकारी चळवळ

·         1857 चा उठाव अयशस्वी झाल्यावर ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र संघर्षाचा मार्ग भारतीयांनी सोडून दिला.

·         भारतात राष्ट्रवाद मूळ धरू लागला होता. त्याचेच पर्यावसन म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना होय.

·         1885 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सभा सुरुवातीला नेमस्तपंथीय होती. पुढे बदलत्या परिस्थितीमुळे ती जहालवादी बनू लागली.

·         राणीच्या जाहीरनाम्यातील आश्र्वासने ब्रिटिशांनी पाळली नाहीतच, उलट भारतीय जनतेची आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली.

·         ब्रिटिशांच्या धोरणामुळेच आपला देश दरिद्री बनला हे भारतीयांना कळून चुकले.

·         ब्रिटिशांचे वर्णद्वेशाचे धोरणही भारतीयांना जाचक ठरु लागले. उच्च परीक्षा उत्तीर्ण करुनही भारतीयांना प्रशासनात घेतले जात नव्हते.

·         ब्रिटिश साम्राज्य भारतावर हजारो वर्षे चालणार अशी भाषा इंग्रज वापरत. अर्थात उन्मत राजसत्तेचे ते प्रताप होते. या सर्व अन्यायाची, अत्याचाराची हकीकत जनतेला नेत्यांकडून, वृत्तपत्रांतून कळत होती.

·         केसरी, मराठा, न्यूइंडिया, टि्रब्यून, इत्यादी वृत्तपत्रे, तसेच बंकिमचंद्र चेपाध्यय, रवींद्रनाथ टागोर, इत्यादीच्या साहित्यातून भारतीय जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते.

·         तरुण वर्ग जहालवादाकडे झुकू लागला. तरुणांचा एक गट क्रांतिकारी मार्गाकडे वळला.

·         विशेषत: एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतात दुष्काळाने व प्लेगाने प्रचंड थैमान घातले असता ब्रिटिशांनी जनतेप्रती जे सहानुभूतीशून्य धोरण अवलंबले, त्यामुळे अनेक तरुणांचे माथे भडकले.

·         जहालवादी आणि दहशतवादी क्रांतिकारी यांचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारतमातेला परकीय दास्यांच्या शृखंलेतून मुक्त करणे. मात्र त्यांच्यात साधनांची, मार्गांची तफावत होती. जहालवादी विचारसरणीत हिंसेला स्थान नव्हते.

·         केवळ ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करुन देशाचे स्वातंत्र्य मिळणार नाही. असे त्यांचे मत होते.

·         असे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्‍या दहशतवादी क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल जहालवाद्यांना सहानुभूती होती, हिसेने, पाशवी बलाने निर्माण झालेले साम्राज्य त्याच मार्गाने खुडून फेकणे शक्य आहे, नव्हे तोच मार्ग योग्य आहे अशी क्रांतिकारकांची धारणा होती. एखाद्या ब्रिटिश अधिकार्‍याला ठार मारुन मूळ प्रश्न सुटणार नाही हे क्रांतिकारकांनाही मान्य होते पण निर्माल्यवत बनलेल्या देशाला खडबडून जागे करण्यासाठी असे वध उपयुक्त ठरतील ही त्यांची श्रध्दा होती.

·         प्रखर राष्ट्रनिष्ठ व त्यांच्या विचारांचा आधार होता. म्हणूनच देशासाठी प्राणार्पण करणे, हुतात्मा बनणे, इत्यादी गोष्टी क्रांतिकारकांना अभिमानास्पद वाटत होत्या.

वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य :-

·         भारतातील क्रांतिकार्याची सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात.

·         वासुदेव बळवंताचा जन्म 1845 मध्ये झाला.

·         रेल्वे खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या ब्रिटिश नोकरशाहीशी जवळून संबंध आला.

·         ब्रिटिश प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उद्दाम, उर्मट व अपमानास्पद वागणुकीमुळे तरुण वासुदेवांचे रक्त खवळून उठले. त्यातूनच त्यांच्या मनात जाज्वल्य देशभक्तीचे स्फ़ुलिंग प्राज्वलित झाले.

·         अशा स्थितीत आपल्या आईला भेटण्यासाठी वासुदेव बळवंत फडकेंनी रजा मागितली. ती नाकारल्याने त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले.

·         त्याच क्षणी ब्रिटिशांची अत्याचारी राजवट उलथून पाडण्याचा निर्धार वासुदेव बळवंतांनी केला.

·         1857 चा संघर्ष होऊन फार कालावधी लोटला नव्हता.

·         संघर्षाच्या हकिकती ऐकून वासुदेव बळवंत रोमांचित होत.

·         ब्रिटिशांशी झुंज देणार्‍या तात्या टोपे व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता.

·         आपणही असेच काहीतरी केले पाहिजे असे फडके यांना मनोमन वाटत होते. याचा सुमारास महाराष्ट्र्रात भयंकर दुष्कार पडला. सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ लागले.

·         अशा परिस्थितीत वासुदेव बळवंत फडके ब्रिटिश राज्यकर्त्याविरुध्द भाषणे देऊन जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही.

·         या मार्गाने यश मिळत नाही असे दिसताच वासुदेव बळवंत फडक्यांनी पश्चिम महाराष्ट्र्राचा दौरा करुन, तेथील रामोशांना संघटित करण्याचे कार्य केले.

·         ब्रिटिश साम्राज्याबरोबर टक्कर द्यायची म्हणजे शस्त्रास्त्रे आवश्यक होती आणि त्यासाठी पैसा पाहिजे होता. म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी रामोशांच्या साहाय्याने धनिकांवर दरोडे टाकण्यास प्रारंभ केला. म्हणूनच काही लोक त्यांना दरोडेखोर म्हणू लागले.

·         पण हे दरोडे पोटासाठी नसून देशासाठी होते हे विसरता कामा नये. रामोशांच्या साहाय्याने तारायंत्र उद्ध्वस्त करणे.

·         तुरुंगावर हल्ले करुन कैद्याना मुक्त करणे व त्यांना आपल्या कामात घेणे, दळणवळण यंत्रणा निकामी बनवणे असे कार्य वासुदेव बळवंत फडके यांनी सुरु केले.

·         ब्रिटिश सरकारच्या मार्गात होता होईल तितके अडथळे निर्माण करणे हा त्यामागील हेतू होता. पण त्याचबरोबर वासुदेव बळवंत गोरगरिबांना मदत करत असल्याने त्यांना परमेश्र्वर मानले गेले.

·         हळूहळू त्यांच्या कार्यात महत्व सरकारच्या नजरेत आले. म्हणूनच वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी बक्षीस लावले गेले.

·         त्याला प्रत्युत्तर म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी असे जाहीर केले की, मुंबईचे गव्हर्नर रिर्चड टेंपल यांचे शीर कापून आणणार्‍यांस अधिक बक्षीस दिले जाईल.

·         अनेक दिवस प्रयत्न करुनही सरकारला वासुदेव बळवंतांचा पज्ञ्ल्त्;ाा लागला नाही. शेवटी 27 जुलै 1879 रोजी डॅनियल नावाच्या ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांना पकडण्यात यश मिळवले.

·         त्या वेळी वासुदेव बळवंत आजारी असल्याने एका मंदिरात असाहाय्य अवस्थेत होते.

·         पुण्याच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्या वेळी फार मोठा जनसमुदाय तेथे उपस्थित असे.

·         जनतेने स्वयंस्फूर्तीने वासुदेव बळवंत फडक्यांच्या सुटकेसाठी पैसा गोळा केला.

·         परंतु अखेर ब्रिटिश सरकारने वासुदेव बळवंतांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून त्यांना दूर एडनच्या तुरुंगात ठेवले.

·         तुरुंगांत वासुदेव बळवंतांचे अतोनात हाल करण्यात आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि 1883 च्या फेब्रुवारीमध्ये या महान देशभक्ताची प्राणज्योत मालवली.

कुका आंदोलन :-

·         महाराष्ट्र्रात वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकार्य केले, तसेच कार्य पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी चालवले.

·         ब्रिटिशांच्या दडपशाहीची चीड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली. आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली.

·         पण ब्रिटिशविरोध रोमरामात भिनलेल्या रामसिंह कुकांचे मन धर्मकार्यात गुंतून पडले नाही. परिणामी त्यांच्या संप्रदायाचे रुपांतर लवकरच एका क्रांतिदलात झाले.

·         ठिकठिकाणी आपले अनुयायी पाठवून रामसिंह कुकांनी जनतेत, विशेषत: सैन्यात ब्रिटिशविरोधी भावना भडकवण्याचे कार्य केले. त्याचबरोबर ठिकठिकाणाहून शस्त्रास्त्रे गोळा केली.

·         ब्रिटिश साम्राज्याविरुध्द कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांचे हे कुका आंदोलन अतिशय गुप्तपणे सुरु होते.

·         अखेर या आंदोलनाची माहिती सरकारला मिळालीच प्रचंड प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कुका आंदोलन पुर्णपणे चिरडून टाकण्यात आले.

·         कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि स्वत: रामसिंह कुकांना ब्रम्हदेशात हद्दपार करण्यात आले.

·          तेथेच 1885 मध्ये त्यांचा अंत झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य :-

·         एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात दुष्काळ व प्लेगने संपूर्ण महाराष्ट्र्राला भयभीत करुन टाकले.

·         मात्र जनता जास्त भयभीत झाली ती ब्रिटिश अधिकार्‍यांच्या दडपशाहीने.

·         प्लेगचा रोगी लपवून ठेवला जातो या कारणाखाली सरकारी कर्मचारी घराघरांत घुसून शोधकार्य करत असत. या दंडेलीतून स्त्रियांही सुटल्या नाहीत.

·         देवघरात घुसून जनतेच्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या. ब्रिटिशांची ही खबरदारी म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम असा प्रकार ठरला. परिणामी लोक संतापले.

·         या वातावरणात 22 जून 1897 रोजी पुण्याचे प्लेग अधिकारी रॅंड व आयर्स्ट यांचे खून झाले. जनतेच्या प्रक्षोभाचे ते प्रतीक होते.

·         या खुनाबद्दल दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव या चाफेकर बंधूंना सरकारने फासावर लटकवले. या घटनेने संपूर्ण देश विस्मयचकित झाला, तसा जागृतही झाला. स्वत: लोकमान्य टिळकांनी रॅड वधाचे नैतिक समर्थन केले.

·         वरील घटनेपासून स्फूर्ती घेऊन विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा नावाची संस्था स्थापन केली.

·         पुढे 1904 मध्ये या संस्थेचे नाव अभिनव भारत असे ठेवले. शास्त्राशिवाय स्वातंत्र्य नाही. अशी सावरकरांची विचारसरणी होती.

·         महाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अभिनव भारताच्या शाखा निघाल्या.

·         इटलीचा देशभक्त स्वातंत्र्यवीर मॅझिनी यांच्या चरित्राचा मराठीत अनुवाद सावरकरांनी केला.

·         मॅझिनीचे आदर्श भारतीयांसमोर ठेवावे म्हणजे त्यातून देशकार्याची प्रेरणा मिळेल, असा त्यामागे सावरकरांचा उद्देश होता.

·         1906 मध्ये सावरकर इंग्लंडला गेले व तेथून भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणे पिस्तुले काडतुसे पुरवू लागले.

·         त्यांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे वडील बंधू गणेशपंत सावरकर चालवत असत. या वेळी देशासाठी बलिदान करण्याची तयारी असलेल्या तरुणांनी महाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अनेक गुप्त संस्था चालवल्या होत्या, त्यांच्याशी अभिनव भारत संस्थेचा संर्पक होता.

·         इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य जोरात सुरु होते.

·         1907 मध्ये 1857 च्या संघर्षाला 50 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा संघर्ष म्हणजे भारतीय स्वांतत्र्य संग्राम होय. असे परखड प्रतिपादन सावरकरांनी केले.

·         1908 मध्ये लंडन येथे सावरकरांजवळून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करुन त्यांना अटक केली. त्यांना भारतात घेऊन येणारे जहाज फ्रान्सच्या मर्सेलिस बंदरात येताच सावरकरांनी सागरात उडी मारुन निसटण्याचा प्रयत्न केला.

·         त्यांच्या पाठोपाठ इंग्रज शिपायांनी सागरात उडया घेतल्या. सावरकर पोहतपोहत किनार्‍यावर आले आणि फ्रेंच शिपायांना फ्रांन्समध्ये संरक्षण मिळण्याबाबत समजावून सांगू लागले.

·         परंतु त्यांची भाषा फ्रेंच शिपायांच्या लक्षात येईना. तेवढयात इंग्रज शिपायांनी सावरकरांना पुन्हा अटक केली. भारतात आल्यावर नाशिक खटल्याबाबत त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

·         स्वातंत्र्यवीर सावरकरांचे इंग्लंडमधील क्रांतिकार्य लक्षात घेऊन त्यांच्या गणेशपंत या वडीलबंधूंवर नाशिक येथे सरकारची करडी नजर होती.

·         1908 मध्ये त्यांच्याजवळ बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली.

·         सरकारने ताबडतोब गणेशपंतांवर खटला चालवून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेखाली अंदमानात पाठवले. यामुळे नाशिकमधल्या क्रांतिकारी गटाने ब्रिटिश अधिकार्‍यांवर दहशत बसवण्याचा निश्चय केला.

·         अभिनव भारताच्या अनंत कान्हेरे नावाच्या सदस्याने नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.

·         नाशिक कटाच्या खटल्यात कान्हेरे, कर्वे व देशपांडे या नाशिकच्या क्रांतिकारकांना फाशिची शिक्षा देण्यात आली.

·         याच नाशिक खटल्यात गोवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगण्याइतका तू जगशील का? अशा अर्थाचा सवाल विचारणार्‍या तुरुंगाधिकार्‍याला सावरकरांनी बाणेदार उत्तर दिले तोवर ब्रिटिश साम्राज्य तरी टिकेल का ? सावरकर बंधूंनी स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, सावरकरांची सागरातील उडी, अंदमानच्या तुंरुंगात त्यांनी भोगलेल्या यमयातना या सर्व घटनांमुळे भारतीय जनतेत स्वातंत्र्याची जबरदस्त उर्मी निर्माण झाली.

बंगाल व इतर प्रांतांतील क्रांतिकार्य :-

·         महाराष्ट्र्राप्रमाणेच बंगालही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते.

·         स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाच्या कल्पनेने भारलेल्या तरुणांनी तेथे अनुशीलन समिती नावाची गुप्त संस्था स्थापन केली.

·         अशीच एक संस्था कलकत्ता यातही निघाली. दुष्टांचे निर्दालन करणारी कालीमाता हे या तरुणांचे दैवत होते, समितीतर्फे तरुणांना लाठयाकाठयांचे शिक्षण देण्यात येई. तरुणांमध्ये लढाऊ बाणा यावा हा त्यामागील उद्देश होता.

·         डाक्का अनुशीलन समिती  कलकत्ता अनुशीलन समिती यांच्या शाखा प्रामुख्याने बंगालमध्ये सर्वदूर पसरल्या होत्या आणि त्यांचे शेकडोंच्या संख्येने सदस्य होते.

·         अरविंद घोष यांचे बंधू वीरेंद्रकुमार घोष आणि स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंन्द्रनाथ दत्त यांचा बंगालमधील क्रांतीकार्यात महत्वाचा वाटा होता.

·         वीरेंद्रकुमार घोष यांनी युगांतर वृत्तपत्राद्वारे बंगालमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे कार्य केले. त्या वेळी बंगालमध्ये अनेक क्रांतिकारी संस्था गुप्तपणे कार्यरत होत्या.

·         र्लॉड कर्झन यांनी बंगालची फाळणी केल्यावर बंगालमध्ये असंतोषाचा प्रचंड भडका उडाला.  

·         हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी बाँब बनवण्याची कला अवगत करुन घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्याच्याजवळ बॉब तयार करण्याचे कार्य सुरु झाले.

·         या बाँबचा पहिला प्रेयोग पूर्व बंगाल प्रांताचा पहिला नायब राज्यपाल मुस्लिमांना झुकते माप देणारा जॉन बाम्फिल्ड फुल्लर याच्यावर करण्यात आला, पण त्यात यश मिळाले नाही.

·         या व्यतिरिक्त अनेक ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करण्यात आल्याने सरकार खडबडून जागे झाले. अशाच एका प्रयत्नात खुदीराम बोस पकडले जाऊन त्यांना फासावर लटकवण्यात आले. या वेळी अनेकांना पकडण्यात आले.

·         सर्वांवर अलिपूरच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. तो अलिपूर खटला या नावाने प्रसिध्द आहे.

·         या खटल्यातील सरकारी वकील आशुतोष विश्र्वास व पोलिस अधिकारी शम्स ललम या दोघांचाही न्यायालय परिसरातच हत्या करण्यात आली.

·         या खटल्याच्या निमित्ताने बंगालमधील क्रांतिकारकांच्या गुप्त कार्याची माहिती मिळाल्याने सरकार अतिशय अस्वस्थ झाले.

·         कारण क्रांतिकारकांचे गुप्त जाळे दूरवर विणले गेले होते आणि त्यांच्यामार्फ़त परदेशातही शस्त्रास्त्रे पाठवली जात होती.

·         अलिपूर खटल्यानंतर कलकत्ता याच्या अनुशीलन समितीचे कार्य बरेच थंडावले पण ढाक्का येथील अनुशीलन समितीतर्फे बंगालमधील तरुणांना देशकार्यासाठी उत्तेजित करण्याचे, शस्त्रास्त्रे निर्माण करण्याचे कार्य सुरुच होते.

·         महाराष्ट्र्र आणि बंगालप्रमाणे पंजाबमध्येही क्रांतिकार्य सुरु होते.

·         तेथील गुप्त क्रांतिकारी संस्था लाला हरदयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालत होतीया कार्याला लाला लजपतराय यांचा आशीर्वाद होता.

·         पुढे 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत गेल्यावर पंजाबमधील त्यांचे कार्य रासबिहारी बोस यांनी चालवले.

·         दक्षिण भारतात पाॅंडेचरी हेही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते. उत्तर प्रदेशातही प्रामुख्याने वाराणसी येथे क्रांतिकारकांचे कार्य सरु होते.

·         1909 मध्ये अहमदाबाद येथे व्हाईसरॉय र्लॉड मिंटो आणि त्यांची पत्नी बग्गीतून जात असता त्यांच्यावर बाँब फेकण्यात आला. त्यातून ते दोघेही बचावले.

·         1912 मध्ये व्हाईसरॉय र्लॉड हार्डिंग यांच्यावरही दिल्लीत बाँब फेकण्यात आला. त्यात हार्डिंग जखमी झाले.

भारताबाहेरील दहशतवादी चळवळ :-

·         भारताबाहेर ज्यांनी क्रांतिकार्य केले त्यात शामजी कृष्ण वर्मा यांचा महत्वाचा वाटा आहे. ते 1897 मध्ये लंडनला स्थायिक झाले.

·         परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या भारतीय तरुणांना शामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती देत.

·         या निमित्ताने देशभक्त तरुणांना एकत्र आणून राष्ट्रवादी गट तयार करणे हा त्यांचा उद्देश होता.

·         त्याद्वारे शामजी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत असत. शामजी कृष्ण वर्मा यांचे लंडनमधील घर पुढे इंडिया हाऊस म्हणून प्रसिध्द पावले. हे घर म्हणजे क्रांतिकारकाचे केंद्र होते.

·         ब्रिटिश सरकारवर टीका करणार्‍या लिखाणामुळे शामजींकडे सरकारची वृष्टी वळली. म्हणून शामजी वर्मा पॅरिसला गेले आणि तेथे क्रांतिकार्य करु लागले.

·         त्यांच्या अनुपस्थितीत लंडनचे केंद्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांभाळले. शामजी वर्मांकडून शिष्यवृत्ती घेऊन सावरकर इंग्लंडमध्ये आले होते.

·         त्यावेळी इंडिया हाऊसमध्ये क्रांतिकारकांचा जो संच निर्माण झाला, त्यांपैकी एक मदनलाल धिंग्रा होते.

·         जुलै 1909 मध्ये धिंग्रा यांनी भारतात राहिलेल्या साम्राज्यवादी मनोवृत्तीवरच्या कर्झन वायली नावाच्या इंग्रज अधिकार्‍यावर लंडन येथे गोळया झाडल्या, त्यामुळे इंग्लंड सरकार अस्वस्थ झाले.

·         भारतातील क्रांतिकार्याचे जाळे दूरवर प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजधानीतही विणले गेलेले पाहून इंग्लंड सरकार सावध झाले आणि ताबडतोब इंडिया हाऊसवर डोळे रोखले गेले कर्झन वायलीचा खून करण्याच्या आरोपाखाली मदनलाल धिंग्रा फाशी गेले.

·         सावरकरांना नाशिक खटल्यांत गुंतवून अटक करण्यात आली त्यांची रवानगी भारतात केली गेली.

·         भारताबाहेरील क्रांतिकार्यात गदर चळवळीचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ही चळवळ अमेरिकेत लाला हरदयाळ यांनी चालवली.

·         यापूर्व लालाजींनी भारतात असतांना लाहोर येथून क्रांतिकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने त्यांना यश मिळू शकले नाही.

·         म्हणून 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत आले. त्याआधीच नागपूरचे डॉ. पा. स. खानखोजे अमेरिकेत आले होते, त्यांचे संघटन लाला हरदयाळ यांनी केले.

·         लालाजींनी अमेरिकेत गदर नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्यावरुनच अमेरिकेतील क्रांतिकारी गटाचे कार्य गदर चळवळ म्हणून ओळखले जाऊ लागले.

·         या चळवळीला बर्‍याच अमेरिकनांची सहानुभूती होती.

·         अमेरिकेत कार्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी शाखाही स्थापन झालेल्या होत्या.

·         जवळच्या कॅनडातही गदर चळवळीच्या शाखा होत्या आणि शेकडो तरुण सदस्य होते.

·         पुढे ब्रिटिश सरकारचे लक्ष या कार्याकडे गेल्यावर लाला हरदयाळांना पकडण्यात आले. पण जामिनावर सुटका होऊन ते स्वित्झर्लंडमध्ये निघून गेले.

·         1914 मध्ये पहिले महायुध्द सुरु झाले तेव्हा परदेशातील क्रांतिकारकांच्या कार्यावर ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने ते शक्य झाले नाही गदर गटाने इंग्लंडच्या शत्रुशीही संर्पक साधला.

·         विशेषत: शक्तिशाली जर्मनीची मदत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी लाला हरदयाळ स्वित्झर्लंडमधून जर्मनीत आले होते.

·         त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जर्मनीने शस्त्रास्त्रे आदी मदत करण्याचे कबूल केले, त्या दृष्टीने भारतात फार मोठे कारस्थान रचले गेले जे लाहोर कट म्हणून प्रसिध्द आहे.

·         जर्मनीने भारतावर हल्ला चढवावा आणि त्याच वेळी भारतात घुसलेल्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र उठाव करावा, शिपायांनी लढयास सुरुवात करावी अशी योजना होती.

·         पण सरकारच्या सर्तकतेमुळे व फितुरी झाल्याने लाहोर कट अपयशी ठरला, याशिवाय विष्णू पिंगळे व अनेकांना जन्मठेप झाली.

·         येथूनच भारतातील क्रांतिकारी चळवळ मागे पडत गेली.

 

क्रांतिकारकचे त्यांनी केलेले क्रांतीकार्य -

 

क्रांतिकारक

क्रांतीकार्य

चाफेकर बंधू

1897 साली पुण्याचा प्लेग कमिशनररैंड याची हत्या

स्वा.वि.दा. सावरकर

1904 साली नाशिक येथे अभिनवभारत संघटनेची स्थापना

अनंत लक्ष्मण कान्हेरे

1909 साली नाशिक येथे जॅक्सनची हत्या

बारींद्रकुमार घोष

संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन

अरविंद घोष

संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन

खुदीराम घोष प्रफुल्ल चाकी

1908 साली किंग्जफोर्ड ला ठार करण्याचा प्रयत्न

रासबिहारी बोस

र्लॉड हार्डिंग्जवर बाँब फेकण्याचे घाडसी कृत्य व जपानला पलायन क्रांतिकार्य चालू ठेवले

वांची अयर

अ‍ॅश या ब्रिटिश अधिकार्‍याची हत्या

श्यामजी कृष्ण वर्मा

इंडिया हाऊसची स्थापना

मादाम कामा

जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज फडकावला

मदनलाल धिंग्रा

कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याला ठार केले.

लाला हरदयाळ, भाई परमानंद. डॉ खानखोजे

भारताबाहेर गदर पक्ष्याची स्थापना गदर पक्षात सकि्रय सहभाग

विष्णू गणेश पिंगळे

1915 साली गदर कटात सहभाग

वीरेंद्रनाथ चटटोपाध्याय, भूपेन दत्त हरदयाळ

बर्लिनमध्ये ब्रिटिशविरोधी कारवाया

महेंद्रप्रताप

काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना

चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिलागेश चटर्जी, मच्छिंद्रनाथ सन्याल, शफाक उल्लाखान, रोशनसिंग राजेंद्र लाहिरी

हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएनशची स्थापना, काकोरी कटात सहभाग

भगतसिंग, राजगुरूागतसिंग, बटुकेश्र्वर दत्त

साँडर्सची हत्या संसदेत बॉम्बस्फोट ?

सूर्य सेन, नंतसिंग गणेश घोष, कल्पना दत्त

चितगाव कटात सहभाग

प्रीतिलता वडडे्दार

ब्रिटिश अधिकार्‍यांच्या क्लबवर गोळीबार

शांती घोष चौधरी

कोमिल्लाच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटची हत्या

बीना दास

कलकत्ता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात गर्व्हनरवर गोळया झाडल्या.

 

भारतातील सुधारणा चळवळीला सुरुवात

·         एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला संपूर्ण आशिया खंड मागासलेल्या अवस्थेत होता. याउलट युरोपात क्रांतीचे युग सुरु झाले होते.

·         फ्रेंच राज्यक्रांतीपासून स्फूर्ती घेऊन युरोपातील अनेक राष्ट्रांनी मध्ययुगीन जुलमी व एकतंत्री राजवटींना आव्हान दिले होते.

·         इंग्लंडमध्ये तर 17व्या शतकाच्या अखेरीसच राजेशाहीला मर्यादित चौकट निर्माण झाली होती.

·         अठराव्या शतकाच्या उतरार्धात, इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती होऊन नव्या भौतिक संस्कृतीचा उदय झाला. या संस्कृतीच्या प्रभावामुळे मध्ययुगीन रीतीरिवाज, अंधश्रध्दा आणि भाषांतरांवरूनरामक समजूती यांना हादरा बसला.

·         मानवी जीवनाला गतिमानता प्राप्त झाली नवीन आचारमुल्ये निर्माण होऊ लागली भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित होत असतानाच धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळींना प्रारंभ झाला.

·         ब्रिटिशांनी सत्ताविस्तार करताना युरोपात ज्या शासन व्यवस्थेत सुधारणा झाल्या होत्या, त्याचा उपयोग आपल्या या वसाहतींमध्ये करुन घेण्याचे धोरण स्वीकारले, महसूल व्यवस्था, करपध्दती, शिक्षण व्यवस्था यासारख्या विविध क्षेत्रांत ब्रिटिशांनी महत्वपूर्ण बदल घडवून आणले. ब्रिटिशांची शिस्त, ज्ञानलालसा, कायद्यावरील श्रध्दा, वैज्ञानिक दृष्टीकोन इ. गुण पाहून भारतीय जनता सुरुवातीस आश्चर्यकित झाली.

·         इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षण घेण्याची उत्कट इच्छा तत्कालीन विचारवंतांना वाटू लागली भारतीय समाजात शेकडो वर्षापासून चालत आलेल्या अनिष्ट रुढी परंपरा भाषांतरांवरूनरामक समजुती धर्मभोळेपणा, वाटू लागली, या विचार प्रवाहामुळे इंग्रज हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत अशी भावना काही काळ निमार्ण झाली.

·         परंतु त्याचबरोबर भारतीय समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी नव्या वैचारिक क्रांतीची गरज आहे यांची जाणीवही विचारवंतांना झाली यातूनच भारतीय सुधारणा चळवळीला प्रारंभ झाला. यालाच भारतीय प्रबोधनाचे युग असेही म्हणतात.

·         बंगालमधील आद्य सुधारक राजा राममोहन रॅाय हे प्रबोधनाचे जनक मानले जातात.

·         त्यांनी सुरु केलेल्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचे लोण हळूहळू सर्व भारतभर पसरले या धार्मिक व सामाजिक पुनरुज्जीवनाची करणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

ब्राम्हो समाज :-

·         धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉययांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

·         विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

·         ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.

·         आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.

·         त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते.

·         हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.

·         त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता.

·         सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.

·         स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती.

·         पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.

·         संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली.

·         रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.

ब्राम्हो समाजाची स्थापना :-

·         त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.

·         हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

·         हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.

·         अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.

·         वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

·         केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.

·         म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

प्रार्थना समाज :-

·         ब्राम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने 1949 मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली.

·         1867 मध्ये केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली.

·         आत्माराम पांडुरंग 1823-1898 नावाच्या सुधारक वृत्तीवरच्या व्यक्तीने हा समाज स्थान करण्याच्या कामी पुढाकार घेतला प्रार्थना समाजपचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे होते.

·         प्रार्थना समाजातील सभासद स्वत:ला प्रार्थना समाजाचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे असे मानीत नव्हते, तर हिंदू धर्मातील एक चळवळ मानीत.

·         थोडक्यात प्रार्थना समाजाची श्रध्दा पूर्णपणे हिंदू धर्मावर होती.

·         एकेश्र्वरवादाच्या सिध्दान्ताव्यितिरिक्त समाज सुधारण हे उद्दिष्ट मानून प्रार्थना समाजाने विश्र्वासापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला.

·         मानव सेवा हीच खरी ईश्र्वराची भक्ती असे प्रार्थना समाजाचे मत होते.

·         समाज सुधारणेच्या बाबतीत प्रार्थना समाजाने आपल्या समोर चार उद्देश ठेवले.

(1)जातिभेद निर्मूलन

(2) बालविवाह प्रतिबंध,

(3) विधवा विवाह

(4) स्त्री शिक्षण ,

·         या चळवळीचे आध्यात्मिक नेतृत्व न्या. माहदेव गोविंद रानडे यांनी केले राष्ट्रीय काॅंग्रेसच्या अधिवेशनात भरवल्या जाणार्‍या समाज सुधारणा परिषदेच्या संस्थापकांपैकी न्या. रानडे हे होते.

·         प्रार्थना समाजाची शिकवणूक लोकांना कळावी व त्यावरील आक्षेप दूर व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी एकेश्र्वरी निष्ठेची कैफियत हा निबंध लिहिला.

·         रानडे यांचे असे मत होती की एखादी दुसरी सुधारणा करुन चालणार नाही तर संपूर्ण समाजच बदलावयास हवा ते म्हणतात सुधारणा अमलात आणत असताना भूतकाळाशी संबंध तोडून चालणार नाही कारण शेकडो वर्षाच्या सवयी व प्रवृज्ञ्ल्त्;ा्ीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

·         खर्‍या सुधारकाला कोर्‍या पाटीवर लिहावयाचे नाही तर अर्धवट असलेले वाक्य पूर्ण करावयाचे आहे. रानडे यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या तत्वांचा असा काही सुंदर उपयोग केला की, ही तत्वे भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरावी.

·         डॉ भांडारकरांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांची भाषांतरे केली. त्यानी आपल्या एका भाषणात परमेश्र्वर सगूण आहे हे तत्वही मान्य केलेले आढळते.

·         परमेश्र्वराची एकाग्रतेने प्रार्थना केली असता, अंत:करण शुध्द होऊन निश्चय सामर्थ्य प्राप्त होते. अशी या समाजाची विचारसरणी होती.

·         प्रार्थना समाजातील सभासद हे बुध्दी प्रामाण्यावादी होते.

·         भागवत धर्मावर त्यांची पूर्ण श्रध्दा होती. म्हणूनच संत तुकाराम व नामदेव या संतांनी सांगितलेल्या शिकवणूकीचा त्यांनी प्रचार केला ना.म.जोशी यांनी 1911 मध्ये कामगारांची स्थिती सुधारावी यासाठी सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना केली.

·         राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तयार करण्यासाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली.

·         न्या रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी व विधवा डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापन केले.

·         पंढरपूरचे अनाथ बालिकाश्रम मुलीच्या शाळा इ. संस्था प्रार्थना समाजाच्याच कार्यकर्त्यानी स्थापन केल्या होत्या जस्टिम चंदावरकर व वामन आबाजी मोडक हे देखील प्रार्थना समाजातील मान्यवर सभासद होते.

सत्सशोधक समाज :-

·         शूद्र, अतिशूद्र, यांच्या वतीने उच्च वर्णियांविरूध्द लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे ज्योतिबा हे महाराष्ट्र्राचे पहिले समाज सुधारक होते.

·         ख्रिस्ती धर्मातील समतेचे तत्व त्यांना आवडत होते तसेच मिशनर्‍यांच्या समाजसेवेबदल त्यांना आदर वाटत होता.

·         पण ज्योतिबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही त्यांना माणसामाणसांमधील जातिबंधने नष्ट करून आपल्याच धर्मात समता आणावयाची होती.

·         जातिभेदाविरुध्द आवाज उठविताना ते सामान्यांना समजेल अशा भाषेत म्हणतात, मानव प्राण्यात मूळ जातिभेद नाही.

·         पशूपक्षी वगैरे प्रत्येक प्राण्यात जर जातिभेद नाही, तर मानव प्राण्यात कोठून असणार जातिभेद व अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी झिजवली.

·         एवढेच नव्हे तर महारवाडयातील मुलांना शिकवून आपल्या घरातील हौद अस्पृष्यांसाठी खुला करुन आपल्या सेवाभावी वृत्तीवरचा आदर्श समाजासमोर उभा केला.

·         24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाज स्थापन केला या समाजाची प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती.

(1) सामाजिक विषमता व दलितांची दु:खे नाहीशी करणे

(2) समाजातील भटभिक्षुकांच्या व उच्च वर्णियांच्या जुलूमांचा प्रतिकार करणे,

(3) अज्ञानी बहुजन समाजाला ज्ञानी करुन सोडणे,

(4) मानवधर्माचे व ईश्र्वरभक्तीचे सत्य स्वरूप बहुजन समाजासमोर ठेवणे यांसारख्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी त्यांनी आयूष्यभर प्रयत्न केले.

आर्य समाज :-

·         आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद यांचा जन्म 1824 मध्ये गुजरातमधील टंकारा मध्ये झाला.

·         त्यांचे मुळ नाव मूळशंकर हे होते.

·         1846 मध्ये त्यांनी लहानपणीच घरदार सोडून संन्यास घेतला. 15 वर्षे ते सतत भटकत राहिले.

·         संस्कृतचे अध्ययन व ज्ञानप्राप्तीसाठी निरनिराळया ठिकाणी प्रवास करीत असतांना त्यांची मथुरा येथे स्वामी विरजानंद सरस्वती नावाच्या एका अंध पंडिताशी 1860 मध्ये गाठ पडली.

·         स्वामी विरजानंद यांच्याकडूनच त्यांना वेदांचा खरा अर्थ समजला व वेदांवर त्यांची गाढ श्रध्दा निर्माण झाली.

·         विरजानंदांनीच त्यांचे नाव दयानंद असे ठेवले.

·         प्राचीन वैदिक धर्म शुध्द स्वरुपात मांडण्याच्या उद्दिष्टाने त्यानी मुंबई येथे 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली.

·         गुरुच्या प्रेरणेने वैदिक धर्माच्या प्रसाराचे कार्य करण्याचा त्यांनी निर्धार केला. हे कार्य पार पाडण्यासाठी ते देशाच्या निरनिराळया भागात प्रवास करुन हिंदी व संस्कृत भाषेत प्रवचने व भाषणे करु लागले.

·         पुढे आर्य समाजाच्या शाखा देशाच्या विविध भागात स्थापन झाल्या 1877 मध्ये पंजाबातील लाहोर येथे आर्य समाजाची एक नवीन शाखा त्यांनी स्थापन केली.

·         हेच शहर पुढील काळात आर्य समाजाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले वेदांकडे परत चला ही स्वामी दयानंद सरस्वतींची घोषणा होती.

·         आर्य समाजाचे तत्वज्ञान व कार्य -

·         या समाजाचे प्रमुख तत्वज्ञान पुढीलप्रमाणे

(1) ईश्र्वर निर्गुण व निराकार आहे.

(2) या समाजास बहुदेवता वाद व मूर्तिपूजा मान्य नाही.

(3) आर्यसमाज वेद प्रामाण्यावर भर देतो

(4) मानव धर्माचे आचरण करुन मोक्ष मिळवता येतो.

(5) ईश्र्वर हा सच्चिदानंद स्वरूप आहे.

(6) आर्य समाज वेद प्रामाण्यावर भर देतो.

थिऑसॉफिकल सोसायटी :-

·         भारतीय संस्कृती आणि विचारसरणी यांचा प्रभाव पडलेल्या पाश्चात्य विद्वानांनी थिऑसॉफिकल सोसायटी स्थापन केली.

·         अमेरिकेतील न्यूर्यॉक शहरात मॅडम ब्लाव्हाटस्की (रशियन) आणि कर्नल हेन्री स्टील आलकॉट (अमेरीका) यांनी भारतात येण्याची विनंती केली असता ते 1879 मध्ये भारतात आले.

·         त्यावेळी ज्या धार्मिक व सामाजिक चळवळी भारतात चालू होत्या त्या चळवळीशी त्यांचा संबध आला.

·         ऑलकॉट हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या कार्याने फार प्रभावित झाले होते. म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या बरोबर कार्य केले.

·         ब्लाव्हाटस्की आणि ऑलकॉट या दोघांनी लोकांच्या मनावरील ख्रिश्चन धर्माचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

·         1886 मध्ये या दोघांनी मद्रासजवळ अडयार येथे थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्य कार्यालय स्थापन केले.

·         (1) आत्मिक उन्नती व आंतरज्ञानाद्वारे ईश्र्वर ज्ञान प्राप्त करणे सोसायटीच्या अनुयायांचे उद्दिष्ट होते.

·         (2) कर्मवाद आणि पुनर्जन्म यावर त्यांचा विश्र्वास होता.

·         (3) अध्यात्मिक बंधुभाव निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. अशा रीतीने थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य हिंदू धर्माला पूरक असेच होते.

·         1907 मध्ये ऑलकॉट यांच्या मृत्यूनंतर थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्षपद श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांच्याकड गेले आणि तेव्हापासून या सोसायटीचे कार्य लोकप्रिय बनले.

·         सुरुवातीपासून अ‍ॅनी बेझंटचा ख्रिश्चन धर्मावर विश्र्वास नव्हता शेवटी आपल्या ख्रिश्चन धर्म प्रचारक असलेल्या पतीशी घटस्फोट घेऊन बेझंट 1882 मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीच्या संपर्कात आल्या.

·         1891 मध्ये ब्लाव्हाटस्कीच्या मृत्यूनंतर त्या भारतात आल्या भारतीय विचार आणि संस्कृतीशी त्यांचा जवळचा संबंध होता.

·         भगवदगीतेच्या त्यांनी केलेल्या अनुवादावरुन त्यांचा वेदांतावर विश्र्वास होता हे दिसून येते. त्या जन्माने आयरिश होत्या.

·         भारताला आपली मातृभूमी व हिंदू धर्माला आपला धर्म मानून त्यांनी या देशाची फार मोठी सेवा केली.

·         भारतीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी बेझंट बाईनी धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात फार मोलाची कामगिरी बजावली.

·         बनारस येथे स्वत:चा पैसा खर्च करून स्वत:च्याच इमारतीत त्यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली पुढे हे कॉलेज त्यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या हाती सोपविले. या बाईच्या प्रभावामुळे अनेक विद्वान व उच्च वर्गीय नेते मंडळी थिऑसॉफिकल सोसायटीच्या कार्यात भाग घेऊ लागले.

·         थिऑसॉफी हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. थिऑस म्हणजे परमेश्र्वर आणि सोफिया म्हाजे ज्ञान त्यानुसार थिअ‍ॅासॉफि या शब्दाचा अर्थ ईश्र्वरीय ज्ञान असा होतो.

·         संस्कृतमध्ये याला ब्रम्हविद्या असे म्हणतात ही सोसायटी सर्व धर्म समानतेवर आणि एकेश्र्वरवादावर विश्र्वास ठेवते स्त्री पुरुष हे दोघेही समान आहेत.

·         संत महात्मे गुरु मनुष्याला निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवतात म्हणून समाजाने त्यांचा उपदेश ग्रहण करुन त्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे.

·         जगात जे काहि घडते ते ईश्र्वरी प्रेरणेनेच घडते.

·         पशुपक्ष्यांबदल दयाबुदी बाळगावी सर्वच धर्माना महत्वाचे स्थान आहे कारण प्रत्येक धर्म मनुष्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो. या गोष्टीवर या सोसायटीचा विश्र्वास होता.

·         थिऑसॉफिकल सोसायटीने शिक्षण प्रसाराचे कार्य फार मोठया प्रमाणावर केले ठिकठिकाणी त्यांनी शाळा, कॉलेज व वसतिगृहाची स्थापना केली. अ‍ॅनी बेझंटने स्वखर्चाने बनारस येथे उघडलेल्या सेंट्रल हिंदू कॉलेजचे रुपांतर पुढे बनारस हिंदू विश्र्व विद्यालयात झाले.

·         त्यांनी 1921 नंतर भारतीय राजकारणात प्रवेश करुन टिळकांना कॉग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळावा आणि जहाल मवाळ गटांचे सामीलीकरण होऊन कॉग्रेस पुन्हा प्रबळ व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश आले.

·         होमरूल लीग स्थापन पुन्हा प्रबळ व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश आले.

·         होमरूल लीग स्थापन करुन देशाला स्वायत्ता शासन मिळावे यासाठी चळवळ सुरु केली त्यामूळे 1917 मध्ये सरकारने त्यांना स्थानबध्द केले.

·         भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी केलेले कार्य फार महत्वाचे मानले जाते.

 रामकृष्ण मिशन :-

(अ) स्वामी रामकृष्ण परमहंस -

·         रामकृष्ण परमहंसाचे जिवन विचार व कार्य या गोष्टी या मिशनचा आत्मा आहे.

·         स्वामी रामकृष्णांचे मुळ नाव गदाधर चटोपाध्याय हे होते.

·         पश्चिम बंगाल हुबळी जिल्हयातील कामारपुकुर नावाच्या खेडेगावात ब्राम्हण कुटुंबात 1836 मध्ये त्यांचा जन्म झाला होता.

·         त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. अगदी लाहानपणापासून परमेश्र्वर भक्तीकडे त्यांचा ओढा होता.

·         वयाच्या 17 व्या वर्षी ते कोलकत्यास आले आणि 21 व्या वर्षी कोलकत्याजवळील दक्षिणेश्र्वराच्या कालीमंदिराचे पुजारी झाले.

·         त्यांचा विवाह झाला होता, पण आपल्या पत्नीला ते देवीच्या स्वरुपात पाहात असत. निरनिराळया स्वरुपात त्यांना परमेश्र्वरी साक्षात्कार झाला त्यांचे अधिकांश जीवन काली मंदिरातच व्यातीत झाले.

·         1886 मध्ये त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. रामकृष्णांनी कोणताही संप्रदाय किंवा मठ स्थापन केला नाही. ते लोकांना साध्या पध्दतीने उपदेश करीत.

·         राजा राममोहन रॉय व स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रमाणे त्यांनी वेदांचा अभ्यास केला नसला तरी, त्यांची वैचारिक बैठक वेदांवरच आधारलेली होती.

·         ते म्हणत असत, मनुष्याचे एकमेव ध्येय परमेश्र्वर प्राप्तीचे असेले पाहिजे ही प्राप्ती अध्यात्म वादाच्याय मार्गाने होऊ शकेल त्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही.

·         तसेच ते म्हणत संसारात राहा कार्य करा आणि इच्छांवर लगाम घालण्यापेक्षा त्या परमेश्र्वरप्राप्तीकडे वळवा.

·         ज्ञानापेक्षा चारित्र्य निर्मितीवर त्यांचा अधिक भर होता. ते म्हणत विवेक व वैराग्याशिवाय अध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही.

·         हिंदू समाजात आपल्या पवित्र धार्मिक ग्रंथांबदल श्रदधा आणि विश्र्वास त्यांनी निर्माण केला.

·         ते सर्व धर्म समान समजत. ते म्हणत व्यक्तीने धर्मातर करू नये.

·         सर्व धर्म ईश्र्वर प्राप्तीचे विविध मार्ग आहेत. त्यापैकी कोणताही मार्ग अनुसरला तरीही ईश्र्वर प्राप्ती होऊ शकेल.

सिंग सभा :-

·         आर्य समाजाच्या शाखा पंजाब प्रातांत अनेक ठिकाणी स्थापना झाल्या होत्या.

·         तेथील शीख समाजाने आर्य समाजाला प्रारंभी पाठिंबा दिला; परंतु वेदांवरील निष्ठेचा आर्य समाजाने धरलेला आग्रह त्यांना मान्य नव्हता. त्यांनी अमृतसर येथे 'सिंग सभा' नावाची संस्था स्थापना केली.

·         गुरू गोविंदसिंगांच्या शिकवणुकीचे पुनरूज्जीवन करणे व शिक्षणप्रसार करणे ही सिंग सभेची मुख्य उद्दिष्टे होती.

·         शीख समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य सिंग सभेने केले.

·         त्यासाठी अमृतसर येथे 1892 साली खालसा कॉलेज सुरू करण्यात आले.

साहित्य, कला आणि विज्ञान या क्षेत्रांतील प्रगती :-

·         सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारकांनी साहित्य आणि कला यांचा वापर केला.

·         त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा आग्रह धरला. त्यामुळे साहित्य, कला व विज्ञान या क्षेत्रांतही प्रबोधन काळात लक्षणीय बदल घडून आले.

·         प्रबोधन काळात आधुनिक भारतीय साहित्याचा उदय झाला.

·         छापखान्यांच्या उदयामुळे त्यास गती मिळाली. साहित्याच्या विषयांमध्ये फार मोठा फरक पडला.

·         पूर्वीच्या देवादिकांच्या पौराणिक कथांच्या जागी सामान्य माणसांच्या कथा आल्या. सामान्य माणसांची सुखदु:खे, त्यांच्या आशा-आकांक्षा यांना वाङ्मयात स्थान मिळू लागते.

·         अद्भुत गोष्टींच्या जागी प्रत्यक्षात घडणार्‍या वास्तव गोष्टींवर भर देण्यात आला.

·         निसर्गसौंदर्य, सामाजिक प्रश्न इत्यादी विषयांचा वाङ्मयातून प्रत्यय येऊ लागला. सामाजिक प्रश्न कादंबरीचे विषय झाले.

·         बाबा पदमनजी यांनी विधवांच्या दारूण परिस्थितीवर 'यमुनापर्यटन' ही कांदबरी लिहीली. ही मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते.

·         राष्ट्रवाद आणि देशप्रेम यावर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 'आनंदमठ' ही कांदबरी लिहीली. 'वंदे मातरम्' हे गीत त्याच कादंबरीत आहे.

·         'सरस्वतीचंद्र' ही गुजराती भाषेतील सामाजिक कांदबरी याच काळात लिहिली गेली.

·         कवितेच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल झाले.

·         केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेचा पाया घातला.

·         निसर्गसौंर्य, देशाभिमान, सामाजिक परिस्थिती, मानवी भावभावना इत्यादीचा ह्रद्यस्पर्शी आविष्कार भारतातील विविध प्रादेशिक भाषामधील कवितांमधून होऊ लागला.

·         गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांना तर जागतिक मान्यता मिळाली.

·         त्यांना साहित्याचा 'नोबेल पुरस्कार' देण्यात आला.

·         ललित साहित्याबरोबर या काळात वैचारिक लेखनाही विपुल प्रमाणात झाले.

·         निंबध हा वैचारिक साहित्याचा प्रकार रूढ झाला.

·         विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तो आपल्या 'निबंधमालेतून' मराठी वाचकांत विशेष लोकप्रिय केला.

·         विविध विषयांवरील निबंध, कथा, कविता, नाटके ही सामान्य वाचकापर्यंत पोचवण्याचे महत्वाचे कार्य प्रादेशिक भाषामधील नियतकालिकांनी केले.

·         संवाद कौमुद्री,उद्रन्तमार्तंड, दर्पण, प्रभाकर, ज्ञानप्रकाश, रास्त गोफ्तार ही त्यांपैकी काही नियतकालिके होती.

·         साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली.

·         अजिंठा शैली, मुघल व पहाडी लघुचित्रशैली यांचे पुनरूज्जीवन झाले.

·         स्थापत्य शैलीवर पाश्चात्य शैलीचा प्रभाव पडून नव्या संमिश्र शैलीचा उदय झाला.

·         मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वेस्थानक व कोलकता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल या वास्तू या संमिश्र शैलीची उल्लेखनीय उदाहरणे आहेत.

·         इंग्रजी शिक्षंणामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास भारतात होऊ लागला.

·         मुंबई, कोलकत्ता, चेन्नई येथे विद्यापीठे स्थापन झाली.

·         वैद्यकीय व तांत्रिक शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था स्थापन झाल्या.

·         पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र अशा विविध शास्त्रांच्या अभ्यासाला गती मिळाली.

मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका

·         प्रारंभीचे राष्ट्रवादी मवाळ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून साम्राज्यवादाचे केलेले विश्लेषण आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी सतत चालविलेली चळवळ होय.

·         व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेने कशी पिळवणूक केली याचे त्यांनी विश्लेषण केले.

·         भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविणे हेच ब्रिटिश वसाहतवादाचे सार आहे हे त्यांनी पक्के ओळखले.

·         केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश, ब्रिटनमध्ये तयार होणार्‍या मालाला हुकमी बाजारपेठ व परकीय भांडवल गुंतवणुकीस उत्तम क्षेत्र् असे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा जो ब्रिटिश वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा हेतू होता त्याला त्यांनी जोरदार विरोध केला.

मवाळवादी युग :-

·         काॅंग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यत मवाळवादी नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यास मवाळवादी कालखंड असे म्हणतात.

मवाळवाद्यांची कार्यपध्दत -

(1) इंग्रजांशिवाय भारताचा विकास आणि देशात शांतता सुव्यावस्था प्रस्थापित होणार नाही म्हणून मवाळवादी नेते इंग्रजांशी एकनिष्ठ होते.

(2) इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्र्वास असून ते न्यायानुसारच योग्य कार्य सुधारणा करतील. त्यांच्याकडील अर्ज, विनंत्या क्रमाक्रमाणे सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल

(3) इंग्रजांनी आपणाला क्रमाक्रमाने सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल.

राष्ट्रीय कॉग्रसचे प्रारंभीचे कार्य -

·         1885-1905 या काळात मवाळद्यांनी अनेक कार्ये करून आपली उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

(1) देशातील अनेक धर्म, प्रांत, जाती, यांच्या संदर्भात पूर्वग्रह व गैरसमज होते. ते नष्ट करून सर्वाच्यामध्ये स्नेहसंबंध निर्माण करण्याचे उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

वसाहतीच्या स्वराज्याची मागणी -

·         र्लॉड कर्झनच्या अत्याचारी धोरणामुळे आणि आयरिश नेता मि. स्मेडले यांच्या वसाहतीच्या स्वराज्य या कल्पनेनुसार 1905 च्या बनारस अधिवेशात गोखल्यांनी वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव मांडला व तशी मागणी केली

जाचक कायदे रद्दची मागणी -

·         भारतीयांवर अनेक जाचक कायदे लादले. प्रशासन व न्यायदानात भेदभाव विना चौकशी तुरुंगात ऑम्र्स अ‍ॅक्ट 1878 प्रेस अ‍ॅक्ट इ. जाचक कायदे रद्द करण्याची मागणी अमरावती अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली केली.

लोकजागृतीचे कार्य -

·         कॉग्रसने अर्ज, विनंत्या करुन जनतेची दु:खे सरकार दरबारांमध्ये मांडली. सभा ठराव लेखन या माध्यमांमधून लोकजागृतीचे कार्य केले.

सरकार विरुध्द आक्रमक पवित्रा -

·         काँग्रेस व सरकार यांचे प्रारंभीचे मैत्रीसंबंध कोलकत्या अधिवेशनानंतर राहिले नाहित कारण काँग्रेसने आक्रमक कार्यक्रमांची सुरुवात केली. इंग्रजांविरुध्द अ‍ॅटी कॉर्नली लीनच्या चळवळीप्रमाणे चळवळ सूरु करावी असे आदेश दिले.

परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य -

·         इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.

हिंदी जनतेची गार्‍हाणी मांडली -

·         भारतीयांच्या विविध क्षेत्रांतील अडचणींचा विचार करण्यासाठी रॉयल कमिशन नेमले.

·         या प्रसंगी कॉग्रेसने सरकारकडे विविध मागण्या केल्या वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य, पोलिस खात्यात व प्रशासनात सुधारणा शासकीय खर्च कपात, शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज, देशी उद्योगंधद्यांना संरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज देशी उद्योगधंद्यांना संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात वाढ, स्पर्धा परिक्षा भारतात घ्यावी व वयोमर्यादा कमी करावी.

काॅंगे्रसचे इंग्लंडमधील कार्य -

·         इंग्लंडमधील जनतेचा व संसदेचा आपल्या हक्कांना पाठिंबा मिळविण्यासाठी इंग्लंडमध्ये चळवळ सुरु केली 1887 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.

·         1889 मध्ये ब्रिटिश कमिटी ऑफ दी इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन केली.

बंगालची फाळणी :-

·         लॉर्झ कर्झन हा साम्राज्यावादी व स्वसमूह श्रेष्ठत्व सिध्दान्तांचा कट्टर पुरस्कर्ता होता.

·         1903 सर अ‍ॅन्डयू फ्रेझरने कर्झनचा आदेश मानून फाळणीची योजना तयार केली.

·         ब्रिटिश सरकारची मान्यता मिळाल्याने मे 1905 मध्ये लंडनच्या स्टॅंर्डट वर्तमानपत्राने प्रथम जाहीर केली.

·         बिहार व ओरिसा विस्ताराने मोठा प्रदेश असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी फाळणी करण्यात आली.

·         परंतु प्रत्यक्षात तेथील राष्ट्रवादी चळवळ नष्ट करणे आणि हिंदु मुसलमान यांच्यात भेदनीतीचे राजकारण करणे हाच उद्देश बंगालच्या फाळणीचा असावा.

·         पूर्व बंगाल व आसाम प्रदेश एकत्र आणि पश्चिम बंगालचा प्रदेश असे विभाजन केले.

·         फाळणी विरोधी बंगालमध्ये वंगभंग आंदोलन सुरु झाले. कोलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये प्रचंड सभा घेऊन निषेध केला.

·         सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी दि बंगाली वृत्तपत्रातून आंदोलनाचा इशारा दिला 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस राष्ट्रीय शोक दिन जाहिर करुन याच दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम केला.

·         गुरुदेव टागोर यांनी हमारा सोनार बं्गला हे काव्य रचले वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले बंगाली ऐक्याचे प्रतीक म्हणून आनंद मोहन बोस यांनी फेडरेशन हॉल चे भूमिपूजन केले.

·         फाळणी रद्द होत नाही तोपर्यत लढा चालू ठेवण्या बाबत निर्णय घेतला.

राष्ट्रीय काॅंग्रसचे कार्य :-

·         1905-1916 बंगालच्या फाळणीमुळे वंगभंग आंदोलन सुरू झाले.

·         त्या वेळी मवाळ जहाल एकत्र आले 1905 च्या बनारस अधिवेशनाच्या अध्यक्ष पदावरून गोखले यांनी र्लॉड कर्झनवर टीका करून चतु:सूत्री कार्यक्रम स्वीकारून आंदोलनाला पाठिंबा दिला.

·         1906 च्या कोलकत्ता अधिवेशनात दादाभाई नौरोजीने चतु:सुत्रीचा ठराव मंजूर केला आणि कॉग्रसमध्यील संघर्ष टाळला 1907 च्या सुरत अधिवेशनात कॉग्रसमध्ये फूट पडून जहाल-मवाळ गट झाले.

·         या फुटीचा इंग्रजांनी फायदा घेऊन जहालवादी चळवळ मोडण्यासाठी अनेक नेत्यांना शिक्षा ठोठावली 1914 ला टिळकांची सुटका झाली.

·         1916 च्या लखनौ अधिवेशनात दोन्ही गट एकत्र येऊन अखंड कॉग्रेस पुन्हा निर्माण झाली. तसेच मुस्लीम लीग व कॉग्रेस यांच्यात करार झाला त्यास लखनौ करार म्हणतात.

1909 चा मोर्ले -मिंटो सुधारणा कायदा :-

·         भारतात शांतता निर्माण करण्यासाठी सरकारने 1909 चा कायदा मंजूर केला त्याची कारणे पुढीलप्रमाणे:

(1) 1892 च्या कायाद्याने असमाधान -

·         या कायद्याने केंदि्रय व प्रांतीय कायदेमंडळात सरकारी सभासदांचे निर्णायक बहुमत होते. बिनसरकारी सभासंदांना चर्चेचा अधिकार होता. निर्णयाचा नव्हता तो मिळावा यासाठी मागणी कॉग्रेसने केली होती.

(2) कॉग्रेसचे कार्य -

·         दादाभाई नौरोजी 1893 मध्ये ब्रिटिश संसदेत निवडून गेल्यानंतर त्यांनी भारतीयांना राजकीय हक्क, सरकारी नोकर्‍या मिळाव्यात परीक्षेतील अन्याय दूर करावा. कॅनडाच्या धर्तीवर वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली.

(3) र्लॉड कर्झनची जुलमी राजवट -

·         विद्यापिठ कायदा, कॉर्पेरेशन अ‍ॅक्ट, बंगालची फाळणी इ. जूलमी धोरणाविरोधी लोकांनी आंदोलन केले.

(4) इंग्लंडमधील उदारमतवादी सरकार -

·         1906 मध्ये इंग्लंडमध्ये उदारमतवादी गटाने सरकारी सुत्रें हाती घेतली त्यांनी भारतातील दहशवाद नष्ट करण्यासाठी व मवाळवाद्यांची सहानुभुती मिळविण्यासाठी कायदा पास केला.

(5) जहालवादाचा प्रभाव कमी करणे -

·         क्रांतीकारकांनी ,खून दरोडयासारख्या दहशतवादी मार्गाचा स्वीकार केला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासठी कायदा मंजूर केला.

(6) मुस्लिमांचे राजकारण -

·         फोडा आणि झोडा नीतीचा उपयोग करुन त्यांच्यात शत्रूत्व ठेवले. 1906 साली आगाखानच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळांनी र्लॉड मिंटोची भेट घेऊन अनेक सवलतींची मागणी केली. त्यांना खुश करण्यासाठी कायदा मुजूर केला.

1909 च्या कायद्यातील तरतुदी :-

(1)भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये व ग. ज. च्या कौन्सिल मंडळात हिंदी सभासदांची नियुक्ती केली.

(2) केंदि्रय विधीमंडळाची सभासद संख्या 16 वरून 68 एवढी करण्यात आली. त्यामध्ये सरकारी 36  बिनसरकारी 32 सभासद होते.

(3) प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला.

(4) जातीय तत्वावर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.

(5) अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीचा उपयोग. भारतमंत्री मोर्ले म्हणतात. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे.

पहिले महायुध्द -राष्ट्रीय चळवळ :-

·         1914 -1918 या काळात पहिले महायुध्द झाले.

·         स्वातंत्र्य व लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि युध्द कायम नष्ट करणे या हेतूने आपण लढत आहोत असे मित्र राष्ट्रांनी जाहीर केले.

·         अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 मुदे जाहीर केले.

·         पारतंत्र देशाबाबतचे स्वयंनिर्णायाचे तत्व त्यामध्ये होते.

·         या दोस्त राष्ट्राच्या भूमिकेत भारतीय राष्ट्रवादी चळवळीला आशादायक प्रेरणा मिळाली याचा भारतीय राजकारणावर परिणाम दिसून आला.

·         इंग्रजांनी भारताची सहमती न घेता युध्दात खेचले 10 लाख भारतीय सैनिक युध्दात सहभागी करण्यात आले पैकी 1 लाख सैनिक युध्दात कामी आले 12.7 कोटी पौंड यूध्दखर्च भारतावर पडला 30 % कर्ज वाढले.

·         भारतीयांत नाराजी निर्माण झाली. याचवेळी इंग्रज अडचणीत असल्याने त्यांच्याकडून अनेक राजकीय मागण्या करण्यात आल्या त्याला चेंबरलेनने नकार दिला.

·         त्यामुळे लो.टिळक, डॉ बेझंट यांनी होमरुल चळवळ सुरु केली.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे कार्य :-

·         गोपाळ कृष्ण गोखले याचा जन्म रत्नागिरी जिल्हयातील कोतलुंक गावी 9 में 1866 रोजी झाला.

·         प्राथमिक शिक्षण कागल, माध्यमिक शिक्षण कोल्हापूर, उच्च शिक्षण पूणे व मुंबई,येथे झाले.

·         फ़र्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यपक, प्राचार्य म्हणून कार्य केले.

·         1887 मध्ये न्या रानडे यांच्याशी संबंध येऊन देशसेवेच्या कार्याकडे वळले.

·         1890 मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. या सभेच्या वतीने चालविण्यात येणार्‍या त्रैमासिकाचे संपादक झाले तसे सुधारक वृत्तपत्राचे सहसंपादक म्हणून काम केले.

·         भारतातील अर्थव्यवहाराच्या चौकशीसाठी 1896 मध्ये वेल्बी कमिशन नेमले होते.

·         त्यांच्या समोरील त्यांची साक्ष फार गाजली इंग्रज सरकार भारतीयांचे कसे व किती आर्थिक शोषण करते याची पुराव्यासह साक्ष दिली.

·         मुंबई प्रांताच्या कौन्सिलवर 1899 मध्ये निवडून आले.

·         1902 मध्ये व्हाईसरॉय इंपिरियल कौन्सिलवर त्याची निवड झाली.

·         केंदि्रय अर्थसंकल्पावरील त्यांची 12 भाषणे गाजली त्यांनी भारताच्या राजकीय आर्थिक शैक्षणिक शेती, उद्योग, आयात-निर्यात, लष्करी, खर्च इत्यादींवर अभ्यासपूर्ण मते मांडली या संदर्भात सरकारकडे मागण्याही केल्या. र्लॉड कर्झनही गोखल्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते.

·         1904 मध्ये भारत सेवक संघ नावाची संघटना स्थापन केली.

·         साम्राज्यांतर्गत स्वराज्य व देशबांधवांची उन्नती हे या संस्थेचे प्रमुख ध्येय होते. समाजसेवा सहकार, समाज शिक्षण, दु:ख निवारण, राजकीय जागृती, या साधनांमार्गे देशाची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला1909 च्या मोर्ले मिंटो सुधारणांच्या स्वरूपात त्याचा मोठा सहभाग होता. इंग्लंडला जाऊन भारतमंत्र्याशी भारताच्या प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा केली.

·         आफ़्रिकेत गोर्‍यांच्या विरुध्द आंदोलनात सहभाग घेतला. तेव्हाच गांधीजींनी त्यांना आपले राजकीय गुरु मानले.

·         19 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांचे निधन झाले.

मवाळ राष्ट्रवादी नेत्यांची उद्दिष्टे आणि कार्यपध्दती -

·         नागरी स्वातंत्र्य, स्वतंत्र वृत्तपत्रे, लोकशाहीनिष्ठ आणि वर्णभेद नसलेले प्रशासन हयांसाठी प्रारंभीच्या राष्ट्रवाद्यांनी सतत लढा दिला.

·         किंबहुना याच काळात राष्ट्रवाद्यांनी केलेल्या राजकीय प्रबोधनामुळे भारतीय जनतेत व विशेषत: बुध्दिमंतांना लोकशाहीची संकल्पना रुजू लागली.

·         आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञान जनतेत व विशेषत: बुध्दिमंतांत लोकशाहीची संकल्पना रुजू लागली.

·         आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा प्रसार व्हा म्हणूनही मवाळ विचारांचे नेते झटले.

·         प्रारंभीच्या काळातील राष्ट्रवाद्यांच्या चळवळीचा पाया अरुंद होता की एक उणीव होती. त्यावेळी या चळवळीला मोठया प्रमाणात प्रतिशाद नव्हते.

·         मवाळांचे राजकीय पबोधन कार्य शहरांती शिक्षित मध्यमवर्गीयांपुरते मर्यादित राहिले, मात्र त्याची धोरणे व कार्यक्रम मध्यवर्गीयापुरते मर्यादित नव्हते.

·         समाजाच्या सर्व वर्गातील लोकांच्या गर्‍हाण्यांची त्यांनी दखल घेतली व वसाहतवादाच्या वर्चस्वाविरुध्द उभरत्या भारतीय राष्ट्राच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व केले.

·         कोणतीही चळवळ घटनात्मक मार्गानी आणि कायद्यांच्या चौकटीत राहूनच करावयास हवी, असा मवाळांचा कटाक्ष होता म्हणूनच जाहीर सभा आणि वृत्तपत्रे यांवरच त्यांचा भर होता. अतिशय काळजीपूर्वक तयार केलेली अनेक निवेदने व अर्ज त्यांनी सरकारला पाठविले.

·         वरवर पाहता ही जरी सरकारला पाठविलेली निवेदने व अर्ज असले तरी त्याचे मूळ उद्दिष्ट जनतेला शिक्षित करणे व राजकीय प्रश्नांबाबत जागृत करणे हेच होते.

·         उदाहरणार्थ 1891 मध्ये न्या. मू. रानडयांनी गोपाळ कृष्ण गोखल्यांना सांगितले की, आपल्या देशाच्या इतिहासात आपले स्थान कोणते हयाची तुम्हाला कल्पना नाही, ही निवेदने सरकारला उद्देशून असली तरी ती नाममात्र आहेत.

·         वस्तुत ती जनतेला उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांच्याद्वारेच हया प्रश्नावर कसा विचार करावयाचा ते त्यांना कळून येईल. कारण हया प्रकारचे राजकारण हया देशाला सर्वस्वी नवे आहे.

·         हे राष्ट्रवादी राजकीयदृष्टया मवाळ असले तरी अधिकारी आणि ब्रिटिश राजकीय नेते त्यांना राजद्रोही आणि बंडखोर मानीत.

·         व्हाईसरॉय र्लॉड कर्झन तर इसवी सन 1900 मध्ये म्हणाला होता की, काँग्रेस नष्ट करण्यात माझा हातभार लागावा अशी माझी महत्वाकांक्षा आहे. कारण अगदी अल्प प्रमाणात का होईना पण मवाळांनीच देशात साम्राज्यविरोधी जागृती केली होती.

·         साम्राज्यवादाचे त्यांनी आर्थिकदृष्टया जे प्रभावी विश्लेषण केले त्यातूनच पुढे ब्रिटिश वसाहतवादाविरुध्द जनतेची क्रियाशील चळवळ सुरु झाली.

·         आपल्या आर्थिक लढयाद्वारा त्यांनी ब्रिटिश सत्तेचे जे क्रर व शोषक स्वरूप स्पष्ट केले त्यामुळे या सत्तेचा नैमिक पायाच ढासळला. शिवाय मवाळ पक्षियांचा भर धार्मिक किंवा भावनिक आवाहनापेक्षा प्रत्यक्ष अभ्यास आणि जनतेला दररोज ज्या दिव्यांतून जावे लागते त्याचे परखड विश्लेषण हयांवर होता.

·         राष्ट्रीय चळवळीसाठी असा भक्कम पाया तयार केल्यावरच राष्ट्रव्यापी आंदोलन करावे, असा त्यांचा मानस होता व पूढे अशी राष्ट्रव्यापी चळवळ झालीही.

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

·         इ.स. 1857 साली राष्ट्रसभेची स्थापना झाली असली तरी त्या आधी बंगाल, मुबई, मद्रास येथे सामाजिक आणि राजकीय प्रश्नावंर विचार करण्यासाठी ज्या विविध संस्था निर्माण णाल्या त्यांचा वृत्तांत पुढीलप्रमाणे :

जमीनदारांची संघटना :-

·         इ. स. 1837 मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन लॅंड होल्डर्स असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केली.

·         राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते.

·         त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला त्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती.

·         त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंगलंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशही सहकार्य करण्यात आले.

ब्रिटिश इंडियन असोसिएशन :-

·         या संस्थेची स्थापना इ.स. 1851 मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली.

·         या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेस झाला.

·         या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.

·         ब्रिटिश इंडियन असोसिएशने पुढील महत्वाच्या मागण्या केल्या

·         (अ) भारतीयांचे हित व काटकसर यासाठी सर्व सनदी संवा समतेच्या तत्वावर खुल्या कराव्यात

·         (ब) सर्वोच्च न्यायालय व ग्रामीण न्यायालय येथे ज्यूरी पध्दत सूरू करावी

·         (क) न्याससत्तेवर येणार्‍या मर्यादा दुर करण्यासाठी न्यायसत्ता व कार्यकारी सत्ता यांचे विभाजन करण्यात यावे

·         (ड) प्रत्येक प्रांतात सरकार नियूक्त व लोक निर्वाचित सदस्यांचे प्रातिनिधिक मंडळ असावे, तसेच या दोन्ही सदस्यांची संख्या सारखी असावी आणि लोकनिर्वाचित सदस्य हे प्रत्येक जिल्हयातून निवडून आलेले असावेत अशा महत्त्वाच्या मागण्या काळाच्या ओघात करण्यात आल्या होत्या हि संघटना फक्त वरच्या वर्गाचेच हित पाहते असा आरोप या संघटनेवर होऊ लागला. त्यामुळे हळूहळू या संघटनेचे महत्व कमी कमी होत गेले.

ईस्ट इंंडिया असोसिएशन :-

·         इ.स. 1865 साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी लंडन इंडियन सोसायटी ची स्थापना केली.

·         एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर ईस्ट इंडिया असोसिएशन मध्ये झाले.

·         ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते.

·         इ.स. मध्ये मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या त्या इ. स. 1884 पर्यत जोमाने कार्य करीत होत्या पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.

 पुणे सार्वजनिक सभा :-

·         न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी र्ऊफ सार्वजनिक काका यांनी पुण्यात इ.स. 1870साली सार्वजनिक सभेची स्थापना केली.

·         इ.स. 1871 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यातील सार्वजनिक व्यवस्था योग्य लागावी एवढाच संकुचित होता.

·         न्यायमूर्ती रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले.

·         र्लॉड लिटन या साम्राज्यावादी व्हाईसरॉयने इ.स. 1877 च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला हिंदुस्थानची सम्राज्याज्ञी अशी पदवी अर्पण केली.

·         या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले.

·         मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या.

·         तसेच या निमित्तने जमलेल्या सर्व प्रांतील लोकप्रतिनि धीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.

मद्रास महाजन सभा :-

·         मद्रासमध्ये 1884 साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी महाजन सभा नावाची संस्था केली होती.

·         स्थानिक संस्थांच्या जानेवारी 1885 मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.

इंडियन असोसिएशन :-

·         26 जुलै 1875 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली.

·         मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती.

·         या संस्थेच्या वतीने डिसेंबर 1883 मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.

·         या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली.

·         सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या इ.स. 1884 च्या शेवटी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना हयूम यांनी केली.

·         हिंदुस्थानचे संघटन करणे नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने हिंदुस्थानचा विकास साधणे हिंदुस्थानचे संघटन करणे नैतिक जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.

राष्ट्रीय चळवळीचा सुरुवातीचा काळ

·         1857 च्या स्वातंत्र्ययुध्दातील पराभवाने हे स्पष्ट झाले की जुनाट दृष्टिकोन आणि सामाजिक शक्ती यांच्या आधारावर केलेले उठाव आधुनिक साम्राज्यवादाचा पराभव करण्यास असमर्थ आहेत.

·         त्यासाठी नव्या सामाजिक शक्ती, नव्या विचारसरणी, आधुनिक साम्राज्यवादाच्या योग्य आकलनावद आधारलेली आणि राष्ट्रव्यापी राजकीय कार्यासाठी जनतेला संघटित करु शकणारी आधुनिक राजकीय चळचळच आवश्यक होती.

·         अशी चळवळ 19 व्या शतकाच्या द्वितीयार्धात राष्ट्रवादी बुध्दिमतांनी प्रथम सुरु केली. पण या चळचळीचा सामाजिक पाया अगदीच अरुंद होता.

·         मात्र ती नव्या राजकीय विचारप्रणाली, वास्तव परिस्थितीचे नवे आकलन आणि नव्या सामाजिक, आर्थिक व राजकीय उद्दिष्टांमुळे प्रेरित झाली होती.

·         नव्या प्रकारच्या शक्ती व संघर्षाचे प्रकार, नेतृत्व करणारा नवा वर्ग आणि राजकीय संघटनेच्या नव्या तंत्राचे त्याद्वारा दर्शन झाले.

·         या राजकीय चळवळीचा उदय होण्यास अनेक कारणे घडली. पण सर्वात महत्वाचा घटक म्हणजे भारतीय जनतेचे हितसंबंध आणि ब्रिटिश सत्तेचे हितसंबंध यामागील विरोध अधिकाधिक स्पष्ट होत गेला.

·         या विरोधामुळेच भारतीय अर्थव्यवस्था व समाज अधिकाधिक प्रमाणात अविकसित होत चालला होता.

·         त्यामुळे भारतीय आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बौध्दिक आणि राजकीय विकास अडून राहिला होता. संघटित राष्ट्रवादाचा उदय होण्यास कोणत्या शक्ती कारणीभूत झाल्या त्याचा आता थोडक्यात आढावा घेऊ.

बुध्दिवंतांची भूमिका :-

·         प्रारंभी आधुनिक भारतीय विचारवंतांना या प्रक्रियेचे अकलन झाले. मात्र अंतर्विरोध असा की 19 व्या शतकाच्या प्रथमार्धात याच विचारवंताचा वासाहतिक राज्याबद्दलचा दृष्टिकोन अनुकूल स्वरुपाचा होता.

·         त्यांची अशी धारणा होती की भारतीय समाजाची पुर्नरचना ब्रिटिश अंमलाखालीच होऊ शकेल, कारण त्या काळात ब्रिटन हाच सर्वात पुढाकारलेला देश होता.

·         पूर्वापार मागासलेपणातून वर येण्यास ब्रिटिश भारताला मदत करतील, अशी त्यांना आशा वाटे.

·         आधुनिक उद्योगधंदे व भारताचा आर्थिक विकास याबद्दल विचारवंतांना मोठा आकर्षण होते. त्यांना अशी आशा

·         होती की ब्रिटन भारताचे औद्योगिकरण करील व येथे आधुनिक भांडवलशाही प्रस्थापित करील.

·         लोकशाही, नागरी स्वातंत्र्य आणि जनतेचे सार्वभौमत्व यावर ब्रिटनची श्रध्दा असल्याने ते भारतात विज्ञान व तंत्रज्ञम्प्;

·         ाान नव्याने आणतील, त्याद्वारा येथील जनतेची सांस्कृतिक व सामाजिक उन्नती होईल, असा त्याचा विश्र्वास होता.

·         भारताचे ऐक्य साकार होत होते हे आणखी एक अकर्षण होते. परिणामी हा वर्ग 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात देखील ब्रिटिश सत्तेच्या पाठीशी राहिला.

·         ब्रिटिशांची येथील सत्ता हा ज्ञानेश्र्वरी संकेतार्थ; आहे, असे ते मानू लागले.

·         19 व्या शतकाच्या द्वितीयार्धात मात्र या विचारवंतांचा भाषांतरांवरूनरमनिरास झाला कारण प्रत्यक्ष अनुभवांती त्यांना कळून चुकले की, त्याच्या आशा व्यर्थ होत्या.

·         ब्रिटिश सत्तेचे स्वरुप आणि गुणविशेष याबद्दल त्यांनी जे आडाखे बांधले होते ते चुकीचे निघाले. या बुध्दिमंतांच्या लक्षात आले की ब्रिटिश वसाहतवाद भारतीय अर्थव्यवस्थेचे विघटन करीत असून आधुनिक पध्दतीची कारखानदारी आणि शेती येथे निर्माण होण्यास प्रतिबंध करीत आहे.

·         लोेकशाही आणि स्वातंत्र्य यांना चालना देण्याऐवजी ब्रिटिशांची एकतंत्री सत्ताच कशी उपकारक आहे, हयाचे गोडवे गाण्यात येत आहेत.

·         ब्रिटिशांनी जनतेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले, नागरी स्वातंत्र्यावर बंधने घातली व 'फोडा व राज्य करा' हे धोरण ठेवले.

·         अशा परिस्थितीत या विचारवंतांकडून कसली अपेक्षा होती, हळूहळू या बुध्दिमंतवर्गाने राजकीय शिक्षणासाठी व देशात राजकीय कार्य सुरु करण्यासाठी राजकीय संस्था निर्माण केल्या.

·         भारतात राजकीय सुधारणा व्हाव्यात म्हणून चळवळ सुरु करणारे पहिले नेते म्हणजे राजा राममोहन रॉय.

·         जनतेच्या हिसंबंधाच्या संवर्धनासाठी 1840 ते 1850  1850 ते 1860 दरम्यान 'बेंगाल ब्रिटिश इंडियन सोसायटी' व इतर संस्था स्थापन करण्यात आल्या पण या संस्था स्थानिक स्वरुपाच्या होत्या आणि त्यांच्यावर श्रीमंत व वरिष्ठ वर्गीयांचे वर्चस्व होते.

·         नंतर 1870 ते 1880 दरम्यान मात्र केवळ राजकीय स्वरुपाच्या व मध्यमवर्गाचा आधार असलेल्या सार्वजनिक सभा पुणे (महाराष्ट्र), इंडियन असोशिएशन (बंगाल), महाजन सभा (मद्रास) आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन यासारख्या संस्था देशात सर्वत्र निर्माण झाल्या.

वासाहतिक राज्याची भूमिका :-

·         इसवी सन 1876 ते 1880 पर्यंत लिटनच्या व्हाईसरॉयपदाच्या कारकिर्दीतचत जे प्रतिगामी धोरण अवलंबिण्यात आले त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाची झपाटयाने प्रगती झाली. लिटनच्या प्रतिगामी धोरणांची काही उदाहरणे अशी

* इसवी सन 1878 च्या शस्त्रविषयक कायद्याच्या एका फटकार्‍याने सार्‍या हिंदी जनतेला नि:शस्त्र करुन टाकले.

*'व्हर्नाक्यूलर प्रेस अ‍ॅक्ट' 1878 अन्वये ब्रिटिश सत्तेवर होणारी वाढती टीका दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

* इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षेस बसण्याची वयोमर्यादा 21 वरुन 19 वर आणल्याने भारतीयांना हया सेवेत प्रवेश करण्याची संधी आणखीच कमी झाली.

* भारतात भीषण दुष्काळ पडला असताना इसवी सन 1877 मध्ये प्रचंड खर्च करुन राजेशाही दरबार भरविण्यात आला आणि अफगाणिस्तानचे खर्चिक युध्द सुरु करुन त्याचा आर्थिक बोजा    भारतीय तिजोरीवर टाकण्यात आला.

* ब्रिटनमधून जे कापड भारतात येई त्यावरील आयात जकात काढून टाकण्यात आली. त्यामुळे नव्यानेच वर येऊ पाहात असलेल्या भारतीय वस्त्रोद्योगावर संकट कोसळले.

·         ही सर्व उदाहरणे ब्रिटिश सत्तेचे वसाहतवादी स्वरुप स्पष्ट करणारी आहेत. इसवीसन

·         1883 मध्ये नवा व्हाईसरॉय रिपन याने इलर्बट' बिल संमत करुन वर्णीय पक्षपाताचे एक ढळढळीत उदाहरण दूर केले व भारतीय जनतेच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला. या बिलाद्वारा युरोपियनांवरील फौजदारी खटलेही भारतीय जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे चालतील असे ठरविण्यात आले.

·         पण भारतातील युरोपियनांनी या बिलाविरुध्द एवढे आकांडतांडव केले की अखेर त्यात दुरुस्ती करावी लागली.

·         भारतीय राष्ट्रवादाची वाढ होण्याच्या दृष्टीने या घटनांमुळेच योग्य वातावरण निर्माण झाले.

भारतीय राष्ट्रीय सभेचा (इंडियन नॅशनल काॅंग्रेसचा) उदय :-

·         परकीय सत्ता व पिळवणूक यांच्याविरुध्दच्या सर्व भारतातील राजकीय कार्यात एकसूत्रीपणा आणावा आणि ते संघटित करण्याच्या दृष्टीने एक अखिल भारतीय स्थापावी हयासाठी हीच वेळ योग्य होती.

·         यादृष्टीने अनेक प्रयत्न बरीच वर्षे चालू होते. इंडियन असोसिएशनची स्थापना करुन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला. अखेर हया कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.

·         ए.ओ. हयूम निवृत्त सनदी अधिकार्‍याशी सहकार्य करुन दादाभाई नौरोजी, न्या, मू. महादेव गोविंद रानडे, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी हयांनी 1885 च्या डिसेंबरमध्ये मुंबईत इंडियन नॅशनल काॅंग्रेसचे अधिवेशन भरविले.

·         अशा रीतीने भारतीय स्वातंत्र्यलढयाची सुरवात अगदी लहानशा प्रमाणात झाली.

·         प्रारंभीच्या काळातील राष्ट्रवादी नेत्यांचे असे मत होते की, स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष लढा देण्याची वेळ अद्याप आलेली नाही.

·         प्रथमत: अशा लढयाची पायाभरणी करायला हवी. प्रारंभीच्या या भारतीय राष्ट्रवादी नेत्यांची मूळ उद्दिष्टे कोणती हे समजावून घेण्यास उत्सुक असाल.

(क) राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करणे हे प्रारंभीच्या काळातील राष्ट्रवादी नेत्यांचे एक प्रमुख उद्दिष्ट होते. भारताची एक राष्ट्र म्हणून बांधणी करणे, एससंध भारतीय जनमत तयार करण्े आणि भारतीय लोक कधीच एक नव्हते, तरन ते शेकडो वंश, भाषा, जाती आणि धर्म यांचे कडबोळे आहे, असा जो आरोप साम्राज्यवादी करीत असत. त्याला चोख उत्तर देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.

(ख) त्यांचे दुसरे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे एका राष्ट्रीय राजकीय व्यासपीठाच्या निर्मितीचे सर्व भारतीयांचे ज्यावर एकमत होईल, असा एक कार्यक्रम तयार करुन अखिल भारतीय राजकीय कार्याची त्यांना पायाभरणी करावयाची होती.

(ग) भारतीय जनतेला राजकीयदृष्टया जागृत करणे, राजकीय प्रश्नांबद्दल जनमानसांत आस्था निर्माण करणे आणि भारतातील जनतेत प्रबोधन करुन तिला संघटित करणे हे तिसरे प्रमुख उद्दिष्ट होते.

(घ) अखिल भारतीय नेतृत्वाची जडणघडण करणे हेही त्या काळातील आणखी एक उद्दिष्ट होते. असे एकत्रित नेतृत्व असल्याखेरीज कोणत्याही चळचळीची प्रगती होत नाही. 1880 पूर्वीच्या काळात असे नेतृत्वच अस्तित्वात नव्हते. हयाखेरीज राजकीय कार्यासाठी सामान्य राजकीय कार्यकत्र्यांना शिकवून तयार करावयाचे होते.

·         अशा रीतीने व्यापक आधारावर व अखिल भारतीय पातळीवर वसाहतवादविरोधी राष्ट्रवादी चळवळी निर्माण कराव्यात, अशी प्रारंर्भीच्या राष्ट्रवादी नेत्यांची उद्दिष्टे होती.

जालियनवाला बाग हत्याकांड

·         लोकमान्य टिळकांना अखेरच्या काळात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधीचे आगमन झाले.

·         भारतीय जनतेच्या ब्रिटिश शासनाविरुध्दच्या असंतोषाला त्यांनी सत्याग्रह व व्यापक जनआंदोलनाव्दारे वाचा फोडली.

·         इ.स. 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली.

सुरवातीचे सत्याग्रह :-

·         भारताच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गांधीजीनी दक्षिण आफ़्रिकेतील गौरवणीय सरकारच्या वर्णव्देषी धोरणाविरूध्द सत्याग्रहाच्या तंत्राचा प्रथमत: आणि यशस्वीरीत्या वापर केला.

·         दक्षिण आफ़्रिकेतून परत आल्यानंतर 1917 साली चंपारण्य येथील नीळ-उत्पादक शेतकर्‍यांच्या आणि गुजरातमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या अहिंसात्मक आंदोलनाद्वारा गांधीजीनी आपले सत्याग्रहाचे तंत्रउपयुक्त असत्याचे दाखवून दिले.

·         त्यांनी याच तंत्राचा यशस्वी उपयोग 1918 साली खेडा जिल्हयात साराबंदीच्या चळवळीत आणि अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संपात केला.

जालियनवाला बाग हत्याकांड :-

·         पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.

·         1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

·         त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

·         गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.

·         13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.

·         या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.

·         भारतीय जनतेने या घटनेचा सार्वत्रिक निषेध केला.

स्वदेशी चळवळ

·         20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.

·         सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.

·         16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.

·         कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.

·         बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.

·         परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते.

·         अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणार्‍या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली.

·         शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकर्‍यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरुप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली, त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर 1906 मधील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की 'स्वराज्य' हेच काॅंग्रेसचे उद्दिष्ट आहेत.

·         खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले.

·         विशेषत: विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या.

·         परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले.

·         समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.

·         सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली.

·         वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकत्र्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्याथ्र्यांना मारझोड करण्यात आली.

·         सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले.

·         जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही.

·         अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली.

·         बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.

·         मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकार्‍यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पध्दत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते.

·         या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.

·         इसवी सन 1909 पासून 1916 पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुध्दाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी 'इंडियन होमरुल लीग' च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरु केले.

·         युध्दकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे.

·         त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

भारताचे जनक / शिल्पकार

1.    आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय

2.    आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

3.    भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

4.    भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

5.    भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

6.    भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार  सरदार वल्लभभाई पटेल.

7.    मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

8.    भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

9.    भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

10.  आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - .ना.आपटे.

11.  आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

12.  स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

13.  भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

14.  भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

15.  भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

16.  भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

17.  भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

 

1909 चा कायदा

·         1909 च्या कायदयास मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा असे ही म्हणतात. 

·         मोर्ले हे भारतमंत्री तर मिंटो हे व्हाईसरॉय होते. 

·         1909 च्या कायद्याने लंडनमधील भारतमंत्र्यांच्या इंडिया कॉन्सिल मध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. 

1.    के.जी. गुप्ता

2.    सय्यद हुसेन बिलग्रामी 

·         1909 च्या कायद्याने भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक जागा हिंदी सभासंदासाठी राखून ठेवण्याची तरतूद केली गेली. त्यानुसार रायपूरचे 'लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा' यांची नेमणूक करण्यात आली. 

·         1909 च्या कायद्याने मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले. 

·         गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची संख्या या कायद्याने आठ वर नेली. 

·         केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 68 केली.

1909 च्या कायद्यातील दोष पुढीलप्रमाणे :

·         संसदीय पद्धत लागू पण उत्तरदायीत्वाचा अभाव. 

·         निवडणूक पद्धत काही अंशी मान्य करण्यात आली. 

·         प्रांतात भारतीयांचे बहुमत पण केंद्रात बहुमत नाही. 

·         1909 च्या कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला परंतु त्यावर मतदान करण्याचा अधिकार दिला नाही.

1919 चा कायदा

·         1919 चा सुधारणा कायदा मॉन्टेग्यु - चेम्सफोर्ड नावानेही ओळखला जातो. मॉन्टेग्यु हे भारतमंत्री तर चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते. 

·         20 ऑगस्ट 1917 - भारतमंत्री मॉन्टेग्युची घोषणा - भारताला 'साम्राज्यअंतर्गत स्वराज्य' टप्याटप्याने दिले जाईल. या घोषणेचे स्वागत मवाळांनी 'मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया' असे केले. 

·         1919 च्या कायद्याने भारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू केला. 

·         इंडिया कौन्सिलच्या सभासंदांची संख्या आठ ते बारा करण्यात आली त्यात तीन भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला. 

·         1919 च्या कायद्याने हायकमिशन ऑफ इंडिया हे पद निर्माण करून त्यांचा पगार भारतीय तिजोरीवर लादला. 

·         केंद्रीय कायदेमंडळ व्दिगृही केले. 

1.    कनिष्ठ सभा (Legislative Assembly - 143)

2.    वरिष्ठ सभा (Council state -60)

·         1919 च्या कायद्याने मुस्लिमांबरोबर शीख, युरोपीय आंदिना स्वतंत्र मतदार संघ दिले. 

·         या कायद्याने प्रांतात व्दिदल शासनाचा प्रारंभ केला. 

·         वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 5 वर्षाचा तर कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 3 वर्षाचा करण्यात आला. 

·         निवडणुकीचा नागरिकांना देण्यात आलेला मतदानाचा

1935 चा कायदा

·         1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली. 

·         1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली. 

·         1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली. 

·         संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली. 

·         या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला. 

·         1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या. 

·         भारतमंत्र्यांचे 'इंडिया कौन्सिल' रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली. 

·         मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले. 

·         1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला. 

·         1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.

·         1935 चा कायदा म्हणजे - संपूर्ण सडलेला मूलत: निष्कृष्ट, अनई संपूर्णपणे अस्विकाहार्य बॅ.जिना.

इतिहासाच्या अभ्यासाची साधने

·         सजीवाची उत्क्रांती - पहिला सजीव पाण्यात जन्मास झाला असे म्हटले जाते. हा सजीव एकपेशीय प्राणी अमिबा होय. त्यानंतरच्या काळात पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती होवून अनेक जीव जन्माला आले.

यापैकी काही जीव पाण्यात होते तर काही जमिनीवर होते. त्यापैकी बेडूक हा एक प्राणी आहे. 

·         नंतरच्या काळात उत्क्रांती होवून वनस्पती, पक्षी आणि हत्ती सारखे प्रचंड आकारमानाचे प्राणी निर्माण झाले. 

·         ज्या सजीवांनी बदलत्या पर्यावरणाशी स्वत:ला जुळून घेतले असे प्राणी काळाच्या ओघात जीवंत राहिले. डायनासोरसारखे प्राणी जे पर्यावरणाशी जुळवून घेवू शकले नाही ते काळाच्या ओघात हे प्राणी नष्ट झाले.

आदिमानवाचा जन्म :

·         सजीवाची उत्क्रांती होण्याच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. त्याला शेपूट नव्हते. त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याचा पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते. त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते हा प्राणी म्हणजे आदिमानव होय. 

·         कालांतराने या प्राण्याच्या ठेवणीत बदल होवून आजचा आधुनिक मानव निर्माण झालेला आहे. 

·         मानवाचे वैशिष्टे : आजच्या आधुनिक मानवाचे खालील वैशिष्टे आहे. 

·         मानव हा सजीव सृष्टीमधील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. 

·         इतर प्राण्यापेक्षा मानवाचा हाताचा सहज हलू शकतो त्यामुळे त्यास हाताच्या इतर बोटाच्या सहाय्याने कोणतीही वस्तु हातात पकडता येते. 

·         मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हत्तीसारख्या प्राण्यास नियंत्रणात आणले आहे आणि निसर्गातील सर्व साधनांचा उपयोग करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. 

·         मानवाने भाषेचा विकास केला असून त्याव्दारे त्याने आपले अनुभव शब्दबद्ध करून येणार्‍या पिढीला ज्ञान म्हणून उपलब्ध करून दिले आहे. या घटनेमुळे मानवाचा विकास होत आहे. 

इतिहासाचा महत्व व अभ्यास :

·         सजीवाच्या उत्क्रांतीमध्ये मानवाला विशेष महत्व आहे. मानवाने निसर्गाशी लढत देत आणि प्रयत्न व प्रमाद पद्धतीचा वापर करून आजची प्रगती साधली आहे. कशाप्रकारे प्रगती साधली याची माहिती देणारा घटक म्हणजे इतिहास होय. भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहिती देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय. 

·         अशा शब्दात इतिहासाची व्याख्या केली जाते. इतिहासावरून भूतकाळात विकसित झालेल्या मानवी संस्कृतीची माहिती मिळते. इतिहासाचे प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक असे तीन खंड पडतात. 

·         भूतकाळ घडलेल्या घटनेचा अभ्यास करून भविष्यकाळाकरिता नियोजन करणे, हा इतिहासाच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश असतो. 

·         पूर्वजांनी केलेल्या चुका टाळून भविष्यकाळात प्रगती साधने हा इतिहासाच्या अभ्यासाचा मुख्य हेतू असतो.

इतिहासाची कालगणना :

·         भूतकाळात घडलेल्या घटनांचा कालानुक्रम ठरविण्याकरिता कालगणना करणे महत्वाचे असते. स्थूलमानाचे जगात कालगणना करण्याकरिता गॅगरिअन पंचागचा वापर केला जातो. 

·         स्थूलमानाचे येशू ख्रिस्ताचा जन्म हा गॉगरियन पंचागाचा पहिला दिवस मानला जातो. 

·         अरबी भाषेत येशू ख्रिस्ताला ईसा म्हणतात. 

·         ईसा या शब्दावरून ईसवी हा शब्द तयार झाला. 

·         आंतरराष्ट्रीय पातळीवर सोईचे व्हावे म्हणून ईसविला सन किंवा साल असे संबोधन करण्याची पद्धत जगभर रूढ झाली. 

·         ख्रिस्त जन्मापूर्वीच्या घटना ईसवी सन पूर्व या नावाने ओळखल्या जातात व नंतरच्या घटना ईसवी सन म्हणून सबोधल्या जातात.

ऐतिहासिक अभ्यासाची साधने :

 

·         प्राचीन काळामध्ये मानवाने वापलेल्या वस्तु आजही सापडतात अशा अवशेषांना ऐतिहासिक अवशेष असे म्हटले जाते. यामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनात वापरावच्या वस्तू, त्याचबरोबर भांडी, अलंकार, किल्ले, लेणी, स्तूप, नाणी, प्राचीन शिलालेख, चालीरिती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा समावेश होतो. 

·         या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. ज्याच्या सहाय्याने त्या काळातील लोकांचे राहणीमान व जीवनप्रणालीची माहिती मिळते. 

·         इतिहासाच्या साधनांचे एकूण भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे तीन प्रकार पडतात.

1. भौतिक साधने - यामध्ये पुढील साधनांचा समावेश होतो.

·         धातू व दगडाची हत्यारे व भांडी - मानवी जीवनाला सुरुवात झाल्यापासून मानवाने आपली जिवनप्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध प्रकारची भांडी आणि साधने तयार केली. आदिमानवाच्या काळात दगडाची साधने वापरली गेली तर त्यानंतरच्या काळात भांडी व हत्यारे तयार करण्याकरिता तांब्याचा वापर केला गेला. आजही साधने अवशेषांच्या स्वरुपात सापडतात. ज्यांच्या सहाय्याने आपणास त्याकाळाच्या लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. यामध्ये प्रामुख्याने भांडी, हत्यारे, इत्यादि. 

·         पुरातन वास्तु - यामध्ये त्याकाळातील जनतेची घरे, मंदिरे, किल्ले, इमारती, नगररचना, यांचा समावेश होतो. ज्याव्दारे त्याकाळातील लोकाचे शिल्पकलेच्या रचनेची माहिती मिळते. 

·         पुरातन अवशेष - भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शहरेच्या शहरे जमिनीच्या आत गाडल्या गेली. अशा ठिकाणचे उत्खनन केल्यास, त्या ठिकाणी अवशेषाच्या स्वरुपात भांडी व भांड्याचे तुकडे, दागदागीने अन्नधान्याच्या बिया यांच्या माध्यमातून त्या काळातील इतिहासिक माहिती मिळते. याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. ज्या शास्त्राव्दारे याचा अभ्यास केला जातो. त्यास पुरातत्व विद्या असे म्हणतात. 

2. लिखित साधने - लिखित साधनांमध्ये लेण्याच्या भिंतीवर लिहिलेले लेख, शिलालेख, ताम्रपत्र, भांडी व कच्या विटांवर केलेले लेखन, पपारस, झाडांच्या साली, भुर्जपत्रे लावर केलेल्या लेखणाचा समावेश होतो. ज्याव्दारे त्याकाळात घडलेल्या घटनांची माहिती मिळते.

 

3. मौखिक साधने - यामध्ये पाठांतराच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या साहित्यांचा समावेश होतो. ज्यामध्ये कथा, भारुडे, ओव्या, लोकगीते इत्यादींच्या माध्यामातून त्या काळात घडलेल्या घटनेची माहिती मिळते. 

मानवी जीवनाचा इतिहास

मानवाची उत्क्रांती -

·         एकपेशीय सजीवापासून ते मानवाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागले.

·         उत्क्रांतीच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. हा प्राणी एप म्हणून ओळखला जात असे. त्याला शेपूट नव्हते.

·         त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याच्या पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते.

·         त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते हा प्राणी म्हणजे आदिमानव होय. त्यानंतरच्या काळातील मानवी विकासाचे होमो इरेक्टस आणि होमो सेपिअस असे 2 टप्पे मानले जातात.

·         होमो सेपिअस म्हणजे बुद्धिमान मानव.

·         मानवी मानवी विकासाच्या या टप्पात मानवाला अग्नीचा उपयोग माहिती होता. त्यानंतरच्या काळात त्याने दगडी हत्यारे घडविण्यास सुरुवात केली.

·         हा काळ अश्मयुग म्हणून ओळखला जातो. या काळाचे पुराश्मयुग व नावाश्मयुग असे दोन काळ पडतात.

पुराश्मयुग -

·         आदिमानव आपली उपजीविका करण्याकरिता कंदमुळे आणि कच्चे मांस खात असे.

·         जेव्हा त्यास नुसत्या हाताने मांस सोलणे अवघड आहे असे, कळल्यानंतर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली.

·         ज्या काळात मानवाने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सुरूवातीला हे हत्यारे ओबडधोबड होती.

·         लांबवर दगड फेकण्याकरिता त्याने दगडाला आकार देण्यास सुरवात केली.

·         दगडाला योग्य आकार देण्याकरिता त्याने दगडाला छिलके पडण्यास सुरुवात केली.

·         या संकल्पनेमधून सुबक आकाराची हत्यारे आकारास आली.

नवाश्मयुग -

·         नवाश्मयुगामध्ये मानवाला शेती व पशूपालनाची कला अवगत झाली. बी टाकल्यानंतर झाड तयार होते.

·         हे ज्ञान त्यास कालांतराने त्यास मिळाले आणि यामधून शेती करण्याची आणि शेतीकरण्याकरिता पशुचा वापर करण्याची कल्पना त्यास सुचली.

·         या कल्पनेमधून मानवाच्या जीवनात शेती आणि पशुपालन व्यवसाय सुरू होवून मानवी संस्कृतीच्या विकासाकडे मानव वळत गेला.

·         शेतीचा शोध - जमिनीवर सांडलेले धान्याचे कण मातीत रुजतात आणि त्यापासून रोपे तयार होवून त्यास कणसे लागतात. असे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने धान्य पेरण्यास सुरुवात केली आणि त्या संकल्पनेतून शेतीचा शोध लागला.

·         पशुपालन - मानवाला शिकारीकरिता आणि घराची राखण करण्याकरिता कुत्रा उपयुक्त ठरू लागला. या घटनेमुळे त्यास आपल्या मदतीकरिता प्राण्याचा उपयोग होतो. असा शोध लागला. या शोधातून मानव मानवी शक्तीऐवजी प्राण्यांचा उपयोग करून शेती करू लागला.

ग्रामीण वस्तीचा विकास -

·         मानवाच्या जीवनातील शेतीचा शोध हा त्याला स्थिरता आणण्यास उपयोगी ठरला.

·         शेतीचा शोध लागल्यामुळे त्याची भटकंती संपवून स्थिर जीवनास सुरुवात झाली.

·         गांव व वसाहती - शेतीच्या शोधामुळे त्याला एकाच ठिकाणी अन्न मिळू लागले. त्यामुळे त्याच्या जीवनात स्थिरता येवून तो घर करून राहू लागला. शेतीच्या कामाकरिता त्यास इतरांची गरज भासू लागली. त्यामुळे एकमेकास सहाय्य करण्यार्‍या माणसाचा गट तयार होवून ते एकत्र राहून एकमेकास संरक्षण देवू लागते. त्यामधून ग्रामीण वस्तीचा विकास झाला. आणि वस्तीचे रूपांतर गावामध्ये होवू लागले.

·         नागरी संस्कृतीच उदय - स्थिर झालेल्या समाजव्यवस्थेला गतीमानता आणण्यामध्ये चाकाचा शोध हा क्रांतिकारक ठरला. नवाश्मयुगामध्ये चाकाचा शोध लागला असावा असे म्हटले जाते. मानवास उंचावरून घरंघळत येणार्‍या ओंडक्यावरुन चाकाची संकल्पना सुचली. चाकाचा सर्वात प्रथम वापर कुंभाराने भांडी तयार करण्याकरिता केला असे म्हटले जाते. चाकाच्या शोधामुळे वाहतुकीला सुरवात झाली. जगातील बहुतांशी संस्कृती नदी काठच्या प्रदेशात विकसित झाली आहे. त्यामध्ये भारतातील सिंधु संस्कृती, आशिया खंडातील तैग्रिस, युफ्रेटिस व चीनची संस्कृती, नाईल नदीच्या खोर्‍यात विकसित झालेली इजिप्तची संस्कृतीचा विकास नदयाच्या प्रदेशातच झाला आहे.  

सिंधु नदीच्या खोर्‍यातील संस्कृती

सिंधु संस्कृतीचा शोध -

·         सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या. 

·         सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय. 

·         ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते. 

·         आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. 

·         आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.

सिंधु संस्कृतीचे वैशिष्टे

·         जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे. 

·         रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था याची सुनियोजित रचना. 

·         पुरापसून संरक्षण करण्याकरिता उंच जोत्यावर घरे बांधण्यात आली होती. 

·         आरोग्य व स्वच्छता यांच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती. 

·         मोहेंजदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे. 

·         मोहेंजदडो हे शहर नदीच्या पुरामुळे सात वेळा नष्ट होवून पुन्हा वसविल्या गेल्याचे येथील पुराव्यावरून सिद्ध होते.

स्थानिक प्रसाशन -

·         मोहेंजदडो येथे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून येथील लोक आरोग्य आणि स्वच्छता विषयक सोईच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येते.

·         नगररचना योजनाबद्ध होती. 

·         यावरून या ठिकाणी आजच्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असाव्यात आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपीवण्यात आल्याचे दिसून येते.

हडप्पाकालीन लोकजीवन -

·         सिंधु आणि रावी नद्यांच्या परीसरात करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील लोकजीवनाबाबत खालील माहिती मिळते.

दैनंदिन जीवनप्रणाली -

·         अन्न : येथील लोक आपल्या आहारामध्ये तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे भाज्या व फळे यांचा वापर करीत असल्याचे दिसून येते. 

·         वस्त्र व प्रावरणे : येथील उत्खनात मिळालेल्या पुराव्यावरून या लोकांना कापड विणण्याची कला अवगत असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात कंबरेपर्यंतचे वस्त्र व उपरण्याचा वापर करीत असे. 

·         अलंकार : हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले कवडया, बिया इत्यादींचा वापर दागिने तयार करण्याकरिता करीत असे. यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत बांगड्या कमरपट्टा इत्यादी अंलकाराचा समावेश होता. 

·         करमणुकीची साधने : हे लोक करमणुकीकरिता, नृत्य, संगीत व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत.

धार्मिक संकल्पना -

·         पुजा अर्चना : हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ति आणि अग्नीचे अवशेष यावरून लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते स्पष्ट होते. 

·         अंत्यविधी : हडप्पा कालीनलोक मृतदेहांना जाळित असे किंवा शवपेटीत घालून पुरले जात आसवेत असे या स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरतांना सोबत अन्न, अंलकार व आयुधे सुद्धा पुरवण्यात येत असे. 

·         उद्योग व व्यवसाय : हडप्पाकालीन लोकांचा शेती आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते. 

·         शेती : शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. ते शेतीमध्ये गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्ये इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे. 

·         भांडी : भांडी तयार करणे आणि त्यावरच चित्रकला काढणे हा येथील लोकांचा दूसरा व्यवसाय असल्याचे दिसून येते. 

·         कापड : कापूस व लोकरीपासून धागा तयार करणे आणि कापड तयार करणे हा येथील लोकांचा एक व्यवसाय होता. 

·         व्यापर : हडप्पा येथे तयार होणार्‍या मालाचे अवशेष सुमेरियन संस्कृतीमध्ये मिळाल्यामुळे आणि गुजरात मधील लोथल येथे मिळालेल्या बंदरच्या अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये प्रविण असल्याचे दिसून येते.हडप्पा येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने इतर देशांशी चालत असल्याचे स्पष्ट होते.

वैदिक संस्कृतीबद्दल माहिती

वैदिक संस्कृतीचा उदय :

·         सुमारे चार हजार वर्षापूर्वी वायव्यकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या. या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते. या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत. गुरे ही त्यांची संपत्ती होती. 

·         सप्तसिंधुच्या भूमी ही त्याच्या ईच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली. त्यानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या. 

·         अशाप्रकारे आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. हे लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली. या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय. 

·         आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. 

·         वैदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.

वैदिक संस्कृतीची वैशिष्टे :

·         आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला. 

·         गुरे ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सप्तसिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले. 

·         हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.

·         सप्तसिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.

वैदिक वाड्मयाची रचना :

·         आर्य लोक निसर्गप्रेमी आणि अनेक देव-देवतांचे पूजक होते. 

·         सूर्य, अग्नी, पर्जन्य, मरुत आणि इंद्र या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. या देवतांना प्रत्यांना प्रसन्न करण्यासाठी ते प्रार्थना करीत व स्तुति करण्याकरीता मंत्र म्हणीत असे. 

·         या मंत्राना सूक्त म्हणतात या मंत्राचा समूह म्हणजे वेद होय. यामधून आर्यांनी खालील ग्रथसंपदेची रचना केली. 

·         वेद : आर्यानी निर्माण केलेली पहिली ग्रंथरचना म्हणजे वेद होय. वेद चार प्रकारचे आहेत. 

·         ऋवेद : हा आर्यांचा पहिला ग्रंथ असून यामध्ये देवतांना प्रसन्न करण्याकरीता रचलेल्या ऋचांचा समावेश आहे. 

·         यजुर्वेद : हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे. 

·         सामवेद : या ग्रंथामध्ये ऋचांचे तालासुरात कसे गायन करावे याबाबतची माहिती आहे. 

·         अर्थवेद : या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्याकरीता आणि उत्तम आरोग्य कराव्या लागणार्‍या उपायाची माहिती आहे.

इतर ग्रंथसंपदा :

·         ब्राम्हण्यके : यामध्ये यज्ञवेदीमध्ये वेदांचा वापर कसा करावा याबाबतची माहीती आहे. 

·         आरण्यके : वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जावून रचलेल्या ग्रंथाचा समावेश होतो. 

·         उपनिषदे : उपनिषधे यांचा अर्थ गुरुजवळ बसून मिळविलेले ज्ञान होय. यामध्ये अनेक प्रश्नावर जीवनातील अनेक प्रश्नावर सखोल चिंतन करण्यात आलेले आहे.

वैदिक कालीन राज्यव्यवस्था :

·         वैदिक कालीन राज्यव्यवस्था एक प्रकारे ग्रामीण व्यवस्थेची होती. 

·         राजा : राजा हा राज्याचा प्रमुख असून प्रजेचे रक्षण करणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असे. राज्याचा कारभार चालविण्याकरीता त्यास पूरोहित, सेनापती आणि कर गोळा करणारा  भागदुध मदत करीत असे. 

·         सभा व समिती : राज्य सत्तेवर नियंत्रण ठेवण्याकरिता सभा व समिती अशा दोन संस्था होत्या. 

·         सभा : ही ज्येष्ठ लोकांचे मंडळ होते. 

·         समिती : लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती म्हटले जात असे.

इतर शासन व्यवस्था :

·         ग्रामणी : गावाच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जात असे व ग्रामवादी हा ग्रामणीच्या मदतीने गावाची न्यायविषयक जाबबदारी सांभाळत असे. 

·         विशपती : गावाच्या समूहाला विश आणि त्याच्या प्रमुखास विश्पती म्हटले जात असे.

दैनंदिन जिवनप्रणाली :

·         अन्न : वैदिक काळातील लोकांच्या आहारात दूध व दुधापासून बनलेल्या पदार्थाचा वापर असे. त्याचबरोबर मांस, फळे, तांदूळ आणि सातू इत्यादी धान्याचा उपयोग होत असे. 

·         वस्त्र व प्रावरणे : वैदिक काळातील लोक स्तुती आणि लोकरीच्या कापडाचा वापर करीत असे. 

·         घरे : वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. आर्य लोक झोपडी वजा मातीच्या घरात राहत असे. 

·         अलंकार : वैदिक काळातील लोक फुलांच्या माळा, सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे मणी व त्यांच्या माळा अलंकार म्हणून वापरीत असे. निष्क हा त्यांचा आवडता दागिना होता.

वैदिक कालीन सामाजिक व्यवस्था :

·         वर्णव्यवस्था : वर्णव्यवस्था ही भारतीय जाती व्यवस्थेचा उगमस्थान आहे. सुरुवातीच्या काळात व्यवसायावरून ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र असे वर्ण निर्माण झाले. उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था संपुष्टात येवून जन्मावरून जात ठरू लागली. 

·         कुटुंबव्यवस्था : भारतात पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा जन्म वैदिक काळामध्ये झाला. समाजव्यवस्थेत स्त्रीयांचे स्थान दुय्यम असले तरी स्त्रियांना वेदाभ्यास करण्याचा अधिकार होता. गार्गी, लोपमुद्रा व मेत्रेयी या विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक काळातील वाड्मयात आढळतो. नंतरच्या काळात स्त्रियांवर कडक बंधने लादली गेली. 

·         आश्रमव्यवस्था : जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळात मानवाला जीवनाचे शंभर वर्षे आयुष्य कल्पून त्याचे चार भागात विभाजन करण्यात आले. या प्रत्येक भागाला खालीलप्रमाणे कर्तव्य सोपविण्यात आले. ही जीवनाची आखणी म्हणजे आश्रमव्यवस्था होय. 

·         ब्रम्हचर्याश्रम : आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीकडे गुरुच्या सानिध्यात अभ्यास करून ज्ञान ग्रहण करून विद्या संपादन करण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले. 

·         गृहस्थाश्रम : या काळात व्यक्तीने विवाह करून त्याचेकडे कुटुंबाचे पालन व पोषण करण्याची आणि आपली संसारीक जाबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले आहे. 

·         वानप्रस्थाश्रम : या काळात व्यक्तीने आपल्या मुलांकडे जबाबदारी सोपवून संसाराच्या सर्व कर्तव्यातून मुक्त होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम होय. 

·         संन्यासाश्रम : यात व्यक्तीने वनात जावून ईश्वर चिंतनात आपला उर्वरित काळ कंठावा असे मानले जाई.

धार्मिक संकल्पना :

·         वैदिक काळातील लोक निसर्गपूजक होते. 

·         सूर्य, वारा व पानी या शक्ति प्रसन्न राहाव्यात म्हणून आर्य लोक त्यांची प्रार्थना करीत असे. अशा देवतांना नैवैद्य प्रदान करण्यात येत असे आणि हा नैवैद्य शक्तिपर्यंत पोहचविण्याचे कार्य अग्नी करतो अशी त्याची संकल्पना होती. 

·         अग्नीस प्रसन्न करण्याकरीता यज्ञ ही संकल्पना उदयास आली.

नवीन धार्मिक प्रवाहाबद्दल माहिती

जैन धर्माचा उदय :

·         उत्तर वैदिक काळामध्ये यज्ञयागाच्या कर्मकांडामध्ये पूरोहित लोकांचे वर्चस्व वाढले आणि ज्ञानदानाचे हक्क मोजक्या लोकांच्या हातात आले. 

·         जातीव्यवस्था कठीण होत जावून उच्च-नीच्च भेदभाव सुरू झाला. 

·         व्यक्तीचा दर्जा हा कर्तव्यावर नसून जन्मावर असल्याची संकल्पना रूढ झाली. या कारणामुळे समाजव्यवस्थेतील बहुतांशी वर्ग हा ज्ञानापासून दूर ढकलला गेला. 

·         या वर्गाला अंधकारातून वर काढण्याचा पहिला प्रयत्न जैन धर्माने केला.

भगवान वर्धमान महावीर (इ.स.पूर्व 599 ते 527) :

·         भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर असून, त्याचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथे झाला.

·         त्यांनी सर्व इंद्रियांवर ताबा मिळविला म्हणून त्यांना लोक जिन म्हणू लागले. ते स्थानिक अर्धमाधवी भाषेमध्ये धर्मप्रचार करू लागले. 

·         महावीरांना जातीभेदभाव मान्य नव्हता. यामुळे धर्मज्ञानापासुन दूर राहिलेले लोक त्याच्याकडे आकृष्ट होवून त्यांचे अनुयायी झाले.

जैन धर्माची शिकवण :

·         पंचमहाव्रते (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य) आणि त्रिरत्न (सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र) ही भगवान माहावीराच्या प्रवचनाची मुख्य तत्वे होती. 

·         या सर्वामध्ये त्यांनी अहिंसेला सर्वात जास्त महत्व दिले. 

·         आपले सर्व आयुष्य महावीरांनी सामान्य जनतेला उपदेश करण्यात घालविले त्याचे वयाच्या बहात्तराव्या वर्षी पावापुरी येथे निधन झाले.

गौतम बुद्ध (इ.स.पूर्व 533 ते 483) :

·         बहुजन समाजाला यज्ञयागाच्या कर्मकांडापासून दूर नेणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्माची स्थापना भगवान गौतम बुद्धाने केली. 

·         भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ आहे. त्यांचा जन्म आजच्या नेपाळमध्ये असलेल्या लुंबिनी येथील राजघराण्यात झाला. 

·         संसारातील दुख:बघून त्यांनी राजघराण्याचा त्याग केला आणि ज्ञान प्राप्तीकरिता बाहेर पडले. 

·         बिहारमधील गया या ठिकाणी एका बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखल्या जावू लागले.

धम्मचक्रप्रवर्तन :

·         ज्ञान प्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले. त्यांचे हे प्रवचन धम्मचक्रप्रवर्तन म्हणून ओळखले जाते. 

·         आपला उपदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा म्हणून त्यांना सामान्य लोकांना समजेल अशा पाली भाषेमध्ये प्रवचन दिले. 

·         सोपी भाषा आणि कर्मकांडाचा व जातीभेत नसल्यामुळे बहुजन समाज गौतम बुद्धाकडे आकर्षिला गेला.    

बौद्ध धर्माची शिकवण :

·         गौतम बूद्धांनी निर्मानाच्या प्राप्तीकरिता अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम आणि मादक पदार्थाचे सेवन करू नयेत या पंचशिलाचे पालन करण्यास संगितले.

गौतम बूद्धांनी दुख: निवारण्याकरिता अष्टांग मार्गाचे महत्व सांगितले.

बौद्ध संघ :

·         जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला उपदेश पोहचावा म्हणून गौतम बूद्धांनी बौद्ध संघाची स्थापना केली. त्यांनी आपल्या बौद्ध संघामध्ये महिलांनाही सहभागी करून घेतले. यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. 

·         बहुजन समाजाच्या हिताकरिता आयुष्य खर्च करणार्‍या या महान व्यक्तीचे इसनपूर्व 483 मध्ये निर्वाण झाले.

भारतातील महाजनपदे

संघटीत राज्यव्यवस्थेचा उद्य :

·         आर्य लोकांनी भारतात टोळ्यांच्या रूपांने प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या संघर्ष सुरू झाला. प्रराक्रमी टोळ्यांच्या नेत्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली. ही राज्ये जनपदे आणि महाजनपदे म्हणून ओळखली जात असे. 

·         भारतीय वेद, पुराण, रामायण, महाभारत जैन आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासावरून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग (उत्तर बिहार), मगध (दक्षिण बिहार), कोसी (बनारस), कोसल (आयोध्या), विदेह (उत्तर बिहार), मल्य (गोरखपूर), चेंदी (बुंदेलखंड), वस्त (अलाहाबाद), कुरू (दिल्ली व मीरत), पांचाल (बरेली), मस्त्य (जयपूर), अश्मक (गोदावरीचा भाग), अवंती (माळवा), गांधार (अफगाणिस्थान), सुरसेन (मथुरा), कुंभोज (दक्षिण पश्चिम क्षेत्र) असे एकूण सोळा महाजनपदे होती असा उल्लेख मिळतो.

महाजपदकालीन राज्यव्यवस्था :

·         महाजनपदकालीन राज्य व्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती. राज्यकारभाराच्या प्रक्रियेत राजा हा सर्वात वरच्या स्थानी असला तरी, बहुतांशी निर्णय खालील संस्थांमार्फत घेतले जात असे. 

·         गणपरिषद - ही राज्यातील ज्येष्ठ लोकांची परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार व राज्यकारभाराचे अधिकार गणपरिषदेकडे असे. 

·         कार्यकारी मंडळ - राज्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता कार्यकारी मंडळ असे. 

·         सभासद कार्यकारी मंडळामध्ये प्रस्ताव मांडीत आणि त्यावर बहुमताने निर्णय घेतला जात असे.

पराक्रमी राज्ये :

·         कालांतराने गणपरिषदेचे महत्व कमी होवून राजेशाहीला महत्व प्राप्त झाले. 

·         या राजेलोकांच्या विस्तारवादी धोरणामुळे काही महाजनपदे विशेष प्रसिद्धीला आली. त्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध विशेष नावारूपास आली. 

·         कोशल - हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तरप्रदेश यामधील भाग म्हणजे कोसल होय. 

·         साकेत ही या राज्याची राजधानी होती. 

·         कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. या राजाचा मगध साम्राज्याचे पराभव करून कोसल आपल्या राज्यात समाविष्ट केले. 

·         वत्स - अलाहाबाद जवळील प्रदेश हा वत्स राज्याची राजधानी कौशांबी म्हणून ओळखला जात असे. हे शहर त्या काळात तलम रेशमी कापडाकरिता जगप्रसिद्ध होते. 

·         अवंती - आजचे उज्जैन शहर हे अवंतीची राजधानी होती. हे शहर त्या काळात व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीला आले होते. 

·         मगध - गंगा व शोण नदीच्या खोर्‍यातील परीसरात मगध राज्य पसरले होते. 

·         बिहारमधील राजगृह हे या राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होवून गेलेल्या पराक्रमी राजे लोकांनी मगध साम्राज्य नावारूपास आणले.

बिंबिसार :

·         बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होवून गेला. 

·         त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली.

अजातशत्रू :

·         हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन, असून त्याने अनेक गणराज्य आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली. 

·         या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. 

·         पहिली धर्मपरिषद अजातशत्रूने राजगृह येथे बोलाविली होती.

शिशुनाग :

·         या राजाने उत्तर भारतातील सर्व गणराज्ये एकत्र करून समर्थशाली मगध साम्राज्य निर्माण केले. 

नंद राजे (इसवी सनपर्व 364 ते 324) :

·         या काळात मगध राज्यात पराक्रमी नंद घराने नावारूपास आले. या घराण्यातील राजे लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला ते हिमालय आणि कर्नाटक पर्यंत केला होता. 

·         या काळात मगध साम्राज्य प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य म्हणून ओळखले जाते. 

·         या घराण्यातील शेवटचा राजा म्हणजे धनानंद होय. 

·         नंद राजांच्या काळातच भारतात परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती.

परकीय आक्रमणे :

·         भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्‍याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली. 

·         प्राचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे. 

·         भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.

इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण :

·         मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले. 

·         भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता. 

·         या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.

अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326) :

·         ग्रीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले. 

·         सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला. 

·         मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही. 

·         भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.

·         सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले. 

·         ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून त्यामधून गांधार शिल्पकला शैली उदयास आली.    

मौर्यकालीन भारत

मौर्य साम्राज्याची स्थापना :

·         नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता. त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.

·         त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.

चंद्रगुप्त मौर्य :

·         चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता. 

·         बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती. 

·         ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते. त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते. 

·         चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला. त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले. 

·         बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.

सम्राट अशोक :

·         चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय. 

·         त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता. 

·         कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.

कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :

·         सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली. 

·         या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला. 

·         या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.

बौद्ध धर्माचा प्रसार :

·         बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. 

·         बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती. 

·         जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले. 

·         आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.

मौर्यकालीन राज्य व्यवस्था :

·         मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती. 

·         जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.

मौर्य कालीन लोकजीवन :

·         मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते. त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते. 

·         विविध व्यापार्‍यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.

मौर्यकालीन कला व साहित्य :

·         सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला. 

·         यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले. 

·         चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले

प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास

साहित्य व शास्त्रचा इतिहास :

·         वैदिक काळापासून भारतात प्राचीन साहित्याची रचना झाली. यामध्ये खालील साहित्य महत्वपूर्ण आहे.

वेदकालीन साहित्य -

·         यामध्ये वेद, वेदांगे दर्शनशास्त्रे, आरण्यके उपनिषिदे आणि भगवतगीतेसारखा तत्वचिंतक ग्रंथाचा समावेश होतो. 

महाकाव्ये -

·         यामध्ये रामायण व महाभारत यांचा समावेश होतो. 

·         राज्यशास्त्रावर मार्गदर्शन करणारा चाणक्यचा अर्थशास्त्र हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. 

वैधकशास्त्र -

·         यामध्ये चिकित्सातंत्राचा समावेश असलेला महर्षी चरक यांनी लिहिलेला चरकसहिता, शस्त्रक्रियेची माहिती देणारा सुश्रूतसंहिता आणि निरनिराळ्या आजारावर उपचारपदी ठरविणारा वाग्भट संहिता प्रसिद्ध आहे. 

गणित व भूमिती -

·         यामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर आणि शून्याचा शोध लावणारे ब्रम्हगुप्त यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.

कला व स्थापत्य :

·         प्राचीन भारत कला व साहित्य क्षेत्रात प्रगतीशील होता. 

·         आजही संची येथील स्थूप आणि दिल्लीच्या मेहरोळी येथील लोहस्तंभ भारताच्या प्राचीन कलेची साक्ष देतो

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

1. महंमद गझनवी :-

·         अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या करून पंजापर्यंत प्रांत आपल्या राज्याला जोडला होता. 

·         सन 998 मध्ये त्याचा मुलगा महंमद हा गझनचा सुलतान झाला. 

·         त्याने सन 1001 ते 1027 पर्यंत भारतावर सतरा स्वार्‍या केल्या. या स्वार्‍या करतांना राज्य स्थापनेऐवजी भारतातील संपत्ती लुटून नेणे हा त्यांचा मुख्य हेतु होता. 

त्याने मथुरा व सोमनाथचे मंदिर लुटून अमाप संपत्ती गझनीला नेली. 

2. महंमद घुरी :-

·         महंमद घुरी हा अफगाणिस्तानमधील एक सुलतान होता. महंमद गझनवी स्वार्‍यानंतर दीडशे वर्षांनी त्याने भारतावर आक्रमण केले. 

·         सन 1992 मध्ये तराईनच्या सुद्धा दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर कनोजचा राजा जयचंदचा पराभव करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पुढे त्याने बंगाल व बिहारवर आक्रमण करून सत्ता स्थापित केली. 

·         त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघण्याकरिता आपला विश्वासू सरदार कुतूबुद्दीन ऐबकची नियुक्ती केली. 

·         अशाप्रकारे भारतात मुस्लिम साम्राज्य प्रस्तापित झाले. त्यानंतरच्या काळात दिल्लीच्या गादिवर खालील सत्ताधीश आले.

कुतूबुद्दीन ऐबक (सन 1206 ते 1210) :

 

·         सन 1206 मध्ये महंमद घुरी मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीन ऐबकने स्वत:ला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. 

·         याच काळात ऐबकने दिल्लीच्या कुतुबमिनारच्या बांधकामास सुरवात केली. 

·         सन 1210 मध्ये तो मरण पावला. 

·         त्याच्या ठिकाणी त्याचा बदायुनचा सुभेदार आणि कुतूबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमश सत्तेत आला.

शमशूद्दीन अल्तमश (सन 1210 ते 1226) :

·         कुतूबुद्दीन ऐबकच्या मुत्यूनंतर काही सरदारांनी अल्तमशविरुद्ध बंडखोरी केली होती. ती ऐबकने मोडून काढली आणि स्थिरता प्रस्थापित केली. 

·         बगदादच्या खलीपाने त्यास भारताचा सुलतान म्हणून मान्यता दिली. 

·         अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. 

·         अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याने टका नावाचे नाणे सुरू केले होते. त्याने आपल्या हयातीमध्ये कुतूबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.

रझिया सुलतान (सन 1226 ते 1240) :

·         अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान दिल्लीच्या राजगादिवर आली. ती प्रजादक्ष आणि कर्तबगार स्त्री होती. 

·         परंतु, दिल्लीच्या सिंहासनावर एक स्त्री असने हे सरदारांना खपत नव्हते. 

·         दिल्लीचे सुलतान पद भूषविणारी ती एकमेव पहिली महिला होती. 

·         सन 1240 मध्ये तिचा वध करण्यात आला.

गियासुद्दून बल्बन (सन 1266 ते 1287) :

·         रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर काही प्रमाणात अस्थिरता आली होती. सन 1266 मध्ये गियासुद्दीन बल्बन हा दिल्लीचा सुलतान झाला. 

·         त्याने आपल्या विरोधकाचा बंदोबस्त करून आपली सत्ता मजबूत केली. 

·         तात्काळ युद्ध करता यावे म्हणून त्याने खडे सैन्य ठेवण्याची प्रथा सुरू केली. यामुळे तास वायव्य सीमेवर मंगोलाचा बंदोबस्त करता आला. 

·         उर्दू भाषेचा रचयिता आणि प्रसिद्ध कवि या राजाचा दरबारी होता.

जलालूद्दीन खिलजी (सन 1290 ते 1296) :

·         गियासुद्दीन बल्बनच्या मृत्यूनंतर त्याचे वारस कमकुवत निघाले. याचा फायदा घेवून पंजाबचा प्रांधिकारी जलालूद्दीन खिलजीने दिल्लीच्या गादीवर आपला हक्क प्रस्तापित करून खिलजी वंशाची स्थापना केली. 

·         त्याचा पुतण्या अल्लाऊद्दीन खिलजी हा पराक्रमी आणि महत्वाकांक्षी होता. 

·         त्याने सन 1296 मध्ये देवगिरीवर आक्रमण करून अमाप संपत्ती लुटली. 

·         ही बातमी ऐकून जलालूद्दीन खिलजी आपल्या पुतण्याला भेटावयास कडा येथे गेला असता. 

·         अल्लाऊद्दीनने त्याचा वध केला आणि दिल्लीची सत्ता हस्तगत केली.

अल्लाऊदीन खिलजी (सन 1296 ते 1316) :

·         अल्लाऊद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी होता. त्याने अल्पावधीतच संपूर्ण भारत आपल्या नियंत्रणाखाली आणला. 

·         सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्तापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा दूसरा राजा होय. 

अल्लाउद्दीन खिळजीचा साम्राज्य विस्तार :-

·         सन 1299 मध्ये त्याने गुजरातवर आक्रमण करून गुजरातवर सत्ता प्रस्तापित केली. 

·         त्यानंतरच्या काळात राजपुताना, मेवाड, माळवा व राजस्थानवर ताबा मिळविला. 

·         सन 1306 मध्ये त्याचा सेनापती मलिक कफुरने दक्षिणेकडे मोहीम काढून दिवगिरी, तेलंगणा, मुदराईवर ताबा मिळविला. 

·         अशाप्रकारे अल्पावधीतच संपूर्ण भारत नियंत्रणाखाली आणला. 

अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील सुधारणा :-

महसूल व्यवस्थेत सुधारणा :-

·         अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून जमिनीच्या उत्पादकेनुसार शेतसारा निश्चित केला.

बाजार नियंत्रण व्यवस्था :-

·         सैन्यास खाद्यन्न आणि आवश्यक गरजेच्या वस्तु योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियंत्रित बाजार व्यवस्था सुरू केली. 

·         या मालाचे भाव सरकारमार्फत निश्चित केले जात असे. 

·         त्याकरिता त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता.

गियासुद्दीन तूघलक (सन 1320 ते 1325) :

·         अल्लाउद्दीन खिलजीच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा ख्रुस्त्रो खान सत्तेत आला. 

·         वायव्य सरहद्द प्रांताचा प्रांधिकारी गियासुद्दीन तुघलकने ख्रुस्त्रोखानचा खून करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि तुघलक वंशाची स्थापना केली. 

·         हे सुख त्याला फार दिवस उपभोगता आले नाही. 

·         त्याचा मुलगा महंमदबिन तुघलकने कपटाने त्याला ठार करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली.

महंमदबिन तुघलक (सन 1325 ते 1351) :-

·         महंमदबिन तुघलक हा उतावीळ्या स्वभावाचा आणि व्याहारकी दृष्टीकोणाच्या अभावामुळे त्या राबवितांना त्यास अपयश आले. 

दूआबमध्ये करवृद्धी (सन1326) :-

·         दूआब भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. या प्रांतातील शेतकर्‍यांवर कराची वाढ केली. 

·         ही योजना लागू करतांना दूआबमध्ये दुष्काळ पडला आणि अधिकार्‍यांनी जबरदस्तीने कराची वसूली केली. यामुळे दूआबमध्ये बंड झाले. 

देवगिरी भारताची राजधानी (1326) :-

·         दिल्लीचा बादशहा महंमदबिन तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवरती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली.

·         सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह दिवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले. 

·         परंतु, दौलताबाद येथे साधंनाचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले. 

·         या काळात देवगिरीला भारताच्या राजधानीच सन्मान प्राप्त झाला होता.

चलन व्यवस्थेत सुधारणा (सन 1329) :-

·         महंमदबिन तुघलकने मुद्रापद्धतीत सुधारणा करून तांब्याची मुद्रा प्रचारात आणली आणि सोन्याच्या मुद्रेच्या मोबदल्यात तांब्याची नाणे चलनात आली. 

·         लोकांनी घरीच टाकसाळ सुरू केला. 

·         बाजारात तांब्याच्या चलनाचा सुळसूळाट होवून सोन्याची नाणी गायब झाली.

फिरोझशहा तुघलक (सन 1351 ते 1388) :-

·         महंमदबिन तुघलक नंतर त्याचा मुलगा फिरोझशहा तुघलक सुलतान झाला. हा उत्तमप्रशासक होता. त्याने लोककल्याणाची काम सुरू केली यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला होता. 

·         त्याने लोकांना जाचक असलेले कर रद्द करून फिरोझपूर, जौनपूर, हिस्सार व फिरोझाबाद ही नवीन शहरे बसविली सतलज आणि यमुना नदीवर कालवे काढले. 

·         फिरोजशहा तुघलक नंतर सत्तेत आलेले तुघलक घराण्याचे वारस कमकुवत निघाले. 

·         सन 1398 मध्ये मध्य आशियाचा सरदार तैमुलंगने भारतावर स्वारी करून प्रचंड लूट केली. या लुटीमधून दिल्ली महंमदबिन तूघलकने सुद्धा सुटली नाही. 

·         त्यानंतर सन 1414 मध्ये तूघलक घराण्याची सत्ता संपूष्ठात आली.

विजयनगर व बहमनी राज्ये

1. विजयनगरचे साम्राज्य :-

·         दिल्लीच्या सुलतान महंमद तुघलकच्या संशयित स्वभावामुळे प्रांताधिकारी नाराज झाले. या घटनेमुळे तुघलक साम्राज्याचा विघटनास सुरवात झाली.

·         या विघटनामधूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. 

·         सन 1336 मध्ये हरीहर आणि बुक्का या दोन भावांनी दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य स्थापित केले. हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.

विजयनगर साम्राज्याचे राजे :-

·         विजयनगर साम्राज्यात खालील पराक्रमी राजे होवून गेले.

हरीहर व बुक्का :-

·         हे दोन्ही बंधु पराक्रमी होते. त्यांनी दक्षिणेत तुंगभद्रा नदीपासून तेकेरळपर्यंतचा भाग आपल्या अधिकाराखाली आणला. 

·         त्यानंतर आलेल्या बुक्काने रामेश्वरपर्यंत विजयनगर साम्राज्याचा विस्तार केला. 

·         त्यानंतरच्या काळात त्यांना बरीचशी वर्षे बहमनी साम्राज्यासोबत संघर्ष कारअवी लागली.

कृष्णदेवराय :-

·         कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात पराक्रमी राजा होवून गेला. 

·         त्याने ओडिशाच्या राजाचा पराभव करून विजयवाडा आणि राजमेहंद्रीचा प्रदेश आपल्या राज्यात सामील केला.

·         या राज्याच्या काळात विजयनगरचे साम्राज्य दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत आणि उत्तरेस रायचूर पर्यंत पसरले होते.

विजयनगर साम्राज्याच्या सांस्कृतिक विकास :-

·         विजयनगरचे राजे कला व साहित्याचे भोक्ते होते. तेलंगू भाषेतील साहित्याचा विकास यांच्याच काळात झाला. 

·         आमुक्तमाल्यदा हा तेलंगू ग्रथ यांच्याच काळात निर्माण झाला. 

·         विजयनगरमधील हजार राम मंदिर आणि पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर याच काळात बांधल्या गेले.

तालिकोटची लढाई (सन 1565) :-

·         कृष्णदेवरायनंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरली कळा लागली. सन 1565 मध्ये कर्नाटकच्या तालीकोट येथे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निझामशाही, गोवळकोंड्यांची कुतूबशाही आणि बिरुदची बिरुदशाही या चारही सत्तेने एकत्र येवून विजयनगरच्या राजा रामरामराचा पराभव केला आणि हंपी शहराचा विध्वंस केला. 

·         आजही हंपी येथे असलेले उध्वस्त अवशेष विजयनगरच्या प्राचीन वैभवाची साक्ष देते.

2. बहमनी साम्राज्याची स्थापना -

महमंद-बिन-

·         तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्‍यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता. त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली. 

·         हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली.

·         बहमनी वंशात खालील राजे होवून गेले.

हसन गंगू (1347 ते 1358) -

·         गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली.

मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) -

·         हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या. 

·         या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती.

मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) -

·         सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला. 

·         त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता.

फिरोजशहा (सन 1397 ते 1422) -

·         या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे.

·         यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले. 

·         याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला.

हुमायू (1457 ते 1461) -

·         सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.

·         बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्‍हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली.

मुघल साम्राज्याचा उदय

1. बाबर (सन 1526 ते 1530) :

·         बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होय. दिल्लीमध्ये रब्राहीम लोदी सत्तेत असतांना पंजाबच्या प्रांताधिकारी दौलतखान लोदीने बाबरला भारतात आक्रमण करण्यास पाचारण केले. 

·         बाबरने सन 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोदीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या साम्राज्याला राजपुतान्यातील राजपूतांनी आव्हान दिले. 

·         सन 1527 मध्ये खुनव्याच्या लढाईत बाबरने संघटीत राजपुतांचा पराभव केला आणि आपली दिल्लीची सत्ता मजबूत केली.

2. हुमायूम (सन 1530 ते 1555) :

·         बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायूम सत्तेत आला. 

·         बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला. 

·         यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्‍या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्‍यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली. 

·         पुढे हुमायूमला सत्तेविना भटकंती करावी लागली.

3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-

·         सन 1540 मध्ये चौसाच्या लढाईत शेरशहा सुरीने हुमायूमचा करून सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या. 

जमीन महसूल सुधारणा: -

·         शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला. 

रस्ते बांधणी :-

·         राजधानीला जोडणार्‍या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले. दिल्ली अमृतसर राजमार्ग त्याच्याच काळात पूर्ण झाला. 

चलन व्यवस्था :-

·         त्याने रुपया हे नाणे सुरू केले. 

टपाल व्यवस्था :-

·         राजधानी मध्ये टपाल व्यवस्था सुरू केली.

4. हुमायूम (सन 1555 ते 1556) :

·         हुमायूमला शेरशहा सूरी सत्तेत असेपर्यंत काहीही करता आले नाही. 

·         शेरशहा सूरीच्या मृत्यूनंतर मुहम्मद आदिलशहा सत्तेत आला. हा विलासी राजा होता. 

·         सन 1555 मध्ये सिकंदर सूरी चा पराभव करून सूरी वंशाची सत्ता संपुष्टात आणली आणि दिल्लीवर पुन्हा आपला ताबा मिळविला. परंतु, त्यास ही सत्ता फार दिवस उपभोगता आली नाही. 

·         सन 1556 मध्ये जिन्यावरुन घसरून मरण पावला.

5. अकबर (1556 ते 1606) :

·         सम्राट अकबराने अल्पावधीमध्येच अर्ध्या भारतावर आपली सत्ता स्थापित केली. 

·         राणा प्रतापच्या प्रखर विरोधामुळे मेवाड मात्र त्यास आपल्या साम्राज्यात सामील करता आले नाही. 

·         अकबर हा सहष्णू राजा होता. 

·         सर्व धर्माच्या लोकांना विश्वासात घेवून त्याने आपला साम्राज्य विस्तार केला. यामुळे तो सर्व लोकांमध्ये प्रसिद्धीला आला होता. 

महत्वाच्या सुधारणा :-

·         त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली. 

·         सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. 

·         हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला. 

·         बालहत्या प्रथा बंद केली. 

·         सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली. 

कला व विद्याप्रेमी :-

·         अकबराच्या काळात आगर्‍याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला. 

·         अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले. 

·         अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले. 

·         तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले. 

·         अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.

6. जहांगीर (1606 ते 1627) :

·         अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर सत्तेमध्ये आला. त्याने अकबराचे राज्य विस्तारचे धोरणपुढे चालू ठेवले.

·         त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता. 

·         मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली. 

·         काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली. 

·         जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.

7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :

·         जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान गादिवर आला. त्याने दक्षिणकडे आपला राज्यविस्तार केला. 

·         त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली. 

·         अशाप्रकारे दक्षिणेकडे आपली सत्ता प्रस्तापित केली. 

·         शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आली लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.

8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :

·         सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडला असता त्याने शहाजहानला नजरकैदेत टाकून स्वत:ला सम्राट घोषित केले. 

·         औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. औरंगजेब हा सुन्नी विचाराचा असल्यामुळे व संशयी स्वाभावामुळे बरेचशे सरदार व अधिकारी दुखावल्या गेले. याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. 

·         औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही. 

·         शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. 

·         सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर-दूसरा यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले. अशाप्रकारे मुघल साम्राज्य संपूष्ठात आले.

महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास

1. देवगिरीचे यादव घराणे -

o    देवगिरीचे यादव घराणे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासातील सोनेरी पान म्हणून ओळखले जाते. 

o    यादव घराण्याच्या काळामध्ये मराठी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा मिळाला. 

o    देवगिरीचे यादव हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशातील असून या घराण्यातील राजा पाचवा भिल्लमने (सन 1178 ते 1193) देवगिरी येथे आपले राज्ये स्थापन केले. त्यानंतरच्या काळात देवगिरी येथे खालील पराक्रमी राजे होवून गेले. 

o    भिल्लम पाचवा (सन 1178 ते 1193) - या राजाने दिवगिरी येथे यादव घराण्याची सत्ता स्थापन केली. 

o    जतुनी उर्फ जैत्रपाल (सन 1193 ते 1210) हा पाचव्या भिल्लमचा मुलगा असून त्याने गुजरातमधील परमार आणि दक्षिणेतील चोळ राजाचा पराभव केला. 

o    सिंघम(सन 1210 ते 1247) - सिंघम या यादव घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा म्हणून ओळखला जातो. सिंघमने नर्मदा ते तुंगभद्रेपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता. 

o    महादेव (सन 1260 ते 1271) - महादेव हा कृष्ण याचा सर्वात लहान मुलगा होता. 

o    रामदेवराय (सन 1271 ते 1310) - महादेवाच्या निधनांतर त्यांचा मोठा भाऊ रामदेवराय सत्तेत आला. रामदेवरायने राज्यसत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या राज्याचा विस्तार अर्ध्या भारतावर केला होता. 

o    शंकरदेव (सन 1310 ते 1312) - सन 1310 मध्ये रामदेवराय मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा शकरदेव सत्तेमध्ये आला. शंकरदेवने अल्लाउद्दिनला खंडणी पाठविणे बंद केले. यामुळे अल्लाउद्दीनचा सेनापती मालिक काफुरने सन 1312 मध्ये शंकरदेवचा पराभव करून देवगिरीचे राज्य खिलजी साम्राज्यात केले. त्यानंतर शिवाजी महाराजाची राज्यसत्ता स्थापन होईपर्यंत महाराष्ट्रात मुस्लिमांची सत्ता होती. 

o    अल्लाउद्दीन नंतरचे राजे - अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून महाराष्ट्रावर मुस्लिमांच्या सत्तेला सुरुवात झाली. अल्लाउद्दीन खिलजीनंतर दिल्लीच्या तख्तावर मालिककाफुर, मुबारक खिलजी, गियासुद्दीन तुघलक व शेवटी महमंद-बिन-तुघलक इत्यादि सत्ताधीश आले. 

o    देवगिरी भारताची राजधानी (1326) - दिल्लीचा बादशहा महमंद-बिन-तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवर्ती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली. सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह देवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले. परंतु, दौलताबाद येथे साधनांचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले. या काळात देवगिरीला भारताचा राजधानीचा सन्मान प्राप्त झाला होता.     

2. बहमनी साम्राज्याची स्थापना -

o    महमंद-बिन-तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्‍यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता. 

o    त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली. 

o    हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली. बहमनी वंशात खालील राजे होवून गेले. 

o    हसन गंगू (1347 ते 1358) - गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली. 

o    मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) - हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या. या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती. 

o    मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) - सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला. त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता. 

o    फिरोजशहा (सन 1397 ते 1422) - या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे. यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले. याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला. 

o    हुमायू (1457 ते 1461) - सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.

 

3. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र -

o    बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्‍हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली. हे राजे सत्तासंघर्षांकरिता आपआपसात लढाया करीत असे. 

o    या कामाकरिता हे राजे लोक मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेत असे. यामुळे महाराष्ट्रात अनेक पराक्रमी घराने उदयास आली. 

o    त्यात सिंधखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले पराक्रमी घराने होते. या सर्वामध्ये भोसले घराण्याचा विशेष दबदबा होता. 

o    कोणताही मराठा सरदार सुलतानकडे गेला की, सुलतान त्यास चाकरीत ठेवत असे व त्यास सरदारकी व जहागिरी देत असे.

o    हे सरदार जहागिरीवर खुश असे आणि स्वत:ला राज्यासारखे समजत असे. 

o    शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी भोसले घराण्यात खालील व्यक्ति प्रसिद्धीस आल्या. 

o    बाबाजीराजे भोसले - बाबाजी भोसले हे भोसले घराण्याचा मूळ पुरुष मनाला जातो. त्यांच्याकडे वेरूळ गावची पाटिलकी होती. त्यांना मालोजीराजे व विठोजीराजे असे दोन मुले होती.

o    मालोजीराजे भोसले - मालोजीराजे भोसले घराण्यातील पहिला पराक्रमी पुरुष मनाला जातो. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. त्यांना शहाजीराजे व शरीफजी असे दोन मुले होती. शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले. 

o    शहाजीराजे भोसले - भोसले घराण्यातील सर्वात पराक्रमी व्यक्ति म्हणून शहाजीराजे ओळखले जातात. निजामाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांच्या नावे करून दिली. सन 1664 मध्ये शिकारीच्या प्रसंगी शहाजीराजेंचे निधन झाले.

o     

4. हिंदवी स्वराज्याची स्थापना -

o    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्यावर झाला. 

o    शिवनेरी किल्यातील शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 

o    शहाजी महाराजांनी जिजामाता व शिवाजीराजे यांचेकडे पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी सोपविली. त्यापूर्वी ही जबाबदारी दादाजी कोंडदेव यांच्या कडे होती. 

o    ते कोढाण्याचे सुभेदार होते व शहाजीराजांचे इनामी सेवक होते. 

o    शहाजीराजे व जिजामातेवर त्याची निष्ठा होती. 

o    पुण्यातील जहागिरीचा कारभार - पुण्यात शिवाजी महाराज व जिजामाता यांना राहण्याकरिता लाल महाल बांधण्यात आला. 

o    स्वराज्याची स्थापना (सन 1645) - जिजामातेने शिवाजी राजांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. सन 1645 मध्ये शिवाजी महाराज व दादाजी नरसप्रभू, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, कान्होजी जेधे इत्यादि सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. 

o    राजधानीची स्थापना - स्वराज्याच्या स्थापनेनंतर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा व रोहिंडा हे किल्ले ताब्यात घेतले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी निवडली. 

o    प्रतापगडची लढाई (सन 1659) - शिवाजी महाराजांचा हा प्रताप पाहून आदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला व या कामगिरीवर वाईचा सुभेदार अफजलखानास पाठविण्यात आले. नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यात झालेल्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांकडून खान मारला गेला. या भेटीत वेडा सय्यदच्या हल्यापासून जिवा महालने महाराजांना वाचविले. 

o    सिद्दी जौहरची स्वारी (सन 1660) - सन 1660 मध्ये आदिलशाहाने कर्नुल प्रांताचा सरदार सिद्दी जौहर याच महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. आदिलशहाने त्यास सलाबतखान हा किताब दिला होता. यावेळी शिवाजी महाराज पन्हाळयावर होते म्हणून सिद्दीने प्रचंड फौजेनिशी पन्हाळ्यात वेढा घातला. सिद्दी जौहरची नजर चुकवून शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले. विशालगडाकडे कूच केले. 14 जुलै 1660 रोजी महाराज आपल्या सवगंड्यासहित विशालगडावर जात असतांना बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या निवडक सहकार्‍यांना सोबत्यासह गजापुरजवळील घोडखिंडीमध्ये सिद्दी जौहरच्या सेनेसोबत झुंज दिली व या लढाईत ते धारातीर्थी पडले. आज ही खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते. 

o    मुघलांशी संघर्ष -

o    शाहीस्तेखानची स्वारी (सन 1660) - याच काळात औरंजेबाने प्रचंड फौजेनिशी शहिस्तेखानास स्वराज्यावर आक्रमण करण्यास पाठविले. तीन वर्षे त्याचा मुक्काम पुण्याच्या लाल महालमध्ये होता. शिवाजी महाराजांनी एप्रिल 1663 मध्ये आपल्या सवंगड्यासह रात्री लाल महालात प्रवेश करून शहिस्तेखानाची बोटे छाटली. 

o    मिर्झाराजे जयसिंग (सन 1665) - शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरिता औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना महाराष्ट्रात पाठविले. मिर्झाराजे जयसिंगने महाराष्ट्रात आल्यानंतर सेनेनिशी पुरंदरला वेढा दिला. 

o    आग्रावरून सुटका (सन 1666) - तहानुसार महाराजांनी औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्रास भेट देण्याचे काबुल केले आणि आग्र्यात महाराजांच्या संरक्षणाची जाबाबदारी मिर्झाराजे यांचा मुलगा रामसिंगने स्वीकारली. 5 मार्च 1666 रोजी शिवाजी महाराज राजपुत्र संभाजी, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, हिरोजी फर्दर, मदारी मेहतर, प्रतापराव गुर्जर व बर्हीजी नाईक इत्यादिस सहकार्‍यांना घेवून ते आग्रास पोहचले. 18 ऑगस्ट 1666 रोजी महाराज बादशाच्या हातावर तुरी देवून महाराष्ट्रात परतले. सन 1670 मध्ये तानाजी मालसरेंनी प्राणाची बाजी लावून कोंढाणा जिंकला. 

5. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक (सन 1674) -

o    स्वराज्य स्थापन करण्यात आले हे जगजाहीर व्हावे म्हणून शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर आपला राज्यशिषेक करवून घेतला. 

o    काशीचे पंडित गागाभट्ट यांनी राज्यशिषेक समारंभाचे पौरोहित्य केले. या दिवसापासून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. 

o    सोन्याचा होन व तांब्याची शिवराई नाणे सुरू करण्यात आले. 

o    शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार केला. 

o    अष्टप्रधान मंडळ - राज्यभिषेकच्या निमित्ताने स्वराज्याच्या राज्यकारभार चालविण्याकरिता अष्टप्रधान मंडळ स्थापन करण्यात आले आणि प्रत्येकावर स्वतंत्र जाबबदारी सोपविण्यात आली. 

o    मुलकी व्यवस्था - शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बारा सुभ्यामध्ये राज्याची विभागणी केली आणि प्रत्येक सुभ्यावर सुभेदार नावाचा अंमलदार नेमला. 

o    सैन्य व्यवस्था - स्वराज्याच्या संरक्षणार्थ महाराजांनी घोळदळ व पायदळ हे सैन्य विभाग तयार केले आणि सागरी किनार्‍याच्या संरक्षणाकरिता आरमार उभारले. 

o    किल्याची व्यवस्था - शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्याकडे 300 च्यावर किल्ले होते. त्या किल्याच्या संरक्षणाकरिता किल्लेदार, सबनीस व कारखानीस इत्यादि अधिकारी नेमले. 

6. दक्षिणेची मोहीम (1677) -

o    राज्यभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी राज्यविस्ताराच्या उद्देशाने दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली. 

o    यामोहिमेत त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशासोबत मैत्रीचा तह केला. 

o    कर्नाटकाच्या मोहिमेत त्यांनी जिंजी व वेल्लोर जिंकले. 

o    उत्तरेकडील हिंदी कवि भूषण यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर शिवराज भूषण या नावाने काव्य लिहिले. 

o    दक्षिणेच्या मोहिमेत दगदग झाल्याने ज्वराने आजारी पडून 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाले.

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

1. यूरोपियन - कोलंबस

·         राष्ट्र - स्पेन 

·         वर्ष - 1493 

·         वखारी - त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला. 

2. यूरोपियन - वास्को-डी-गामा

·         राष्ट्र - पोर्तुगल

·         वर्ष - 1498 

·         वखारी - कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन) 

3. यूरोपियन - कॅप्टन हॉकीन्स

·         राष्ट्र - ब्रिटिश

·         वर्ष - 1607 

·         कंपनी - ईस्ट इंडिया कंपनी

·         वखारी - पहिली वखार सूरत येथे स्थापन केली. 

4. यूरोपियन - हृहृ

·         राष्ट्र - डच

·         वर्ष - 1602 

·         कंपनी - युनायटेड ईस्ट इंडिया 

·         वखारी - सूरत, मच्छलीपट्टणम, नागपट्टणम, वेगूर्ला

5. यूरोपियन - हृहृ

·         राष्ट्र - फ्रेंच

·         वर्ष - 1664 

·         कंपनी - फ्रेंच ईस्ट इंडिया 

·         वखारी - सूरत, मच्छलीपट्टणम, पोंडेचेरी, चंद्रनगर, कोरोमंडल इत्यादि ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या.

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

·         भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 

·         प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 

·         बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 

·         अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 

2. सर वॉरन हेस्टिंग (सन 1772 ते 1773) :-

·         सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. 

भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले. 

3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

·         लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 

4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

·         लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 

·         तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 

·         सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 

5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

·         मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली. 

·         जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली. 

6. लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-

·         लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला. 

·         भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

·         इंग्रज अधिकारी सर अॅलन ह्युम यांनी सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. या संघटनेची पहिली बैठक डिसेंबर 1885 मुंबई येथे बोलाविण्यात आली. 

·         राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 रोजी गवालिया टॅंक जवळील गोकूळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले होते. 

·         कलकत्याचे प्रसिद्ध वकील ओमेशचंद्र बॅनर्जी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 

·         या अधिवेशनाला देशाच्या कानाकोपर्‍यातून एकूण 72 प्रतीनिधी हजर होते.

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :

·         1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 

·         1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 

·         1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष 

·         1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष

·          

·         1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष

·          

·         1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले. 

·         1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले. 

·         1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. 

·         1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली. 

·         1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला. 

·         1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला. 

·         1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

·         1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला. 

·         1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

·         1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले. 

·         1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 

·         1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. 

·         1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला. 

·         1928 - कलकत्ता - मोतीलाल नेहरू - नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली. 

·         1929 - लाहो - पं. जवाहरलाल नेहरू - संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. 

·         1931 - कराची - सरदार पटेल - मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला. 

·         1936 - फैजपूर - जवाहरलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले. 

·         1938 - हरिपुरा - सुभाषचंद्र बोस - 

·         1939 - त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस -

·         1940 - रामगढ - अब्दुल कलाम आझाद - वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली. 

·         1940 - मुंबई - मौ. अब्दुल आझाद - चलेजाव आंदोलनाची घोषणा. 

·         1946 - मिरत - जे. बी. कृपालानी - 

·         1947 - दिल्ली - डॉ. राजेंद्रप्रसाद - भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

टिळक युगातील महत्वाच्या घटना

1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :

·         सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती. 

·         शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्‍याची नियुक्ती केली. 

·         रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला. 

·         ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली. 

·         न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली. 

·         भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.

2. बंगालची फाळणी (1905) :

·         लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 

·         बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले. 

·         बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले. 

·         आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली. 

·         टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले. 

·         सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.

3. टिळकांना शिक्षा :

·         ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले. 

4. होमरूल लीग चळवळ :

·         डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली. 

·         थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली. 

·         सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले. 

·         लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली. 

·         बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.

5. टिळकांचे निधन :

·         लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰

·         या कायद्यानुसार घेण्यात येणार्‍या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती. 

·         एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. 

·         भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.

गांधी युगातील महत्वाच्या घटना

गांधी युगाचा उदय :

·         सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 

·         आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 

·         जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 

·         जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :

·         भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 

चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -

·         चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 

साराबंधी चळवळ (सन 1918) -

·         1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 

·         गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 

·         शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 

·         हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -

·         भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 

·         या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 

·         या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 

·         हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 

·         13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 

·         या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

2. असहकार आंदोलन :

·         डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

·         सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 

·         फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 

·         या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

·         या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

·         सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 

·         असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 

·         काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.

4. सायमन कमिशन (1928) :

 

·         भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 

·         या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 

·         या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 

·         या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.

5. नेहरू रिपोर्ट (1928) :

·         भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 

·         राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 

·         नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.

6. सविनय कायदेभंग आंदोलन :

·         1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 

·         या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

·         26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

·         सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 

·         12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 

·         385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 

·         यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 

·         महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.

·         सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 

·         6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 

·         आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

·         सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 

·         महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 

·         विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

·         क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 

·         14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 

·         8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 

प्रति सरकारे -

·         इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 

·         प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

·          

·         चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 

·         महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 

सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -

·         सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती. 

·         या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 

भारतीय सैनिकाचा उठाव -

·         चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

·         या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 

·         नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 

·         सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

·         सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 

·         मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 

त्रिमंत्री योजना (सन 1946) -

·         या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 

·         या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजनाम्हणून प्रसिद्ध आहे. 

हंगामी सरकार -

·         त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 

माऊंट बॅटन योजना -

·         24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 

·         भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 

·         3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 

·         मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

सायमन कमिशन बद्दल माहिती

·         1919 च्या सुधारणा कायद्यात येणार्‍या अडचणी व निर्माण होणारे दोष यांचा विचार करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये समिती नेमली होती. 

·         नोव्हें. 1927 मध्ये कमिशन नेमले गेले 

·         सात सदस्यीय या कमिशनात एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी कमिशनवर बहिष्कार घातला. 

·         3 फेब्रुवारी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले. 

·         पंजाब मध्ये सायमन कमिशनला विरोध लाला लजपतराय यांनी केला. 

·         1930 रोजी सायमन कमिशनचा अहवाल जाहीर.

गोलमेज परिषद बद्दल माहिती

·         सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.

·         वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.

·         नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.

·         1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष - पं. जवाहरलाल नेहरू.

·         सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)

·         12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.

·         साबरमती ते दांडी अंतर - 385 कि.मी.

·         6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.

·         धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)

·         याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.

·         या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)

·         पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.

·         काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.

·         गांधी आयर्वीन करार - 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.

·         दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास

·         सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932

·         सविनय कायदेभंगाची समाप्ती - 1934

·         17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.

·         विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.

·         24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.

·         तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.

·         सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.

ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ

ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ

·         ऑगस्ट 1940 मध्ये दुसर्‍या महायुद्धात काँग्रेसचे सहकार्य मिळविण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी एक घोषणा केली. त्यानुसार गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदी प्रतिनिधींचा समावेश व कार्यकारी मंडळाचा विस्तार करण्याची आश्वासने दिली होती. 

·         ऑगस्ट घोषणेत-युद्धानंतर स्वातंत्र्य देणे, गव्हर्नर जनरलच्या अनिर्बंध सत्तेवर नियंत्रणे घालणे, वसाहतीच्या स्वराज्याचे स्पष्ट आश्वासन देणे इ. गोष्टीचा समावेश नसल्याने काँग्रेसने हि योजना फेटाळली. 

·         ऑक्टोबर 1940 मध्ये म.गांधीजीच्या आदेशानुसार वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू झाली. 

·         वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही-विनोबा भावे, दुसरे पं. नेहरू होते.

 क्रिप्स योजना :

·         मार्च 1942 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांनी भारतमंत्री सर स्ट्रफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात पाठविले. 

·         21 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली. 

·         युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा देण्याची तरतूद या योजनेत होती. 

·         क्रिप्स योजना काँग्रेससह सर्वच पक्षांनी फेटाळून लावली. 

·         गांधीजीनी क्रिप्स योजनेला 'बुडत्या बॅकेचा पुढील तारखेचा चेक' अशी उपाधी दिली.

लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)

·         जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी 

·         1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे

·         1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 

·         1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 

·         1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ 

·         1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती. 

·         1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.

·         1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका 

·         1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न. 

·         1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला. 

·         1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.

म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)

·         जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात) 

·         इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली. 

·         1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये

·         गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले. 

·         गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले. 

·         1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला. 

·         पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली. 

·         1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह) 

·         1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी) 

·         1918 - अहमदाबाद गिरणीतील संप 

·         1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला. 

·         1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष 

·         1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ 

·         1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.

·         1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.

·         1940 - वैयक्तिक सत्याग्रह

·         1942 - 'चलेजाव' ची घोषणा

·         1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या

·         दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना

·         सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला. 

·         सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले. 

·         सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

·         नेताजींनी 1940 मध्ये 'फॉरवर्ड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. 

·         डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले. 

·         जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली. 

·         नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते. 

·         नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे 'स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार' स्थापन केले. 

·         सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले. 

·         आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या. 

·         सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते. 

·         आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील 'अंदमान व निकोबार' ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे 'शहीद व स्वराज्य' असे केले. 

·         आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला. 

·         18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.

विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी (1883-1966)

·         जन्म 1883, भगूर (जि. नाशिक)

·         प्रभाव - इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी 

·         विचार - ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही. 

·         1900 - पुण्यात 'मित्रमेळा संघटना' स्थापना केली. 

·         1904 - मित्रमेळ्याचे रूपांतर 'अभिनव भारत' संघटनेत. 

·         1906 - 'शिवाजी स्कॉलरशिप' मिळवून इंग्लंडला शिक्षणासाठी गेले. 

·         वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले. 

·         सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले. 

·         1908 - सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास 'नाशिक खटला' असे म्हणतात. 

·         अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली. 

·         न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. 

·         1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली. 

·         वि.दा. सावरकरांनी 'भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने', हिंदू पदपादशाही, 'माझी जन्मठेप', 'हिंदुत्व' '1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध' इत्यादीचे लिखान केले.

वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी

·         यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.

·         वासुदेव फडक्यांनी 1879 मध्ये रामोशी, कोळी, ठाकर अशा जमतीच्या लोकांना हाताशी धरून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

·         सार्वजनिक काकांनी फडक्याचे वकीलपत्र घेतले होते.

·         जानेवारी 1880 मध्ये वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

·         17 फेब्रुवारी 1883 रोजी फडक्यांचे क्षय रोगाने एडनच्या तुरुंगात निधन झाले.

 चाफेकर बंधु

·         1896-97 मध्ये दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी पुण्यात व्यायाम मंडळाची स्थापना केली.

·         1897 मध्ये पुण्यात ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती.

·         22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूनी जुलमी प्लेग कमिशनर रॅड व इंग्रज अधिकारी आर्यहस्ट यांची हत्या केली.

·         द्रवीड बंधूनी रॅड हत्या कटाची माहिती सरकारला दिली.

·         चाफेकर बंधूना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.

·         वासुदेव चाफेकर व महादेव आपटे यांनी द्रवीड बंधूची हत्या केली.

 दहशतवादाच्या उदयाची कारणे :

1.      इ.स. 1857 ची प्रेरणा

2.      प्रबोधन चळवळ

3.      युरोपातील घटना

4.      बंगालची फाळणी

5.      रशिया जपान युद्ध

6.      प्रखर राष्ट्रवाद

7.      राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल

8.      इंग्रजी भाषा

9.      इंग्रज अधिकार्‍यांचे उद्दात वर्तन

10.  अहिंसात्मक तत्वज्ञान

11.  क्रांतीकारकांचे आदर्श

12.  जहालाची कार्यप्रणाली

ईस्ट इंडिया कंपनीवर भारताची सत्ता

·         मुंबईतील उद्योगपती संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीची खरेदी केली आहे.

·         तसेच यात त्यांनी कंपनीचे समभाग खरेदी करून 15 दशलक्ष डॉलर एवढी मोठी रक्कम देऊन ते आता कंपनीचे मालक झाले आहेत. 

·         संजीव मेहता यांनी 'ईस्ट इंडिया कंपनी' चे मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी केले आहेत. 

·         संजीव यांनी 40 भागधारकांकडून ही हिस्सेदारी खरेदी केली आहे. 

·         ईस्ट इंडिया कंपनी आता नवीन व्यवसायांना सुरुवात करणार आहे. 

·         ई-कॉमर्स माध्यमातून देखील विक्री सुरू केली जाणार आहे. 

·         इ.स. 1600 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. 

·         1757 च्या प्लासीच्या लढाईचे ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया घातला, तर 1764 बक्सारच्या लढाईने सत्तेचा पाया भक्कम केला होता. 

·         1 नोव्हेंबर 1858 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील सत्ता संपुष्टात आली.

आधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती

·         माजी सनदी अधिकारी अॅलन ओक्टिव्हि हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.

·         मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72प्रतिनिधी उपस्थित राहिले. 

·         डिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्‍याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले. 

·         राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी

·         राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता. 

·         1888 साली 'ब्रिटिश समितीची' स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने 'इंडिया' नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले. 

·         1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' या सभागृहासाठी निवडून आले. 

·         1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली. 

·         1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.

·         1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची 'भारताचा व्हॉईसरॉय' म्हणून नेमणूक झाली. 

·         कर्झनने 1901 मध्ये 'पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा' पास करून कर्जबाजारी शेतकर्‍यांची कर्जे माफ केली. 

·         1904 मध्ये 'सहकारी पतपेढी कायदा' करून शेतकर्‍यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.

·         कृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने 'इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर' नेमले. 

·         1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.

·         1903 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली. 

·         पोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले. 

·         1901 मध्ये 'Imperial cadet core' ची स्थापना कर्झनने केली - (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता) 

·         कोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ 'व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल' कर्झनने बांधला.

·         1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला. 

·         1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.

आधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती

·         माजी सनदी अधिकारी अॅलन ओक्टिव्हि हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.

·         मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72प्रतिनिधी उपस्थित राहिले. 

·         डिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्‍याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले. 

·         राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी

·         राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता. 

·         1888 साली 'ब्रिटिश समितीची' स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने 'इंडिया' नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले. 

·         1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' या सभागृहासाठी निवडून आले. 

·         1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली. 

·         1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.

·         1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची 'भारताचा व्हॉईसरॉय' म्हणून नेमणूक झाली. 

·         कर्झनने 1901 मध्ये 'पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा' पास करून कर्जबाजारी शेतकर्‍यांची कर्जे माफ केली. 

·         1904 मध्ये 'सहकारी पतपेढी कायदा' करून शेतकर्‍यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.

·         कृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने 'इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर' नेमले. 

·         1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.

·         1903 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली. 

·         पोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले. 

·         1901 मध्ये 'Imperial cadet core' ची स्थापना कर्झनने केली - (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता) 

·         कोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ 'व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल' कर्झनने बांधला.

·         1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला. 

·         1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.

इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे भाग 1

·         वृत्तपत्रे व मासिके - संपादकाचे नाव 

·         तत्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर 

·         व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार - दादाभाई नौरोजी 

·         न्यू इंडिया - विपीनचंद्र पाल 

·         न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी 

·         नवजीवन समाचार - महात्मा गांधी 

·         इंडियन मिरर - डी.डी. सेन

·         द ईस्ट इंडियन - हेरी डेरोझिओ

·         इंडियन सोशलॉजीस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा 

·         नॅशनल हेरोल्ड - पंडित नेहरू 

·         इंडिपेडन्स - मोतीलाल नेहरू 

·         अल-हिलाल, अल-बलाध - मौलाना आझाद 

·         भारतमाता - अजित सिंग 

·         हिंदू - श्री सुब्रम्हण्यम अय्यर 

·         सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद

·         सोमप्रकाश - ईश्वरचंद विद्यासागर 

·         वंदे मातरम, पंजाबी पिपल - लाला लजपत रॉय

·         वंदे मातरम - मादाम कामा

·         संवाद कौमुदी - राजा राममोहन रॉय

·         मिरात-उल-अखबार - राजा राममोहन रॉय 

·         बॉम्बे क्रोनिकल - फिरोजशहा मेहता

·         युगांतर - भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष 

·         संध्या - भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय

इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे भाग 2

·         वृत्तपत्रे व मासिके - व्यक्तीचे नाव 

·         अमृतबझार पत्रिका - शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष 

·         वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू 

·         बंगाली - सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

·         हिंदुस्थान व्हयू - एस.पी. सिन्हा

·         अकबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल

·         हिंदूस्थान वकील - जी.पी. वर्मा 

·         कॉम्रेड, हमदर्द - मोहम्मद अली 

·         गदर - लाला हरदयाल

·         व्हॅनगार्ड - एम.एन. रॉय 

·         उद्बोधन - स्वामी विवेकानंद 

·         प्रबुद्ध भारत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

·         रिव्हॅल्युशनरी - सच्चिंद्रनाथ सन्याल

·         ब्रम्हबोधिली - उमेशचंद्र दत्त 

·         सुलभ समाचार - केशवचंद्र सेन 

·         बंग्लारकथा - सुभाषचंद्र बोस 

·         इंडिया - सुब्रमण्यम भारती 

·         लिडर - पंडीत मदन मोहन मालवीय

·         द इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी

·         इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र 

·         अबला बांधव - व्दारकानाथ गांगुली 

·         फ्री हिंदुस्थान - तारकानाथ दास

·          

·         जन्मभूमी - पट्टाभी सितारामय्या 

·         मुंबई समाचार - फरदुनजी मर्झाबान

इतिहासातील महत्वाची पुस्तके भाग 1

·         पुस्तके - लेखक 

·         होली संगम - विजयलक्ष्मी पंडीत 

·         द इंडियन स्ट्रगल - आचार्य कृपालानी

·         इंडियन विन्स फ्रिडम - मौलाना आझाद 

·         पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया - मौलाना आझाद 

·         गुबारे खातीर (पत्रसंग्रह) - मौलाना आझाद 

·         अ नेशन इन द मेकींग - सुरेंद्रनाथ बॅनर्जी 

·         आय. एम.ए. सोशलिस्ट - विवेकानंद 

·         व्हिलेजिअस प्रोब्लम इन इंडिया - अॅनी बेझंट 

·         इंडिया ए नेशन, हाऊ इंडिया फॉट फॉर इट्स फ्रिडम - अॅनी बेझंट 

·         द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स - अॅनी बेझंट 

·         इंडिया अँड दी एम्पायर - अॅनी बेझंट 

·         ग्लिम्पसेस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी - पं. जवाहरलाल नेहरू

·         हू लिव्हज, इफ इंडिया डाइज - पं. जवाहरलाल नेहरू 

·         अॅट द फिट ऑफ महात्मा गांधी - डॉ. राजेंद्र प्रसाद 

·         आनंदमठ, दुर्गेश नंदिनी - बकीमचंद्र चटर्जी 

·         व्हाय. आय. एम. अॅन अॅथीस्ट - भगतसिंग 

·         प्रिझन डायरी, समाजवादच का? - जयप्रकाश नारायण 

·         अस्वाब-ए-बगावत - सय्यद अहमद खान 

·         प्रेझेंट स्टेट ऑफ इंडियन पॉलिटिक्स - सय्यद अहमद खान 

·         लॉयल मॉहमेडन्स ऑफ इंडिया - सय्यद अहमद खान

इतिहासातील महत्वाची पुस्तके भाग 2

·         तहजीब-अल-अखलाक - सय्यद अहमद खान 
 

·         राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास - पट्टाभिसितारामय्या 

·         द व्हील ऑफ हिस्टरी - राम मनोहर लोहिया 

·         पाव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया - दादाभाई नौरोजी 

·         बंदीजीवन - सचिन्द्रनाथ संन्याल 

·         ब्रोकन विंग्ज, बर्ड ऑफ टाइम, गोल्डन थ्रेशहोल्ड - सरोजिनी नायडू 

·         नील दर्पण - दीनबंधू मित्र 

·         भारत दुर्दशा - भारतेन्द्रू हरिश्चंद्र 

·         माय एक्सपेरीमेंट विथ टूथ, हिंद स्वराज - महात्मा गांधी

·         साऊथ आफ्रिकाज फ्रिडम स्ट्रगल - युसूफ मोहम्मद दादु 

·         अनहॅपी इंडिया, इंडियन इन्फोर्मेशन ब्युरो, यंग इंडिया, इंग्ल ड्ज डेट टू इंडिया - लाला लजपतराय 

·         द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन - लाला लजपतराय 

·         द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया - लाला लजपतराय 

·         भवानी मंदिर - बारिन्द्र घोष 

·         गीतांजली - रविंद्रनाथ टागोर 

·         आय फॉलो द महात्मा - के.एस. मुन्शी 

·         विधवा विवाह (विडो मॅरेज) - ईश्वरचंद्र विद्यासागर 

·         इंडियन पॉलिटिक्स सिन्स म्युटिनी - सी.वाय. चिंतामणी 

·         आय.एन.ए. अँड इट्स नेताजी - शहानवाज खान 

·         रिव्हाव्हायिंग अवर डायिंग प्लॅनेट - सरला बेन

इतिहासातील महत्वाची पुस्तके भाग 3

·         माय इंडियन इयर्स - लॉर्ड हर्डिंग्ज

·         अखंड हिंदुस्थान - कन्हैयालाल मुन्शी

·         निहिलीस्ट रहस्य स्वदेशी रंग - रामप्रसाद बिस्मील 

·         वर्तमान रणनीती - अविनाश भट्टाचार्य 

·         बॉम्ब पोथी - सेनापती बापट

·         गांधीइझम:अॅन अॅनालिसिस - फिलीप स्प्रेट 

·         द अवेकनिंग ऑफ इंडिया - रॅम्से मॅकडोनाल्ड 

·         काँग्रेस मिनिस्ट्रीज अॅट वर्क - आचार्य जुगलकिशोर 

·         दी वे आऊट, 1943 - सी. राजगोपालाचारी 

·         इंट्रोडक्शन टू इंडियन पॉलिटिक्स - डब्ल्यू. सी. बॅनर्जी 

·         मेमॉयर्स ऑफ माय लाईफ अँड टाइम - बी.सी. पाल 

·         गव्हर्नमेंट ऑफ इंडिया - सी.पी. इल्बर्ट 

·         इंडियन अनरेस्ट - व्हॅलंटीन चिरोल 

·         इंडिया अॅज आय नो इट - मायकेल ओडवायर 

·         भारतीय मुसलमान, इंडिया अंडर ड क्वीन - विल्यम हंटर 

·         हू वेअर दी शुद्रास?, बुद्ध अँड हिस धम्म - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जगातील महत्वाच्या संस्था बद्दल माहिती

जगातील महत्वाच्या संस्था, आयोग व त्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे :  

·         संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल - बॉन की मुन

·         संयुक्त राष्ट्र संघाचे उपसेक्रेटरी जनरल - आशा रोझ निगिरो 

·         जागतिक बँकेचे अध्यक्ष - जॉन यंग किम

·         आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष - ख्रिश्टेन लिग्रेड

·         यूनेस्कोचे कार्यकारी संचालक - इरिना बोकोव्हा 

·         जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक - मार्गरेट चान

·         जागतिक अन्न व कृषी संघटनेचे कार्यकारी संचालक - जोज गाझियानो सिल्व्हा 

·         आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यकारी संचालक - जुआन सोमाविया 

·         युनिसेफचे कार्यकारी संचालक - अॅन्टोनी लेक 

·         संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाचे प्रशासक - हेलन कार्क 

·         अनकाड संघटनेच्या सेक्रेटरी जनरल - डॉ. सुछाई पंतचापकडी

·         आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष - एऑनी अब्राहम 

·         आशियन विकास बँकेचे अध्यक्ष - ताकेहितो नाकोवा 

·         कॉमनवेल्थचे सेक्रेटरी जनरल - कमलेश शर्मा 

·         आफ्रिकन विकास बँकेचे अध्यक्ष - डोनॉलडो कुरोडा

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 1

·         व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव

·         ज्ञानेश्वर - माऊली 

·         ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी - ज्ञानेश्वर 

·         माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) - तुकडोजी महाराज 

·         तुकाराम बोल्होबा आंबिले - तुकाराम 

·         नामदेव दामाजी शिंपी - संत नामदेव 

·         नारायण सूर्याजी ठोसर - समर्थ रामदास स्वामी 

·         डेबुजी झिंगरोजी जाणोरकर - गाडगेबाबा 

·         महात्मा गांधी - बापू, राष्ट्रपिता, महात्मा 

·         पंडित जवाहरलाल नेहरू - चाचा 

·         रविंद्रनाथ टागोर - गुरुदेव 

·         सुभाषचंद्र बोस - नेताजी

·         इंदिरा गांधी - प्रियदर्शनी, आर्यन लेडी

·         टिपू सुलतान - म्हैसूरचा वाघ 

·         भाऊराव पायगोंडा पाटील - कर्मवीर 

·         धोंडो केशव कर्वे - महर्षि

·         विठ्ठल रामाजी शिंदे - महर्षि 

·         देवेन्द्रनाथ टागोर - महर्षि 

·         पांडुरंग महादेव बापट - सेनापती बापट

·         शिवराम महादेव परांजपे - काळकर्ते

·         नरेंद्र दत्त - स्वामी विवेकानंद

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 2

·         व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव 

·         चक्रवर्ती राजगोपालाचारी - सी.आर., आधुनिक चाणक्य

·         मुरलीधर देविदास आमटे - बाबा आमटे 

·         अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर - ठक्करबाप्पा

·         राम मोहन - राजा/रॉय

·         शेख मुजीबूर रेहमान - वंग बंधु 

·         बापूसाहेब अणे - लोकनायक 

·         विनायक हरहर भावे - लोकनायक 

·         धुंडीराज गोविंद फाळके - दादासाहेब फाळके

·         मुळशंकर दयाळजी - दयानंद सरस्वती 

·         गदाधर चट्टोपाध्याय - रामकृष्ण परमहंस 

·         पंडित मदन मोहन मालवीय - महामान्य 

·         सरोजिनी नायडू - भारत कोकिळा

·         लाला लजपतराय - पंजाबचा सिंह 

·         बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य 

·         लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल - लाल, बाल, पाल

·         ज्योतिबा फुले - महात्मा 

·         दादा धर्माधिकारी - आचार्य 

·         बाळशास्त्री जांभेकर - आचार्य 

·         प्र.के. अत्रे - आचार्य

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 3

·         व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव 

·         वल्लभभाई पटेल - सरदार 

·         नाना पाटील - क्रांतिसिंह 

·         वि.दा. सावरकर - स्वातंत्र्यवीर 

·         डॉ. भिमराव रामजी आंबेडकर - बाबासाहेब 

·         गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 

·         दादाभाई नौरोजी - भारताचे पितामह 

·         शांताराम राजाराम वणकुद्रे - व्ही. शांताराम 

·         मंसूर अलीखान पतौडी - टायगर 

·         डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - मिसाईल मॅन 

·         सी.आर. दास - देशबंधू

·         लालबहादूर शास्त्री - मॅन ऑफ पीस 

·         सरदार पटेल - पोलादी पुरुष 

·         दिलीप वेंगसकर - कर्नल 

·         सुनील गावस्कर - सनी, लिट्ल मास्टर 

·         पी.टी. उषा - भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन

·         नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व 

·         नरसिंह चिंतामण केळकर - साहित्यसम्राट 

·         लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी - तर्क तीर्थ 

·         आचार्य रजनीश - ओशो

·         लता मंगेशकर - स्वरसम्राज्ञी

नेहरू रिपोर्ट विषयी माहिती

·         भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते. असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल. 

·         लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली. 

·         भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेजबदूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या. 

·         समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले. 

·         नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती. 

·         केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी 'संपूर्ण स्वातंत्र्य' या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला. 

·         महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते.  

 

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती

·         भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील. 

·         भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी. 

·         भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत. 

·         सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा. 

·         जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)

·         इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील. 

·         आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल. 
 

·         गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल. 

·         प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा. 

·         गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा. 

·         प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी

 

अलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या 'मुस्लिम अॅग्लो-ओरीएंट' कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसरॉय नार्थब्रुकने दिले.

 

सतत पडणार्‍या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली एक खास 'दुष्काळ समिती' नेमली होती. याच समितीच्या शिफारशीन्वये 1883 मध्ये 'दुष्काळ संहिता' तयार करण्यात आली.

 

लॉर्ड लिटनने इ.स. 1877 मध्ये दिल्ली येथे दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला 'भारताची सम्राज्ञी' किंवा 'कैसर-ए-हिंद' हा किताब दिला.

 

लॉर्ड लिटनने मार्च 1878 मध्ये 'व्हरनेक्यूलर प्रेस अॅक्ट' (देशी वृत्तपत्र कायदा) पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक बंधने लादली.

 

भारतीयांनी वरील कायद्याची 'मुस्कटदाबी कायदा' (The Gagging Act) अशी संभावना केली.

 

1879 मध्ये लॉर्ड लिटनने 'स्टॅट्युटरी सिव्हील अॅक्ट' पास करून सनदी सेवेचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर आणले.

 

लॉर्ड लिटनने अलिगड येथे स्थापन झालेल्या मुस्लिम विद्यापीठास प्रोत्साहन दिले.

 

लॉर्ड रिपन या उदारमतवादी व्हाईसरॉयची नियुक्ती लॉर्ड लिटननंतर झाली.

 

इ.स. 1881 मध्ये लॉर्ड रिपनने इंग्लंडप्रमाणे भारतात 'फॅक्टरी अॅक्ट' पास केला.

 

लॉर्ड लिटनने केलेला देशीवृत्तपत्रबंदी कायदा लॉर्ड रिपनने 19 जाने. 1881 रोजी रद्द करून मुद्रण स्वातंत्र्य दिले.

 

इ.स. 1854 मध्ये 'वुड समितीने' केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे पाहण्यासाठी लॉर्ड रिपनने 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 'हंटर समिती' नेमली.

 

लॉर्ड रिपनने 18 मे 1882 रोजी प्रत्येक प्रांतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी एक ठराव पास केला. त्यामुळे त्यास 'स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक' असे म्हटले जाते.

 

'इलबर्ट बिल' पास करून रिपनने मोठेच धाडस केले परंतु युरोपियनांच्या सामुहिक प्रतिकारामुळे ते अस्तित्वात येऊ शकले नाही.

 

लॉर्ड डफरिनच्या कारकिरर्दितील महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.

 

लॉर्ड डफरिनच्या काळात लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 मध्ये करण्यात आली.

1857 चा उठावाचे स्वरूप

 स्वातंत्र्य युद्ध - म्हणणारे व्यक्ती

वि.दा. सावरकर -

·         स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.

संतोषकुमार रे -

·         हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.

कर्नल मानसयन -

·         'परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती'.

डॉ. एस.एन. सेन -

·         'धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.'

 

बंड म्हणणारे व्यक्ती

 

सर जॉन लॉरेन्स -

·         'बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते'

सर जॉन सिले -

·         'उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.'

न.र. फाटक -

·         'शिपायांची भाऊगर्दी'

आर.सी. मुजूमदार -

·         इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.

डॉ. ईश्वरी प्रसाद -

·         'उत्तरेतील बंड'

1857 च्या उठावानंतरचा काळ

·         भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला. 

·         राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला. 

·         इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.

·         इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली. 

·         1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या 'इंडियन पिनल कोड' ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली. 

·         इ.स. 1861 मध्ये 'इंडियन हायकोर्ट अॅक्ट' पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. 

·         'चार्लस वुड' ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.

·         इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा 'बंगाल रेंट अॅक्ट' कॅनिंगच्या काळात करण्यात आला. 

·         इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन 'निल दर्पण' या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले. 

·         लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास 'अर्ल' हा किताब बहाल केला. 

·         इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी 'फॅमिना कमीशन' ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली. 

·         व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली. 

·         14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास 'प्रांतीय स्वायत्तेची सनद' असे मानण्यात येते. 

·         लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती

·         सर्वपक्षीय सभेत नेहरू रिपोर्टवर एकमत झाले तरी ते दिखाऊ होते. कारण मूस्लीम लीगचा विरोध मूलभूत स्वरूपाचा व जातीय होता. लीगमधील मुस्लिमांना हा रिपोर्ट मान्य नव्हताच; म्हणून त्याचा फेरविचार करण्यासाठी आगाखानांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928मध्ये मुस्लीम लीगचे दिली येथे खास अधिवेशन भरविण्यात आले. 

·         बॅ. जीना या परिषदेला हजर राहिले. त्यांना सर्वपक्षीय सभेत मोठा विरोध झाला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते.

लीगच्या अधिवेशनात त्यांनी आपले राजकीय तत्वज्ञान त्यांच्या प्रसिद्ध 'चौदा मुद्यात' सांगितले.

 

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे :

·         भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांतांकडे असावेत. 

·         सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी. 

·         सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये. 

·         केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे. 

·         स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल. 

·         पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये. 

·         सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे. 

·         कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये. 

·         मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा. 

·         वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात. 

·         राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत. 

·         मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात. 

·         केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत. 

·         केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.

भारतातील जनक विषयी माहिती

·         भारताचे राष्ट्रपिता - महात्मा गांधी

·         आधुनिक भारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू 

·         भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक 

·         स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन 

·         राष्ट्रीय काँग्रेसचे जनक - अॅलन हयूम 

·         हरितक्रांतीचे जनक - डॉ. स्वामीनाथन 

·         चित्रपटसृष्टीचे जनक - दादासाहेब फाळके 

·         राज्यघटनेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

·         धवलक्रांतीचे जनक - डॉ. कुरियन 

·         वनमहोत्सवाचे जनक - कन्हैयालाल मुन्शी

भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 1

1. लॉर्ड कॅनिंग (सन 1858-62)

·         फेब्रुवारी 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंगने लॉर्ड डलहौसीकडून गव्हर्नर जनरल पदाची सुत्रे हातात घेताच सन 1857 च्या उठावाला सुरवात झाली. लॉर्ड कॅनिंगने मोठ्या कौशल्याने व धैर्याने हा उठाव दडपून टाकला. सन 1858 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने एक जाहीरनामा पास केला.

·         राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील राज्यकारभाराचे अधिकार इंग्लंडच्या राणीकडे गेले.

·         कंपनीच्या गव्हर्नर जनरलला व्हॉईसरॉयचा (इंग्लंडच्या राजाचा प्रतीनिधी) दर्जा देण्यात आला. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉईसरॉय होय.

·         सन 1861 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा पास केला. या कायद्यानुसार मद्रास (1862), मुंबई (1862) व कलकत्ता (1862) या ठिकाणी उच्च न्यायालयाने स्थापन करण्यात आली.

·         सन 1860 मध्ये इंडियन पिनल कोड लागू करण्यात आले.

 

2. लॉर्ड मेयो (सन 1869-72)

·         लॉर्ड मेयोने भारतीय जनतेविषयी सुधारणावादी दृष्टीकोण स्विकारून अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्या.

·         लॉर्ड मेयोच्या काळात भारतात जनगणना पद्धतीला सुरुवात झाली. भारताची पहिली जनगणना सन 1872 मध्ये करण्यात आली. त्यानंतर भारतात दर दहा वर्षानी जनगणना करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

·         सन 1870 मध्ये लॉर्ड मेयोने एका ठरावाव्दारे प्रांतांना निश्चित स्वरूपाची रक्कम अनुदान देण्याची आणि त्या अनुदानची रक्कम खर्च करण्याचे प्रांतांना स्वतंत्र दिले. त्याने केलेल्या या सुधारणेमुळे लॉर्ड मेयोला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात.

·         सन 1870 मध्ये भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान तांबडया समुद्रातून समुद्रतार टाकण्यात आली. या घटनेमुळे भारत इंग्लंड या दोन देशात थेट संदेश वहन सुलभतेने होऊ लागले. याच काळात सुवेझ कालवा बांधून पूर्ण झाल्यामुळे इंग्लंड आणि भारत या दोन राष्ट्रातील प्रवासाचा वेळ कमी झाला.

 

3. लॉर्ड लिटन (सन 1876 ते 1880)

·         लॉर्ड डलहौसीनंतर भारतात सर्वोच्च अधिकारपदी आलेला लॉर्ड लिटनहा दुसरी साम्राज्यावादी विचारसरणीचा व्यक्ती होय. लॉर्ड लिटनची ही कारकीर्द भारताच्या इतिहासात जुलमी लिटनशाही म्हणून ओळखली जाते.

भारतभर दुष्काळ :-

·         सन 1876 ते 1878 या काळात म्हैसूर, हैदराबाद, मध्यप्रदेश, पंजाब, मद्रास व मुंबई या सर्व प्रांतांत मोठया प्रमाणात दुष्काळ पडला होता. लॉर्ड लिटनने या दुष्काळावर उपाययोजना सुचविण्याकरिता सर रिचर्ड स्ट्रेचे समिती नेमली. या समितीच्या शिफाररसीवर आधारित लिटनने उपाययोजना केल्या परंतु तोपर्यंत बरीच मनुष्यहानी झाली होती. यामुळे लॉर्ड लिटनला भारतीय लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले.

दिल्ली दरबार :-

·         सन 1876 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एका कायद्याव्दारे इंग्लंडच्या राणीला प्रदान करण्यात आलेल्या कैसर-ए-हिंद या पदवीची घोषणा करण्याकरिता लिटनने दिल्ली येथे शाही दरबार भरविला.

 

4. लॉर्ड रिपन (सन 1880 ते 1884)

·         भारतीय इतिहासात उदारामतवादी रिपन म्हणून ओळखला जातो.

पहिला फॅक्टरी अॅक्ट :-

·         भारतातील कारखान्यामध्ये काम करणार्‍या कामगारांची परीस्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड रिपनने सन 1881 मध्ये पहिला भारतीय फॅक्टरी अॅक्ट पास केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक :-

·         लॉर्ड रिपनने सन 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात.

शिक्षण पद्धतीत सुधारणा :-

·         सन 1882 मध्ये लॉर्ड रिपनने सर विल्यम हंटर समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारसीमुळे शिक्षणव्यवस्थेतील सरकारी नियंत्रणे कमी होऊन भारतात खाजगी शिक्षण संस्था काढण्यास चालना मिळाली व त्यांना अनुदान देण्याची पद्धत अंमलात आली.

इलबर्ट बिल :-

·         न्यायपद्धतीमध्ये समानता आणण्याच्या उद्देशाने लॉर्ड रिपनने सर पी.सी, इलबर्टच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. या समितीच्या अहवालातील तरतुदीनुसार भारतीय न्यायधीशांना इंग्रज व्यक्तीवर खटला चालविण्याचा अधिकार मिळणार होता.

भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 2

5. लॉर्ड डफरिन (सन 1884 ते 1888)

 

·         लॉर्ड रिपननंतर लॉर्ड डफरिनची भारताचा व्हॉईसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर अॅलन ह्युमच्या प्रयत्नामुळे सन 1885 मध्ये व्हॉईसरॉय लॉर्ड डफरिनच्या काळात मुंबईत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

 

6. लॉर्ड कर्झन (सन 1899 ते 1905)

·         लॉर्ड कर्झनचा कार्यकाल भारताच्या इतिहासामध्ये कर्झनशाही म्हणून ओळखला जातो. लॉर्ड कर्झने त्याच्या काळात खालील सुधारणा केल्या.

शेतीविषयक सुधारणा :-

·         शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा व्हावा म्हणून कर्झनने 1904 मध्ये सहकारी पतपेढी कायदा पास केला. पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना आणि नागपूर, पुणे व कानपुर या ठिकाणी कृषी महाविद्यालये सुरू केली.

पोलिस विभागातील सुधारणा :-

·         सन 1902 मध्ये प्रत्येक प्रांताकरिता सी. आय.डी.(गुन्हा अन्वेषण विभाग) स्थापना करण्यात आली व पोलिसांना प्रशिक्षण देण्याची योजना लागू केली.

प्राचीन स्थारक कायदा :-

·         भारतातील प्राचीन स्मारकाचे रक्षण करण्याकरिता सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा पास केला. सांची येथील स्तूप, अंजिठा, वेरूळची लेणी यांच्या दुरूस्तीकरिता खर्च मंजूर केला.

बंगालची फाळणी :-

·         साम्राज्यवादी विचारसरणीच्या कर्झनने राष्ट्रीय सभेतील सदस्यांमध्ये फुट पाडण्याकरिता केवळ प्रशासकीय सोयीचे कारण पुढे करुन बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 19 जुलै 1905 रोजी फाळणीची योजना जाहीर करण्यात आली आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी ही योजना अंमलात आली. या दिवशी बंगाल प्रांताचे पुर्व बंगाल व पश्चिम बंगाल असे दोन स्वतंत्र प्रांत करण्यात आले.

 

7. लॉर्ड मिंटो (सन 1905 ते 1910)

·         लॉर्ड मिंटो नंतरचा काळ भारतीय इतिहासामध्ये राजकीय जागृतीचा काळ म्हणून ओळखला जातो.

मुस्लिम लीगची स्थापना :-

·         लॉर्ड मिंटो यांच्या सल्ल्यानुसार डिसेंबर 1906 मध्ये डाक्का येथे नवाब सलीमुल्लाखान यांच्या अधक्ष्यतेखाली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली.

मोर्ले मिंटो सुधरणा कायदा :-

·         भारतमंत्री लॉर्ड मोर्ले व व्हॉईसरॉय मिंटो विचार विर्मशातून भारतीय कायदेमंडळाच्या सुधारणेबाबत एक विधेयक तयार करण्यात आले. हे विधेयक मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909 म्हणून ओळखले जाते. या कायद्यानुसार मुस्लिम लोकांना जातीय मतदार संघ मंजूर करण्यात आले.

 

8. लॉर्ड हार्डिंग (सन 1910 ते 1916)

लॉर्ड हार्डिंगच्या काळातील सुधारणा :

दिल्ली दरबार :-

·         ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांनी सन 1911 मध्ये भारताला भेट दिली. त्यांच्या भारत भेटीप्रीत्यर्थ दिली येथे बोलविण्यात आलेल्या शाही दरबारात भाषण करतांना त्यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची व भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा केली.

दिली कट :-

·         सन 1912 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलविण्यात आली. राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रसंगी व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंग दिल्लीत प्रवेश करीत अवधबिहारी बोस नावाच्या क्रांतिकारकाने हार्डिंगच्या हत्तीवर बॉम्ब फेकला. यामध्ये हार्डिंग वाचला पण, हत्ती हाकणारा माणूस मात्र ठार झाला. ही गोष्ट दिली कट म्हणून ओळखली जाते.

भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 3

9. लॉर्ड चेम्सफोर्ड (सन 1996 ते 1921)

·         लॉर्ड हार्डिंगनंतर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचा व्हॉईसरॉय झाला. याच काळात गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली.

मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा (सन 1919) :-

·         डिसेंबर 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा - 1919 पास केला. या कायद्यामध्ये प्रांतिक कायदेमंडळातील काही खाती भारतीयांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. जी खाती भारतीयांकडे सोपविण्यात आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जात व जी खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली त्या खात्यांना आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जात व जी खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली त्या खात्यांना राखीव खाती म्हणून ओळखली गेली आणि केंद्रीय कायदेमंडळात व्दिगृही सभागृहाची स्थापना करण्यात आली.

रौलॅक्ट कायदा :-

·         भारतातील क्रांतिकारक कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर सिडने रौलॅक्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीवर आधारित भारत सरकारने अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. हा कायदा भारताच्या इतिहासात रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा म्हणून ओळखला जातो.

 

10. लॉर्ड आयर्विन (सन 1926 ते 1931)

आयर्विनच्या काळातील घटना :

सायमन कमिशन (सन 1927) :-

·         भारतमंत्री बर्कनहेड यांनी सन 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली भारतात एक कमिशन पाठविले या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसने या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

पहिली गोलमेज परिषद (सन 1930) :-

·         सन 1930 मध्ये स्यामान कमिशन अहवालावर चर्चा करण्याकरिता ब्रिटिश शासनाने 1930, 1931 आणि 1932 या तीन वेळा लंडनला गोलमेज परिषद बोलाविली होती. काँग्रेसने पहिल्या व तिसर्‍या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता.

गांधी आयर्विन करार (सन 1931) :-

·         महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घ्यावे व सन 1931 मध्ये लंडन येथे होत असलेल्या दुसर्‍या गोलमेज परीषदेत काँग्रेसने भाग घ्यावा या उद्देशाने महात्मा गांधी व आयर्विन यांच्यात 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. या कारारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घेण्याचे व दुसर्‍या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे मान्य केले होते.

भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 4

11. लॉर्ड वेलिंग्टन (सन 1931 ते 1936)

लॉर्ड वेलिंग्टन च्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनोल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला.

दुसरी गोलमेज परिषद :-

·         सन 1931 मध्ये लंडन येथे दुसरी गोलमेज परिषद भरली होती. गांधी आयर्विन करारानुसार या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधीजी हजर होते. मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्टर जिना व गांधीजी यांच्यात मुस्लिम जनतेच्या नेतृत्वाच्या प्रश्नावरुन वाद निर्माण झाल्यामुळे हि परीषद यशस्वी होऊ शकली नाही.

जातीय निवाडा :-

·         ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी अस्पृश्य लोकांकरीता स्वतंत्र जातीय मतदार संघाची घोषणा केली. हि गोष्ट जातीय निवाडा म्हणून ओळखली जाते. हा निवाडा लागू होऊ नये म्हणून सन 1932 मध्ये पुणे येथील येरवडा तुरंगात गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 रोजी करार झाला. हा करार पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराअंतर्गत स्वतंत्र जातीय मतदार संघाऐवजी राखीव जागा हे स्वीकारण्यात आले.

भारत सरकार कायदा (सन 1935) :-

·         सन 1930, 1931 1932 या तीन वेळा भरलेल्या गोलमेज परिषदेच्या चर्चेवर आधारित 1933 मध्ये श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आणि या श्वेतपत्रिकेवर आधारित 1935 चा भारत सरकार कायदा पास करण्यात आला.

या कायद्याची वैशिष्टे -

·         भारतात संघराज्य पद्धती स्विकारण्यात आली.

·         प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली व प्रांतिक शासनाचा कारभार भारतीयांकडे सोपविण्यात आला. 

·         संपूर्ण विषयाच्या 1) मध्यवर्ती सूची 2) प्रांतिक सूची 3) समवर्ती सूची अशा तीन सूची तयार करण्यात आल्या.

·         भारत मंत्र्याला सल्ला देण्याकरिता तयार करण्यात आलेले इंडिया कौन्सिल रद्द करून त्या ठिकाणी सल्लागार मंडळाची निर्मिती करण्यात आली. त्याचप्रमाणे भारतमंत्र्याचे अधिकार कमी करण्यात आले. 

·         केंद्रात व्दिदल राजकीय पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. या अंतर्गत मध्यवर्ती सूचितील काही खाती भारतीयांकडे सोपविण्यात आली तर महत्वाची खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली. 

·         सिंध व ओरिसा नवीन प्रांत निर्माण करण्यात आले व ब्रम्हदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. पं. नेहरूंनी या कायद्याचे वर्णन इंजिनाशिवाय ब्रेकची व्यवस्था केली अशा शब्दात केले आहे.

 

12. लॉर्ड लिनलिथगो (सन 1936 ते 1944)

प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका :-

·         1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक शासन व्यवस्था भारतीयांकडे सोपविण्याच्या उद्देशाने सन 1937 मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये भारतातील एकूण अकरा प्रांतापैकी आठ प्रांतात काँग्रेसची सरकारे सत्तेवर आली व तीन प्रांतात संयुक्त पक्षाची सरकारे स्थापन झाली. मुस्लिम लिगला एकाहि प्रांतात बहुमत मिळाले नाही.

प्रातिक कायदेमंडळाचे राजीनामे (1939) :-

·         1 सप्टेंबर 1939 रोजी दुसर्‍या महायुद्धाला सुरुवात झाली. ब्रिटिश शासनाने काँग्रेसला विचारात न घेता भारताला युद्धात ओढल्यामुळे आठही प्रांतामधील काँग्रेसच्या सरकारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.

क्रिप्स मिशन :-

·         दुसर्‍या महायुद्धाला भारतीय नेत्यांच्या सक्रिय पाठींबा मिळविण्याकरिता त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा उद्देशाने इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी स्ट्रफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक मिशन भारतात पाठविले. मार्च 1942 मध्ये स्ट्रंफर्ड क्रिप्स भारतात आले. त्यांनी आणलेल्या अहवालामध्ये भारताला युद्ध संपल्यानंतर वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल अशी तरतूद होती. ही तरतूद काँग्रेसने अमान्य केली व चलेजाव आंदोलनाची घोषणा केली.

 महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 1

·         महाराष्ट्रातील नेवासे,चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. 

·         महाराष्ट्रातील महापाषाण  युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे. 

·         मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.

·         जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे 'सातवाहन' हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. 

·         'सिमुक' हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. 

·         सातवाहन 'राजा सातकर्णी' प्रथम व त्याची रानी 'नागणिका' यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते. 

·         चालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते. 

·         इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर 'दंतीदुर्ग' याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली. 

·         राष्ट्रकूट  घराण्यातील 'कृष्ण प्रथम' याने जगप्रसिद्ध असलेले 'वेरूळ येथील कैलास मंदिर' बांधले . 

·         शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती. 

·         शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून 'विद्याधर जीमुतवाहन' हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर(तेर) हे त्याचे मूल स्थान होय. 

·         चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक 'कोल भिल' हा होता.

·         यादवांचा प्रधान हेमाद्री याने 'चातुरवर्ग चिंतामणी' हा ग्रंथ लिहिला. 

·         अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.

·         महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना 'हसन गंगू बहामणी' याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो. 

·         बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले -

1.    वर्हाडी-इमादशाही

2.    अहमदनगर-निजामशाही

3.    बिदर-बरीदशाही

4.    गोवलकोंडा-कुतुबशाही

5.    विजापूर-आदिलशाही

·         विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली.

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 2

·         'गुरु नानक' हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. 

·         गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठांनांकडून त्यांची हत्या झाली.

·         19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 

·         10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली. 

·         6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 

·         3 एप्रिल 1680 रोजी छत्रपति शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. 

·         1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले. 

·         1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली. 

·         शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला 'शिवशाही काठी' असे म्हटले जात असे. 

·         शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये 'होन' हे सोन्याचे तर 'शिवराई' हे तांब्याचे नाणे होते. 

·         दक्षिण भारतामध्ये 'नायनार आणि अलवार' या भक्ती चळवळी उदयास आल्या. 

·         महाकवी सूरदास यांनी 'सुरसागर' हे काव्य लिहिले. 

·         शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली. 

·         23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली. 

·         1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3

·         इंग्रजांनी उमजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला. 

·         उमजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले. 

·         उमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजिला पुण्याच्या मुळशिजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली. 

·         नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.

·         3 फेब्रुवारी 1834 रोजी उमजी नाईकाला फाशी देण्यात आली. 

·         कोळी  जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटीशांविरोधी रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली उठाव केला. 

·         पुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला. 

·         ब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.

·         स्वातंत्र्य वीर सावरकरांनी 1857 च्या उठावास  पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे. 

·         सातार्याचे छत्रपति प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी 1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले. 

·         1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला. 

·         नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता. 

·         13 जून 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला. 

·         1857 साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्यांनी सावकारविरुद्ध केलेले उठाव होत. 

·         वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील 'सिरधोण' येथे झाला. 

·         गणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून 'ऐक्यवर्धणी' ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात 1874 'पुना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू केली.

·         20 फेब्रुवारी, 1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी,महार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1

·         इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले.

·         इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी 'स्वराज्य' हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावरून 'स्वराज्य' या ध्येयाची प्रथमच घोषणा. याच अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला. 

·         1907 च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले. 

·         व्हाईसरॉय कर्झनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय बनला.

·         भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून रिपनला ओळखतात. 

·         हार्डिंगने ब्रिटिशांची राजधानी कोलकत्याहून दिल्लील्ला हलवली. 

·         भारतमंत्री मॉन्टेंग्यूच्या रोपोर्टनूसार व्हाईसरॉय चेम्सफोर्डने प्रांतात व्दैध प्रशासनाचा (व्दिदल शासनपद्धती) प्रारंभ केला.

·         1919 ला पंजाब प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला. 

·         13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग हत्याकांड घडले. 

·         लखनौ अधिवेशन (1916): या अधिवेशनात काँग्रेस 1907 नंतर सांधली गेली. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजूमदार. या अधिवेशनात 1909 च्या मोर्ले मिंटो कायद्याव्दारे मुस्लिमांना दिलेल्या स्वतंत्र मतदार संघाची तरतूद काँग्रेसने मान्य केली. 

·         होमरूल चळवळ म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळणे होय. 

·         होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती. 

·         होमरूल चळवळ भारतात सुरू करण्याचे श्रेय आयरिश विदुषी अॅनी बेझेंटकडे जाते. 

·         1 सप्टें. 1916 पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली. 

·         एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे स्वतंत्रपणे होमरूल चळवळीसाठी संघटना स्थापन केली.

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2

·         टिळकांनी स्थापन केलेल्या होमरूल लिगचे अध्यक्ष - बॅरिस्टर बॅप्टीस्टा तर सचिव : न.ची. केळकर

·         ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्याची निर्मिती हे होमरूल चळवळीचे उद्दिष्ट होते. 

·         होमरूल चळवळीमुळेच ब्रिटीश सरकारला ऑगस्ट 1917 मध्ये भारतात टप्या टप्याने वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याबाबतची घोषणा करावी लागली. 

·         अॅनी बेझंट यांनी 'कॉमनविल' हे साप्ताहिक व 'न्यू इंडिया' हे दैनिक सुरू केले. 

·         1917 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अॅनी बेझंट यांची निवड करण्यात आली. 

·         1916 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुस्लीम लीगच्या स्वतंत्र मतदार संघास मान्यता दिली. 

·         रौलेट अॅक्ट - राजद्रोह्यांना आळा घालण्यासाठी विनाचौकशी डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यान्वये सरकारला मिळाला. हा कायदा 18 मार्च 1919 मध्ये पास झाला. 

·         जालीयनवाला बाग हत्यांकांड- 13 एप्रिल 1919, रौलेट कायद्याचा निषेध व डॉ. किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे भरलेल्या सभेवर जनरल डायरने 1600 फैरी झाडल्या. 

·         जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये हंटर कमिशन नेमले. 

·         खिलाफत चळवळ - 1919 (अलीबंधूंनी सुरू केली) 

·         24 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषेदेचे अध्यक्ष माहात्मा गांधी होते. 

·         तुर्कस्थानाच्या पाशाला पाठींबा दर्शविण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध एकत्र येऊन चळवळ करणार्‍या चळवळीस खिलाफत चळवळ म्हटले जाते. 

·         20 फेब्रुवारी 1920 रोजी नागपूर येथे खिलाफत सभेचे खास अधिवेशन भरले. या अधिवेशनात असहकार चळवळीस पाठींबा दर्शविला. 

·         1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ प्रारंभ करण्याची गांधीजींची घोषणा केली.

वेव्हेल योजना विषयी माहिती

·         मे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले. इंग्लंड विजयी झाले. लवकरच पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या. चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता. त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती. आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते. 

·         युद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती. अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते. कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती. मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती. 

·         विलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले. 14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली. 

·         नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे. 

·         जपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे. 

·         त्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील. त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील. 

·         भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील. 

·         पक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील. 

·         केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल. 

·         विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.   

·         25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली. युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते. तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले. बॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली. व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता. तो हक्कच जिना अमान्य करीत होते. 

·         याशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत. त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या. 

·         भारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता. भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती. मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या. त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही. म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला.

सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती

·         समाजसुधारक - संस्था व समाज 

·         रमाबाई रानडे - सेवासदन-पुणे 

·         पंडिता रमाबाई - शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे

·         गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज 

·         कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस. 

·         महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ

·         महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ. 

·         डॉ. शिवाजीराव पटवर्धन - जगदंबा कुष्ठ निवास. 

·         डॉ. आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज.

स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना भाग 1

·         स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.

·         स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.

·         भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते. 

·         भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते. 

·         26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले. 

·         20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.
 

·         17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले. 

·         भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. 

·         डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. 

·         घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. 

·         26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.

·         घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.

स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना भाग 2

·         इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली. 

·         'दार समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले. 

·         तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले. 

·         आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी अस्तित्वात आले. 

·         राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते. 

सदस्य- के. एम. पंनीकर  हृदयनाथ कुंझरू हे होते. 

·         केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला. 

·         1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. 

·         1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 

·         1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले. 

·         1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली. 

·         1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले. 

·         1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली. 

·         1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.

 

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages